ती

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 17 December, 2018 - 15:48

मी बाहेरून स्टुडीयोचा दार उघडला. ती मधुर अावाजात म्हणाली “भैया फोटो कब तक मिलेगा”. काउंटर वरचा माणुस म्हणाला “कल श्याम तक अा जाना”. तिला पाहतच माझ्या शरीरावर काटा उमटला. तिच्या शरीरावर साडी अाणि गळ्यांत मंगळसूत्र. तिला त्या अवतारात पाहून चेहर्‍यावरची चमक नाहीसी झाली. ती रिसिट घेउन माझ्या बाजूनी निघून गेली. मी माझी रिसिट दाखवली. त्याने पटकन रिसिट नंबर पाहून, हात द्रॉवरमधे घातला अाणि माझी योग्य तो फोटो एॅनवंलप शोधून काढला. मी एक फोटो काढून बघितला अणि मनामधे बोलू लागलो “नेहमी सारखा बेकार अाला. स्टुडीयोच्या फोटो मध्ये स्माईल नेहमी मंमद्या सारखी का येते ! सेल्फीत तर भारी असते” तो म्हणाला “५० रुपया देना बाकी है”. मी रिसिट बघितली तर हो बाकीचं अाहे”. मी ५० ची नोट देऊन निघालो.
.
गाड्यांच्या अावाजात अाणि लोकांची बडबड असून देखील, मी माझ्या विचार विश्वात गुंतून चालत होतो. “तिचं लग्न कधी झालं असावं. मला तिच्याशी बोलण्याची संधी मिळालीच नाही अाणि मिळणार तरी कशी ? ती अापल्या फ्रॅन्द सर्कलमध्ये नव्हती. तिचं नाव काय असेल. अायला ! लहाणपणापासून ती एरियामध्ये दिसायची. पण अोळख नाय-काय-नाय तिच्याशी बोलायचं कसं”. ह्रदय अाणि मन झड वाटू लागलं. डोळयांसमोर अाठवणीचं दृश्य अालं ‘मी तिच्या घरासमोरून जात असतांना तिच्यावर लक्षं गेलं. ती दरवाजावरील पायउतारावर बहिणीसोबत हसत बोलत होती. तिचं गोड हसू पाहता, नकळत माझ्या गालावर हसू उमटायचं’ अाणि तिच्याच विचारात दिवस निघून जायचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा... किती तरल.. हळूवार.
मूक प्रेम असच तर असतं. मैत्रिणीला पहिल्यांदा साडीत बघण्याचं फिलिंग लै भारी असतं.
खूप खूप धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल.

ह्याचा पुढचा भाग असल्यास लवकर टाका प्लीssssज.

मी फोटो स्टुडीयोचं दार उघडलं, आत आलो, आतमध्ये ती होती.
ती मधुर आवाजात दुकानदाराला म्हणाली, “भैया फोटो कब तक मिलेगा?”
“कल श्याम तक आ जाना” दुकानदार म्हणाला.
तिला पाहताच माझ्या शरीरावर काटा उमटला!!
तिने साडी नेसली होती, गळ्यात मंगळसूत्र होतं. तिला बघून माझ्या चेहर्‍यावरची चमक नाहीशी झाली.

ती माझ्या बाजूने निघून गेली, मी तिच्याकडे पाहतच राहिलो.

मी माझी रिसिट दाखवली. त्याने पटकन रिसिट नंबर पाहून, ड्रॉवर मधून माझ्या फोटोंचा इन्व्हलप शोधून काढला. मी एक फोटो काढून बघितला आणि मनातल्या मनात म्हणालो “नेहमी सारखा बेकार आलाय. स्टुडीयोच्या फोटो मध्ये स्माईल नेहमी मंमद्या सारखी का येते? सेल्फीत तर भारी असते”

दुकानदाराने मला फोटोचे पन्नास रुपये मागितले, मी पन्नासची नोट त्याला देऊन बाहेर आलो.

गाड्यांच्या आवाजात आणि लोकांची बडबड असून देखील, मी माझ्या विचार विश्वात गुंतून चालत होतो.
तिचं लग्न कधी झालं असावं?
तिला विचारू का?
पण कसं?
ती संधी कशी मिळेल?

ती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नव्हती. तिचं नाव काय असेल? आयला ! लहाणपणापासून ती एरियामध्ये दिसायची पण ओळख नाय-काय-नाय मग तिच्याशी बोलायचं कसं?”

हृदय आणि मन जड वाटू लागलं. डोळयांसमोर आठवणीचं दृश्य आलं .
मी तिच्या घरासमोरून जात होतो, ती दरवाजा बाहेर उभं राहून तिच्या बहिणीसोबत बोलत होती. हसत होती, तिचं गोड हसू पाहता, नकळत माझ्या गालावर हसू उमटायचं

...आणि तिच्याच विचारात दिवस निघून जायचा.

चैतन्य, पन्नास रुपये बाकी होते. काही पैसे अ‍ॅडव्हान्स दिले होते. हा महत्त्वाचा भाग का गाळलात?
मुद्रितशोधकाला संपादनाचा अधिकार नसतो.

इंग्रजी माध्यमच्या मुलाला शाळेतही मराठी भाषा विषय नव्हता का?
त्यात नववीला सामान्यरूपे आहेत.

शाळेतही मराठी भाषा विषय नव्हता का?>>> असेल हो. पण मायबोलीवर कसं टंकावं हे नसेल शिकवलं.
चै, किती कष्ट घेतलेत.

@भरत.
हो.. बरोबर आहे, ऍडव्हान्सचा उल्लेख होणे गरजेचं आहे, माझ्या आधी लक्षात आलं नाही, पण लेखकाला हे बदल योग्य वाटले तर चांगलंचं आहे.

@सस्मित
कष्ट वगैरे नाही Proud त्यांनी विचारलंचं होतं, म्हणून पटकन बदल सुचवले.

अरेरे,
तुम्ही नाउमेद होऊ नका... शिव्या घालणारे काही कारणाने मनातून खूप राग बाळगून असतात आणि ते सॉफ्ट टार्गेट बघून तो राग त्यावर काढतात. ह्या सस्मित ताई तर केवळ मी तुमचे कौतुक केले म्हणुन तुम्हाला शिव्या घालत आहेत. त्या माझा राग तुमच्यावर काढत आहेत.
तुम्ही तुमच्या आधीच्या कथेवर सुद्धा हे बघितले असेल.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करा... त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो.
तुम्ही कृपया लिहिणे चालू ठेवा.. माझ्यासारखे अनेक लोक वाचतात तुमच्या कथा.
तुम्ही लिहिणे चालू ठेवा समंजस प्रतिसाद देणारेही आज ना उद्या येतील.

ह्या सस्मित ताई तर केवळ मी तुमचे कौतुक केले म्हणुन तुम्हाला शिव्या घालत आहेत. त्या माझा राग तुमच्यावर काढत आहेत.>>>
सिरीयसली हायझेनबर्ग?
गेट वेल सून.

सिरीयसली हायझेनबर्ग? >> ताई, मी सगळीकडे खर्‍या भावनेतून आणि पोटतिडकीने प्रतिसाद लिहितो. तुम्ही माझे १००% प्रतिसाद १००% सिरियसली लिहिलेलेच असतात असे १००% खात्रीने घेऊ शकता.
'आंतरजालावर कधीच काही सिरियस घ्यायचे/लिहायचे नसते' ही तुमची विचारधारा नाही का? (तुम्ही एवढ्यातच एका बाफवर ही मुक्ताफळं ऊधळली आहेत)
त्यामुळे तुम्ही सगळीकडे टवाळी करणारे, नवोदितांच्या लिखाणाची टिंगल करून त्यांचा आत्मविश्वास खच्ची करणारे असेच प्रतिसाद लिहिता ह्याची मलाच काय सगळ्यांनाच १००% खात्री आहे. पण लेखक जुने वा नवे मोठ्या मेहनतीने भावना ओतून लेखन करतात हो.. कुठल्याही कारणाने त्यांच्या भावनांची टिंगल करू नका अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करेन.

माझ्यासारखा बिनकामी माणसाच्या लेखनाची/प्रतिसादांची हवी तेवढी टिंगल करा पण कृपया गंभीरपणे लिहिणार्‍या किंवा तसा प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या नवोदितांची नको. बघा बुवा जमलं तर.

@ लेखनशैली - ईंग्रजी माध्यमाचे असून मराठीत लिहीतात याचे कौतुक आहे. चुकत आहात तर चुकू द्या. भाषा ही भावना पोहोचवण्याचे माध्यम आहे. चुका थोड्या जास्त आहेत. पण थोड्या कमी झाल्या तर भावना पुरेश्या प्रभावीपणे पोहोचतील. आणि त्या कमी तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही सातत्याने लिहाल आणि चारचौघांची भीड न बाळगता ते पब्लिक फोरमवर प्रकाशित कराल. पुलेशु!

@ कथा - स्टोरीलाईन ईण्टरेस्टींग आहे.
अंजामसारखी कथा असावी असा वास येतोय.
हिरोईनचे लग्न झालेय. हिरोईन साडी घालतेय. पुढे काय?

नवरयाचा मड्डर्र ..?? Happy

अवांतर - लग्नानंतर साडीच घातली पाहिजे या जाचक प्रथा तरुणींच्या मनाविरुद्ध आजही पाळल्या जातात का?

लेखक तुम्ही नाउमेद होऊ नका,
आणि बिनधास्त इंग्रजी शब्द टाका - शुद्ध मराठीतच लिहायला पाहिजे असा काही रुल नाहीय.
मॅटर पोचण्याशी मतलब.
बाकी कथेबाबत - छान लिहिले आहे, अजून खुलवून लिहा, अजून कथा येऊ दे तुमच्या.