Submitted by कटप्पा on 4 January, 2019 - 18:27
भावाचे १५ महिन्याचे बाळ अजून काहीच शब्द बोलत नाही. ब्लॅंकेट ला बा , बॉल ला बा , बाय ला देखील बा म्हणते.
Give me car/remote/blanket/phone म्हणाले की त्या त्या वस्तू आणून देतो.
नावाने हाक मारली की वळून बघतो.
Eye Contact व्यवस्थित आहे.
काही हवे असेल तर पॉईंट करतो पण बोलत नाही.
ताताताता, बचा बचा बचा असे आवाज काढतो.
अजून ममा , पपा असे काहीही म्हणत नाही.
काय करावे, काही सल्ला?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माझ्या थोरल्या मुलाचा सेम
माझ्या थोरल्या मुलाचा सेम प्राॅब्लेम होता. एकच फरक हा की, तो ईतर मुलांबरोबर खेळायचा. पण खरेतर बरेचदा मुलांमधे असूनही त्याचा तो एकटाच खेळायचा. आमचे पहिलेच मूल असल्याने अन विभक्त कुटुंबपद्धतीमुळे त्याला इतर मुलांमधे कसे खेळायचे किंवा मिसळायचे माहितच नव्हते. त्यामुळे अगदी साडेतीन वर्षापर्यंत तो मोजकेच शब्द आणि एखादेच वाक्य म्हणायचा. पण तो शाळेत जाऊ लागला अन् दोनचार दिवसांतच नविन शब्द शिकून घरी यायला लागला. मग पुढे सहा महिन्यातच अगदी इतर मुलांप्रमाणेच बोलू वागू लागला. शाळेत गेले की मुले ईतर मुलांबरोबर बोलणे, वागणे, मस्ती करणे, खोड्या करणे, भांडणे वगैरे न शिकवता आपोआप शिकतात. जास्त काळजी करू नये.
माझ्या ताई चा मुलगा पूर्ण दोन
माझ्या ताई चा मुलगा पूर्ण दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा एक एक शब्द बोलायचा..ते पण खुपचं बोबड..आता तीन वर्षाचा झाला तेव्हा बोलत आहे..ते पण अगदीच पूर्ण वाक्य बोलत नाही..2 4 शब्दाचं एक वाक्य असत.पण बाकी खुपचं active आहे पझल्स वगैरे सोडवतो.
मूल लेट च बोलतात अस माझी आजी म्हणायची.
माझा मुलगा 3 वर्ष 4 महिने
माझा मुलगा 3 वर्ष 4 महिने वयाचा आहे.परंतु तो अजून जास्त बोलत नाही.>>>>> Annaso, हे कदाचित स्वमग्नतेचे (Autism) लक्षण असू शकते. आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन सर्व normal असल्याची खात्री करून घ्या.
बरं झालं हा धागा वाचून माझी
हा धागा वाचून माझी थोडी चिंता कमी झाली
धागा वर काढलाच आहात तर
धागा वर काढलाच आहात तर मुलाबद्धल अपडेट देतो.
आता तीन वर्षांचा आहे, व्यवस्थित बोलतो. तासन तास गप्पा मारू शकतो त्याच्याबरोबर कोणीही आता.
फक्त R त्याला उच्चार ता येत नाही, मीडिया रूम ला मीडिया यूम म्हणतो
गोड वाटते ऐकायला.
वा मस्तच अपडेट.
वा मस्तच अपडेट.
वा मस्तच अपडेट.....+१.
वा मस्तच अपडेट.....+१.
माझ्या लेकीला पण R नीट
माझ्या लेकीला पण R नीट उच्चारता येत नव्हता. डोरा ला डोला म्हणायची. 5व्या वर्षानंतर व्यवस्थीत बोलायला शिकली.
माझा एक प्रश्न होता..अनुभवी
माझा एक प्रश्न आहे..अनुभवी लोकांनी उपाय सांगावेत.
माझी मुलगी जानेवारीत तीन वर्षाची होईल..तीची अंगठा चोखायची सवय कशी घालवावी?
दिवसभर चोखत नाही पण झोप आली किंवा भूक लागली कि अंगठा तोंडात.. मधे एकदा तीच्या हाताला मेंदी लावली होती तेव्हा ती मेंदी जाईपर्यंत पंधरा दिवस तीने अंगठा चोखला नव्हता.. पण खूप चिडचिड करायची,रडायची, ती मेंदीचा रंग पुस म्हणायची...हातावरची मेंदी जाताच पुन्हा जैसे थे..
इतक्यासाठी नवीन धागा नको, म्हणून इथे विचारते.
कुणी काही उपाय केले असतील तर प्लीज शेअर करा.
माझ्या लेकीला पण R नीट
माझ्या लेकीला पण R नीट उच्चारता येत नव्हता. डोरा ला डोला म्हणायची. 5व्या वर्षानंतर व्यवस्थीत बोलायला शिकली.>>>
मी पाचवीत जाईपर्यंत र ला ल बोलत होते

दर पंधरा दिवसांनी मेंदी लावा
दर पंधरा दिवसांनी मेंदी लावा की मग... उपाय दिसतोच आहे हा...
अंगठा ही नीड फॉर अटेंशन आहे
अंगठा ही नीड फॉर अटेंशन आहे असे वाचले होते.
काही इंटरेस्टिंग हात मोकळे न राहणाऱ्या ऍक्टिव्हिटी करता येतील.स्वतः पीठ मळून त्यात स्वतः फूड कलर टाकून प्लेडो बनवून त्याने खेळणे वगैरे.साबणाने फुगे करणे.आपोआपच कधीतरी साबणाचा अंगठा चोखला जाऊन डिस्लाईक निर्माण होईल.
3 म्हणजे अजून लहान आहे.थोडे शाळा वगैरे उद्योग लागल्यावर आपोआप सवय कमी होत जाईल.
मुलाची सवय दिड वर्षाचा असताना
मुलाची सवय दिड वर्षाचा असताना सुटली..

मुलगी दिवसभर नाही पण भूकेच्या आणि झोपेच्या वेळी चोखते..
एक गंमत आहे.. नवर्याच्या एका मामींची अंगठा चोखायची सवय मुलं झाल्यावर सुटली... सासरकडचे नावं ठेवतील म्हणून त्या लपून अंगठा चोखायच्या..
इतके वर्षाच्या त्यांच्या सवयीमुळे अंगठ्याचा आकार पण बदलला आहे..आता नातवंडे आहेत त्यांना.. त्यांनीच सांगितलेले हे.
अनु, बरोबर आहे.. शाळा सुरू झाल्यावर बहुतेक फरक पडेल..
माझे मूल 5 वर्षेचे झाले आहे
माझे मूल 5 वर्षेचे झाले आहे पण अजून बोलत नाही. काही पाहिजे असल्यास फक्त बोट करून दाखवतो. खळखळून हसतो
सिम्पल कमांड फॉलो करतो का?
सिम्पल कमांड फॉलो करतो का? तुम्ही बोलता ते समजते का त्याला?
वाक्य बोलत नसला तरी शब्द बोलत असेल ना?
माझी मुलगी २ वर्ष २ महिन्याची
माझी मुलगी २ वर्ष २ महिन्याची आहे पण अजून ती काहीही शब्द बोलत नाही. तिच्या बरोबरीचे तसेच तिच्या पेक्षा ही १ वर्षाने लहान मुले काही शब्द तरी बोलतात पण ती फक्त मम् मम् एवढेच बोलते हे ती गेले ६ महिन्यापासून बोलतेय. नवीन काहीच शब्द बोलत नाहीये. तिच्या नावाने हाक दिली तरी पाहत नाही. पण मोबाईल वर लहान मुलाची गाण्याचं आवाज एकूण लगेच येते. पप्पा, मम्मी, आई आलेत मनलेले कळते तिला. ती मोबाईल दाखविल्या शिवाय खात नाही काहीच.
इतर मुलं बरोबर खेळते, एकटी ही खेळते, काही हवे असल्यास बोट पकडून घेऊन दाखवते काय हवे आहे ते. फक्त बोलत नाही. किमान काही शब्द तरी बोलता यायला हवे या वयात. काय करावं काही सल्ला?
तिच्याशी भरपूर गप्पा मारा.
तिच्याशी भरपूर गप्पा मारा.
मोबाईल ची सवय हळूहळू इतर गेम्स खाताना खेळून(एखादा मॅप किंवा फ्लॅग चार्ट दाखवून त्यावर देश सांगणे,एक घास खाऊन तिकडचे खेळणे घेऊन ये असे काही.
मुख्य म्हणजे स्वतःला अजिबात दोष देऊ नका, व्यवस्थित बोलेल.
बुक्स वाचून दाखवा... खूप
बुक्स वाचून दाखवा... खूप फायदा होतो...
अभिनय करुन गोष्टी सांगा.
अभिनय करुन गोष्टी सांगा. बडबडगीते म्हणा. प्राण्याचे पक्षांचे आवाज काढुन दाखवा. मुलीशी भरपुर गप्पा मारा. तिच्या आवडीचे खेळ खेळा. इंग्लीश, मराठी अंकलीपी आणा. त्यातील चित्र दाखवुन शब्द शिकवा. आणि मुख्य म्हणजे इतर मुलांबरोबर तुलना करु नका.
माझी मुलगी 4वर्ष 3 महिन्याची
माझी मुलगी 4वर्ष 3 महिन्याची आहे. ती अगदी 10 महिन्याची होती, तेव्हा बोलू लागली. ती खूप activeआहे.ती दिवसभर बडबड करत असते. ती Kg1 ला आहे.online class दररोज असतो. poems, Stories खूप लवकर पाठ करते. दिवाळीपूर्वी 15 poems,2 Stories, conversation etc. पाठ करून त्याचे व्हिडिओ school मध्ये पाठविले . तिला A+ रिझल्ट मिळाले देखील. एकदा poem पाठ झाली की वर्षभरात पण विसरत नाही. नर्सरी तील poems अजूनही पाठ आहेत.पण ती बरेचसे शब्द नीट उच्चारत नाही. तिची जीभ बोलताना चटकन वळत नाही. कधी कधी ती बोलताना तोंडात थुंका येतो. कधी तिचे काही बोलणे नीट कळत नाही. ट, त, ड, ल नीट उच्चारत नाही. जीभ जाड असेल तर नीट बोलता येत नाही का? बोलताना तिची जीभ टाळू ला लागत
नसेल का? Dr. कडे तपासले. तर dr. नॉर्मल आहे म्हणतात. जेवण करताना टीव्ही पाहिजेच असतो.ती रोज दुपारी आणि रात्री थोड्या वेळ टीव्ही वर मिकी माऊस, टॉम आणि जेरी, baby bus असे कार्टून बघते.या कार्टून चा बोलण्यावर काही परिणाम होतो का? मी दिवस भर तिच्यासोबत बोलत असते. तिचे उच्चार सुधरविण्याचे प्रयत्न करते. कोरोना मुळे तिला बागेत किंवा बाहेर खेळायला पाठविता आलेले नाही. शाळेत पण जाण्याची सोय नाही. त्यामूळे तिला समवयस्क मुलांमध्ये बोलायला, खेळायला मिळत नाही.
घरात ज्येष्ठ सासू सासरे असे कुणीच नाही. आम्ही नवरा बायको आणि मुलगी असा त्रिकोणी परीवार आहे. त्यामुळे कुणी तिचे observation करून सांगेल. अशी सोय नाही. मी सतत ती नीट , सुस्पष्ट बोलेल की नाही, या टेंशन मध्ये असते. अनुभवी व्यक्ती नी सल्ला द्यावा. काही घरगुती उपाय असेल तर सुचवावे.
तिचे उच्चार सुधरविण्याचे
तिचे उच्चार सुधरविण्याचे प्रयत्न करते.>>>>> अहो ती खूप लहान आहे.आताचे तिचे बोबडकांदेपण एन्जॉय करा.तसेही डॉक्टरांनी काळजीचे कारण नाही म्हटले आहेच.
तुम्ही तिच्याबरोबर दिवसभर असता तर तिच्याकडून रामरक्षा,श्लोक पाठ करवून घ्या.तिच्याशी गप्पा मारताना किंवा मोबाईलवर रामरक्षा लावून ठेवा.तिची हळुहळू पाठही होईल.तिचे उच्चार फारसे न सुधरवता तुम्ही तिच्याशी स्पष्ट बोला.नक्की फरक पडेल.
>>ट, त, ड, ल नीट उच्चारत नाही
>>ट, त, ड, ल नीट उच्चारत नाही. >> खूप मुलांना हे जमत नाही. शेवटी जीभ वळणे हे देखील एक प्रकारचे फाईन मोटार स्किल आहे. लेखनाची जशी घाई नको तसेच हे देखील. ५ वर्षापर्यंत जमू लागते. डॉक्टरांनी काळजी करु नका सांगितले आहेच तेव्हा तुम्हीही टेंशन घेवू नला. ती बोलताना तिचे उच्चार सुधारायचा मोह टाळा. असे केल्याने मूल बोलायलाच संकोचू लागते. त्याऐवजी जीभ बाहेर काढणे , हळूच आत वळवून टाळ्याला लावत टॉक-टॉक आवाजाचा खेळ खेळायचा. भरपूर मराठी बालगीते ऐकवा. पाठ करुन घेवू नका. तिला तिच्या मर्जीने गावू दे. बोबडे बोलली तरी दुरुस्त करु नका. हळू हळू तिचेच तिला जमू लागेल.
४-५ वर्षाच्या वयात बोबडे
४-५ वर्षाच्या वयात बोबडे बोलणे सामान्य आहे. फक्त आपण त्यांच्याशी बोलताना स्पष्ट बोलायचे.
वेगवेगळे आवाज काढणे, tongue twisters गेम खेळाणे करा. मजा येते.
देवकी, स्वाती आणि सोनाली मॅडम
देवकी मॅडम, स्वाती मॅडम आणि सोनाली मॅडम, आपण दिलेल्या सल्ल्याबद्दल मनस्वी धन्यवाद. माझ्या मुलीचे बोबडे बोलणे नॉर्मल आहे, हे लक्षात आले आहे. मुलीच्या बोलण्याबद्दल चे बरेचसे टेंशन आता कमी झाले आहे. आपण सुचविलेले उपाय मी नक्की करून बघेन. प्रत्येक मुल वेगळे असते हे नक्की.पण तरीही सहसा मुलं अगदीं सुस्पष्ट कोणत्या वयापर्यंत बोलतात? 5 वर्षापर्यंत बोलू शकतात बहुतेक.
Pages