प्रभारक

Submitted by चैतन्य रासकर on 31 December, 2018 - 08:42

ही कविता काथ्याकूट: नि...चा धनी (भाग सव्वा आठ) या कथेचा भाग आहे, त्यामुळे ही कथा वाचल्यानंतर या कवितेची गमंत कळेल.

तू नसावीस..
मी व्हावे कासावीस..
अन... तुला शोधावे घरभर..
कापावे मन थरथर...

मग तू दिसावीस, बिछान्यावर पहुडलेली...
थोडी अवघडलेली..
स्वतःमध्ये गुरफटलेली...

पण आज तू बिछान्यावर नाहीस.
माझ्या जवळ नाहीस..
जीव तुटतो ग..
जेव्हा तू आसपास दिसत नाहीस

तू तिथेच थांबत जा ना..
जिथे तुला सोडलं होतं..
दुर्लक्ष झालं तरी,
तुला त्या कोपऱ्यात जपून ठेवलं होतं

तुला नाव द्यायचं होतं..
जे आपल्यातचं राहील

कारण?

"माझ्या मोबाईलचा चार्जर" म्हणताना,
मला नेहमीच जड जाईल

- © अर्रर्रर्र

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
मस्तय
पण टायटल मुळे आधीच रहस्य कळतय कवितेचं!
दुसरं काहीतरी द्या शिर्षक Happy

@किल्ली>>>>> अहो काथ्याकूट भाग सव्वाआठ मध्ये त्यांनी आधीच डिक्लेर केलीये कविता, म्हणून काहीही रहस्य नाहीये.
नसेल वाचला तर जरूर वाचा. खतरनाक लिहिलंय!

काहीही रहस्य नाहीये.>>> ही कविता independently वाचणार्‍यांसाठी तर रहस्य आहे!
जरूर वाचा>> येस, झालय वाचून Happy

@किल्ल, स्वस्ति, अज्ञातवासी
मला खरं तर चार्जर नावं द्यायचं नव्हतं, नावावर फारच विचार केला, दुसरं काही सुचलं नव्हतं
पण आता तुम्ही सुचवल्या प्रमाणे, आधीचे "चार्जर" नावं बदलून, आता "प्रभारक" असं नावं देत आहे, कारण चार्जरला मराठीत "प्रभारक" असा शब्द आहे, पण याबद्दल मी साशंक आहे, कोणाला चार्जर साठी पर्यायी मराठी शब्द माहित असेल तर सांगावे.

मस्त

अरेच्चा असं आहे काय
अरे माझा सव्वा आठ च्या आधीचा भाग पण राहिलाय वाचायचा त्यामुळे तो भाग वाचून मग हा वाचायचाय.
आणि त्यामुळे अजून वाचला गेला नाहीये.