पराभव का झाला.भाजपच्या पराभवाचा फायदा कुणाला।

Submitted by ashokkabade67@g... on 13 December, 2018 - 03:00

सेमीफायनल म्हणून गाजलेल्या पाचही राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि भाजपला कुणी हारवुच शकणार नाही असे म्हणणाऱ्या नेत्यांच्या थोबाडीत जनतेने मतपेटीतून चपराक मारत त्यांचा सत्तेचा माज ऊतरवला.राहुल गांधींना पपु म्हणून हिनावणाऱ्या भाजप नेत्यांचे पप्पा बनुन त्यांनी भाजपला पराभवाची चव चाखायला भाग पाडले.. भाजपच्या यशाला जसे मोदी कारणीभूत ठरले तसेच या ,पराभवालाही तेच कारणीभूत आहेत।त्यांच्या कारभाराला कंटाळून अनेक मित्रपक्ष भाजपला सोडून बाहेर पडले? नोटबंदीचे अपयशं शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव शेतकऱ्याच्या आत्महत्या न झालेला विकास बेरोजगारीत झालेली वाढ पुरी नकेलेली आश्वासने आणि धर्माचे केलेले राजकारण प्रत्येक नेत्यांच्या वाचाळपणा आणिसोनीयांजीवर केलेली जहरी टीका.अशी अनेक कारणे पराभवाला कारणीभूत ठरली.पण हार कुणाची जीत कुणाचि पण फायदा मात्र शिवसेनेला.अशी गंमत झाली. इतके दिवस सेनेला दुर्लक्षित करणाऱ्या भाजपला आता सेनेची गरज भासु लागली आहे आणि आता पत्ते सेनेच्या हातात आहेत .भाजपला युतीची गरज आहे अण्यथा भाजपचा पंराभव अटळ आहे आणि याचाच फायदा घेत शिवसेना भाजपाची अडवणूक करून जास्तिच्या जागा पदरात पाडून घेत मोठ्या भावाचि भुमिका बजावत महाराष्ट्र काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. नुकत्याच झालेल्या धुळे मनपा निवडणुकीत गोटेंचे बंड झुगारून भाजप विजयी झाला आहे. शिवसेनेला भाजप म्हणावी तितकी दाद देणार नाही बहुतेक.

>>. भाजपच्या यशाला जसे मोदी कारणीभूत ठरले तसेच या ,पराभवालाही तेच कारणीभूत आहेत<< अतिशय चुक.. भाजपच्या परभवाला नेहरुच जबाबदार..!!

जर नेहरु पंतप्रधान झाले नसते तर इंदिराबाईंची काय बिशाद पंतप्रधान होण्याची..? आणि जर त्या पंतप्रधान झाल्याच नसत्या तर सोनियाबाईंनी राजीव गांधींशी लग्न केलेच नसते.. आणि जर सोनियाबाई व राजीव गांधींचे लग्न झालेच नसते तर राहुल गांधीचा जन्मच झाला नसता.. त्यामुळे आता ५ राज्यात भाजपची हार झालीच नसती..!! त्यामुळे भाजपच्या हाराकिरीला नेहरुच जबाबदार..!! (असे काल एक चिडलेला भक्त तावातावने कारणमिमांसा करताना पाहिला..!!)

Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol

भाजपा हरला ना. आता ह्या जिलेब्या खा. आनंदोत्सव साजरा करा.
फुकट वाटत आहात का तुम्ही? नाही म्हटलं फुकट्यांचा नायनाट करण्याचे स्वप्नं आहे तुमचे म्हणून विचारले. सावध असलेले बरे.

भाजप हरला कारण यावेळी संघाचा कोणी कार्यकर्ता तिथे ६ महिने तळ ठोकुन बसला नव्हता. या आधी भाजप जिंकला की लगेच दुसर्‍या दिवशी कोणा देवधर वगैरेंनी त्याभागात जाऊन कसे स्वयंसेवक उभे केले याच्या रसभरीत कहाण्या यायच्या. तसे कोणी देवधर याव्ळेस मिळाले नसावेत म्हणुन भाजप हरला. राहुल्/काँग्रेस हे सब झूट है!

विठ्ठल,
MP तर RSS वाल्यांचे वारूळ आहे,
अपयशाला बाप नसतो, त्यामुळे एकही RSS वाला पुढे येणार नाही, आलाच तर " काँग्रेस ला गाफील ठेवायला मुद्दाम RSS ने भाजप ला हरवले" असे सांगायला 15-10 मेसेज फिरतील

@ धागा,
फायदा कोणाला झाला?
1) मोदीला- पक्षांर्गत स्पर्धा कमी झाली, योगी जमिनीवर आले
2) गडकरी ला- मोदी करिष्मा कमी झालाय वाटले तर गडकरी नाव पुढे येईल
3) काँग्रेस ला - ओबविअस रिझन्स
4) NDA घटक पक्ष- परत एकदा महत्व आले म्हणून

बाकी सेने बद्दल मला फार स्ट्रॉंग ओपिनियन आहेत जी पब्लिक फॉरम वर मांडता येणार नाहीत,
पण ते विरोधी पक्षातच बरे, राज्य चालवण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत.

फुकट वाटत आहात का तुम्ही? नाही म्हटलं फुकट्यांचा नायनाट करण्याचे स्वप्नं आहे तुमचे म्हणून विचारले. सावध असलेले बरे.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 13 December, 2018 - 15:44
<<
हो,
तुमच्या सारख्यांसाठी फुकटच आहेत त्या जिलेब्या. कारण विकत दिल्या तर तुमच्यासारखे फुकटे लगेच श्री मोदींच्या नावाने मोर्चे काढतील, तेंव्हा तुम्ही लोक मिळतय तोपर्यंत फुकटच खायचे पाहा.

चहाचा धंदा बंद करुन जिलेब्या पाडण्याचा सुरु केला वाट्ट!
Submitted by विठ्ठल on 13 December, 2018 - 16:11
<<
चहाचा काय किंव्हा जिलेब्यांचा काय, धंदा करायला डोक व मेहनत दोन्ही लागतात
पण तुमच्या सारख्या फुकट्यांना ते कळणार नाही.

@ अनिरुध्द.. : अगदी याच विचारसरणीमुळे वाताहत झाली मोदींची. इतरांना कमी लेखण्याचा, तुच्छ्पणा, तुसडेपणा नसानसांत भिनलेला आहे. मोदींना स्वतःला कामं करायला जमत नाही म्हणुन रोज सकाळी उठल्यापासुन गेल्या ६० वर्षांतल्या त्यांना स्वतःला वाटणार्‍या चुकांची जंत्री सांगत बसतात जगाला..!

अगदी याच विचारसरणीमुळे वाताहत झाली मोदींची.
<<
काय आहे,
कावळ्यांनी गाय मरण्याची स्वप्न कितीही पाहीली तरी गाय मरत नसते.
भाजपाच्या गेल्या चार वर्षातील ३ पराभवानी, पप्पू गांधीच्या भाटांनी कितीही आनंद साजरा केला तरी तीन राज्यातील विजयात पप्पूचा वाटा किती हे कोणी ही भाट सविस्तर सांगू शकणार नाही.

ज्याला पप्पु म्हणुन हिणवलं तोच आता त्याला नावं ठेवणार्‍यांचा पप्पा झालाय हे त्यानं क्रुतीनं दाखवुन दिलंय.
इथुन पुढे पप्पु म्हणण्याआधी किमान १० वेळा विचार करा असं मोदिच्या पार्टिचेच नेते जाहीरपणे कान उपटु लागलेत. Proud Proud Proud

@ Filmy : अगदी खरंय... जिथे तिथे 'आमच्यामुळेच' चा टेंभा मिरविण्यासाठी शेवटी 'दत्तात्रेय' गोत्र तरी कामाला येणारच.. Lol Lol Lol

भाजपाच्या गेल्या चार वर्षातील ३ पराभवानी, पप्पू गांधीच्या भाटांनी कितीही आनंद साजरा केला तरी तीन राज्यातील विजयात पप्पूचा वाटा किती हे कोणी ही भाट सविस्तर सांगू शकणार नाही.
---
वरिल प्रश्नाचे उत्तर कोणत्या ही थापाड्या कॉंग्रेसी भाटाने दिले,
तर आम्ही ही मान्य करु की पप्पू हा पप्पू नसून रायबरेली मधील एकाद्या मशीदीतील विद्वान मौलवी आहे म्हणून.

कावळ्यांनी गाय मरण्याची स्वप्न कितीही पाहीली तरी गाय मरत नसते.

>>

हेच म्हणतो!

काँग्रेस मुक्त वगैरे वगैरे.

तुमच्या सारख्यांसाठी फुकटच आहेत त्या जिलेब्या.
फुकटयांना ठेचायची हिम्मत होत नाही का आता? एका पराभवात गळपटलात? आणि ती जिलेबी तुम्हीच खा, तोंड कडू पडले असेल तुमचे.

<< कावळ्यांनी गाय मरण्याची स्वप्न कितीही पाहीली तरी गाय मरत नसते. >>
---- गाय पवित्र प्राणी आहे, प्रत्यक्षातच नाही तर स्वप्नातही गाय मारणे गुन्हा आहे.

तीन राज्यातील विजयात पप्पूचा वाटा किती हे कोणी ही भाट सविस्तर सांगू शकणार नाही.
राहुल गांधींनी विजयाचे श्रेय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहे,त्यांच्याकडे भाट संस्कृती अजून रुजलेली नाही.

काँग्रेसला गाफिल ठेवण्यासाठी खेळलेली चाल आहे.

एक मोठा धोका पत्करुन (calculated risk) मोदी दोन घरे मागे जाण्याची चाल हेतुपुरस्सर खेळले आहेत कारण पुढे मोठी झेप अपेक्षित आहे. शेर जब दो कदम पिछे लेता है तो झपटने के लिये... Happy राहुलजी आप ने शेर को ललकारा है.

सुट्टीच्या दिवशी पॉपकॉर्नचा टब आणि एक मोठा कोका कोला घ्यावा, आणि मायबोलीवरील सगळे राजकारणी धागे उघडून ब्राउझर ऑटो रिफ्रेश रिफ्रेश मोड मध्ये टाकावा.आहाहा.... स्वर्गसुख म्हणतात ते यालाच. नको ती नाटकं, नको ते सिनेमे, नको त्या दोन दिवसाच्या छोट्या सहली.

Pages