हैदराबाद: जगातील सर्वात वयोवृद्ध 'युट्युबर शेफ' मस्तनम्मा यांचे निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर या मूळ गावी वयाच्या 107 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झणझणीत चिकन आणि मटन बनवणारी युट्युबवाली आज्जी अशी त्यांनी जगाला ओळख होती. युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून या आजी जगभर पसरल्या होत्या. विशेष म्हणजे केवळ 2 वर्षात या आजीच्या युट्यूब चॅनेलला 12 लाख सबस्क्राईबर्स मिळाले होते. आता, या सबस्काईब्रर्सची संख्या 1.2 मिलियन्स एवढी झाली आहे.
शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. तो कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे 106 वर्षांच्या या ‘अम्मा.’ आंध्र प्रदेशच्या रहिवासी असलेल्या मस्तनम्मा यांचा सध्या इंटरनेटवर बोलबोला होता. कारण, त्या भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर होत्या. यूट्यूबवर मस्तनम्माच्या कामाची खूप प्रशंसा होते. यू ट्यूबवर कंट्रीफूड नावाचे त्यांचे चॅनल आहे. त्यांचा नातू लक्ष्मण हे चॅनल चालवितो. लक्ष्मणच त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करतो. मस्तनम्मा यांना स्वयंपाकाची आवड. तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला त्यांचे त्यांच्या कामावरील प्रेम दिसून येईल. त्या अत्यंत सहजपणे हे सर्व करायच्या. मस्तनम्मा चॅनलचे जवळपास 1.2 मिलियन्स सबस्क्रायबर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूजची संख्याही लाखांच्या घरात असते. त्यांचे काही व्हिडिओतर दहा लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. कंट्रीफूड चॅनलवर तुम्हाला मस्तनम्माच्या चविष्ट रेसिपी मिळतील. मस्तनम्मा यांना प्रेमाने सर्व जण ग्रॅनी म्हणतात. त्या याच नावाने प्रसिद्ध आहेत. ग्रॅनी त्यांच्या गावातच नाहीतर यूट्यूब जगतातही स्टार बनल्या होत्या, पण आता त्या केवळ आठवणींमध्येच उरल्या आहेत.
(बातमी लोकसत्ता वरून साभार)
मस्तनम्मा यांच्या काही उलेखनीय पाककृती मायबोलीच्या वाचकांसाठी:
शाकाहारी:
Green Chillies chutney:
https://www.youtube.com/watch?v=oGHLkvsK2us
Capsicum Tomato Curry
https://www.youtube.com/watch?v=a6tESFLSb8g
Maggi Noodles
https://www.youtube.com/watch?v=-1H7b4sVyyE
Samosa Recipe
https://www.youtube.com/watch?v=vLl7erB2xS0
Mushroom Recipe
https://www.youtube.com/watch?v=2ep3Bd7dxww
Chocolate Cake
https://www.youtube.com/watch?v=6WRdMZMbsMY
Delicious Banana
https://www.youtube.com/watch?v=ulKN84bc82w
Tasty Drumstick Curry-Drumstick Gravy
https://www.youtube.com/watch?v=CmwKX2-tzZI
ONION PAKODA
https://www.youtube.com/watch?v=pFLBqPGKx2E
Simple Potato Curry
https://www.youtube.com/watch?v=GY3lS4iljDw
Gobi Manchurian
https://www.youtube.com/watch?v=LRe5EQvRLhg
Yummy Bitter Guard Fry
https://www.youtube.com/watch?v=-3Ghjevr8Gs
Delicious Cabbage
https://www.youtube.com/watch?v=I0RL8klHJ94
Jackfruit Biryani
https://www.youtube.com/watch?v=gphoVN9f5eY
Yummy Brinjal Roast
https://www.youtube.com/watch?v=cJXLyqApXfk
Simple and Easy Tomato Rice
https://www.youtube.com/watch?v=FHupbJY-OaE
Traditional Kheer
https://www.youtube.com/watch?v=TuQkle_CVQs
Lemon rice
https://www.youtube.com/watch?v=xxi5kP4_xJM
Paneer Biryani
https://www.youtube.com/watch?v=qqE58qNgcY0
Hot Mirchi Bhaji
https://www.youtube.com/watch?v=lpZii4gqafU
Yummy Brinjal Masala
https://www.youtube.com/watch?v=LHAfXhpyDR4
मांसाहारी:
Drumstick Curry With Eggs:
https://www.youtube.com/watch?v=vnjBjU5v9pI
Egg 65
https://www.youtube.com/watch?v=uGfD2e8Nx3w
Egg dosa
https://www.youtube.com/watch?v=CLXzDmuc6CU
Egg masala gravy
https://www.youtube.com/watch?v=L4WACIMmHG4
Chicken Biryani
https://www.youtube.com/watch?v=nSBB-9ky_2c
Butter chicken With Butter Naan:
https://www.youtube.com/watch?v=3rB_XmYnr28
Village Style Chicken Curry
https://www.youtube.com/watch?v=A-5wzalq-Ik
Rooster Chicken-Country Chicken
https://www.youtube.com/watch?v=guKsPubxP7E
Desi Chicken Curry
https://www.youtube.com/watch?v=dGyH3qGR_1M
Delicious Hen Gravy Recipe
https://www.youtube.com/watch?v=ogMZTeUXEbs
Chicken Pickle
https://www.youtube.com/watch?v=ai3KkxV3teI
Chilli Chicken Fry
https://www.youtube.com/watch?v=FGFS_Mv_ztA
Chicken Lollipop
https://www.youtube.com/watch?v=hHljnanVeZk
KFC Style Chicken Fingers
https://www.youtube.com/watch?v=CQe4_BTR7ao
KFC Chicken
https://www.youtube.com/watch?v=fl7K0efDk4Y
Chicken Rolls
https://www.youtube.com/watch?v=AYkOesHrv54
Chicken Pizza
https://www.youtube.com/watch?v=hbLHSh48sDM
Lamb Head recipe
https://www.youtube.com/watch?v=NSTkoZlVSiY
Full Goat Biryani
https://www.youtube.com/watch?v=Vt5VTHanDpc
Special mutton curry
https://www.youtube.com/watch?v=Bzh1Wk-lCpk
Mutton Chilli Fry
https://www.youtube.com/watch?v=2ghziVWdIsM
Mutton Biryani
https://www.youtube.com/watch?v=pnxyQC-1hzI
Spicy Mutton Kheema Biryani
https://www.youtube.com/watch?v=XZdNdEN2q78
Mutton Keema Recipe
https://www.youtube.com/watch?v=eBElepXlnks
Mutton Keema Balls
https://www.youtube.com/watch?v=ngXvokByvwM
Rare Fish biryani
https://www.youtube.com/watch?v=LPGe0-tzI1s
Prawns Recipe
https://www.youtube.com/watch?v=Na1ho7vRQG8
Prawns omelette
https://www.youtube.com/watch?v=8w5RAf5bHPk
Prawn Masala Curry
https://www.youtube.com/watch?v=AtlnaC7760o
Murrel Fish curry
https://www.youtube.com/watch?v=We40cxjsuTU
Special Fish Recipe
https://www.youtube.com/watch?v=tJ9Uzf4XcJI
Sea Fish Recipe
https://www.youtube.com/watch?v=fpxeHGBhWF8
Delicious River Crabs
https://www.youtube.com/watch?v=IhyFDnTSmlo
हे अजीबात माहिती नव्हते
हे अजीबात माहिती नव्हते
धन्यवाद ह्या धाग्याकरता.
लिन्क्स बद्दल धन्यवाद..
लिन्क्स बद्दल धन्यवाद..
अम्मांना श्रद्धांजली.. _/\_
हे अजीबात माहिती नव्हते
हे अजीबात माहिती नव्हते
धन्यवाद ह्या धाग्याकरता.>>>>>+१.
अशीच एक पंजाबी दादी आहे.तीही खूप मस्त आहे.
अरेरे वाईट बातमी. ही आज्जी
अरेरे वाईट बातमी. ही आज्जी खूप आवडते मला.
अम्मांना श्रद्धांजली !!
अम्मांना श्रद्धांजली !! धन्यवाद हो माहितीबद्दल.
अरेरे, खूप दिवसात आजी दिसली
अरेरे, खूप दिवसात आजी दिसली नव्हती. वाईट झाले खूप.
वॉव.... मस्त कलेक्षन आहे..!!
वॉव.... मस्त कलेक्षन आहे..!!
हे अजीबात माहिती नव्हते.
हे अजीबात माहिती नव्हते. Thanks Atulji
अम्मांना श्रद्धांजली.. _/\_
अम्मांना श्रद्धांजली.. _/\_
हो छान होत्या ह्या आजी.
हो छान होत्या ह्या आजी.
ह्याच्या सारखच grandpa's kitchen ही छान आहे युट्युब वर.
अरे वा! हे मला पण नव्हते
अरे वा! हे मला पण नव्हते माहिती. माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.
आज्जिना श्रद्धांजली!
(No subject)
ग्रॅनीला श्रद्धांजली!
ग्रॅनीला श्रद्धांजली!
माहितीबद्दल धन्यवाद अतुलजी.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
२०१७ च्या लोकमत मध्ये मी त्यांची छान माहिती वाचली होती. त्यांची मुले, नातवंडे त्यांचे रेकॉर्डींग करुन घ्यायचे.
मस्तानम्मांबद्दल माहीत नव्हते
मस्तानम्मांबद्दल माहीत नव्हते. धन्यवाद माहिती बद्दल.
छान माहिती, व्हिडीओ बघते आता,
छान माहिती, व्हिडीओ बघते आता,
त्या गेल्यानंतर समजले हे..
त्या गेल्यानंतर समजले हे..
त्यांचे व्हिडीओ आधी पाहिले
त्यांचे व्हिडीओ आधी पाहिले होते. पण त्या गेल्याचे हा धागा वाचून कळले.
त्या आजीला श्रद्धांजली!
मस्त आहे आजी. तिची ग्रीन चिली
मस्त आहे आजी. तिची ग्रीन चिली चटणी बघितली. भारी लागत असणार चवीला. तिच्या युट्युब चॅनलमुळे तिच्या रेसिपीज कायम संग्रही राहतील.
हे माहीत नव्हते... माहितीसाठी
हे माहीत नव्हते... माहितीसाठी धन्यवाद...
मी खुप फॅन होते त्यांच्या
मी खुप फॅन होते त्यांच्या विडिओची. पदार्थ एकही केला नाही पण त्यांना बघायला आवडायचे.
केळीच्या पानावर सगळ्यांनाजेवायला घालाय्चे पाहून मजा वाटायची. माझी आजी आठवायची
श्रद्धांजली!
आज सकाळीच कळल.. मी फॉलो
आज सकाळीच कळल.. मी फॉलो करायची या आज्जीला..
मागे माझ्या आप्पांच्या स्पेशल रेसिपी टाकाव्या का असा विचार केलेला मी पण राहूनच गेलं ते प्रकरण..
श्रद्धांजली..
माहीती नव्हते. ओळख करुन
माहिती नव्हते. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.ब
त्यांच्या सगळ्या पाकृ किमान
त्यांच्या सगळ्या पाकृ किमान दहा माणसांसाठी असायच्या. अगदी शेतात, नदिकाठी वगैरे. बिलकुल तामझाम नाही. मस्त आहेत ते सगळे व्हिडीओस.
येथे लिंक्स दिल्या बद्दल धन्यवाद!
अम्मांना श्रध्दांजली!
मलाही फारशी माहिती नव्हती.
मलाही फारशी माहिती नव्हती. त्यांच्याविषयी उशिराच कळले. त्यांच्या अफाट पाककृती पाहिल्यावर (कोणता पदार्थ नाही त्यात? हॉटेलचे अख्खे मेन्यू कार्ड आहे. अगदी केफसी चिकन सुद्धा आहे) मग मात्र अक्षरश: थक्क झालो आणि या "अडाणी" वृद्ध स्त्री विषयी इथे सांगावे वाटले. वयाची शंभरी उलटल्यानंतर मस्तानम्मा यांचे करीयर सुरु झाले ज्यामुळे त्यांना जग ओळखू लागले. इथे त्यांच्या विषयी बरीच माहिती आहे. हा लेख वाचण्यासारखा आहे:
https://www.bbc.com/marathi/india-46450450
खूप छान वाटलं माहिती वाचून
खूप छान वाटलं माहिती वाचून.अश्या माणसांना मनापासून वंदन.
यांचे व्हिडीओ मी पाहिले नाहीत पण आता पाहते.खूप इंस्पायरिंग व्यक्तिमत्व वाटतंय.
मला असंच महाशय धर्मपाल यांचं कौतुक वाटतं.
धर्मपाल कोण ? लिही ना अनु
धर्मपाल कोण ? लिही ना अनु त्यांच्याबद्दलही ...
ओह! गेल्या का त्या आजीबाई!
ओह! गेल्या का त्या आजीबाई!
मी काही रेसिपीज बघितल्या आहेत.
श्रद्धांज्ली
श्रद्धांज्ली
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!