शेअर बाजारात गुंतवणूक करता येईल का?

Submitted by Mi Patil aahe. on 22 January, 2019 - 08:28

मला गुंतवणूक करायची आहे ती सुद्धा शेअर्स मार्केट मध्ये! त्यासाठी काय करावे लागते? शेअर्स खरेदी करताना अन् विकताना कोणती काळजी घेण्याआधी ते शेअर्स कसे जपावे,हे कळणे महत्वाचे आहे का? कृपया मान्यवरांची योग्य मार्गदर्शन, माहिती हवी आहे,ती मिळाली तर आनंदच होईल तरी मिळावी ही नम्र विनंती!!!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला सगळ्यात प्रथम डिम्याट अकाउंट लागेल. सध्या आपल्याकडे म्हणजे भारतात शेरखान, अपस्टॉक, झेरोधा यामध्ये तुम्ही हे अकाउंट उघडू शकता, एकदा का तुम्ही सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण केल्यात की तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड मिळेल मग तुम्ही शेअर खरेदी विक्री करू शकता

असे ऑनलाईन सल्ले घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. त्याऐवजी एक चांगला अर्थ सल्लागार गाठा आणि त्याच्या सल्ल्याने स्वत:च्या पैशाची गुंतवणूक अर्थबाजारात करा.

लहान म्हटले तरी किती पर्यंत रक्कम गुंतवावी, सुरूवातीला?>>>>लहान म्हणजे एवढी कमी कि लॉस झाला तरी चार घास सुखाचे जातील आणि शांत झोप लागेल. Happy

आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक बऱ्याच जणांना मोहात पाडते. पण बाजारातील धोके ओळखणे फार कठीण आहे. कमी अवधीच्या लक्ष्यासाठी जमवलेली पूर्ण रक्कम शेअरमध्ये गुंतवण्याचा सल्ला योग्य ठरणार नाही. तसेच चांगल्या कंपन्यांचे शेअर मध्ये पैसे गुंतवणे जास्त जरुरी आहे. सर्वप्रथम थोडी रक्कम चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवून पहा. तसेच आपली जोखीम क्षमता ओळखूनच अतिरिक्त पैशांची गुंतवणूक करा. शेअर बाजारातील गुंतवणूदारांचे अध्ययन करण्यासाठी एक लेख खालील ब्लॉग वर लिहिला आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.
मला आवडलेले पुस्तक - भाग ४ Stocks to Riches (इंग्लिश)
https://akshargaane.blogspot.com/2019/12/stocks-to-riches.html

गुंतवणूक विश्वात शेअर बाजाराचे एक वेगळे इथं आहे . इथे चांगला परतावा मिळण्याची नेहमी संधी असते . पण काही मूलभूत नियम स्वतःसाठी पक्के करून ठेवले आणि त्यानुसार वागले तर कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त फायदा आपण स्वतःला करून देऊ शकतो. काही नेहमी आढळणाऱ्या चुकांवर खालील ठिकाणी एक लेख लिहिला आहे. कृपया अवलोकन करा.

शेअर बाजारातील संभाव्य नुकसान कसे टाळावे?
https://akshargaane.blogspot.com/2019/12/blog-post_24.html?m=1

कसला टुकार ब्लॉग आहे. पहिलीतलं पोरगं पण जास्त चांगलं सांगेल या ब्लॉगपेक्षा.

डिम्याट अकाउंटसाठी ICICI Direct हा पर्याय कसा आहे? Max. ₹5 lakh per transaction, Only for equities, no options/futures/derivatives/currency transactions

अति अवांतर: एका adviser ला भेटलो. तो माझे पैसे मॅनेज करीन म्हणाला. मी विचारले की फी स्ट्रक्चर काय आहे? तर म्हणाला की 2.5% per annum (1.25% every 6 months). ते ऐकून मी खुर्चीतून खाली पडलो.

.

ICICI Direct: Equity delivery brokerage is high.
UI - not so informative and slow.
Customer support: Patience is required to make them understand what your issue is and not to respond just by reading few random words in the e-mail message and that it's a good idea to read a message fully and then respond. (This you have to do every time.)

बाकी ठीक आहे. तुम्हाला derivatives मध्ये इंटरेस्ट नसल्याने त्यांचा Neo plan उपयोगाचा नाही. तो घेण्यासाठी आग्रह होऊ शकतो म्हणुन सांगितले.

Zerodha , IIFL, फ्री फॉर equities only, options/futures/derivatives/currency transactions chargeable

फ्री असेल तरी कर आणि exchange /demat charges द्यावे लागतात . साधरणतः ०.११% घेताना/विकताना आणि विकताना २० रुपये पण स्र्किप्ट .
डीमॅट २०० ते ५०० रुपये वर्षाला
ह्या सगळ्यावर १८% GST

Zerodha ला फोन केला होता. त्यांचे कमिशन सगळ्यात कमी आहे. ब्रोकरेज फी ०.५% or ₹ १०० whichever is lower for non-intraday असे सांगितले. Quarterly fees ₹ १२५ + gst = ₹ १४८. बाकी इतर गव्हर्नमेंट फीज सर्वाना सारख्याच आहेत.

ब्रोकरेज फी ०.५% or ₹ १०० whichever is lower for non-intraday>>>
हे NRI अकाउंट साठी असेल.
रहिवासी भरतीयांसाठी नॉन इंट्रा डे इक्विटी साठी शून्य ब्रोकरेज आहे.
---
IIFL equity delivery free नाहीय साहिल.
त्यांचे डेरिव्हेटिव्ह साठी 20/order किंवा 5/lot प्लॅन्स आहेत, किमान १५ की २० लाख कॅपिटल साठी 2/lot प्लॅन सुद्धा आहे पण त्यातही equity delivery free नाही.

IIFL equity delivery free नसेल तर relationship manager ला फोन करुन झिरोदा चे रेट मॅच करायला सांगा , ते करतात स्वानुभवरुन सांगतोय.

आमचं असं का होतं ते कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही.

१) आम्ही एखादा शेअर उत्तम आहे म्हणून विकत घेतला कि सुरुवातीला तो थोडा चढतो मग आम्ही अजून थोडे विकत घेतो. मग तो परत थोडा चढतो म्हणून आम्ही अजून थोडे शेअर विकत घेतो. यानंतर तो शेअर जो पडतो तो काही परत वर येत नाही

२) एखादा चांगला शेअर घेतलेला असतो तो पडायला लागला कि आम्ही स्टॉप लॉस लावतो. स्टॉप लॉस च्या किमतीला आल्याबरोबर सर्व शेअर विकले जातात आणि आपले नुकसान कमी झाले या समाधानात असतो तर त्यानंतर हा शेअर चढत जातो आणि त्यात पैसे गुंतवलेल्याना दाम दुपटीपेक्षा जास्त नफा देतो.

३) यामुळे आम्ही एखादा शेअर पडलेला असताना विकत घेतो आणि शांत बसून राहतो. हा शेअर चढत चढत जातो दुप्पट होतो तिप्पट होतो म्हणून खुशीत येऊन आम्ही तो विकून चांगला नफा पदरात पडला म्हणून खुश होतो तर हा शेअर चढत चढत दसपटीपेक्षा जास्त जातो, वर एकास एक बोनस देतो.

४) असाच एखादा शेअर वर वर चढत असताना सर्वत्र त्याचे गुणगान चालू असते म्हणून मग fomo होऊ नये म्हणून आम्ही तो विकत घेतो त्यानंतर तो थोडासा चढतो आणि मग इतका गडगडतो कि ५ % सुद्धा मूल्य हातात येत नाही

५) एखादा शेअर दहा पट चढला म्हणून आम्ही तो विकून टाकतो आणि त्यानंतर त्याचा बोनस शेअर निघतो. परत आम्ही हात चोळत बसतो

६) आम्ही एखादा शेअर फारच स्वस्त आहे म्हणून भरपूर विकत घेतो आणि तो एके दिवशी मल्टी बॅगर होईल म्हणून गाजरे खात असतो. पण एके दिवशी या शेअरला लोअर सर्किट लागते आणि आम्हाला विकायचा असला तरी कोणीच घेत नाही आणि एक दिवशी शेअरची बाजारात खरेदी विक्रीच बंद होते आणि प्रत्येक वेळेस बाजारातून येणाऱ्या समाभागांच्या सूचित शेअर खरेदी विक्री बंद आहे म्हणून नोंद आम्हाला खिजवत राहते.

७) या सगळ्याला कंटाळून आम्ही शेवटी बाजारातून नुकसान सोसून बाहेर पडतो आणि आपला पैसे सुरक्षित अशा बँकेच्या मुदत ठेवीत जमा करतो.
यानंतर बाजार चढतच जातो आणि आम्ही विकलेले प्रत्येक समभाग आम्हाला वाकुल्या दाखवत राहतात. याशिवाय बँकेत ठेवलेल्या मुदतठेवी १० % कर कापून व्याज खात्यात जमा करतात ते पाहून हसावे कि रडावे कळत नाही

आमचं असं का होतं ते कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही.

यातले एक किंवा अनेक अनुभव आपल्यापैकी सर्वाना कधीना कधी आलेले आहेतच.

वरील मुद्दे हे ट्रेडिंग संबंधीचे (इंट्रा डेच नव्हे, काही दिवस /आठवडे/महिने होल्ड करून विकण्याचे ट्रेडिंग - ज्याला स्विंग आणि पोझिशनल म्हणतात) वाटतात. तर...:

शेअरचा चार्ट बघितला तर एक बॉटम आणि एक टॉप लेवल दिसेल.
आपण बॉटम लेव्हलच्या आसपास विकत घ्यावा आणि टॉप लेव्हलच्या आसपास विकून जास्तीत जास्त फायदा पदरात पाडून घ्यावा असे स्वप्नरंजन आपण बहुतेकजण करत असतो.
पण बॉटम लेव्हल कोणती आणि टॉप कोणती हे तो भूतकाळ झाल्यावरच कळते, वर्तमानात कधीच कळत नाही. टेक्निकल ऍनॅलिसिस वगैरे फक्त शक्यता दर्शवते, ते आपण बऱ्यापैकी शिकलो तरी त्याचा वापर असा बॉटम लेव्हलजवळ एन्ट्री आणि टॉपलेव्हल जवळ एक्झिटसाठी करण्याचा अट्टाहास करू नये. मोमेंटम बघून एन्ट्री घ्यावी आणि ओंजळ भरली की एक्झिट करून दुसरी मोमेंटम पकडणारी गंगा शोधावी. अजून थांबलो असतो तर बादली भरली असती की वगैरे हळहळ करत बसू नये.
असे समजा की बॉटम लेव्हल शून्य आणि टॉप लेव्हल शंभर.
तर यातील १० ते १५ जरी पदरात पडले तरी मी त्यात समाधान मानेन.

<पण बॉटम लेव्हल कोणती आणि टॉप कोणती हे तो भूतकाळ झाल्यावरच कळते, >+१.

अगदी. कालच याबद्दल एका मित्राशी बोलणं झालं. अर्थात ते शेअर्सबद्दल नव्हे, तर म्युच्युअल फंड बद्दल होतं. त्याचं म्हणणं, कोव्हिड पसरायला सुरुवात झाल्यावर आपण आपली गुंतवणूक लिक्विडेट करून घसरण थांबल्यावर पुन्हा एंट्री घ्यायला हवी होती. सेम युक्रेन युद्ध, अदाणी शॉर्ट सेलर प्रकरण. मी म्हटलं तेव्हा ते आपल्यासारख्यांना लोकांना तरी लक्षात येणं कठीण. आणि पडझड इतकी झटपट होते की वेळ निघून गेली आहे, असं वाटतं.

म्युच्युअल फंडाच्या बाबतीत कायम मार्केटमधे सिप करत रहायचे. योग्य असेट अलोकेशन निवडून त्यानुसार फंड निवडायचे आणि खात्यातून ठराविक तारखेला पैसे गुंतवले जाण्यासाठी सुरवातीचे काय ऑनलाइन सेट अप असेल ते करायचे. वर्षातून एकदा असेट अलोकेशन योग्य आहे ना ते बघून त्यानुसार थोडे अ‍ॅडजस्ट करायचे. बस्स!

माझा प्रश्न - अमेरीकेन नागरिक म्हणून भारतात गुंतवणूक करायची असेल तर फक्त इंडियात गुंतवणूक करणारा इंटरनॅशनल फंड/ETF योग्य राहील का?
उदा. iShares MSCI India ETF किंवा Franklin FTSE India ETF

म्युचुअल फंड गुंतवणूकीवर नात्यातील जेष्ठ व्यक्तीने नुकतेच पुण्यात एक सेमिनार अटेंड केले. सेमिनार फ्री होते. त्यांना आवडले म्हणून मला त्याची लिंक पाठवली ती खाली देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=PP9N8OeByeM

>> "मला गुंतवणूक करायची आहे ती सुद्धा शेअर्स मार्केट मध्ये! त्यासाठी काय करावे लागते?"
Do these things first:
1. Understand risk management
2. Understand position sizing
3. Understand how to find TOP gainers

Check this twitter handle: ChartStudy_IN for latest potential stocks.

Hope this helps.