मलई मिरची

Submitted by सीमा on 21 December, 2018 - 02:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप हिरव्या मिरच्या चिरुन तुकडे (तुकडे साधारण बोटाच्या पेराच्या निम्मे
व्हिपिंग क्रीम (इथे अमेरिकेत कॅन मध्ये मिळते. ) अर्धा कप किंवा लागेल तशी.
(भारतात असाल तर साय वापरून पहायला हरकत नाही. (मी ट्राय नाही केली.))
१/२ चमचा हळद,
१ चमचा जिर्‍या धन्याची पावडर
हिंग
तेल

क्रमवार पाककृती: 

तेल ताप्वून त्यात हिंग घालावा.
जिरे घालुन तडतडले कि मिरच्या घालुन परतावे. फार रंग जाई पर्यंत परतु नये.
जिर्‍या धन्याची पावडर,हळद घालून परतावे.
आता त्यात क्रीम ओतावी. (साय वापरत असाल तर थोडी चमच्याने बारीक करुन मग घालावी. परतत रहावे. आळत आले कि मीठ घालुन गॅस बंद करावा. झाकण लावू नये. (मिरच्या सॉगी होतात. त्या करकरीतच राह्यला पाहिजेत. )
वरून लिंबू पिळुन गरम चपात्यांबरोबर खावी.
एकदम सिंपल परंतु पाहुण्यानी प्रत्येक वेळि मागून मागून खाल्ली आहे. कधी कधी मी यात भरडलेले धने , पावडर बडिशेप घालते.

वाढणी/प्रमाण: 
तिखटपणावर अवलंबून आहे.
अधिक टिपा: 

मिरच्या जितक्या चांगल्या रसरशीत ,, लांबड्या, मध्यम तिखट असतील तेव्हाच ही रेसीपी करावी. उगाच शिळ्या मिरच्यांबरोबर करुन नये.
मी मिरच्या चांगल्या दिसल्या तर जरा जास्त घेवून येते. लोणच आणि ही भाजी करते मग.

माहितीचा स्रोत: 
मारवाडी थाळीत खाल्लेली. रेसीपी शोधली तर यु ट्युब वर मिळाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या. आताच करुन पाहिली
IMG-20181221-WA0010.jpg

आणि हि लगे हाथों केलेली दही मिरची
IMG-20181221-WA0009.jpg

यात उद्या सकाळी थोडे आणखी दही घालून चांगले मिक्स करुन उन्हात वाळत घालणार

सात्त्विक झणका वाली होईल ही कृ. करून पाहायला हवी.
घरगुती सायीमध्ये फार तुपट अंश असण्याची शक्यता आहे (आणि मुळात मला सायप्रकार आवडत नाही); व्हिपिंग क्रीम मिळेल इथे.

वाह छान.

मनिम्याऊ दोन्ही फोटो मस्तच.