अरेबिअन नाइटस् - अनु. गौरी देशपांडे

Submitted by मनिम्याऊ on 15 January, 2019 - 05:13

मला बर्याच दिवसांपासून 'अरेबिअन नाइटस् - अनु. गौरी देशपांडे' वाचायची इच्छा आहे. नेटवर शोधाशोध केली असता मला कुठेही रिव्ह्यू मिळालेले नाही. हे पुस्तक 16 भागांत विभागले असुन किम्मत बर्यापैकी जास्त आहे. (त्यामुळे एकदम ओर्डर द्यायला हिंमत होत नाहीय)

तर आपल्यापैकी कोणी 'अरेबिअन नाइटस् - मूळ लेखक सर रिचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे' वाचले आहे का?

असल्यास प्लिज इथे रिव्ह्यू द्यावा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे रिचड बर्टन वाले जाडजूड वाचले आहे. खरं तर त्यामन्ये ६६६ च्या आसपास गोष्टी होत्या. मग जालावर शोधाशोध केल्यावर कळले हो तेवढ्याच आहेत, १००१ नाहीत. तरीही यातल्या तळटीपा यासाठीच ते प्रसिद्ध आहे. आणि ती बर्टनची कमाई आहे. आता गौरी देशपांडेनी १००१ चे भाषांतर केलं आहे का या रिचड बर्टनच्या पुस्तकाचे हा प्रश्न उरतोच.
आपण जे/ज्या मराठीत काही वाचलं होतं त्या फक्त कापलेल्या उरकलेल्या लहान मुलांसाठीच्या गोष्टी होत्या हे लक्षात आलं.

आपण जे/ज्या मराठीत काही वाचलं होतं त्या फक्त कापलेल्या उरकलेल्या लहान मुलांसाठीच्या गोष्टी होत्या हे लक्षात आलं. >> +१

गौरी देशपांडे यांचं नाव वाचून ही वाचायलाजाणार असाल तर अजिबात नका वाचू. मी असा गाढवपणा केला आणि पस्तावले.
लायब्ररीतून एखादं पुस्तक आणून वाचा आणि मग ठरवा पुढचं.

हा संच रिचर्ड बर्टनच्या

हा संच रिचर्ड बर्टनच्या पुस्तकाचाच अनुवाद आहे. महा प्रचंड काम होते ते. त्या काळातल्या मध्यपूर्वप्रदेशातल्या जीवनाचा, संस्कृतीचा, रूढींचा, संकल्पनांचा एक आरसाच आहे हा संच म्हणजे. आपल्यापैकी कोणी दत्तप्रबोध हे स्तोत्र वाचले आहे काय? त्यातले अनेक उल्लेख आज आपल्याला अश्लील वाटतील. ही पुस्तकेही तशीच आहेत. पण इरॉटिक किंवा कामोद्दीपक वगैरे मात्र नाहीत. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने रिचर्ड बर्टनने एक अमोल खजिना आपल्या हाती दिला आहे. आणि गौरींनी प्रामाणिकपणे मोठ्या मेहनतीने हे अनुवादाचे आव्हान पेलले आहे. या कथा म्हणून नावालाच 'कथा' आहेत. कथा चिमूटभर आणि तळटीपा पासरीभर असा प्रकार आहे. बर्टनने तळटीपांमध्ये सध्या आपल्याला विचित्र वाटणार्‍या त्या काळच्या प्रथांविषयी अप्रतिम माहिती दिली आहे. बहुतेकांना ही पुस्तके म्हणजे भारूड वाटेल. कंटाळवाणे वाटेल. ज्यांच्याकडे चिकाटी आणि धीर असेल त्यांनीच या वाटेला जावे. दोन घटका करमणूक म्हणून वाचण्याची ही पुस्तके नव्हेत.

सर रिचर्ड बर्टन यांची अफाट मेहनत गौरी देशपांडे यांनी मराठीत आणली. हे सर्व खंड माझ्या संग्रहात आहेत. ते खरेदी करून आता दहा वर्षे होतील. सगळेच्या सगळे वाचून झाले नाहीत. पण प्रत्येक खंडातील काही पानं नक्कीच वाचलीत. कोणत्याही वेळी कोणत्याही खंडातलं कोणतंही पान काढावं आणि वाचायला लागावं. मजा येते. मी खरेदी केली तेव्हा एका खंडाची किंमत १०० रुपये होती. विक्रेत्याच्या दोन वर्षं मागं लागून हे खंड घसघशीत सवलतीत मिळवले. यातल्या अनेक गोष्टी आपण पंचतंत्र किंवा अशाच भारतीय पुराणकथामंधून ऐकलेल्या-वाचलेल्या असतात. पण या संचातल्या तळटीपांमधून मिळणारी माहिती अद्भुत आहे. इस्लामबाबत माहिती घ्यायची असेल, तर हे खंड अवश्य वाचावेत, असं व्यक्तिशः वाटतं. शक्य असल्यास आणि मिळाल्यास सगळे खंड अवश्य घ्या.

पुस्तक विकत घ्यायचं नक्की केलय.... कुथे मिळतय आनि किमत इथे सान्गा, मलाहि आवडेल .. खुप ऐकल आहे या पुस्तकाविष्यी

पुण्यात घेणार असाल तर अक्षरधारा गॅलरी मध्ये आहे ३००० रु.

मनीमाऊ वर्थ आहे. नक्की घ्या.