मस्तानम्मा यांच्या काही अस्सल देशी पाककृती

Submitted by atuldpatil on 5 December, 2018 - 03:21

हैदराबाद: जगातील सर्वात वयोवृद्ध 'युट्युबर शेफ' मस्तनम्मा यांचे निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर या मूळ गावी वयाच्या 107 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झणझणीत चिकन आणि मटन बनवणारी युट्युबवाली आज्जी अशी त्यांनी जगाला ओळख होती. युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून या आजी जगभर पसरल्या होत्या. विशेष म्हणजे केवळ 2 वर्षात या आजीच्या युट्यूब चॅनेलला 12 लाख सबस्क्राईबर्स मिळाले होते. आता, या सबस्काईब्रर्सची संख्या 1.2 मिलियन्स एवढी झाली आहे.

शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. तो कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे 106 वर्षांच्या या ‘अम्मा.’ आंध्र प्रदेशच्या रहिवासी असलेल्या मस्तनम्मा यांचा सध्या इंटरनेटवर बोलबोला होता. कारण, त्या भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर होत्या. यूट्यूबवर मस्तनम्माच्या कामाची खूप प्रशंसा होते. यू ट्यूबवर कंट्रीफूड नावाचे त्यांचे चॅनल आहे. त्यांचा नातू लक्ष्मण हे चॅनल चालवितो. लक्ष्मणच त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करतो. मस्तनम्मा यांना स्वयंपाकाची आवड. तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला त्यांचे त्यांच्या कामावरील प्रेम दिसून येईल. त्या अत्यंत सहजपणे हे सर्व करायच्या. मस्तनम्मा चॅनलचे जवळपास 1.2 मिलियन्स सबस्क्रायबर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूजची संख्याही लाखांच्या घरात असते. त्यांचे काही व्हिडिओतर दहा लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. कंट्रीफूड चॅनलवर तुम्हाला मस्तनम्माच्या चविष्ट रेसिपी मिळतील. मस्तनम्मा यांना प्रेमाने सर्व जण ग्रॅनी म्हणतात. त्या याच नावाने प्रसिद्ध आहेत. ग्रॅनी त्यांच्या गावातच नाहीतर यूट्यूब जगतातही स्टार बनल्या होत्या, पण आता त्या केवळ आठवणींमध्येच उरल्या आहेत.

(बातमी लोकसत्ता वरून साभार)

मस्तनम्मा यांच्या काही उलेखनीय पाककृती मायबोलीच्या वाचकांसाठी:

शाकाहारी:

Green Chillies chutney:
https://www.youtube.com/watch?v=oGHLkvsK2us

Capsicum Tomato Curry
https://www.youtube.com/watch?v=a6tESFLSb8g

Maggi Noodles
https://www.youtube.com/watch?v=-1H7b4sVyyE

Samosa Recipe
https://www.youtube.com/watch?v=vLl7erB2xS0

Mushroom Recipe
https://www.youtube.com/watch?v=2ep3Bd7dxww

Chocolate Cake
https://www.youtube.com/watch?v=6WRdMZMbsMY

Delicious Banana
https://www.youtube.com/watch?v=ulKN84bc82w

Tasty Drumstick Curry-Drumstick Gravy
https://www.youtube.com/watch?v=CmwKX2-tzZI

ONION PAKODA
https://www.youtube.com/watch?v=pFLBqPGKx2E

Simple Potato Curry
https://www.youtube.com/watch?v=GY3lS4iljDw

Gobi Manchurian
https://www.youtube.com/watch?v=LRe5EQvRLhg

Yummy Bitter Guard Fry
https://www.youtube.com/watch?v=-3Ghjevr8Gs

Delicious Cabbage
https://www.youtube.com/watch?v=I0RL8klHJ94

Jackfruit Biryani
https://www.youtube.com/watch?v=gphoVN9f5eY

Yummy Brinjal Roast
https://www.youtube.com/watch?v=cJXLyqApXfk

Simple and Easy Tomato Rice
https://www.youtube.com/watch?v=FHupbJY-OaE

Traditional Kheer
https://www.youtube.com/watch?v=TuQkle_CVQs

Lemon rice
https://www.youtube.com/watch?v=xxi5kP4_xJM

Paneer Biryani
https://www.youtube.com/watch?v=qqE58qNgcY0

Hot Mirchi Bhaji
https://www.youtube.com/watch?v=lpZii4gqafU

Yummy Brinjal Masala
https://www.youtube.com/watch?v=LHAfXhpyDR4

मांसाहारी:

Drumstick Curry With Eggs:
https://www.youtube.com/watch?v=vnjBjU5v9pI

Egg 65
https://www.youtube.com/watch?v=uGfD2e8Nx3w

Egg dosa
https://www.youtube.com/watch?v=CLXzDmuc6CU

Egg masala gravy
https://www.youtube.com/watch?v=L4WACIMmHG4

Chicken Biryani
https://www.youtube.com/watch?v=nSBB-9ky_2c

Butter chicken With Butter Naan:
https://www.youtube.com/watch?v=3rB_XmYnr28

Village Style Chicken Curry
https://www.youtube.com/watch?v=A-5wzalq-Ik

Rooster Chicken-Country Chicken
https://www.youtube.com/watch?v=guKsPubxP7E

Desi Chicken Curry
https://www.youtube.com/watch?v=dGyH3qGR_1M

Delicious Hen Gravy Recipe
https://www.youtube.com/watch?v=ogMZTeUXEbs

Chicken Pickle
https://www.youtube.com/watch?v=ai3KkxV3teI

Chilli Chicken Fry
https://www.youtube.com/watch?v=FGFS_Mv_ztA

Chicken Lollipop
https://www.youtube.com/watch?v=hHljnanVeZk

KFC Style Chicken Fingers
https://www.youtube.com/watch?v=CQe4_BTR7ao

KFC Chicken
https://www.youtube.com/watch?v=fl7K0efDk4Y

Chicken Rolls
https://www.youtube.com/watch?v=AYkOesHrv54

Chicken Pizza
https://www.youtube.com/watch?v=hbLHSh48sDM

Lamb Head recipe
https://www.youtube.com/watch?v=NSTkoZlVSiY

Full Goat Biryani
https://www.youtube.com/watch?v=Vt5VTHanDpc

Special mutton curry
https://www.youtube.com/watch?v=Bzh1Wk-lCpk

Mutton Chilli Fry
https://www.youtube.com/watch?v=2ghziVWdIsM

Mutton Biryani
https://www.youtube.com/watch?v=pnxyQC-1hzI

Spicy Mutton Kheema Biryani
https://www.youtube.com/watch?v=XZdNdEN2q78

Mutton Keema Recipe
https://www.youtube.com/watch?v=eBElepXlnks

Mutton Keema Balls
https://www.youtube.com/watch?v=ngXvokByvwM

Rare Fish biryani
https://www.youtube.com/watch?v=LPGe0-tzI1s

Prawns Recipe
https://www.youtube.com/watch?v=Na1ho7vRQG8

Prawns omelette
https://www.youtube.com/watch?v=8w5RAf5bHPk

Prawn Masala Curry
https://www.youtube.com/watch?v=AtlnaC7760o

Murrel Fish curry
https://www.youtube.com/watch?v=We40cxjsuTU

Special Fish Recipe
https://www.youtube.com/watch?v=tJ9Uzf4XcJI

Sea Fish Recipe
https://www.youtube.com/watch?v=fpxeHGBhWF8

Delicious River Crabs
https://www.youtube.com/watch?v=IhyFDnTSmlo

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अजीबात माहिती नव्हते
धन्यवाद ह्या धाग्याकरता.>>>>>+१.

अशीच एक पंजाबी दादी आहे.तीही खूप मस्त आहे.

अरे वा! हे मला पण नव्हते माहिती. माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.
आज्जिना श्रद्धांजली!

श्रद्धांजली.

२०१७ च्या लोकमत मध्ये मी त्यांची छान माहिती वाचली होती. त्यांची मुले, नातवंडे त्यांचे रेकॉर्डींग करुन घ्यायचे.

मस्त आहे आजी. तिची ग्रीन चिली चटणी बघितली. भारी लागत असणार चवीला. तिच्या युट्युब चॅनलमुळे तिच्या रेसिपीज कायम संग्रही राहतील.

मी खुप फॅन होते त्यांच्या विडिओची. पदार्थ एकही केला नाही पण त्यांना बघायला आवडायचे.

केळीच्या पानावर सगळ्यांनाजेवायला घालाय्चे पाहून मजा वाटायची. माझी आजी आठवायची

श्रद्धांजली!

आज सकाळीच कळल.. मी फॉलो करायची या आज्जीला..
मागे माझ्या आप्पांच्या स्पेशल रेसिपी टाकाव्या का असा विचार केलेला मी पण राहूनच गेलं ते प्रकरण..
श्रद्धांजली..

त्यांच्या सगळ्या पाकृ किमान दहा माणसांसाठी असायच्या. अगदी शेतात, नदिकाठी वगैरे. बिलकुल तामझाम नाही. मस्त आहेत ते सगळे व्हिडीओस.
येथे लिंक्स दिल्या बद्दल धन्यवाद!
अम्मांना श्रध्दांजली!

मलाही फारशी माहिती नव्हती. त्यांच्याविषयी उशिराच कळले. त्यांच्या अफाट पाककृती पाहिल्यावर (कोणता पदार्थ नाही त्यात? हॉटेलचे अख्खे मेन्यू कार्ड आहे. अगदी केफसी चिकन सुद्धा आहे) मग मात्र अक्षरश: थक्क झालो आणि या "अडाणी" वृद्ध स्त्री विषयी इथे सांगावे वाटले. वयाची शंभरी उलटल्यानंतर मस्तानम्मा यांचे करीयर सुरु झाले ज्यामुळे त्यांना जग ओळखू लागले. इथे त्यांच्या विषयी बरीच माहिती आहे. हा लेख वाचण्यासारखा आहे:

https://www.bbc.com/marathi/india-46450450

खूप छान वाटलं माहिती वाचून.अश्या माणसांना मनापासून वंदन.
यांचे व्हिडीओ मी पाहिले नाहीत पण आता पाहते.खूप इंस्पायरिंग व्यक्तिमत्व वाटतंय.
मला असंच महाशय धर्मपाल यांचं कौतुक वाटतं.