हरवत चाललेले 'स'

Submitted by स्मिता द on 1 December, 2018 - 00:59

हरवत चाललेले 'स'

' ए , तुला आठवत नाही का? तिची आणि माझी 'क' होती ना'. अनघा काल सांगत होती उत्साहाने.
मला खुदकन हसू आले तो "क' हा शब्द ऐकुन...खरच, विसरच पडला नाही लहानपणच्या त्या गमतीदार शब्दांचा.
पूर्ण शब्द न म्हणता एकच अक्षर म्हणायचे. क आहे. सो झाली वैगरे.
आज पेपर वाचताना , अचानक पुन्हा ती गंमत आठवली. पेपरमधल्या बातम्या वाचून वाटायला लागले की आपल्यातील 'स" हरवत चाललाय का?

आता हा 'स' आपल्याला ब-याच अर्थी वापराता येईल नाही. अर्थ काय घ्यायचा ते वापरकर्त्यावर अवलंबुन आहे म्हणा,
आता ही या निम्म्याहून अधिक बातम्या वाचताना आपली म्हणजे समाजाची संवेदनशीलता हरवत चालली आहे असे वाटते. नुसती संवेदनशीलता नाही तर सहिष्णुता ही कमी झाली आहे.

आजुबाजुला बघताना, वावरताना अजून एक मोठी पोकळी मला जाणवते ती म्हणजे संवादाची. आपला संवाद खरच हरवत चाललाय.. मित्रमंडळींच्या गप्पाच्या अड्ड्याबरोबरच , कुटुंबातील संवाद...नवरा बायकोतील संवाद, दोन पिढ्यातील संवाद, इतकेच काय पोटच्या पोरांशीही आताशा संवाद घडत नाही फारसे. संवादाची ही वानवा जाणवतेय हे मात्र नक्की.

तुम्हाला काय वाटते. अजून कुठले ' स ' हरवत चाललो आहोत आपण. आणि या मी वर उल्लेखलेल्या ' स ' बद्द्ल तुमचे मत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रायव्हिंग करून माझी 'स'हनशीलता नक्कीच संपली आहे. मला वाटतं सगळ्याच लोकांची. ड्राईव्ह करून घरी आलेलं माणूस पहिले 10 मिनिटं चिडचिडं झालेलं असतं.

अरे बरेच 'स' मिळाले . खरंय संयम, सहनशीलता, समन्वय , सहजीवन, सौजन्य, सहकार हे हळू हळू हरवतच चाललोय नाही आपण . धन्यवाद मित्रा मैत्रिणींनो खूप सुंदर असे हरवत चाललेले स सुचले तुम्ही
धन्स कृष्णा, विनिता,सिम्बा,उमानु, स्वधा, मीरा Happy

संयम
समजूतदारपणा
सहसंवेदना
सात्विकता
सोशिकता
सभ्यता
सोज्वळता
संस्कृती
साधेपणा
स्वच्छता

स्वीकार
सुहृदता
सर्जनशीलता
संयोजीतपणा
सेवाभाव
संस्कारक्षमता
सद् भावना
सूनीयोजीतपणा
संघटितता
सुहास्य
सक्षमता
सुरक्षितता