लहान मुल बोलण्यासाठी

Submitted by कटप्पा on 4 January, 2019 - 18:27

भावाचे १५ महिन्याचे बाळ अजून काहीच शब्द बोलत नाही. ब्लॅंकेट ला बा , बॉल ला बा , बाय ला देखील बा म्हणते.

Give me car/remote/blanket/phone म्हणाले की त्या त्या वस्तू आणून देतो.

नावाने हाक मारली की वळून बघतो.

Eye Contact व्यवस्थित आहे.

काही हवे असेल तर पॉईंट करतो पण बोलत नाही.

ताताताता, बचा बचा बचा असे आवाज काढतो.

अजून ममा , पपा असे काहीही म्हणत नाही.

काय करावे, काही सल्ला?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी दोन्ही मुले अडीच वर्षाची झाल्यावर बोलू लागली.
काळजी वाटली तर पेडीला विचारा, पण आमच्या पेडीने नावाला रिस्पाँड करतो का? बॅबल करतो का? फिजिकली किती अ‍ॅक्टिव्ह आहे? आय काँटँक्ट करतो का? आवाज जिकडून येतो तिकडे बघतो का? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आल्यावर वाट बघा असेच सांगितलेले.
त्याच्याशी बोलत मात्र रहा. आणि बेबी टॉक नाही तर आज काय झालं, तुम्ही काय करताय असं सगळं बोला. त्याच्या कानावर विविध शब्द आणि साउंड पडू दे. वेगवेगळ्या भाषा बोलणे शक्य असेल तर ते ही बोला.

आवाज काढतो मग काळजी नाही.भरपूर बडबडी लोक जवळ ठेवा.6 महिन्यात बोलायला लागेल.
मुलगे उशीरा बोलायला शिकतात असा काहीसा सर्वमान्य समज आहे.

पेडि काय म्हणतात हे महत्वाच ! त्याच्याशी बोलत रहा, पझल्स , ब्लॉक्स, चित्राची पुस्तक घेवुन त्याच्याबरोबर बसा , बेबी आइनस्टाइन व्हिडियो असतिल युट्युबवर तर ते पण छान स्टिम्युलेटिन्ग आहेत, मुलान्ची गाणी बाबा ब्लॅकशिप, लन्डन ब्रिज फॉलिन्ग डाउन वैगरे कम्युट मधे लावता येतिल
इथे अमेरिकेत असतिल तर लायब्ररीत टॉडलर सिन्ग अलॉन्ग असते ते या वयाची मुल खुप एन्जॉय करतात.

१५ महिने म्हणजे फार नाही. एवढी चिंता करू नका.

आमच्या घरातले एक उदाहरण आहे. मुलगी दिड वर्ष उलटून गेले तरी बोलत नव्हती. त्याचवेळी आजूबाजूची त्याच वयाची दोन मुले बोलू लागलेली. आई नेहमी ईतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करणारी असल्याने टेंशनमध्ये आलेली पण तिचे बाबा रिलॅक्स होते.
अखेर ती मुलगी बोलायला लागली. आणि साधारण महिन्या दोन महिन्यातच. म्हणजे एक वर्षे दहा महिने असताना ती पुर्ण एबीसीडी ए टू झेड आणि एक ते तीस आकडे मराठी तसेच ईंग्रजी या दोन्ही भाषेत न चुकता क्रमाने सहज बोलू लागली आणि आज तिच्या चुरूचुरू बोलण्याचे लोकांना कौतुक वाटते.

सांगायचा मुद्दा असा की मुलगा बोलत नाही, चालत नाही वगैरे चिंता किमान ईतर आजूबाजूंच्या मुलांशी तुलना करून वाढवू नका. एखादी गोष्ट मुलगा लेट करतो यात काही प्रॉब्लेम नसतो. मिल्खासिंग सहाव्या महिन्यातच त्याच्या वयाच्या सर्व मुलांच्या आधी उठून चालायला लागला असावा असे नसते.

डॉक्टर चेक करेलच की काही प्रॉब्लेम तर नाही. पण काही फिजिकल प्रॉब्लेम नसेल तर लेट ईज नॉट ए प्रॉब्लेम.

एन्जॉय this टाईम.
एकदा बोलायला लागले की थांबत नाहीत.

तुमच्या भावाचे बाळ इतर अल्फाबेट्स बोलतंय.नुसते अ अ असे नाही.तेव्हा फिकीर नॉट.अर्थात हे डॉक्टरांनी माझ्या मुलाच्या बाबतीत सांगितले होते.तोही असाच उशीरा बोलायला लागलामाझ्या भाचीच्या तुलनेत.एकदा सर्दीखोकला की कशासाठी डॉ.कडे नेले असता सहज विचारले की स्पीच थेरपिस्टकडे न्यायची गरज आहे का? त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.नंतर सव्वदोन-अडीच दरम्यान जो बोलायला लागल त्यावेळी कान काढून ठेवावेसे वाटायचे.

अशा परिस्थितीत एकदा कान/ऐकणे ही तपासून घ्यावे.

हाक मारल्यावर वळून पहातोय म्हणजे तुमच्या बाळाला तो प्रॉब्लेम नसावा, पण ऐकू आले नाही तर बाळाला बोलता येत नाही. ( पूर्वी रेडिओवर अभंगाच्या चालीत 'कानाने बहिरा, मुका परि नाही. शब्द शिकविता बोले कसा बाई' अशी एक जहिरात येत असे ती आठवतेय का?)

दुसरे, बाळाशी बोलणे झाले पाहिजे. जितक्या जास्त गप्पा माराल तितका बोलण्याचा चान्स वाढतो. तुमच्या ओठांच्या हालचाली पाहून तसे आवाज काढायचा प्रयत्न करून बाळ बोलते.

अन तिसरे, क्रॅप्स म्हणताहेत तसे एंजॉय द टाईम. आधी आपण बोल बोल करतो अन मग पुढची कित्येक वर्षे त्याला गप बस आता देवासारखा! असे सारखे सांगावे लागते. Wink

डावरा आहे का? त्याचं नैसर्गिक डावरेपण दूर करुन त्याला मुद्दाम उजव्या हाताची सवय लावायचा प्रयत्न चाललाय का?

माझा एक कझीन, असं म्हणे की तो 2.10 मध्ये पाहिलं बोलला. कटप्पाने सांगितलेलं सगळं त्याला लागू होत होतं ( म्हणजे ऐकू येणं, बोटाने हवं ते दाखवणं, ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटेलिजन्स दाखवणं इ. पण बोलायचा मात्र अजिबात नाही. डॉक्टर्स झाले, टेस्टस झाल्या पण इल्ले. डॉक्टर म्हणाले की तो नॉर्मल आहे, वाट पहा. मग तो2.10 असताना एकदा बाबाने सांगितलं की चला बागेत जाताना आज xyz कारने जाऊ, तर जगातील पहिला शब्द नाही तर वाक्य तो बोलला की 'रेड नको, आपण मोठी पांढरी कार नेऊ' ही अनेक वेळा ऐकलेली कथा आहे, तो माझ्यापेक्षा खूप वर्षांनीं मोठा असल्यामुळे हे ऐकीव आहे, पण त्याची आई त्याला मुलगी झाल्यावर सुद्धा तुझा वडील किती आळशी होता हे अजून सांगते Lol

एकुणात काय तर तुमच्या घरातल्या बाळाची बाकी शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य असेल तर just wait n watch. पेशन्स ठेवा, बोलेल तो

काही मुलं तर 3 वर्ष पूर्ण झाल्यावर बोलायला लागतात... आधी काहीच बोलत नाहीत आणि मग 3 वर्ष पूर्ण झाले की एक एक अक्षर, शब्द असं नाही तर छोटे छोटे वाक्य पूर्ण बोलतात.. अशा 2-3 मुलांना पाहिलंय मी...

आई वडील लहान्पणी कधी बोलायला लागले? घरात माणसे किती बोलतात? मुल लाजाळु आहे का? डे केअरला जाते की घरातच नॅनीबरोबर अस्स्ते?

आता माझा अनुभवः
माझी मुलगी १.५ महिन्याची झाल्यावर बोलयला लागली. माझ्यासाठी व माझ्या आई वडीलांना चिंता झाली. कारण त्यांच्या पहण्यात आमच्या घरातील( नात्यातील व मी) मुले १० महिन्यातच शब्द बोलत व वर्षाचे होइपर्यंत मोठी वाक्य. आम्ही डॉक्टर केले. अक्कलदाढ घासली , लेंडी घासली, जिभ अगदी नियमित दोनदा घासायचो वगैरे वगैरे. तिचा बाबा शांत. काहीच चिण्ता नाही. एकतर आम्ही दोघे नोकरीला, घरात ती फक्त नॅनीबरोबर आणि तीही परभाषिक. पण अतिशय हुशार. आम्ही दिलेल्या ऑर्डर्स, जोक्स , खेळ समजायचे. तिला हवी असलेली वस्तुकडे बोट दाखवून जर आम्ही ओळखली तर ती हसायची, “ हां बरोब्बर“ असे भाव असत. मग अचानक ती मोठी वाक्यच बोलायला लागली, पहिले वाक्य, “ मला भात नकोय, “
असे अगदी व्याकरणासकट बोलली माझ्याकडे पहात. मग नॅनीकडे पहात हिंदीत सुद्धा बोलली, मुझे ये चावल नही देती.
आम्ही गार.. एकदम दोन भाषा.
तिचा लबाड बाबा मग म्हणाला, उगाच चिंता करत होतीस. मी अडीच वर्षाचा बोलायला लागलो. तु हसशील म्हणून नाही सांगितले.
काही दिवस , मुलीचे बडेबडे नानी-नाना आम्ही आणून ठेवल्याने, फरक पडला.

>>>>मग 3 वर्ष पूर्ण झाले की एक एक अक्षर, शब्द असं नाही तर छोटे छोटे वाक्य पूर्ण बोलतात.. अशा 2-3 मुलांना पाहिलंय मी...<<
खरय.

>>>Give me car/remote/blanket/phone म्हणाले की त्या त्या वस्तू आणून देतो.<<<
माझ्या मुलीला ईंग्लिश सुधा कळायचे. तीन भाषा कळत होत्या. पण तिच्या बाबावर गेली .

तुम्हि मायबोलिवरच्या हायझेनबर्ग, ऋन्मेSSष, अज्ञातवासी, Mi Patil aahe., सायो, नन्द्या४३ या लोकान्शि बोलुन बघितलं का? लहान मुलाला बोलतं कसं करायचं कळु शकेल (कुमारवयातील बोलण्याच्या प्रोब्लेमसाठि अ‍ॅमी यान्ना सम्पर्क करा)

अमितव +1
त्यांचा प्रश्न सिरीयस आहे. विषयांतर नको प्लिज.

माझ्या बहिणीची मुलगी एक वर्षाच्या आतच ए टू झेड बोलायची आणि नंतर तिचा छोटा भाऊ ३ वर्षाचा होईपर्यंत बोलला नाही. प्रत्येक मुलाला लागणारा वेळ वेगळा.

माझ्या शेजारचा मुलगा ३ वर्ष झाली तरी संपुर्ण बोलत नाहीये. एक-दीड वर्षात जशी काही मुलांची बोलायला सुरुवात होते. तशी त्याची आता सुरुवात झालीये.

<<<<माझी मुलगी १.५ महिन्याची झाल्यावर बोलयला लागली. >>>>>झंपी, १.५ वर्षांची म्हणायचंय ना. Happy

फिकीर नॉट.काही मुलं तर 3 वर्ष पूर्ण झाल्यावर बोलायला लागतात. बाळ अल्फाबेट्स बोलतंय ना.
बास झाल तेवढ, just wait n watch. पेशन्स ठेवा, बोलेल तो.क्रॅप्स म्हणताहेत तसे एंजॉय द टाईम. आधी आपण बोल बोल करतो अन मग पुढची कित्येक वर्षे त्याला गप बस आता म्हणावे लागते .

माझ्या शेजारणीचा मुलगा तर साडेतीन चा होईतो काहिहि बोलायचा नाही. ४.५ वर्षाचा झाल्यावर त्याला छोट्या गटात घातले तेव्हा जरा जरा बोलु लागला. आता ७ वर्षांचा आहे. आता बोलतो छान व्यवस्थित.
काळजी करू नका. छान बोलेल.

असं म्हणतात की जी मुलं लवकर चालायला लागतात ती उशिरा बोलायला लागतात, आणि लवकर बोलायला लागतात ती उशिरा चालायला लागतात. (खखोदेजा) मुली मात्र दोन्ही लगेच करतात म्हणे Uhoh (हेपखखोदेजा)

आभार सर्वांचे. वन, टू ,थ्री म्हणतो आता. डाडा म्हणतो बापाला.
जेवणाला मम म्हणतो
दुधाला दुदु म्हणतोय.
आजोबाला बाबा म्हणतोय.

ग्राईप वॉटर देऊन पोटातला गॅस जाईल हो फक्त. हे म्हणजे काहीही झालं की एकदा संडासला जाऊन ये बरं वाटेल सांगणाऱ्या आमच्या ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांसारखं झालं.