भुना गोश्त

Submitted by आ.रा.रा. on 18 November, 2018 - 10:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

3-bhuna.jpg

मटण पाव किलो. (त्यातही थोडं फॅट काढून टाकल्याने सुमारे २०० ग्रॅमच असावे. मसाले व इतर प्रमाण त्याच हिशोबाने आहे) धुवून, तुकडे करून, हवे तसे ट्रिम करून घेणे. लहान तुकडे लवकर शिजतात.

खडे मसाले :
लवंग २
काळे मिरे ४-५
नखाएवढी दालचिनी
अर्धा चमचा जिरं
एक हिरवी वेलची
अर्धी लहान सुकी लाल मिरची

१ चमचा आलं + १ चमचा लसूण पेस्ट.

एक टमाटा भाजून त्याची साल काढून पेस्ट करून.

दीड मध्यम कांदा, चिरून, तळून. (हा माझ्याकडे रेडीमेड होता)

दही : १-२ चमचे, फेटून.

(आंबटपणा जास्त, तर दही कमी घ्या. टमाटा व दही दोन्ही आंबट असतील तर फायनल चव बिघडेल.)

१-२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून. (वरील फोटोत नाहीत. गार्निशिंगची कोथींबीरही नाही.)

सुके मसाले :
जिरेपूड
धणेपूड
हळद
लाल तिखट
मिरेपूड
फोटोनुसार क्लॉकवाईज, हे सगळे मसाल्याच्या डब्यातला उलुसा चमचा असतो, ते २-२ भरुन. रफली सपाट टीस्पून. मिरेपूड कमी घेतलीय.

कसूरी मेथी

मीठ.

साजुक तूप.

क्रमवार पाककृती: 

छोट्या प्रेशर कुकरमधे आधी तूप गरम केले.

त्यात सगळे खडे मसाले परतून घेणे. १५-२० सेकंदात होतात.

त्यात आलं+लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाऊन रंग पालटेपर्यंत परतणे.

त्यात मटन घालून परतावे. मटनाचा रंग बदलून ऑफ व्हाईट झाला की थोडे मीठ घालावे. भरपूर पाणी सुटते, ते सुकेपर्यंत परतायचे आहे. भुना गोश्त आहे. ते खरपूस भुनणे गरजेचे आहे. मटन घालण्याआधी गॅस मोठा करणे, अन मोठाच ठेवणे.

पाणी सुकले, की सुके मसाले घालावे, पुन्हा परतावे. खाली लागत असेल तर थोडेसे(च) पाणी घालून परतावे. या स्टेपला गॅस कमी. नाहीतर जळेल.

यात तळलेला कांदा व फेटलेले दही व हिरवी मिरची घालून पुन्हा थोडं परतावे.

हे सगळं एकंदर सुमारे ८-१० मिनिट परतल्यानंतर त्यात अर्धा पेला (सुमारे १००-१२५ मिलि) पाणी घालून उकळी येऊ दिली, अन कुकरला झाकण लावून एक शिटी काढली. गॅस मंद करून सुमारे १५ मिनिटं मटन गळेपर्यंत शिजवले.

वाफ काढून टाकून झाकण उघडावे.

पाणी जास्त असेल तर थोडे आटवून त्यात टोमॅटो प्युरी घालून परतणे. मटनाचा अंदाज पाहून झाकण ठेवून शिजू देणे.

थोडी कसूरी मेथी, मिठाची चव अ‍ॅडजस्ट करणे.

4-bhuna.jpg

शॉर्टकट टेस्टी भुना गोश्त तय्यार आहे.

वाढणी/प्रमाण: 
जेमतेम माझ्या एकट्यापुरते. (काकू व्हेजीटेरियन आहेत)
अधिक टिपा: 

हा अंगच्या रश्श्यातला प्रकार आहे. नुसते चमच्याने खायलाही छान लागते. सोबत पोळी/नान/भात आपापल्या चॉईसनुसार घेणे.

कुकर वापरायचा नसेल, तर मटन शिजायला अर्धा तास किंवा जास्त लागू शकतो.

माहितीचा स्रोत: 
आमच्या एक वहिनींनी यूट्यूबवर पाहून केलेली अन मग शिकवलेली रेस्पी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्राय आयटम आहे.थोडी थिक ग्रेवी हवी असेल तर काय वापरता येईल? भाताबरोबर भारी लागेल हे. दालचा टाईप थोडी ग्रेवी असेल तर.

फोटो भारी आहे . पैकीच्या पैकी मार्क !

( बाकी कोथिंबीर जssss रा बारीक कापून शिवरायला हवी होती. अजून प्रोफेशनल फोटो आला असता . Light 1 )

चांगली आहे पाक्रु ! पण आम्ही तुमच्या काकुंच्या ' बोटी 'तल्या ! आपलं ते हे (फणस) घालून सेम भाजी केली होती... फोटो काढायचा राह्यला नाहीतर झब्बु देता आला असता.
जाईशी सहमत !

छान दिसतय. सोपं नी झटपट पण आहे. दीड तास नाही लागणार कुकराच्या रेसिपीला अगदी मटण धुण्यापासून सुरुवात केली तरी असं वाटतय.

मस्तय.

मी इथली रेसीपी वाचून करते त्यात टमाटा नाहिये पण अगदी बाकी सेमच आहे.

उलुसा हा शब्द प्रथमच वाचायला मिळाला. यापूर्वी ऐकला होता त्यालादेखील अनेक वर्षें झालीत. इवलासाच्या तुलनेत जास्त गोड वाटतो.

फोटो सहीच आलाय.
घरात मांसाहार व्यर्ज असल्याने ओळखीच्या रेस्टॉरंटात खाण्यात येईल.

घरात मांसाहार व्यर्ज असल्याने ओळखीच्या रेस्टॉरंटात खाण्यात येईल.
Submitted by मानव पृथ्वीकर on 20 November, 2018 - 13:38

अनोळखी रेस्टॉरंटात खा म्हणजे घरी समजणार नाही.

भारी दिसतंय.
रेसिपी योग्य व्यक्तींकडे पोचवण्यात येईल. Happy

अ कुक इज अ कुक - मेल फीमेल काय बघायचं त्यात म्हणते मी! Proud )
>> बुरसट भारतीय मनोवृत्ती ...

बिपिनजी, खाणे व्यर्ज नाही.
ओळखीच्या रेस्टॉरंटात: जिथे कूक सांगितल्याप्रमाणे करून देतो. काही मराठमोळ्या भाज्या पण करवून घेतो तिथे.
एखादी रेसिपी आवडली आणि कुठेही जाऊन नावाने खाल्ली त्यात मजा ती काय?

इथे कुक कुक करू नका. तुम्ही आगगाडी आहात का तसं करायला? Proud (मानव हे तुम्हाला नाही. Happy तुमचा प्रतिसाद आत्ता बघितला.)

आरारा रेसिपी मस्त आहे, मटणाऐवजी दुसरं काहीतरी घालून करायचा विचार करतो आहे.

>> सोया चंक्स करा. किंवा सुरण
आणि त्याला भूना सोया किंवा भूना सुरण म्हणा, (आणि 'भूना सोया'वर आणखी जोक्स मारू नका!) त्यांच्या भावना दुखावायला नकोत. Lol

सॉरी आ.रा.रा, तुमच्या रेस्पीवर टीपी केला जरा. Happy

सॉरी आ.रा.रा, तुमच्या रेस्पीवर टीपी केला जरा.
<<
इबा, सॉरी कशाला? माझ्या रेस्प्या टीपीसाठी फेमस आहेत. तशीही गप्पाटप्पा केल्याशिवाय जेवणात मजा येत नाही Proud

Pages