Submitted by खुशालराव on 3 December, 2018 - 23:40
आपण सगळे मायबोलीवर येतो म्हणजे कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांना वाचनाची आवड आहे.. आपल्यापैकी अनेकांनी पुस्तकें वाचलेली असतील त्यातील कित्येक पुस्तकें आवडलेली सुध्दा असतीलच... आपण ईथे त्याच संदर्भात चर्चा सुरू केली तर? म्हणजे या निमित्ताने आपली सुध्दा उजळणी होईल, अनेक पुस्तकाचे प्रत्येकावर पडलेला प्रभाव कळेल आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्याला ज्या वेळी पुस्तक वाचायचे मन करेल त्या वेळी कोणत पुस्तक आपल्याला वाचायला आवडेल हे सुध्दा पटकन कळेल की...
हा धागा नक्कीच मनोरंजक असेल.. चला तर मग करूया सुरवात....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपण सगळे मायबोलीवर येतो
आपण सगळे मायबोलीवर येतो म्हणजे कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांना वाचनाची आवड आहे..
>>>>>
मला लिखानाची आणि वादसंवाद चर्चा करायची आवड असल्याने मायबोलीवर येतो. वाचनाची आवड फार्रच कमी
पण धाग्याला शुभेच्छा !
असे दोन तीन धागे आहेत. ते ही
असे दोन तीन धागे आहेत. ते ही बघा.
https://www.maayboli.com
https://www.maayboli.com/discuss-marathi-books या विभागात मी वाचलेले पुस्तक असे दोन धागे आहेत आधीच. तिथे अनेकांनी लिहिलंय, लिहित असतात, शिवात एकेका पुस्तका / लेखकाबद्दल लिहिलेले लेख सुद्धा आहेत. पुस्तकांबद्दलच्या गटात, व्यवस्थित शब्दखुणा देऊन केलेले लेखन असेल तर ते शोधायला सोपे पडेल. असा विभाग आणि धागे असताना ललित लेखन विभागात वेगळा धागा कशाला ?
अरे वा, असे कसे? आमचा पण एक
अरे वा, असे कसे? आमचा पण एक धागा!
मग या धाग्याचा संदर्भ इतर धाग्यात!
अरे पुनः प्रतिसादांच्या पेटवा मशाली!
मी मायबोली वाचतो.
मी मायबोली वाचतो.
रुन्म्याचे धागे आणि
रुन्म्याचे धागे आणि प्रतिक्रिया सोडून बाकी काहीही वाचतो (even ultra low standard)
अग्निपंख, माझे किती प्रतिसाद
अग्निपंख, माझे किती प्रतिसाद आणि लेख वाचल्यावर आपल्याला हे समजले की याचे वाचायचे नाही.
हेन्री शॅरीयर ती पॅपिलाॅन हि
हेन्री शॅरीयर ती पॅपिलाॅन हि आत्मकथा वाचली होती काही दिवसांपुर्वी... खुप आवडली...
मी मायबोली वाचतो.>>>> हे मी ,
मी मायबोली वाचतो.>>>> हे मी , मी शब्द शोधीतो च्या चालीवर वाचले.
सदानंद चांदेकर यांच आम्ही
सदानंद चांदेकर यांच आम्ही दिवटे हे आत्मचरित्रपर लिहिलेले पुस्तक वाचलं.. आवडल.. बऱ्यापैकी विनोदी वाटले..