महिला सक्षमीकरण म्हणजे काय बरे????

Submitted by Mi Patil aahe. on 15 January, 2019 - 06:09

काल "मिटक्वान इ स्कूल" चे उद्घाटनप्रसंगी आलेले राजकीय (आमदार वगैरे...) इंडस्ट्रियल मान्यवर (अर्थात सर्व पुरुष) महिला सक्षमीकरण वर जास्त भर देत होते.जे ते सर्व ऐकून ऐकून गुळगुळीत झालेले शब्द,वाक्य पुन्हा आपल्या तोंडून प्रेक्षकांच्या कानाला ऐकवत होते, खरंतर मला अशा औपचारिक कार्यक्रमांत सहभागी व्हायला फारसं मनाला रूचत नाही,पण नाईलाजाने का होईना मी हजेरी लावल्याने हे सारे माझ्या कानात शिरत होते, अन् प्रश्र्नांची मालिका सुरू झाली.त्यातलाच हा एक प्रश्र्न तसा तोही जुनाच पुन्हा नव्याने माझ्या मनातून बाहेर डोकावून पाहू लागलाय बघाss बाहेर---"महिला सक्षमीकरण म्हणजे काय बरे???????"

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

महिला सक्षमी करण म्हणजे महिला पक्षी हाफ ऑफ ह्युमॅनि टी ह्यांना आर्थिक दृ ष्ट्या स्वतंत्र बनवणे. उपजीविके साठी. - स्वतःच्या व तिच्या मुलांच्या व डिपेंडंट पालकांच्या, तिला कोणाव र ही अवलंबून राहावे लागू नये ह्यासाठी समाजाने, तिने स्वतः व सिस्टिमने जसे सरकार, नेते धार्मिक नेते शैक्षणीक धोरण करते. ह्यांनी प्रयत्न करणे.

अजूनही स्त्री म्हणजे एक ब्रीडर अशीच समजूत समाजात प्रिवेलंट आहे. पण एक लैंगिक वस्तू म्हणूण तिचा वापर न व्हावा, तिला तिच्या मनानुसार, मतानुसर जगता यावे, तिचा व तिच्या डिपेंडंट लोकांचा अब्युज होउ नये ह्या साठी तिला आर्थिक बाबींमध्ये स्वतंत्रता आवश्यक आहे
कारण त्यामुळे आवश्यक ते निर्णय विना दडपण घेता येतात.

जेंडर फ्री, समान अधिकार समाजासाठी महिला आर्थिक सक्षमी कर न अनिवार्य आहे.

नवरा हे कधीही उपजीविकेचे साधन मानून जगावे लागू नये कोणत्याच स्त्रीला. त्याच्यावर प्रेम असावे पण ते तिच्या टर्म्स वर.

पण पैसा कमावला की स्री सक्षम होते हा विचार निव्वळ चूकीचा आहे असे वाटते>> संपूर्ण स्त्री स्वातंत्र्य अचीव करायला आर्थिक स्वावलंबन. नुसते पैसे कमवणे नव्हे. कमविलेला पैसा चुकी च्या इन्वेस्ट मेंट, कर्ज अन नेसेसरी शॉपिन्ग , क्रेडिट कार्ड बिले, चुकीचे आर्थिक निर्णय, अनाठाई विश्वास टाकून गुन्हेगारी पुरुषांच्या आश्वासनांना भुलून त्यांना पैसे देणे ह्याने तो पैसा आला तसा जातो. आपले जीवन मनासारखे जगायला पैसा हा फ क्त माध्यम आहे. पण त्याचा योग्य गुंतवणूक करून आपल्या स्वतःच्या तसेच आपल्या डिपेंडंट ना त्याम्च्या इच्छा पूर्ण करायला , शिक्ष्णा च्या संधी एक्स्प्लोअर करायला घरातील मोठ्यांच्या तब्येतीची काळजी घेताना एक महत्वाचा अ‍ॅसेट म्हणून कमविलेल्या पैशाचा उपयोग होतो.

मुलगा व मुलगी ह्यांच्यात केवळ पैसे कमी म्हणून शिक्षण सोडवलेल्या मुलींच्या कहाण्या दर्दनाक आहेत.

इतर तितकीच समतोल महत्वाची स्वातंत्र्ये म्हणजे :

२) निर्णय स्वातं त्रयः आपले जीवन कसे व्यतित करायचे, काय शिकायचे कसे जगयचे कोणाबरोबर जगायचे कुठे जगायचे ह्याचे सर्व निर्णय सक्षम स्त्रीला घेता येतात यावेत.

३) भावनिक व शारिरिक स्वातंत्र्यः आपल्या भावना व्यक्त करायचे स्वातं त्र्य. मन मारून जग्णे हा वाक्प्रचार रद्द झाला पाहिजे

आपल्या शरिर व रिप्रॉ डक्टिव्ह कपॅसिटि संबंधाने आवश्यक ते सर्व निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला मिळायला हवे. करीअर की संसार,
बाळ होउ देणे वा न देणे, सर्व रोगांवरची ट्रीट्मेंट त्या संबंधाने आवश्यक ते नि र्णय व अंतिम निर्णय त्या स्त्रीचा च असला पाहिजे.
कॅन्सर झाला की सुनेला माहेरी फेकून देणारे , मुलगा व्हावा म्हणून बाळंत पने लादणारे लोक असतात हिला कशाला चश्मा, छत्री, सेनिटरी टावेल असे म्हणून पैसे वाचव णारे लोक ही.

५) वैचारिक व मानसिक स्वातंत्र्यः हे फार मोठे व अवघड आहे एका प्रतिसादात लिहिणे शक्य नाही. आपली क्रिएटिवीटी, विचार धारा, धार्मिक जडण घडण राजकीय मते, सामाजिक व्यवहार ह्या संबंधाने मते तिला स्वतःची स्वतः बन्वता आली पाहिजेत. कोन ते ही दडपण किवा मी म्हणतो म्हणून स्पून फीडिन्ग नसावे. तिचे मन फ्री असावे व्यक्त व्हायला. विथ ग्रेट फ्रीडम कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी हे अध्यार्हुत आहे.

स्वातंत्र्य म्हण जे स्वैर पणा नव्हे.

आता ह्याची ग्रिड बनवा. प्रत्येक स्त्री ह्यात कुठल्यातरी पॉइंट्ला असते. तिथून ती कुठे जाते ते सक्षमी करण.

अमा तुमचे सर्व मुद्दे योग्य असले तरी; ज्या पार्श्र्वभूमीवर,(ज्यांनी निर्माण केले आहेत) ते निर्माण झाले आहेत, ती मानसिकता शेवटी ,पुरूषदेहप्रधानच असल्याने ,स्त्री कोणत्याही प्वाईंटवर असली तरी; ती सक्षमीकरणाकडे वाटचाल न करता ;पुन्हा आहे ,त्याच प्वाईंटवर खिळली जाते; ते ही तिच्या कळत-नकळत!!!!!
एवढे मात्र नक्की!!!!!

हाफ ऑफ ह्युमॅनि टी <<< जगाची निम्मी लोकसंख्या...
डिपेंडंट > अवलंबून...
सिस्टिम > पध्दत.. / व्यवस्था..
ब्रीडर > जननी
प्रिवेलंट >> प्रचलीत
अब्युज >> शोषण
जेंडर फ्री >> लिंग निरपेक्ष...
टर्म्स >> अटी

अमा... Light 1

परदेसाई धन्यवाद. आता संपादनाची वेळ गेली. काल घपाघप मुद्दे उतरवले. आता त्याला आधार वगैरे शोधून नीट संपादित करते.

ती मानसिकता शेवटी ,पुरूषदेहप्रधानच असल्याने ,स्त्री कोणत्याही प्वाईंटवर असली तरी; ती सक्षमीकरणाकडे वाटचाल न करता ;पुन्हा आहे ,त्याच प्वाईंटवर खिळली जाते; ते ही तिच्या कळत-नकळत!!!!!
एवढे मात्र नक्की!!!!!>> पाटील ताई, आपल्याला काय होते आहे. आपल्या सोबत काय घडते आहे ते समजणे, कळणे व ते आपल्याला हवे आहे का नाही त्या ऐवजी काय हवे आहे हे पूर्ण समजणे हे खरे सक्षमी करण आहे. इतर फॅक्टरस नेहमी राहणार च आहेत. पुरुष देह प्रधान मानसिकते चा सामना न करता त्या मानसिकतेला एक फॅक्ट ऑफ लाइफ धरून त्या ऐवजी किंवा त्या सिस्टिममधूनच आपल्याला प्रगती करावी लागते. ( पक्षी महिलांना) पण पुरुष व ती मानसिकता म्हणजे काही वरच ढ आहे. आपल्यापेक्षा त्यांना जास्त समजते वगैरे गोड गैरसमजुतीतून शक्य तितक्या लवकर बाहेर येउन स्वतःचा संपूर्ण उत्क र्ष साध णे निदान त्या दिशेने अ‍ॅक्टिव्ह प्रयत्न करणे हे झाले पाहिजे तर
ते सक्षमी करण होईल. तुम्ही लहान आहात वयाने अजून खूप वाचन मनन करा, जगात खूप लेखक लेखिकां नी चांगले लिहून ठेवले आहे यावर तसेच अनेक अनुभव घेउन मग मत बनवा. उधारणा र्थ आता केजीचा एक क्लास शिकवता आहात तर तुम्ही अश्या शाळांचे एक फ्रँचाइस बनवलेत व त्यातून करोड पत्नी झालात तर ते सक्षमी करण होईल.

हा स्त्रीवादाचा मुद्दा नाही शेवटी प्रत्येक हक्क नाकारलेल्या गेलेल्या व्यक्तीचा मुद्दा आहे. व्यक्तीचे सक्षमी करण होणे व त्याला पोषक सामाजिक धोरणॅ, सरकारी सिस्टिम असणे, धर्माचा अडसर नसणे इको सिस्टिम तयार होणे व व्यक्तीकडून अ‍ॅक्टिव्ह प्रयत्न स्वतः च्या उन्नती साठी असे झाले तर विना हक्काच्या व्यक्तींचे जीवन मार्गी लागेल.

पुरुष देह असे काही नाही ग्रेट इट इज अ व्हल्नरेबल थिंग . मुव्ह ऑन गर्ल्स गेट अहेड.

अमा छान लिहित्येस, एक स्वतंत्र असा वेगळा उतारा का लिहित नाहीस. (तुझ्या आजच्या विचारांकरता हजार इंग्रजी शब्द माफ तुला)

अमा, सक्षमीकरण खूप छान मांडलेत. आवडले.

जे आहे त्याच्याशी भांडण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा त्याच्या सोबत किंवा त्याला गृहीत धरून आपले काम करायचे हा विचार खूप आवडला.

खूप छान मुद्दे मांडले आहेत,अमा.
ते स्रीवादाकडून व्यक्तीवादापर्यंत पोहोचले आहेत.
अन् इथेच पुन्हा स्री म्हणून एक स्त्री मागेच राहते !!!
मग पुन्हा जुन्या वादांना,विचारांना खुलं रान मिळत!!!
सिस्टिम चा भाग म्हणून कधी तिचे पालन, किंवा तसे आचरण करू लागतो हे एक व्यक्ती म्हणूनही लक्षात येतंच नाही.
स्री म्हणून तर नाहीच नाही.
पुरुष म्हणून तर विचारायलाच नको.
मग हे सक्षमीकरण ,तेही महिलांच; हे मुद्दे फक्त बोलण्यासाठी,लिहीण्यासाठी उरतात.
महिला सक्षमीकरण म्हणजे काय? असे प्रश्र्न विचारणे ही, हास्यास्पद वाटू लागतात.
आणि स्वत:ची प्रगती, विकास कितीही व कसलेही अडथळे, अडचणी आल्या तरी न डगमगता,न घाबरता जीवनभर,आयुष्यभर करीत राहणे.यशापयाशाची तमा न बाळगता सदैव नविन काहीतरी शिकणे, शिकण्याची तयारी मनाची ठेवणे,स्वत:ला विकसित करीत राहणे,घडवत राहणे, काळाबरोबर चालणे, जमल्यास काळाच्या पुढे एक पाऊल टाकून, जगासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित करून घराचे,घराण्याचे,गावाचे/शहराचे,राज्याचे, किंवा देशाचे नाव जगात गाजवणे------ हे (ह्या पायय्रा) तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात करीतच असते फक्त पार्श्र्वभूमी वेगळी असते.
पण स्त्री म्हणून या सक्षमीकरणाच्या पायय्रा वेगळ्या पद्धतीने मांडल्या जाण्याचा छुपा धोका असतो,यात खरी गोची आहे.
अन् तीच कोणी उकलण्यास धजावत नाही.
उद्या मी स्वत:ची स्कुल काढली म्हणजे माझ सक्षमीकरण असं मानलं जातं असेल तर आनंदच,पण हे निकष चूकीचे आहे ,जगाच्या नजरेत!!!
ते कसे??????????

,जगाच्या नजरेत!!!
ते कसे??????????>> जगाच्या नजरेची काळजी करत बसले तर स्वतः साठी काहीही करणे अवघडच आहे. ह्या चक्रातून बाहेर पडून स्वतःचा मार्ग चोखाळणे व आपल्या डिपेंडंट्स ना आपल्या बरोबर संभाळून नेणे त्यांना त्यांचे संपूर्ण पो टेन्शिअल अचीव्ह करायला संधी देणे, व उद्युक्त करणे
ह्यासा ठी खूप वैचारिक स्ट्रेंग्थ लागते. बरेच मोह सोडा वे लागतात. पण सक्षमी करण हे एक बोलायचीच बाब न राहता प्रत्यक्षात येते. अशी खूप उदाहरणे दिसतील. पण त्यांना त्या आहेत तश्या अ‍ॅक्सेप्ट करायला पण एक प्रकारचा प्रांजलप णा लागतो तो नसतो सर्वांकडे . ते तिथेच राहतात. तुम्ही अनुभवाने ज्ञानाने मोठ्या झालात की तसतसा अनुभव येत जाईल. मनात शंका ठेवू नका. पहिले ती आयडी मी पाटलीण आहे अशी करा. शुभेच्छा.

>> काल "मिटक्वान इ स्कूल" चे उद्घाटनप्रसंगी आलेले राजकीय (आमदार वगैरे...) इंडस्ट्रियल मान्यवर (अर्थात सर्व पुरुष) महिला सक्षमीकरण वर जास्त भर देत होते.

इतकंच लिहिलं असतं तरी चाललं असतं. खूप काही सांगून जातं. आरके हयात असते तर ह्यावर त्यांनी हजार शब्दांत सुद्धा जे सांगता येणार नाही असे एखादे व्यंगचित्र काढले असते.

पहिले ती आयडी मी पाटलीण आहे अशी करा. शुभेच्छा.>>>>आयडी पाटलीण केल्याने जग (मायबोलीकर) मला स्त्री म्हणून मान्यता देणार आहे का?
अन् मी पाटील आहे अशा आयडी मुळे मायबोलीकर गोंधळात (स्त्री??? की पुरुष??) पडून ड्यूआयडी ,ड्यूआयडी म्हणून गाजावाजा करणार आहेत?
म्हणजे तुम्हाला वाटते की मी एक व्यक्ती म्हणून माझा आयडी न ठेवता ;मी स्त्री आहे की पुरूष हे दर्शविणारी आयडी धारण करावी!!!
अन् सक्षमीकरण स्वत:च मायबोलीवर सिद्ध करावं!!!