दे दणादण

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 12:08

मायबोलीकरांच्या दे दणादण बोली म्हणजे प्रतिक्रिया/प्रतिसाद ---------
त्यात अनेक प्रकारच्या भावना दडल्या आहेत.
राग आहे, तिरकसपणा आहे, शुभेच्छा आहेत,सल्ला आहे, टोमणे आहेत, आपलेपणा ही आहे,प्रश्र्न आणि उत्तर ही आहे-----
असं बरंच काही आहे!!!!!!
बघाs तुम्हाला काय जाणवते?

१)आम्हालाही अजून ऐकावसं/वाचावसं वाटतंय.
लिहित रहा
२)बापरे!!!

३)गावाकडे पाटील करतात सर्वांचा स्वयंपाक. पा म्हणजे पाकक्रिया तील मुखिया असे पातील हे उपमान पुढे उच्चारदोषाने पाटील असे झाले.
४)आपणास आश्र
५)आज शनिवार आहे
६)लोक पाटलांचा राग का करतात असा धागा तुम्ही स्वतःच काढणार आहात कि त्यांच्यासाठी वाट बघणार ?
अर्थात आगाऊ श्रद्धांजली वाहीलेली असल्याने ती वेळ येईल का ही शंका आहेच.

७)एक धागा सुखाचा... शंभर धागे दुःखाचे!
तस्मात एकच धागा काढावा!!

८)मन धागा धागा जोडते नवा

९)धागा धागा अखंड विणूया

१०)ये मोह मोह के धागे

११)भांगडा डान्स मायबोली धाग्याच्या मदतीने यशस्वी रित्या बसविल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन Happy

डोक्यावर प्रिंसिपल + कोरियोग्राफी + जॉब असे त्रिविध टेंशन्स असतानाही आपण आज फूल रिलैक्स मुडमध्ये इतके बाफ काढताय ह्याचे संपूर्ण श्रेय नक्की कोणाला द्याल ?

ऑप्शन्ससाठी अजून एक बाफ काढावा Happy

१२)हे सगळे माबो आयडी आहेत? Uhoh

१३)हे सगळे माबो आयडी आहेत? >> कशाला आयडिया द्यावी म्हणतो मी त्या एकाला ? आभोआकफ

१४)कोण तो एक? Happy

१५)मस्त धागा , आणि 60 प्रकार टाकल्याचे कौतुक

१६)आणि 60 प्रकार टाकल्याचे कौतुक. >>> एव्हढे प्रकार तुम्ही मनाने लिहिलेत? कॉपीपेस्ट नसेल तर तुमचे नक्कीच कौतुक वाटतेय. एव्हढे प्रकार लिहायला तुम्हाला बराच विचार करावा लागला असेल नाही!!? Happy

ते ६१) नंबरचे 'धागा' हे काही समजले नाही.
१७)सध्यातरी तुम्हीच सगळ्यात जास्त जाणवताय.

१८)सगळ्यात जास्त: उठसूठ कसलेही धागे काढण्याचा प्रकार
सगळ्यात कमी: इग्नोरास्त्राचे कसब. (माझी ही पोस्ट सुद्धा याचे उदाहरण समजता येईल.)

१९)भरत आणि मानव Lol

२०)मायबोलीवर चांगले लेखन कमी आणि उठसुट फुट्कळ सल्ले मागणारे धागे जास्त आहेत.

२१)राग कमी आहे. प्रेम जास्त आहे.
त्यामुळे मायबोली कायमची सुटत नाही. आयुष्याने वेळ आणि संधी दिल्यास पुन्हा आपण ईथे येतोच..

२२)अरे एकाच वेळी तुमचे फुटकळ फुटकळ प्रश्न विचारणारे भरपूर धागे दिसताहेत . हे जरा जास्तच आहे .
आवरा जरा स्वतःला . काय लावलाय ? Happy
२३)ओ काय चालवलंय काय? उगा लिहायला मिळतंय म्हणुन भारंभार धागे काढत सुटला आहात.
कसली माहिती हवी होती तुम्हाला?
डान्स कसा बसावावा? मग भांगडा कसा बसवावा? मग काय तर देश्भक्तीच्या डान्स कसा बसवावा?
इथे लिहु शकता म्हणजे आंतरजालाचं ज्ञान आहे.
तर युट्युब वैगेरे करुन बघु शकता / डानस इथे लिहुन तुम्हाला कसा समज्णार असं काही प्रतिसादात लिहिलं तर तुम्हालाअ एवढा राग का आला?
बरं ह्याउपर काही झालं असेल तर कल्पना नाही.
पण ते तिथेच सोडुन न देता इतरही तीन-चार धागे सेम विषयावर काढताय.
माबोवर सल्ले मिळतच नाहीत. चेष्टा होते. माबोकर टवाळखोर आहेत. माहिती मिळाली आणि माझे पोट भरले वै वै.
अजुन येणार पण असतील धागे.
आवरा. तुम्ही बी पाटील आहात काय?

२४)सस्मित +100
२५)सद्गती

२६)माबोवर लेखन करून काय मिळतं??>>>>>> काही मिळत नाही. आजिबात लेखन करु नका इथे.

२७)तुम्ही भारंभार धागे काढून तुम्हाला काय मिळालं? तुमच्या लेखनातुन तुम्हाला जे काही मिळालं तेच बाकीच्यांना
२८)वाचक !

लेखनाला जर वाचकच नसेल तर ते व्यर्थ आहे.

२९)अरे आवरा

३०)तुमच्या डायरीतले लेखन, पुस्तक काढण्याएवढं मोठं नसेल तर इथे धागे काढून लिहून ठेवायच. वाचक भेटले तर ठीक नाही तरी ठीक.

३१)प्रतिसादही मिळतात. ती लेखकाची कमाई असतात. ते कमवायला त्याने आपल्या लिखाणाची गुंतवणूक केली असते. शब्दाने शब्द वाढतो असे म्हणतात ना..

३२)१. मला वाटतं "आपल्याला काय मिळतं?" याच विचारात आपण अडकून बसतो, "आपल्याला काय देता आलं?" हा विचार माणूस म्हणून आपल्याला कदाचित समृद्ध करू शकतो.

२. तुमचा प्रश्न खरंच चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. एखाद्याला टीव्हीवर चांगले सिनेमे बघायला आवडतात तर दुसऱ्याला ट्रेकिंग, भटकंतीची आवड असते, एखादा फूडी असेल तर दुसरा फिटनेस फ्रिक असतो, एखाद्याला दुसऱ्याची टिंगल करायला आवडते तर दुसऱ्याला स्वतःवर सुद्धा हसता येतं. तसंच एखाद्याला लेखन करायला तर दुसऱ्याला वाचायला आवडतं, हे सगळं करत असताना टाईम पास होतो का निखळ आनंद मिळतो का आत्मिक सुख प्राप्त होतं, हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

३. माबोवर लेखन का करायचं किंवा एकंदरीत लेखन, वाचन का करायचं हा प्रश्न पु.ल. देशपांडे यांनी खूप वर्षा आधीच सोडवला आहे, पु.लं. त्यांच्या "पुरचुंडी" नावाच्या पुस्तकात म्हणतात की, "पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल"

३३)लेखन कंड शमतो

३४)माबोवर लेखन करून काय मिळतं??
<<
गोंड्याची टोपी.
ही अशी
३५)आता अजून एक धागा वाचायला मिळेल उद्या -
"गोंड्याची टोपी कशी बनवावी ?"
Wink

३६)नाही हो - गोंडयाच्या टोप्यांचा डान्स कसा बसवावा? Light 1

Proud
३७)हां हेपण भारी आहे
३८)ह्या बाई खरच शिक्षिका आहेत? बापरे!
३९)ड्यु आयडी आहे हो Biggrin

४०)माहिती मिळते नक्कीच पण 2..3 ओळींचे धागे काढून काहीहीहं ह प्रकारची माहिती मागितली तर नक्कीच खिल्ली उडवली जाणार
४१)टवाळखोर हा शब्द ओळखीचा वाटतो.

डाकु डाकु डाकु डाकु डाकु डाकु डाकु डाकु (विचारमग्न अवस्थेत धरलेला ठेका)
४२)पर्यटनस्थळे, चित्रपट, पाककृती, पाळीव प्राणी, टीव्ही - गाडी सारख्या वस्तू, दूरदर्शन मालिका अश्या गोष्टींची विपुल माहिती मिळू शकते.

राजकीय व सामाजिक धाग्यांचे आखाडे झालेले असतात.

गझलांना संमिश्र प्रतिसाद येतात. कथा, कविता ह्यांना चांगले प्रतिसाद येतात. टाईमपासचे जे धागे असतात, जसे शाहरुख वगैरे, त्यावर धमाल चाललेली असते व क्वचित वादही होतात. स्कोअर सेटल करण्यासाठी कोणताही धागा वापरला जाऊ शकतो असा अनुभव आहे. उचकवणारे धागे आले की दोन दिवस अजगरासारखे पडून राहतात आणि मग शेवटी उसळून वर येतातच आणि तुफान मारामारी होते. वाहती पाने हे एक प्रकारचे उपसमुह असतात. तेथील सामुहिक मानसिकता खिल्ली उडवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत कुठेही वावरत असते.

४३)गझलांना संमिश्र प्रतिसाद येतात >> संमिश्र म्हणजे चांगलेदेखील असे सुचवताय का ?

४४)>>संमिश्र म्हणजे चांगलेदेखील असे सुचवताय का ?<<
स्कोअर सेटल म्हणजे काय याचे प्रात्यक्षिक Wink

४५)संमिश्र म्हणजे, एखादि गझल 2 3 प्रतिसादात आटोपली असेल तर त्याचे आगाऊ जस्टीफिकेशन आहे ते

४६)आदु यांच्या या धाग्यावरच्या पहील्याच प्रतिसादाशी सहमत!
खर म्हणजे त्या प्रतिसादानंतर अजुन काही बोलण्याची आवश्यकता नाही

४७)तरीही तुमच्या त्या भांगडाच्या धाग्यावर आलेले प्रतिसाद बघता बऱ्याच लोकांनी सयंम दाखवून तुम्हाला मदतच केलेली दिसतीय तरीही तुम्ही सरसकट मायबोलीला नावे ठेवताय यावरुन तुमच्याच हेतूबद्दल शंका यायला लागलीय.

४८)मायबोलीला वाईटच म्हणायचे असे ठरवूनच आलाय का?

४९)टाईमपासचे जे धागे असतात, जसे शाहरुख वगैरे ...
>>>>
शाहरूख टाईमपास ...

५०)@ धागा,
माहिती गूगलवर मिळते.
मायबोलीवर सल्ले मिळतात. काही आपुलकीचे काही खोचक. काही फायद्याचे काही मनोरंजनाचे...

५१)मायबोली वर खरेच माहिती मिळते का? >>>> अजिबात नाही. सरळ माबोसंन्यास घेऊन दुसरा काही माहीती स्त्रोत मिळाला तर पहा. किंवा मग वाचनमात्र रहा आणि माहिती विचारूच नका
( मदत घेऊन attitude दाखवणं तरी बंद होइल)

५२)मायबोली माहिती मिळण्याची साईट नाही. तस्मात इथे माहिती मिळालीच पाह्जे असं काही नाही.
तर तुम्हाला जर योग्य माहिती न मिळण्याचा कटु अनुभव आला असेल तर इथे माहितीपर प्रश्न न विचारता इतर आंतरजालावर विचारावे.
गूगलावे.

५३)गुगलला प्रश्न कसे विचारावेत असा धागा येईल आता

५४)मी म्हणाले तेच पण संयमित शब्दात लिहिलं आहेस. हे मला जमायला हवं. पटकन फ्यूज उडतो माझा
>>> Lol

५५)मिळते की. फक्त तुम्हाला काय हवेय हे तुम्हाला नीट माहीत असायला हवे.

५६)माहिती: पुलंच्यां जन्मशताब्दीनिमित्ताने बूकगंगावर त्यांच्या पुस्तकांवर १५% सुट आहे

५७)असा प्रश्न पडायला एखादं उदाहरण?

५८)झुरळं पालींचा धागा - यावर तर किती ठूसठूसकर माहमाहिआहे तेवढी गुगलून नाही मिळणार॥

५९)माहिती: पुलंच्यां जन्मशताब्दीनिमित्ताने बूकगंगावर त्यांच्या पुस्तकांवर १५% सुट आहे

>>>
धन्यवाद सस्मित ! काही पुस्तकं संग्रही नव्हती. एखादे होते पण कोणीतरी घेऊन परत न दिल्याने नव्हते ते पण घेतले!
लोकसत्ता चं अप्रकाशित पु. लं. पण दिसलं बुकगंगा वर
चिडकू>>> अरे वा! माहितीचा फायदा झाला म्हणजे.

६०)माहिती: आयडियल बूक डेपो, दादर, पुस्तक प्रदर्शन आणि विक्री. पुस्तकांवर आकर्षक सुट आहे. (ही वाचीव माहिती आहे. आज किंवा उद्या मी स्वतः जाउन बघेन Happy

६१)सस्मित मायबोली माहितीचा खजिना आहे! घ्यायचे काय आपल्या हातात ! Lol

६२)माबोवर माहिती मिळते, नक्कीच मिळते.
दारू कशी प्यावी, बार कसा उघडावा, कुत्रा घरी कसा सोडावा, ढेकूण कसे पळवले, विबास मधले कोत बो असे खूप उपयोगी धागे आहेत.

६३)हम बी चले, तुम बी चलो, चलती रहे मायबोली!

६४)ताई हे सगळे प्रश्न एकाच धाग्यात विचारा ना!! लोकांना उत्तरे द्यायला सोपे जाईल

६५)नीज माझ्या नंदलाला वर पंजाबी बीट्स चे फ्युजन करता आले तर पहा, एकदम हिट होईल

६६)ओके & thanks सिम्बा

६७)मायबोलीचे IIN होते आहे का?

६८)बल्ब बदलणे, घराला रंग लावणे, गवत कापणे इत्यादी जमत असेल तर तेच तालावर करायचे.. हा का ना का.. Happy

६९) Lol

७०)पण मुळात भांगडा कसा शिकवावा हे लोक ऑनलाइन लिहून कसं समजावणार? ☺️☺️☺️
म्हणजे मी इथे बसून 'हे बघा मुलांना सांगायचं की असे असे टुक टुक केल्यासारखे हात हलवत इंडेक्स फिंगर नाचवत तिरकं तिरकं पायात वाकत डावीकडे जायचं' तरी तुम्हाला इमाजीन होईल का?
युट्युब जास्त चांगले समजावू शकेल

७१)YouTube बघा. बर्याच आयडिया मिळतील . इथे माबो वर प्रश्न विचारून काय अर्थ??
धन्यवाद

७२)माफ करा ताई,
खिल्ली उडवण्याचा हेतू नव्हता.पण माझ्या आजूबाजूच्या प्री स्कुल शिक्षकांकडे अन्युअल डे साठी ज्या सुंदर आयडिया दर वर्षी असतात त्या बघून आपण खूपच बेसिक स्पून फिडिंग , तेही 2 वाक्यांचे नवे नवे धागे काढून मागता आहात असे काहीसे वाटले.
शिवाय प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर सगळ्या एज ग्रुप चे नाच तुमच्या एकट्या कडे देऊन ओव्हरलोड का केले आहे असेही वाटले.
चूक असल्यास माफी.

७३)अवांतर : फार पूर्वी एक विनोद वाचला होता. सरदारजींच्या दोन्ही हातांची पहिली एकेक बोटे (अनामिका) कापली तर त्यांना भांगडा करताच येणार नाही. Lol

७४)Lol kahihi ha joke

७५)Ikde bangda (malvani) icharla asta tar jamun gela asta ekvel...dhigbhr recipes milalya astya pan Proud bhangda vachun nachayla shikne mhanje "pohave kase" he book vachun pohayla (/ki budayla Wink ) panyat udi marlyasarkhe zale
YouTube बघा. >>+११
७६)सगळे प्रश्न एकाच धाग्यात विचारा ना!! >>+१११

७७)इथे मी फक्त माहिती विचारली आहे.
माहिती देता आली तर द्या. >>>>> Attitude, huh?

७८)मी अनु, अहो असल्या धाग्यांवर टाईमपास करायचा असतो. तुम्ही काय इतके मनापासून सल्ले वगैरे देताय!

७९)बाय द वे, ते प्रतिसादात इतके चांगले मराठी लिहता येत असताना धागा का नीट मराठीत लिहला नाही बरं
अहो त्या डान्स स्टेप्स कशा बसवाव्या मागत नाहीयत, गाणे सुचवा म्हणतायत.

८०)मी प्रत्येक वेळेला , बांगडा कसा तळायचा वाचतेय..

८१)ओके ओके
हो प्रि स्कुल च्या टीचर्स कडून त्यांना चांगला नाच यावा वगैरे अपेक्षा हल्ली केल्या जातात.आमच्या इथल्या प्रि स्कुल टीचर्स ची स्वतःची पूर्ण एक थीम बसवून नाच इव्हेंट असते.स्टेप ज्याला जश्या येतात त्याप्रमाणे त्याला/तिला जास्त किंवा कमी नाच वाली गाणी देतात.शिवाय मुलांचे नाच बसवणं, गोष्टीचे स्किट तयार करणं वगैरे कामं असतात.
भांगडा ला हल्ली ट्रेंड गाणं लंडन ठुमकदा, जुनं रंग दे बसंती, रेट्रो थीम असेल तर नया दौर चं गाणं.
थोड्या सोप्या भांगडा ऍक्शन मसाला भांगडा स्टेप बाय स्टेप युट्युब वर सर्च करा.भांगडा च्या बेसिक स्टेप लहान मुलांना जमतील.शिवाय अश्या कार्यक्रमा पूर्वी माईक वरून सूचना करतात की मुलं खूप लहान आहेत.त्यांच्या वयाचे असताना तुम्ही स्टेजवर उभे पण राहिला नसतात.ते नाचले, उभे राहिले, रडले, पळून गेले तरी त्यांना चिअर अप करा.चिडू नका.
जे मूल नाचत नाही त्याला टीचर स्वतः त्याच्या बरोबर नाचून संभाळून घेतात.
एकंदरच प्रचंड कठीण जॉब प्रोफाइल आहे.

८२)पाटील, धीर सोडू नका. आज काल वर्क ओव्हरलोड ही फॅक्ट ऑफ लाइफ आहे व स्पर्धेत तरून पुढे जायचे असेल तर कोप करावे लागते.

भांगडा शिकवा यचा असेल तर रंग दे बसंती हे गाणे बसवा. देशभ क्ती पर तसेच फार कॅची आहे. मुले असेच नाचतील. भांगडाचा ड्रेस अस्तो मुला मुलींचा वेगळा लुंगी कुर्ता व मुलांना वर सरदारजीचे पागोटे. दाढी मिस्या. मुले गोड दिसतील. मुली पण दोन लांब वेण्या वगैरे.

स्टेप्स सा ठी नगाडा नगाडा हे जब वी मेट मधील गाणे बघा. व कल हो न हो मधील प्रिटी वुमन.

सोप्या स्टेप्स असतात. मला बर्यापैकी भांगडा येतो व मी खाली बेसमेंट मध्ये कुत्रा फिरवायला जाते तिथे कोणी नस्ते तेव्हा मी मस्त नाचून घेते.

दुस रे म्हणजे जस्ट डायल किंवा सुलेखा साइट वर डानस कोरीओ ग्राफर सर्च करा. तुमच्या भागातील व्यक्ती शोधून त्याला परिस्थिती सांगा
व एक तास दोन तासाचे इंटेन्स कोचिन्ग घ्या. म्हणजे मुलांना शिकव णे सोपे जाईल. मुलांचे कपडे सप्लायर कडे मिळतील.

सोपे आहे हो टेन्शन घेउ नका. ओय बल्ले बल्ले. ओय शावा शावा.

८३)मी प्रत्येक वेळेला , बांगडा कसा तळायचा वाचतेय..>>> फिस्स्कन हसले. आजूबाजूचे बघायला लागले ना Lol

८४)अमा Happy
https://www.wikihow.com/Dance-Bhangra
इथे बेसिक स्टेप्स आहेत.

८५)खाली बेसमेंट मध्ये कुत्रा फिरवायला जाते तिथे कोणी नस्ते तेव्हा मी मस्त नाचून घेते. <<< कुत्र्याला भांगडा नक्की आला असेल.. Light 1

८६)तरीही यू ट्युब वर मी फिर फिर फिरले >>> खर की काय ? मी भागरा डान्स फोर किड्स टाकल्यावर दोन अगदी सोपे व्हिडियो पहिल्या दोनातच दिसलेत
हे बघा!
https://www.youtube.com/watch?v=hQkitPHEdt0
https://www.youtube.com/watch?v=lth5zHpSmgA

८७)तुम्हाला डान्स मधल काहीही येत नसेल तरी हे व्हिडियो दाखवुन करुन घेता येइल
बॉलिवुडच गाण हव असेल तर प्रिन्सिपलला गाणी सुचवायला सान्गा किवा सरळ पालकाना इमेल करा १-२ उत्साही आया सापडतिलच तुम्हाला बहुधा त्या आख्हा डान्सही देतिल कोरीओग्राफ करुन फक्त त्याच्या पोरास्नी पहिल्या रान्गेत वैगरे डोकेदुखी हेन्डल करावी लागेल.

धाग्याची टी आरपी वैगरे उद्देश असेल तर तुम्हाला इथल्या काही महान आयडिची शिकवणि लागेल बघा!
८८)इथे मी फक्त माहिती विचारली आहे.
माहिती देता आली तर द्या. >>>>> Attitude, huh?

८९)>> बघ की!!

९०)मी अनु, अहो असल्या धाग्यांवर टाईमपास करायचा असतो. तुम्ही काय इतके मनापासून सल्ले वगैरे देताय!
>>> अगदी अगदी! अनू मनापासून सल्ले पण देतेय आणि वर सॉरी पण म्हणतेय हे बघुन मलाच कसं तरी होतंय.

९१)भांगडा धागा काढुन कसा कळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी गाणी मागितली आहेत असं नाही वाटत मला. वर पुन्हा सल्ले देता आले तर द्या हा अ‍ॅटिट्युड ? लोकं पण मनापासुन सल्ले बिल्ले देतायेत,

९२)जरा थोडे कष्ट घेतले तर युट्य्ब वर लहान मुलांचे बसवलेले डान्स सापडतील... शोधता आलं तर शोधा!

९३)हे सारे मलाही कळते आहे.पण आमच्या आदरणीय प्रिन्सिपॉल ला कुणी सांगावे?
>>>>
प्रिन्सिपल ला काय सांगायचं या वर धागा येणार का आता?

९४)https://www.youtube.com/results?search_query=easy+bhangra+steps+for+kids+

९५)अवगुण आये बालमा, सावन बीता जाये
बेस्ट आहे हे गाणे भांगड्यासाठी.
९६)या बाईं इतक्या ओव्हरलोडेड असतील तर त्यांनी मुलांनाच विचारावे. तर ती जास्त चांगला सल्ला देतील असे वाटते, ती जास्त अपडेटेड असतात.

९७)ओये बल्ले बल्ले
९८)ओये शावा शावा

९९)ती जास्त अपडेटेड असतात.>>> +१ Proud
रोल नं २१ ह्या कार्टुन सीरीज ,, बल्ले बल्ले शावा शावा हे गाण खुप मस्त आहे.लहान मुलांना ते दाखवा. क्रीस नाचतोय म्हटल्यावर ते पण उत्साहात शिकतील.तुम्हांला पण सोप जाईल.
१००)ओये शावा शावा
>>>>>
+७८६
माहीया वे शावा शावा.. कभी खुशी कभी गम.. मुलांना फिलींग सुपर्राटार्स होईल Happy
अदरवाईज्ज पंजाबी गाणी बोअर असतात..

१०१)ओये शावा शावा
>>>>>
+७८६
माहीया वे शावा शावा.. कभी खुशी कभी गम.. मुलांना फिलींग सुपर्राटार्स होईल Happy
१०२)अदरवाईज्ज पंजाबी गाणी बोअर असतात..>>>>>>>
+८७६
रुप है तेरा सोणा सोणा
सोणी तेरी पायल
छन छना छन ऐसे छमके
करदे सबको घायल
कह रहा आखोका काजल
इश्क मे जीना मरना
शावा शावा माहिया वे
शावा शावा
य्या Happy

१०३)कां करू सजनी, आये ना बालम

१०४)येइल येइल.
१०५)उडता पंजाबचे टाईटल ट्रॅक सुद्धा मस्तयं नाचायला.. थोडे हटके.. पंजाबची दुसरी बाजूही दाखवायला हवी ना लोकांना

१०६)छे छे! मुलांना असल्या गाण्यावर नाचवायचं नसतं.
त्यांच्या बालमनावर परीणाम होतील.
१०७)छान....
१०८)हे कडक आहे
१०९)खूप गोड आणि निरागस.
११०)छान आहे कविता,
१११)<<खूप गोड आणि निरागस.>>
हो ना.
११२)नीट कळाले नाही.
थोडे अजून विस्ताराने सांगितले तर वाचायला आवडेल.
११३)मिस्टिरीयस
११४)आताही तुम्ही लिहिलेलं नक्कीच आवडत आहे.
लिहित रहा.
११५)अप्रतिम
११६)शेवटच्या दोन ओळी सोडून बाकी कविता .... अप्रतिम.
होती तहान अधुरी---- >> ऐवजी 'आहे तहान अधुरी' असे वाचल्यास शेवटच्या दोन ओळीही कवितेशी जुळून येतात.
मस्त मस्त!
११७)सही..
पूर्ण अभ्यासक्रम कवितेत गुंफला आहे. मस्त कल्पना.
११८)खासम खास.. कल्पना!
११९)मस्त Happy
१२०)छान.
वास्तव, स्वप्न, ईच्छा ह्यांचा मस्तच मिलाप साधलात.
१२१)डबल पोस्ट झाल्यासारखी वाटते आहे.
पण ह्याचे शीर्षक जास्त आवडले.
122)१ल्यावहिल्या अर्थहीन अर्ध शतकाबद्दल अभिनंदन

१२३)Amitava, Seattle madhe ashich ek Aai bhetaleli.
Mala mhanali, ha (her toddler) "chikani chameli baghitalyashivay jevatach nahii"
Mee ugachach sovala vichar karat basallele tumacha pratisad vachala nasalyane. Happy
To mulaga bayakankade kasa baghat asel aata hyachi vegali kalpana karayachi garaj nahi.

Overall ch, aajubajuch public drugs vagaire enjoy karat asel tar apala vichar, bhumika sodun enjoy karatahet na, he baghave. Happy

BTW, asha exposure mule vayat yenyache vay kami zale ahe ase aikalay ka kuni? Ohh.. Its just casual.

१२४)नानबा, परत एकदा अनुमोदन.
मी गेले काही वर्षे प्री प्रायमरी, प्रायमरी शाळेत शिकवले आहे. मुलांची निरागसता हरवत चालली आहे हे प्रकर्षाने जाणवते.
दिल्लीतल्या शाळेत तर पहिलीतल्या मुलांकडून बरीच वर्णने ऐकली आहेत. त्यांना त्याचा अर्थ कळत नव्हता म्हणून त्याचे गांभीर्य कमी होत नाही. अशा अनुभवांमुळेच परत परत सांगावेसे वाटते की जोवर शक्य आहे मुलांना दूर ठेवा अशा गाण्यांपासून, सिनेमांपासून, सिरिअल्सपासून.
त्यांना एक ना एक दिवस हे सगळे कळणारच आहे, पण ते योग्य वयात कळू द्या. सध्या त्यांच्या वयाला साजेसे ज्ञान द्या. आणि हे फक्त घरी संस्कार करून होणार नाही. शाळा आणि सभोवतालचा समाज पण खूप महत्त्वाची भुमिका बजावतात यांत. अशी गाणी, शब्द सतत कानावर पडले की हे शब्द वापरणे चूकीचे आहे असे वाटणारच नाही त्यांना.

१२५)To mulaga bayakankade kasa baghat asel aata hyachi vegali kalpana karayachi garaj nahi.
>>>किती घाण विचार हो? एका toddler बद्धल बोलताय तुम्ही. चिकणी चमेली बघण्याचा तुमचा दृष्टिकोन ( प्रौढ व्यक्तीचा) आणि एका toddler चा समान कसा असेल??

१२६)Would you show sex scenes to your toddlers saying that their view is different?
Chikani chameli, i couldn't watch completely even once. its so tasteless.
I would never ever show it to my kiddo at that age.
BTW, mazi post disali Ki tumhee palat yeta virodh nondavayala. Lol

१२७)मुलांच्या वयाला साजेशी, त्यांना समजेल अशी भरपूर गाणी असतात की. बीट्स चांगले आहेत म्हणून त्यांना कुठल्याही गाण्यावर नाचवणं योग्य वाटत नाही.

१२८)केवळ तो नाच बघितला म्हणून तो मुलगा बायकांकडे कसा बघत असेल हे ओव्हर इमॅजिनेशन आहे नानबा.
हा भाग वगळता तुमच्याशी, प्राचीशी सहमत.
असले नाच छोट्या मुलांकडून बघवत नाहीत, योग्य वाटत नाहीत.

१२९)हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद
कोणते गाणे निवडलेत शेवटी?

१३०)देल्लीबेलीचे भाग डीके बोसडीके मस्त गाणे आहे. पुर्ण गाणे घाणेरडे लिरीक्स पण धम्माल बीट्स आहेत.

सुट्टा ना मिला गाणे कोणी ऐकलेय का?
ओरिजिनल शिव्यांचे वर्जन.
अस्सल कचकचीत शिव्याच आहेत त्यात.
गाण्याची म्युजिक मस्त आहे. तरी त्यातल्या शिव्यांमुळे मोठ्याने ऐकता यायचे नाही.

पण नर्सरीतल्या मुलांना शिव्यांचे अर्थ माहीत नसल्यास अशी गाणीही ट्राय करायला हरकत नाही.

हेच वय आहे त्या पोरांचे अशी गाणी एंजॉय करायचे. एकदा का शिव्यांचे आणि घाणेरड्या शब्दांचे अर्थ समजले की बिचारे संगीताचा निर्मल आनंद लुटू शकणार नाहीत Sad

शुभेच्छा !
१३१)हे मी टीचर्ससाठी सुचवलेले. लहान मुलांना मौजा ही मौजा लाऊन मौज करू द्यावी.

१३२)मी पाटील आहे जी,
तुम्ही नेमके काय बदलले माहीत नाही पण हे बदलून आता पहिल्यापेक्षा जास्त छान वाटत आहे...
बदल केल्याबद्दल धन्यवाद.
आता तुमचे बदल केलेले सगळे लेख पुन्हा वाचतो.

१३३)अय्या! कित्ती छान झालाय लेख आता बदलल्यावर.
मीपाआजी, तुम्ही असेच लेख लिहित - एडिट करत रहा.
धन्यचवाद Lol

१३४)सस्मित,झकास!
१३५)६४ कोणत्या ते माहित नाही... पण ६५वी कला 'जाहिरातबाजी' आहे असे आत्ताच ईथे वाचले
https://www.maayboli.com/node/63851

१३६)ताई ,गूगलवर हेच टायटल टाकलं तर पहिलीच लिंक मिळते. एकदा प्रयत्न करून बघाच

१३७)१ विद्या बालन आहे, १ वर्गात होती व १ शेजारी रहायची. बाकीच्या ११ कोणत्या माहीत नाहीत.

१३८)https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A4%B7%E0%A5...

१३९)सहासष्टावी कला किंवा पंधरावी विद्या म्हणजे मायबोलीवर सटासट, एकामागून एक धागे काढत रहाणे!

१४०)मूळ प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, आता येऊ द्यात इतर लोक, नि होऊन जाऊ दे धिंगाणा. दर धाग्याला शेकडो प्रतिसाद मिळेस्तवर बावळटासारखे लिहीत रहायचे, म्हणजे त्याहून जास्त बावळट लोक येऊन आणखी काहीतरी लिहीतात!

१४१)हाय पाटीलबर्ग !
भेटा वडापावच्या गाडीवर. जिलब्या टाकायचे बंद करायला किती घेणार ? मीटींग करू
१४२)Lol Lol Lol

१४३)इथे बर्‍याच वर्‍शापुर्वी हा विषय हाताळला गेलाय
https://www.maayboli.com/node/341
१४४)माबो म्हणजे व्हॉटसअ‍ॅप झालं का? आला मनात प्रश्न काढा धागा.. जस 'कायवर' आपण एखाद्या गृप ला विचारतो..
१४५)हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.
१४६)हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.

१४७)"सं" ने सुरू झालेले शब्द हे नुसते शब्द न वाटता एक चैतन्याचा झरा/ अनुभव/अनुकरण/स्त्रोत/उल्लेख वाटतो.>>>> वावा! क्या बात.

ऋ, तुला काय लिहायचंय नक्की? डास काय? डास? पाटील सं बोलताहेत तु डास काय बोलतोस?
१४८)माझा रुमाल.

१४९)तुमचा रुमाल पंतप्रधान?? Wink Light 1

१५०)प्रणव मुखर्जींना करायला हवे.
१५१)काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का

लाल बहादूर शास्त्रीना संधी मिळाली ती शेवटची. त्यानंतरच्या दोघांना संधी मिळाली ती सोनिया पंप्र होऊ शकत नव्हती म्हणून. आता गांधी घरात उमेदवार आहे. याला अद्याप मुले नसली तरी प्रियंकाला आहेत. त्यामुळे काँग्रेसचा पंप्र उमेदवार कोण हा प्रश्न गांधी फॅमिली असेतो चर्चिण्यात काहीही अर्थ नाही.

१५२)मनमोहन सिंग यांच्यानंतर निलंकेणी यांचे नाव चर्चेत होते २०१४ला. बहुतेक ते स्वत: राजकारणातुन बाजुला झाले किंवा रागा साठी त्यांना हटवण्यात आले असावे. जसे अडवाणींना हटवण्यात आले.

१५३)सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आणि वैयक्तिक कामगिरीचा ऊंचावलेला आलेख पाहता राहुल गांधीच बेस्ट पर्याय आहेत.

अर्थात जे व्हॉटसप फॉर्वर्ड आणि फेसबूकवरच राजकारणाचे धडे गिरवतात त्यांना हे पटणार नाही.

१५४)<< भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा????? >>
------- लोकसभेत ज्या पक्षाचे बहुमत असेल त्या पक्षाचे खासदार ठरवतील प्रधानपदावर कोणाला बसवायचे.

१५५)सुयोग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदारांना शुभेच्छा...

१५६)योगी कोइ शक... Happy

१५७)उद्धव ठाकरे

१५८)त्यानंतरच्या दोघांना संधी मिळाली ती सोनिया पंप्र होऊ शकत नव्हती म्हणून >> सोनिया गांधी का होऊ शकत नव्हत्या तेही सांगा..

१५९)त्यामुळे काँग्रेसचा पंप्र उमेदवार कोण हा प्रश्न गांधी फॅमिली असेतो चर्चिण्यात काहीही अर्थ नाही. >> धाकर्त्यने कोण होईल विचरले आहे. उगा गांधी घरण्याच्या नावाने गळे का काढताय?

१६०)रामदेव बाबा
सगळे सकाळी उठुन योगासने आणि कपालभाती करतील.

संपूर्ण राष्ट्र निरोगी बन जायेगा.
आणि केवळ पंतजली एकही ब्राण्ड होगा पुरे भारत वर्ष में
जुते से लेके पगडी तक और सुबह के चायसे लेकर रात को लेने के लिये पेट साफ करने वाले चूर्ण तक!
पतंजली ट्र्क से लेकर पतंजली की पीन तक..

अजून बरेच काही ह्या यादीत समाविष्ट करता येईल बघा....

१६१)सोनिया गांधी का होऊ शकत नव्हत्या तेही सांगा..>>>+1

धाकर्त्यने कोण होईल विचरले आहे. उगा गांधी घरण्याच्या नावाने गळे का काढताय?>>>

१६२)धागा नीट वाचा हो. काँग्रेस पार्टी आली तर कोण हा प्रश्न आहे/होता. आता त्यांनी विषय बदलला असेल तर माझे कमेंट डिलीट करते.

१६३)सोनिया गांधी जन्माने भारतीय नाही म्हणून पंप्र होऊ शकत नाही हे तेव्हा वाचले होते. नंतर हा अडथळा दूर केला गेला का हे माहीत नाही.

१६४)राजकीय घडामोडी पाहता पुन्हा एकदा कांग्रेस विराजमान सध्या ४राज्यात झाली आहे,हे पाहता लवकरच कांग्रेस सत्तेत परतत आहे,हे फक्त राज्यात होत आहे की भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा?????

हा मूळ विषय आहे.

१६५)काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का>>>>>> अगदी!

१६६)<< सोनिया गांधी जन्माने भारतीय नाही म्हणून पंप्र होऊ शकत नाही हे तेव्हा वाचले होते >>
------ मी पण असेच वाचले होते... आणि त्या काळी माझा असाच समज झाला होता.

१६७)आता वाचलेले खरे असतेच असे नाही म्हणुन क्रॉस रेफरंन्स शोधतो... पडताळणी करतो... आणि मग ठरवतो. पण प्रधान पदासाठी जन्माने भारतीयच असायला हवे असा काही नियम नाही. लोकसभेचा/ राज्यसभेचा कुठलाही सभासद, बहुमत सिद्ध करुन, प्रधान होण्यास पात्र आहे.

१६८)हो, तुमचे बरोबर आहे. असा कुठलाही नियम नाही.

१६९)ॠन्मेष नायतर रामदास आठवले, पण मला राहून राहून असं वाटतंय कि ऋन्मेष बाजी मारणार.

१७०)सोनिया गांधीनी भारतीय नागरिकत्व घेतले नव्हते म्हणून त्या पंप्र होऊ शकल्या नव्हत्या.त्यांच्या इटालियन नागरिकत्वावर त्यावेळी टीका झाली होती.

१७१)भारताचा पुढील ५वर्षांसाठीचा पंतप्रधान कोण होईल?

२०२४ नंतर हा धागा काढा. २०१४ मध्ये प्रचारादरम्यान मोदींनी जनतेकडे १० वर्षांकरिता राज्य चालवायला मागितले होते. त्यांना मत देणार्‍या बहुसंख्य मतदारांनी (तुम्ही त्यांना भक्त म्हणा किंवा समर्थक किंवा आणखी काही) त्यांचे हे अपील स्वीकारुनच त्यांना मतदान केले होते. ते पुन्हा त्यांनाच मत देतील. राज्यातील विधानसभा निवडणूकीशी यांचा संबंध नाही. १९९५-९९ काळातील शिवसेना भाजप यूतीला महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेत नाकारले होते तरीही त्याच वेळी झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात भाजप-सेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या. एक्झिट पोल घेणार्‍यांना दिसून आले होते की मतदान केंद्रात गेलेला मतदार एकाच वेळी राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तर लोकसभेकरिता युतीच्या उमेदवारांना मत देऊन बाहेर पडत आहे.

१७२)२००४ साली कलाम यांनी सोनियांना पंतप्रधानपदासाठी बोललण्याची तयारी केली होती. पण सोनियांनीच मनमैहनसिंग यांचे नाव दिले.
त्यांच्या जन्माने भारतीय धसण्याचा मुद्दा कलाम यांच्यासमोर अजिबात नव्हता. ( हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे)
त्या खासदार होत्या म्हणजे नागरिक झाल्या असणारच.
सुब्रमण्यम स्वामींच्या सुरस कथांमुळे लोकांना वाटतं की सोनिया पंतप्रधान होऊ शकत नव्हत्या..
त्यांचा एकेरी उल्लेख लक्षणीय आहे.

१७३)मनमोहन सिंग दहा वर्षं पंप्र होते, त्यांना गांधी घराण्याने दत्तक घेतले होते बहुतेक.

१७४)@ मानव पृथ्वीकर : प्रणव दा, खरोखर च सुयोग्य व्यक्ति होते, मुळात हुषार, मितभाषी परंतु अत्यन्त शिस्तीचे... आणि म्हणुनच ते कॉन्ग्रेस ला डोइजड
होत होते बहुदा, म्हणुन काँग्रेस ने त्यांना सरळ राष्ट्रपती बनवले... एक्दा इतक्या सर्वोच्च पदावर माणुस बसला कि तो काहि केल्या पुन्हा पं.प्र वगैरे होउ शकत नाहि... थोड्क्यात राजकिय जीवनाचा शेवट Wink काँग्रेस मध्ये काहि व्यक्ती खरोखर अभ्यासु आहेत्/होती, परंतु आपल्या निष्ठा गांधी-नेहरु घराण्याला आणि लाचारी ला वाहायल्या मुळे सगळं मुसळ केरात गेलयं

१७५)मोदी कसे आहेत आणि रा.गा. काय आणि किती पाण्यात आहे हा विचार एक वेळ बाजुला ठेउ या.... मुळात प्रोब्लेम हा आहे कि सध्या काँग्रेस कडे एक हि असा चेहेरा नाही जो काँग्रेस ला एकहाती सत्ता मिळवुन देईल. त्या मानाने मोदींचे पारडे जड आहे. मुळात माणुस अभ्यासु आहे, कष्टिक आहे, प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये Wink

१७६)२००४ साली राहुल गांधी अ‍ॅक्टीव न्हवते. सोनिया गांधी का नाही झाल्या त्याबद्दल माह्ति नाही.
२०१९ जर कॉग्रेसला २०० च्या वर जागा मिळाल्या तर राहुल गांधी . नायडु आणि जेडीयस मिळुन ३० जागा देतिल .मग बहुमतासाठी बाकीच्या मिळायला त्रास नाही.
१५० जागा मिळाल्या आणि कॉग्रेस नंबर १ चा पक्ष असेल तर १९९०-९१ मध्ये चंद्रशेखर किंवा त्यानंतर देवीगौडा जसे पंतप्रधान झाले तसे कोणीही होउ शकते. अगदी शरद पवार, मायवती, ममता, मुलायम ह्या सगळ्याना समान संधी आहे.
त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर माझा पास.

१७७)प्रपंच नसल्याने??

मध्यंतरी गुजरातेत कुठल्यातरी स्त्री वर पाळत ठेवल्याचा प्रपंच चालू होता कोणत्या तरी 'साहेब' साठी
प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये >>
हे रागांच्या बाबतीत पण सत्य आहे!

१७८)आणि मुळात पक्षाचे निवडून आलेले सदस्य (नियमानुसार) / पक्षाध्यक्ष(बर्‍याचदा) ठरवतात.
त्यामुळे कुणीही होऊ शकते..

१७९)कमळ नाही फुलले तर अरविंद देखिल होऊ शकतात! Wink

१८०)>> हे रागांच्या बाबतीत पण सत्य आहे! << अहो पण त्या बावाजी च्या बेसीक मध्येच लोचा आहे हो Lol

१८१){मुळात माणुस अभ्यासु आहे, }
मोदीपण अभ्यासू आहेत? फडणवीसांचं माहीत होतं. हे नवुन ऐकलं.

१८२)प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये >>

जामच हसायला आले.... मायवतीपण आहेत की .. प्रपंच आहे म्हणून जितके भाजपे आहेत सगळ्यांना कामचुकार घोषित करायला हवे. किंबहुना त्यांना प्रपंच आहे म्हणून मोदींनाच धावुन्धावुन सगळ्या मंत्र्यांची कामे स्वतः करावी लागत आहेत.

१८३)प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये>>>>> Lol Lol Lol Lol Lol तरीच बोललो तो सलमान खान बिग बॉसचा शो संपल्यावर प्रत्येक वेळी देश का नाम रोशन करो का बोलत असतो सारखा.

१८४)इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींचीही हत्या झाल्याने अमिताभ बच्चन ने परिवाराला सल्ला दिला की आता बास, पंतप्रधानपद दुसऱ्याला द्या

१८५)सोनिया ह्या परदेशी असल्याचे कारण दाखवुन जाणत्या राजांनी निराळा पक्ष काढला व सत्ता जातीय हे बघून त्या परदेशी पाहुण्यांशीच हातमिळवणी करून राज्य देशोधडीला लावून पुन्हा जाती-आधारित मोर्च्यांबाबत प्रक्षोभक विधाने करायला व पुतण्याच्या जिभेवर व सिंचन प्राकरणावर लगाम ठेवता येत नाही हे सांगायला मोकळे झाले

त्यामुळे ते आता कायमचे मांडलिक झाले व ह्यावर उदय ह्यांचे संतुलित व संभ्रमित प्रतिसाद येणार ह्यात वाद नसून त्यांचा प्रतिवाद नाही केला तरी पाच सहा अनियमित व दोन तीन नियमित झमपट त्यावर पोस्टी ओतणार हे नक्की

१८६)पुढील पंतप्रधान जर मोदी होऊ शकले नाहीत तर राहुल गांधी होतील आणि ह्या देशाची राहुल गांधी पंतप्रधान असण्याची संपूर्ण योग्यता आहे

ते पंतप्रधान झाले की चिनी राजदूतांना उजळ माथ्याने भेटणे, उजळ माथ्याने वार्षिक पंचावन्न दिवस थाई सुट्टी घेणे, जमावातील स्त्रिया खळ्यांवर भाळून चुंबन घ्यायला धावल्या तरी ढिम्म न हलणे ह्या गोष्टी शक्य होतील व शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे प्रश्न चुटकीसरशी सुटतील

विविध महादेव मंदिरांबाहेर रांगा लागतील व ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील

-'बेफिकीर'!

१८७)बेफि तुम्हि जळु नका. तुमच्या भाग्यात नाहीत त्या गोष्टी. त्या दुसर्‍या कोणाला मिळतायत तर जलन ठिक नहि.

१८८)अमिताभ बच्चन ने परिवाराला सल्ला दिला की आता बास, पंतप्रधानपद दुसऱ्याला द्या. >> Rofl

१८९)>>ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील
हे भारी आहे. Proud थोडक्यात राधिका च्या जागी शनाया ला बसवले तर सर्वच प्रश्ण मुळासकट संपतील असे म्हणण्यासारखे. Proud

१९०)राहुल पंतप्रधान होण्याच्या शक्यतेनेच इतका तडफडाट होतोय. झाल्यावर मुंडण करून चणे खाऊन जमिनीवर झोपण्यासारखा काहीतरी कार्यक्रम हाती घ्यावा लागेल बहुतेक.

१९१)काँग्रेसमुक्तच्या वल्गना करता करता एकदम राहुल गांधींना पंतप्रधानपदी बघू लागलेत भक्त आणि त्यांचा पक्ष. अरेरे! इतक्यात हवा गेली? त्या ५६ इंची फुग्यात हवा कोण भरणार?

१९२)राहुल च्या "खळ्यांचा" काल पासून झालेला दुसरा उल्लेख.
माझ्या नेत्याहून तुमचा नेता देखणा दिसतो म्हणून इतकी पोटदुखी?

आता शारीरिक बाबींबद्दल बोलणे सुरू झालेच आहे ,तर न्यूनतम लिमिट काय असावी हे ठरवून टाका, म्हणजे त्यापुढे अडमीन ना हाक मारायला बरे.

१९३)विविध महादेव मंदिरांबाहेर रांगा लागतील व ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील

या अशा खुदगर्ज वाचाळपणामुळेच ही वेळ आली आहे. असा तोंडाळपणा करण्याची ही मोडस ऑपरेंडी यावेळी फॉर अ चेंज म्हणून उलटली . सतत गळे काढणे . सतत लंब्यागप्पा, सतत शहीदगिरी, सतत मुद्दा सोडून भलतेच व्हर्चुअल काव्यात्म छप्पन इंची बोलणे ..तुमचे लीडर तुम्हाला फक्त यामुळे आवडतात, त्यांनी काहीतरी चांगले केले म्हणून नाही ,, हेच वाईट आहे आणि यासाठीच धोक्याची घंटा वाजली आहे.
तरी बरं अजून फार काही नाही बिघडले .इनमीन ३-४ राज्ये .. त्यातली १-२ कमी फरकाने आणि ओव्हरऑल मतांची टक्केवारी तर टक्करच आहे जवळजवळ ..तरी तुमचे लिव्हर हार्ट ब्रेन सारे एकाच वेळी गंडले .धीर धरण्याची, ,वाट पाहण्याची ,सबुरी ठेवण्याची इच्छा नाही कुवत नाही

१९४)मोदेंची बॉडी लँग्वेज काही वर्षांपुर्वी प्रॉमिसिंग वाटलेली असेल जनतेला आणि आता राहुलची वाटली ..दोघांचे गेल्या काही दिवसांतले बोलणे शेजारी शेजारी ठेऊन बघा बघू ... राहुल सुधरला आणि आणखी सुधरेल असे जनतेला वाटले असेल. मोदी आहेत त्याहून आणखी जास्त सुधराणार नाहीत अशी परस्पर खात्री करून घेतलीत का स्वतःची ? साहजिक आहे म्हणा .

ती साठ वर्षे त्यांना त्याकाळच्या करमदरिद्रि जनतेमुळे मिळाली असे एकवेळ समजून चलू.. पण आता या पाचनंतर काय खरे नाही असे का वाटू लागले ????जरा स्वतःला खोलीत कोंडून घेऊन थंड पाण्याचा ग्लास हातात धरून शांत बसून विचार करून बघता का ..एवढी देशाची आणि सीमांची काळजी आहे म्हणून म्हणले //

१९५)>>>>> धोक्याची घंटा

Lol

१९६)SC finds no irregularities in purchase of Rafale jets, dismisses all petitions for court-monitored probe
https://timesofindia.indiatimes.com/india/sc-finds-no-irregularities-in-...
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi

१९७)धोक्याची घंटा वाजतेयच, ज्यांच्यासाठी वाजतेय त्यांना ती त्यांच्यासाठी वाजत होती हे कळायला अजून काही वर्षे जावी लागतील. सुदैवाने मी तेव्हा नसेन. त्यामुळे नो फिकर.

१९८)धोक्याची घंटा वाजतेयच, ज्यांच्यासाठी वाजतेय त्यांना ती त्यांच्यासाठी वाजत होती हे कळायला अजून काही वर्षे जावी लागतील. सुदैवाने मी तेव्हा नसेन. त्यामुळे नो फिकर

१९९)कशाला काळजी करताय मग? अजून वर्षे गेलीच नाहीत का? केवळ गर्भित सूचक बोलणयाने फोबिया निर्माण करून मन नाही भरले अजून ९० वर्षात? येतेच आहे इस्लामी राजवट अजून तुमची... चांगल्या चांगल्या लोकांच्या मनात विष कालवून आयुष्य खराब करून समाधान मिळाले नाही? आपण आपली पोरे तर परदेशात पळून जातात इथे आगी लावून...

२००)SC finds no irregularities in purchase of Rafale jets,

>>

चितळे मास्तरांच्या धाग्यांवर व्यवस्थित दिसला असता प्रतिसाद. इकडे पुढचा पंप्र कोण ह्याची चर्चा.

२०१)काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का
<<
साधना यांचे प्रतिसाद लय भारी आहेत.

२०२)ज्या आडवाणी यांचे नांव माजी "भावी पंतप्रधान" म्हणून अजरामर आहे, त्यांचा जन्म भारतात झालेला होता का? की पाकिस्तानात?

२०३)बेफि, साधना या भाजप्यांची तद्दन खोटे रेटून बोलायची सवय कधी जाणारे कुणास ठाऊक.

२०४)न्यायालयाने 'प्रोसेस फॉलो झाली' म्हटले. भ्रष्टाचार केला की नाही माहित नाही म्हटले. याचा अर्थ क्लीन चिट असा होऊच शकत नाही.

२०५)पण जशी मोदीला दंग्यांतून न्यायालयाने क्लीन चिट दिली असे भासवले जाते, तसेच हे ही भासवणे सुरू झालेय ऑलरेडी.

***

सुदैवाने मी तेव्हा नसेन. त्यामुळे नो फिकर.
२०६)<<
अरे वा! बर्‍याच सुदैवी आहात की!

२०७)<<<थंड पाण्याचा ग्लास>>>
त्यापेक्षा दुसरे एखादे द्रव्य घ्या ग्लासात. बरे वाटेल.
मला तर वाटते प्रियांका चोप्राला पंप्र करा! ती आजकाल फार प्रसिद्ध आहे. शिवाय तिचा नवरा गोरा आहे.
किंवा मग सलमान का कोण तो त्याला.

२०९)राहुल गांधी ला करा नि लगेच त्याची ट्रंपशी भेट ठेवा. मग दोघे जे बोलतील ते ऐकून हसून हसून पुरेवाट!

२१०)नन्द्याभाउ... आज फोडलाय राव्हल्याने मोदीला...

२११)आज फोडलाय राव्हल्याने मोदीला... >>>>
आणि न्यायालयानं राव्हल्याला
मोदींना राफेल प्रकरणात न्यायालयाकडुन क्लीनचीट

२१२)न्यायालयाकडुन क्लीनचीट

>>

२जी वाल्यांना पण क्लीनचीट मिळालाच होता हो. (आता उकरू नये, पण तरीही) २००२ च्या बाबतीत हि साहेबांना क्लीनचीट मिळालाच.

२१३)<< प्रपंच नसल्याने देशाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाहिये>> >>
------- "यांना मोदी कधी समजणारच नाही... " असे कालच मायबोलीवर वाचले आहे आणि ते खरे आहे असे आता वाटायला लागले आहे. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉ. राजीव आनंद मुंबई, 099201 28217

Dr Prakash Bhambure
Pune, Maharashtra, 094233 28872

या दोघांपैकी जे सोयीचे असतील त्यांची भेट ठरवून घ्या.

****संपादित करून. स्वतः केलेली घाण स्वतःच स्वच्छ करावी!! म्हणून****
हा धागा अत्यंत विचारप्रवर्तक आहे. लोकांच्या प्रतिसादांवरून कल्पना येते की माणसांच्या मनात काय काय विचार येत असतात.
बर्‍याच जणांना हे कळले नसेल म्हणून धागाकर्त्याने धागा काढला.
मायबोलीवर असे धागे काढून (भांगडा कसा बसवावा, बार चा धंदा कसा करावा इ. ) एकून ज्ञान प्रसारण करावे हा मुख्य हेतू! म्हणजे गूगल नि यू ट्यूबला भक्कम कॉम्पिटिशन!
असेच धागे काढत रहा. आमचे ज्ञान (?!) वाढेल.

इथे यायचे म्हणजे जसे शरीरातील घाण टाकायला एका वेगळ्या ठिकाणी जायचे तसे मनातली घाण टाकायला मायबोलीवर येऊन असले धागे काढायचे नि त्यावर प्रतिसाद द्यायचे. >> अहो मनातील घाण काढण्यासाठीच एलिट मायबोलीकरांनी टीपापाची सुलभ व्यवस्था केली आहे.. तिथली सोय रोज मनसोक्त वापरून मग इथे सार्वजनिक सुलभ सोयी विरुद्ध घोषणा देणे असा स्वार्थीपणा तुमच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला शोभत नाही.

अरेरे ऊपरती होऊन पोस्ट बदलली का?
म्हणुन तुमच्या सारख्या elit आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांच्या वागण्यातील विसंगती दाखवून देणारी माझी पोस्ट बदलत नाही.
माफ करावे.