या व अशा घटना #MeToo च्या उलट प्रकारच्या आहेत का?

Submitted by Parichit on 14 December, 2018 - 04:37

आयुष्यात काही घटना अशा घडतात कि त्यांचे स्पष्टीकरण मिळत नाही. पुढे काही काळ जातो. आपण वयानुसार परिपक्व होत जातो. आपल्याला अजून काही माहिती मिळत जाते. किंवा आसपास अजून काही घटना घडतात. आणि मग कदाचित पूर्वी घडलेल्या 'त्या' अनाकलनीय घटनांचे अर्थ लागतात. बर, आता जास्त फुटेज खात नाही सरळ मुद्द्यावर येतो. माझ्या आयुष्यात पूर्वी ह्या घटना घडल्या आहेत. ह्यातली प्रत्येक घटना म्हणजे स्वतंत्र लेख होईल. पण विस्तारभयास्तव इथे कमीत कमी शब्दात मांडत आहे:

१. कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगला असताना कोणत्याही मुलाशी फारसे न बोलणाऱ्या एका अतिशय सुंदर मुलीशी योगायोगाने माझी मैत्री झाली होती. एक दिवस तिचा प्रोजेक्ट करण्यासाठी माझी मदत हवी म्हणून आपण रोज तास दोनतास तिच्या फ्ल्याटवर जाऊया असे ती म्हणाली. घरी तिचा डेस्कटॉप प्रिंटर वगैरे सगळा सेटप होता (तेंव्हा आतासारखे प्रत्येकाकडे लॅपटॉप नव्हते). तिच्या घरी कुणीही नसायचे. तरीही दोन तास सभ्यपणे चांगल्या मित्रासारखे तिच्यासोबत घालवायचो. असे काही दिवस गेले. खुशीचे दिवस होते. अचानक काय झाले माहित नाही. "बाकी राहिलेला प्रोजेक्ट माझा मी करते" असे सांगून तिने माझे येणे बंद केले. आश्चर्य म्हणजे पुढे तिने संबंधसुद्धा तोंडून टाकले. समोरून आली तरी ओळख दाखवायची नाही. पूर्णपणे इग्नोर करू लागली. त्यानंतर आजतागायत तिचा संपर्क नाही.

२. कॉलेजात असतानाच एका वर्गमैत्रिणीने (जी माझी खूप चांगली मैत्रीण झाली होती) एकदा घरी बोलवले होते. ती सर्वांशी फ्रेंडली होती पण कुणालाही घरी मात्र कधीच बोलवत नसे. मी गेलो तेंव्हा घरी ती एकटीच होती. नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेली. गाऊनवरच होती. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. सभ्यपणे चांगल्या मित्रांसारखे. तो दिवस अजूनही स्वच्छ आठवतो. पण पुढे काय झाले माहित नाही. या मैत्रिणीने मला पुन्हा कधीच घरी बोलावले नाही. इतकेच काय हळू हळू मैत्री सुद्धा कमी केली. औपचारिक संबंध फक्त ठेवले. कारण कधीच कळले नाही. (नंतर तिची अन्य एका मुलाशी घनिष्ट मैत्री झाली वगैरे ऐकायला मिळाले. खरेखोटे माहित नाही)

३. एक दिवस ऑफिसमध्ये एका मुलीची इमेल मला आली. विचारपूस केल्यावर कळले कि ती माझ्याच कॉलेजमधून नुकतीच पासआउट झालेली एक ज्युनियर मुलगी होती व नुकतीच तिथे जॉईन झाली होती. कंपनी एक असली तरी तिचे ऑफिस माझ्या ऑफिसपासून खूप लांब होते. म्हणून भेट अजून झालीच नव्हती. मग आम्ही नियमित चाट करू लागलो. एका वीकएंडला लंच साठी बाहेर भेटायचे ठरवले व भेटलो. भेटून दोघांनाही आनंद झाला. लंच झाल्यावर सहज तिला विचारले लॉंग ड्राईवला जाऊया का. मला अपेक्षा नव्हती पण ती हो म्हणाली. झाले. आम्ही गप्पा मारत मारत शहराबाहेर खूप दूर आलो. रस्ता व तो भाग एकदम निर्मनुष्य. एका विनोदावरून विषय निघाला आणि तिने अप्रत्यक्षपणे चावट कोमेंट केली. मी फक्त तिच्याकडे पाहिले आणि त्या एकांतवासात गप्पांची गाडी भलतीकडे वळून मैत्रीवर परिणाम होऊ नये म्हणून विषयच बदलला. तसेच थोडे अंतर पुढे गेल्यावर ती अचानक परत जाऊया म्हणू लागली. तिचा मूड बदलला होता हे कळून येत होते. मला आश्चर्य वाटले. आणि आम्ही तिथेच यूटर्न घेऊन परत आलो. येताना फार उत्साही वाटत नव्हती. शहरात आल्यावर उतरून पाठमोरी निघून गेली. बाय सुद्धा म्हणाली नाही. पुढे तिने इमेल अथवा चाट वर प्रतिसाद देणे बंद केले ते कायमचेच.

४. बऱ्याच वर्षांनी मी दुसरी एक कंपनी जॉईन केली. तिथे पूर्वीच्या एका कंपनी मधली एक कलीग आधीपासूनच आहे असे कळले. ती सुद्धा शहराच्या दुसऱ्या भागात असलेल्या ऑफिसात होती. पण पूर्वीची ओळख असल्याने आम्ही क्वचित चाट वगैरे करू लागलो. असेच काही दिवस गेले. एक दिवस एक विचित्र घटना घडली (तपशिलात सांगत नाही). त्यासंबंधी चाटवर बोलताना तिने सांगितले कि तिचे काही वरिष्ठ सहकाऱ्यांशी संबंध निर्माण झाले होते. ते ऐकून मी थक्क झालो. मग मात्र खुलेपणाने तिच्याशी चाटवर चर्चा होऊ लागली. एकदा मी तिला भेटायची इच्छा व्यक्त केली. खूप वर्षांनी तू आता कशी दिसतेस ते पाहायचेय म्हणालो. तिने होकार दिला. पुढे एकदा कामानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये ती आली तेंव्हा तिने मला लिफ्टजवळ बोलवले. मी गेलो. तिला खूप वर्षांनी पाहून आनंद झाला. फार बदलली नव्हती. तिने नवीन कार घेतली होती ती पार्किंगमध्ये पाहायला जाऊ म्हणाली. लिफ्ट आली. लिफ्टमध्ये आम्ही दोघेच होतो. तर हिने अचानक अंगावरचा जर्किन काढून मला विचारले "पहायचे होते ना मला. सांग आता कशी दिसते मी?" मी चाट पडलो. छान दिसतेस इतकेच कसेबसे बोललो. खाली पार्किंगमध्ये गेल्यावर तिच्या नवीन कारजवळ आलो. मात्र ती अचानक म्हणाली मला मेसेज आलाय महत्वाचा. काम आहे. मी जाते. आणि निघून पण गेली. पुन्हा तिने माझ्याशी फार संपर्क ठेवला नाही तो नाहीच.

अजून एकदोन अशाच घटना आहेत. सध्या #MeToo मुव्हमेंटने माध्यमांतून चांगलाच जोर धरला आहे. एकांताचा किंवा शारीरिक जवळीकीचा गैरफायदा घेणाऱ्याविरोधात मुली/स्त्रिया बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर माझ्या या घटना मात्र याच्या बरोबर उलट प्रकारे घडल्या आहेत असे जाणवू लागले आहे. काहीही गैर प्रकार झाले नसतानासुद्धा त्या त्या मुलींनी माझ्याशी संबंध तोडले आहेत.

स्त्रीची वा मुलीची इच्छा असताना समोरच्या पुरुषाने त्याला नकारात्मक प्रतिसाद देणे हेदेखील रिव्हर्स पण मीटूच आहे का?
(मला जे विचारायचे आहे तो हा नेमका प्रश्न. अॅमी यांच्या प्रतिक्रियेतून साभार)

तुमच्या आयुष्यात असे प्रसंग घडलेत का? मला वाटतंय प्रत्येकाच्या आयुष्यात घडले असावेत. तुमचे मत काय आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

> Submitted by mi_anu on 15 December, 2018 - 23:36

"नौका" म्हणजे लग्नाची बायको आणि "रंगीबेरंगी तराफा" म्हणजे "दुसरी स्त्री" असे असेल, तर "जेलीफिश" म्हणजे काय ते कळले नाही.

> Submitted by ऋन्मेऽऽष on 16 December, 2018 - 02:39

प्रतिक्रियेशी सहमत आहे.

> माझी इच्छा असताना समोरच्या पुरुषाने त्याला नकारात्मक प्रतिसाद देणे हेदेखील रिव्हर्स पण मीटूच आहे का असे धागाकर्ता विचारत आहे. आतातरी बरोबर आहे का मी?

हो अगदी हेच मला म्हणायचे आहे. धाग्याच्या विषयात हे स्पष्ट होत नसेल तर मी धागा अपडेट करतो.

> एकीकडे निकोप मैत्रीच्या बाता मारताना अशा विषयाचा उच्चार होताच विषय बदलून समोरच्याला अपराधी वाटण्यास भाग पाडणे ही भोंदूगिरी आहे

माझी चूक नाही असे मी म्हणत नाही. परंतु (मैत्रीवर परिणाम होईल, किंवा ती स्त्री/मुलगी आपल्याविरुद्ध नंतर कांगावा करेल वगैरे भीती वाटल्याने) माझ्याकडून प्रत्येक वेळी हे नकळत होत गेले. पण त्याचा परिणाम म्हणून असेही घडू शकते याची तेंव्हा कल्पना नव्हती. त्यामुळे त्या घटना माझ्या दृष्टीने अनाकलनीयच राहिल्या. पण #MeToo सुरु झाल्यानंतर मात्र जेंव्हा मी त्या घटनांकडे पाहिले तेंव्हा वाटले हे कदाचित #MeToo च्या उलट झाले असावे. (म्हणजे जसे #MeToo मध्ये स्त्री ची इच्छा नसताना पुरुष आपली इच्छा लादतो त्यामुळे ती स्त्री त्या पुरुषाशी पुढे कोणतेही संबंध ठेवत नाही. इथे मात्र तिची इच्छा असूनही पुरुषाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तिने संबंध तोडले आहेत). म्हणूनच 'असे असू शकते का?' याची चर्चा करण्यासाठीच तर हा धागा उघडला.

दोन शक्यता आहेत.
१. ती कृती /बोलणे, एका क्षणिक ऊर्मीतून घडले. समोरून हवा तो प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे एका अर्था नकार मिळाला. आता पुन्हा त्या व्यक्तीच्या जवळ आल्यावर सतत ती कृती आठवून अवघडल्यासारखे वाटणार, म्हणून संपर्कच तोडला.
२. कृती/उक्तीतून सुचवलेलाच खरा उद्देश होता. तो साध्य न झाल्याने पुढे संपर्कात राहण्याची गरज राहिली नाही.

पहिली शक्यता आधिक आहे. दोघांपैकी एकाला, तेव्हा जे झालं ते क्षणिक होतं. ते विसरून मैत्री कायम ठेवूया असं म्हणता आलं असतं.

समजा हवा तो प्रतिदाद मिळाला असता, तरीही पुढे अवघडल्यासारखं वाटून संपर्क तोडला जाण्याची एक शक्यता आहेच.

हे इन्फिनाइट लूपचं रूप घेण्याआधी थांबतो.

जनरल मध्ये आपले लीगल सेफ रिलेशन सोडून थोड्यासाठी मोहात पडणे या अर्थाच्या उपमा आहेत हो.
फार सिरीयस घेऊ नका.

छान पोस्ट किरणूद्दीन.>>+1111

सभ्य पुरूष हाच मुळात मोठा विनोद आहे

1 , 2 मध्ये काहीच वाटत नाही पण 3 4 मध्ये त्या बायकांना #Me Too चा हक्क आहे

हे वरचे लिहिलेले खरे असेल तर आत्मपरीक्षण करा
आणि खोटे असेल तर Get well soon

फ्रेंड्स सिरीजमधे एक एपिसोड आहे.
रेचलच्या वडलांना हार्ट अटॅक आलेला असतो म्हणून ती जन्मगावी जाते. तिला सोबत, सपोर्ट, मदत म्हणून रॉसदेखील तिच्यासोबत जातो. वडलांना भेटून, रडून वगैरे झाल्यावर रात्री ते दोघेच घरी असताना रेचल रॉसला किस करते आणि सेक्स हवे असा पुढाकार घेते. पण 'तू सध्या योग्य निर्णय घेण्याच्या योग्य मनोअवस्थेमध्ये नाहीयस आणि अशावेळी मी तुझ्यासोबत सेक्स करणार नाही' असे सांगून रॉस सभ्य पुरुषासारखा दुसऱ्या रुममधे निघून जातो.
दुसऱ्या दिवशी रेचल त्याला समजावते कि 'माझ्या योग्य-अयोग्य मूड, निर्णय घेण्याची क्षमता याबद्दल तू तुझ्या पुरुषी मानसिकतेतून बोलू नकोस. तुला सेक्स करायचे आहे कि नाही हे तू सांगू शकतो पण माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला ठरवू दे'.

तर जोपर्यंत स्त्री दारू किंवा ड्रग्ज घेतल्याने आर्बिटरी अवस्थेत नसते तोपर्यंत तिचा निर्णय तिच्यासाठी विचारपूर्वक घेतलेला असतो असे समजावे.
आणि अनुने दिलेल्या अल्गोनेच जावे.
उगाच अंदाज करत बसू नये.

याचा सगळ्याच मिटूशी संबंध नाही लावला तर बरे होईल. धाग्याचे शीर्षक 'जेव्हा स्त्री पुढाकार घेते' असे ठेऊन, मीटूचे सगळे रेफरन्स काढून टाकावेत असे सुचवते.

===
किरणुद्दीन आणि भरत दोघांच्या आजच्या पोस्ट चांगल्या आहेे

सभ्य पुरूष हाच मुळात मोठा विनोद आहे
>>>>

हा गैरसमज झाला की फार अवघड होते.

नराला मादीबद्दल आकर्षण वाटणे आणि व्हायसे वर्सा हे नैसर्गिक आहे. स्त्री पुरुष याला अपवाद नाहीत.

पण स्थळ काळ वेळ बघून त्या उत्पन्न झालेल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, तसेच परीस्थितीचा फायदा उचलत वा बळजबरीने समोरच्याच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्थापित न करणे याला सभ्यता म्हणतात.
आणि ती असते हो काही पुरुषांकडे Happy

फार प्रश्न पडतात बुवा तुम्हाला.. वेगवेगळे अर्थ काढले तरी पुढची काही मते निघतात बघा काय पटतंय ते.

१. कधी कधी माणसाचा लुनावाले ब्रम्हे होऊ शकतो, तुमचा पण झाला असणार.

२. कधी कधी ऐनवेळी फुकट सद्सद्विवेक जागृत होतो, आणि माणूस कच खातो.

३. कधी कधी फाटते.

४. समोरचा 9 दाखवतो, आणि आपण 6 समजतो. कदाचित त्या त्या व्यक्तींना तुमच्यात रस असेल, पण तुमच्यात' रस नसेल, असेही असू शकते!

५. या लेखातून तुम्ही आरशाची आरती करत असाल कदाचित

Pages