साहित्यः
१ वाटि राजमा
१ बीट
१ मध्यम आकाराचा कांदा
२ टेबल्स्पून तेल
मोहरि
हिंग
१ हिरवि मिरचि बारिक चिरुन
लिंबाचा रस आणि मीठ आवडिप्रमाणे
बारिक चिरलेलि कोथिंबिर
कृति:
राजमा निवडुन तिप्पट पाण्यात रात्रभर भिजवुन घ्यावा. सकाळि उरलेले पाणि काढुन टाकुन चाळणिवर निथळत ठेवावा. बीटचि साले काढुन बीट जाडसर् किसुन घ्यावा. बीटाचा किस, भिजवलेला राजमा दोन वाट्या पाणि घालुन प्रेशर कुकर मध्ये शिजवुन घ्यावा (३-४ शिट्या होवु द्याव्यात). शिजलेला राजमा मोडणार नाहि या बेताने एक पसरट भांड्यात काढुन घ्यावा आणि त्यात चिरलेला कांदा, लिंबाचा रस आणि मीठ घालुन हलक्या हाताने ढवळुन घ्यावे. वरुन मोहरि ,हिंग आणि मिरचिचि खमंग फोडणि द्यावि आणि परत एकदा हलक्या हाताने ढवळुन घ्यावे. आवडत असल्यास वर कोथिंबिर बारिक चिरुन घालावि. आवडिप्रमाणे पोळि अथवा भाताबरोबर वाढावि.
टिप : प्रोटिन्स, लोह आणि ब जीवन्सत्व यान्चा पुरवठा करणार्या या कोशिंबिरिचा आहारात अवश्य समावेश करावा.
एकदम हेल्दी!
तुझा पण next GTG चा पदार्थ ठरला !
- महागुरु