#metoo campaign

Submitted by Abhishek Sawant on 8 October, 2018 - 15:17

#metoo चळवळ आजकाल फार गाजत असलेली सोशल मिडिया मध्ये आपल्याला दिसते. मला स्त्रियांच्या बद्दल नितांत आदर आहे हे मी पोस्ट च्या सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो नाहीतर तथाकथित फेमिनिस्ट माझ्यावर तुटून पडणार आहेत याची मला खात्री आहे.
असो कुठल्याही ठिकाणी स्त्रियांचा होणारा मानसिक किंवा शारीरिक छळ हा निंदनीय आहे हे वाक्य शंभर टक्के खरं आणि ऐकायला जरी बरं वाटत असलं तरी मी याच्याशी सहमत नाहीये. कुठल्याही ठिकाणी स्त्रियांचा किंवा पुरुषांचा शारीरिक किंवा मानसिक छळ हा निंदनीय आहे हे वाक्य मला पटत. आजकाल चाललेल्या या #metoo campaign मुळे सगळ्या सेक्टर मध्ये काम करणारे प्रामाणिक पुरुष जरा घाबरून च वावरत असतील कारण या बाबतीत दोन्ही कडील बाजू ऐकून घेण्याची पद्धत नाहीये.तुमच्यावर आरोप झाला म्हणजे समाज तुम्हाला गुन्हेगार ठरवून मोकळा होतो. भलेही तो आरोप गैरसमजुती मधून झाला असेल किंवा पूर्व वैमनस्य मधून झाला असेल.
आपल्या देशात आदर करणे हे कार्य जबरदस्ती प्रत्येकावर थोपलेलं आहे. कोणी एक व्यक्ती स्त्री आहे तर तिचा आदर तुम्हाला करायलाच पाहिजे.कोणी एक व्यक्ती वयस्कर आहे तर तिचा आदर तुम्हाला करायचा आहे आणि बरेच असे criteria आपल्या देशामध्ये आहेत.
माझ्या सोबत घडलेला एक किस्सामी इथे सांगू इच्छितो, मी ऑफिस मध्ये काम करत असताना माझी एका मुलीशी खूप घट्ट मैत्री झाली त्याला आमच्या कलीग नी वेगळा रंग दिला ही गोष्ट वेगळी.काही दिवस आमची मैत्री चांगली चालू होती पण अचानक आमच्यात भांडणं होऊ लागली.एक दिवस असंच जोराचं भांडण झाले आणि आम्ही एकमेकांना खूप काही बोललो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने ऑफिस मध्ये आली तेव्हा कदाचीत तिचा इमोशनल breakdown झाला असावा ती खूप रडली मला राहवले नाही मी तिला सॉरी म्हणायला गेलो ऑफिस मध्ये. तिला माझा राग आला होता तिने आमच्या हेड कडे तक्रार केली. आता त्यांना आमच्यामैत्री बद्दल काहीच माहिती न्हवती.त्यांनी मला harrasssment चा दोषी करून टाकले आणि मलालास्ट ची वॉर्निंग देण्यात आली. माझा खूप इन्सल्ट झाला माझ्या आई बाबांचे संस्कार हि काढण्यात आले. हि बातमी पूर्ण कंपनीत पसरली.सगळे मला तुच्छतेच्या नजरेने पाहू लागले. मी दोन महिने प्रचंड डिप्रेशन मध्ये जगत होतो. कधी कुणाला कारण नसताना त्रास न देणारा मी आज माझ्यावर harrassment चा आरोप होत होता. वाटत होत कि आत्महत्या करावी आणि संपवावं सगळं. पण कसंबसं नेटानं एक दोन महिने ढकलले.
एके दिवशी असाच तिला सॉरी चा मॅसेज केला तर तिनेच उलटं मला सॉरी म्हणून मॅसेज केला आणि म्हणाली की मी त्यावेळी रागात होते त्यामुळे तुझी complaint केली मला माफ कर आणि रडू लागली. मी तिला माफ केले पण मनात एक प्रश्न होता2खरंच मी तेव्हा निराश होऊन आत्महत्या केली असती तर???? खरंच मी तो अपमान पचवू शकलो नसतो तर????
अर्थात सगळ्याच केस मध्ये असे असेल असे मी मुळीच म्हणत नाही पण सगळ्याच केस मध्ये पुरुष दोषी असतो असे सुद्धा म्हणता येणार नाही. अश्या आरोपांमुळे अनेकांचे करियर बरबाद झाले अनेक जण त्या नैराश्यातून बाहेर पडू शकत नाहीयेत.एखादी व्यक्ती अमुक एका gender ची आहे म्हणून ती खरं बोलते किंवा तिचा रिस्पेक्ट करायचा हे मला पटत नाही.रिस्पेक्ट हा कमवायला लागतो तुम्ही अमुक एका gender चे आहेत म्हनुन तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा हा कोणता न्याय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आपण कँपेन देवनागरीत लिहावे असे वाटते. ज्याचे स्पेलिंग ही माहिती नाही अशा विषयाबद्दल धागा काढायचा अट्टाहास का?

हम्म.दुर्दैवी आहे.जर ते 'भांडण' असेल तर हरेसमेंट लावायला नको होती.अश्या केस मध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहून कमिटी ने निर्णय घेणे जास्त चांगले.
यातून सावरण्या साठी शुभेच्छा.

स्त्री किंवा पुरुष दोघांची काही बाजू असेल. ती निर्णय घेणार्‍या व्यक्तिने / पक्षाने ऐकून घेणे नक्कीच आवश्यक आहे. त्याशिवाय निपक्षपाती निर्णय घेता येणार नाही.
नुसत्या तक्रारीवर दुसर्‍याला शिक्षा देणे न्यायसंमत नाही.

अलिकडे हा घातक ट्रेण्ड ठरू पाहत आहे. स्त्री बुद्धीने, कर्तृत्वाने, आर्थिक अंगाने कुठेही कमी नाही. पण सामाजिक दृष्ट्या कमी लेखली जाते. जरी तात्विक दृष्ट्या अनेक गोष्टी मान्य केल्या तरी व्यवहारात ते दिसत नाही. स्त्री बॉसच्या हाताखाली काम करण्याची नाखुशी हा एक प्रकार तर सुंदर असिस्टंट असावी ही इच्छा हा दुसरा प्रकार.

व्यवस्था पुरूषाच्या फायद्याची आहे. आहे याच व्यवस्थेतल्या त्रुटींचा फायदा घेत काही महिला फायदा जरूर उठवत असतील. पण त्यामुळे नियम सिद्ध होत असेल तर तो अपवादाचा. राजरोस स्त्रिया पुरूषांना बदनाम करतात किंवा त्यांचे शोषण करतात असं नाही. सरसकटीकरण करण्यासारखं तर नक्कीच नाही. जगभरात शोषक जे आहेत तेच शोषित असल्याची हाकाटी पिटण्यामागे शोषितांची बाजू सहानुभूतीने ऐकली जाऊ नये हा उद्देश असतो.

सध्या चालू असलेल्या तनुश्री दत्ताच्या वादात जर ती समजा खोटी पडली तर अशा हाका-यांना मोठेच बळ मिळणार आहे. सेलेब्रिटीज किंवा मोठ्या व्यक्तींवर यासाठी मोठी जबाबदारी असते. त्यांनी वैयक्तिक फायदा वा वैर पाहून केलेल्या गोष्टींनी अपवादांना नियम सिद्ध करण्याची अहमहिका चालू होते.

इथे लेखकाने जे काही लिहीले आहे ती त्याची एकट्याची बाजू आहे. ही कथा काल्पनिक नसेल तर दुसरी बाजू समजण्यासाठी काय पर्याय आहे वाचकांकडे ? समजा लेखक खरे बोलत जरी असेल तरी त्याने अशा अपवादात्मक अनुभवांचा कांगावा करून सर्वच स्त्रियांना आरोपीच्या पिंज-यात आणू नये. भारतात हे सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहे. आणि अशा कांगाव्यांना यशही मिळते आहे.

मेरिच +1

काळ बदलतो आहे,
बायकांवर अब्रू जाईल म्हणून बंधने घालणाऱ्या पुरुषांनी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःवर बंधने घालून घ्यायला हवीत.
बहुतेक कँपन्यांच्या हरासमेंट कशाला म्हणावे याच्या गाईडलाईन्स असतात. त्यांचे काटेकोर पालन करावे.

ऑफिसमध्ये कोणत्याही मुलीशी जास्त मैत्री करू नये, कामापुरते बोलावे, प्रोफेशनल वागावे, तुम्ही कुठल्याही मुलीबरोबर जास्त वेळ दिसलात किंवा हसून बोलत आहात असं दिसलं की लोक जोड्या जमवायला सुरुवात करतात, त्याकडे निखळ मैत्री म्हणून बघत नाहीत. हे असं सगळीकडे होतं.
ऑफिसमधल्या मैत्रीमुळे नोकरी गमवण्याची वेळ येत असेल तर अशा मैत्रीला काही अर्थ नाही.

अशा गोष्टींना दोन बाजू असतात हे नक्कीच. आपण जनरली लगेच जजमेंट देऊन एका बाजूला गुन्हेगार ठरवून मोकळे होतो. सध्याची रोहतक सिस्टर्स controversy याच उत्तम उदाहरण आहे. तीन तरुण मुलांच्या आयुष्यातील 4 वर्ष वाया जाणं किती भयानक आहे. तशीच ती दुसरी जुनी केस ज्यामध्ये लग्न झाल्यावर महिन्याभरात बायको गायब झाल्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांवर केस केली आणि जावई जवळ जवळ 8-10 महिने पोलीस कस्टडी / जेलमध्ये होता. नंतर कळलं की मुलीचं आधीच अफेअर असल्यामुळे ती पळून जाऊन आधीच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न करून मजेत होती. पण मग त्या नोकरी गेलेल्या, बदनाम झालेल्या आणि प्रचंड मानसिक त्रासातून गेलेल्या त्या नवऱ्या मुलाचं काय? स्त्री म्हणून सहानुभूती दाखवताना बाकी aspects चा विचार करणं तेवढंच महत्वाचं आहे.

प्रत्येक गोष्टीला नक्कीच दोन बाजु असतात. असे उगाच मनात आले किंवा जुजबी त्रास झाला , भांडण झाले म्हणुन कोणीही ऊठसुट तक्रार करु शकत नाही. तसेही ही बाब मुळातच खुप नाजुक असते त्यामुळे कोणी तक्रार केली की लगेच समोरच्याला दोषी ठरविले जात नाही. रादर कुठल्याच कंपनिचा एचआर असे कारणार नाही, हा प्रोप्रायटर असेल किंवा खुप छोटी कंपनी असेल तर माहित नाही.

वरिल लेख वाचुन याच गोष्टीचे आश्वर्य वाटतेय की फक्त भांडण झाल्यामुळे लेखकाला दोषी ठरविले गेले असे खरेच झाले असेल का?? म्हणजे त्यांच्यावर शंका घेत नाहीये पण यामुळे एखाद्याचे होणारे नुक्सान अन ईतर बाबी लक्षात घेता मला खरेच हे पचनी पडत नाहीये की फक्त तिच्या तक्रारीमुळे कसलीही चौकशी न करता लास्ट वॉर्निंग मिळाली.

असो

अन हो, एकत्र काम करता करता स्त्रि-पुरुषामधे खरेच एक चांगली मैत्री होवु शकते, आता हे तुमच्या आजुबाजुच्या परिस्थीतीवर अन लोकांच्या विचारसारणी वर अवलंबुन आहे की ते काय विचार करता अन तुमच्यावर सुद्धा की तुम्ही लोकांच्या मताला किती महत्त्व देता.

मेरीच गिनो, उत्तम पोस्ट +१ + १११११

<<< एकदा वाचून आपल्याला काय वाटतं याबद्दल नक्की सांगावे. >>>
१. निव्वळ वॉर्निंगवर निभावले यात समाधान माना, कदाचित नोकरी पण गेली असती.
२. ऑफिसमध्ये कुणीही दोस्त नसते, असतात ते निव्वळ सहकारी, हे लक्षात ठेवा.

<<< म्हणाली की मी त्यावेळी रागात होते त्यामुळे तुझी complaint केली मला माफ कर आणि रडू लागली. मी तिला माफ केले >>>
३. एका वेळी माफ केले, पण पुढील वेळी तशी चूक करू नका. ही गोष्ट वाचा.
४. नेहमी सावध रहा. लेडी बॉस असो किंवा सबऑर्डिनेट असो अथवा सहकारी असो, खाजगी कामाचे असले तरी कधीही बंद कॅबिनमध्ये एकांतात बोलू नका. शक्यतो सोबत दुसरी व्यक्ती असतानाच बोलणे योग्य, पण जर ते शक्य नसेल तर कॅबिनचे दार फक्त लोटून घ्या, पूर्णपणे बंद करू नका.

निव्वळ १ उदाहरण सांगतो. मी फार पूर्वी ज्या (फॉर्च्युन ५) इंजिनियरिंग कंपनीत काम करत होतो, तिथे आमच्या ग्रुपमध्ये एक शारदा मॅडम होत्या (मराठी), ज्यांचे कामाचे स्वरुप तितकेसे चांगले न्हवते, शिवाय त्या मॅडम कधीही कमिशनिंगसाठी साईटवर जात नसत किंवा व्हेंडर व्हिजिटला पण जात नसत, त्यामुळे त्यांचे आणि आमच्या तामिळ बॉसचे तितकेसे जमत नसे, पण बॉस त्यांना फार काही बोलू शकत नसे. एकदा टेंडरचे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले, तर साधारण ८ की ९ वाजता बॉसने त्या मॅडमना सांगितले की अजून बराच वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही आता घरी जा आणि रिक्षा किंवा टॅक्सीने जा आणि उद्या खर्च क्लेम करा. योगायोगाने, गेटजवळ वॉचमनने त्यांना विचारले की आज उशीर झाला वाटतय, तर त्या मॅडम म्हणे, काय करणार, फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे लेडिजना फार फार तर ६ पर्यंत काम करायला सांगितले पाहिजे, पण आमचा बॉस हा असा, थांबवून ठेवले ना. झाले, त्या वॉचमनने लगेच एच.आर.ला सांगितले आणि दुसर्या दिवशी बॉसला लेखी ताकीद मिळाली आणि एच.आर.कडे वरात निघाली. या प्रकरणात इतर लोक टेंडरचे काम करताना हजर होते आणि बॉसने सगळ्यांसमोर टॅक्सी करून जायला सांगितले होते. आमची सर्वांची एकेकट्याने मुलाखत पण घेण्यात आली , म्हणून तो थोडक्यात वाचला. तरीपण त्याला ताकीद मिळालीच. प्रकरण संपल्यावर त्याने सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे त्याच्या बॉसला सांगितले की आजपासून शारदा मला नाही, तर थेट तुम्हाला रिपोर्ट करेल. त्याच्या बॉसने सांगितले की तुला बदली माणूस मिळणार नाही, तर या पठ्ठ्य्याने सांगितले की हरकत नाही. केवळ ४ डायरेक्ट रिपोर्ट आणि आम्ही ३ ट्रेनी यांच्या जिवावर त्याने गाडे हाकले. या एकंदर प्रकरणात त्याला इतका मनस्ताप झाला की आयुष्यात त्याने कधीच एकाही बाईला नोकरीला सिलेक्ट केले नाही, असे नंतर कळले.

मुळात स्त्रिनेहि निट राहिले पाहिजे.
अर्ध नग्न कपडे घालुन फिरतात अर्धे स्तन दाखवतात कार्पोरेट मधे स्कर्ट घालुन मांड्या दाखवल्या तरच गेत्ट च्या आत घेतात काय ?
मग पुरुसाना सागायचे भावना नियनत्रित थेवायला
अरे नैसर्गिक आहे त्या भावना

डिस्क्लोजर सिनेमा व पुस्तक जरूर बघा व वाचा. कंपनीच्या गाइड लाइन प्रमाणे वागावे हे बेस्ट. से. हॅरेसमेंट व नुसती हॅरेसमेंट ह्यात फरक आहे. तो ही लक्षात घ्या.

नवीन Submitted by उपाशी बोका on 9 October, 2018 - 12:24

प्रतिसाद आवडला. अशा प्रकरणांना अनुल्लेख करुन, चुकार संबोधून आणि बिनमहत्त्वाचे ठरवून कचर्‍याच्या पेटीत टाकले जाते. अखिल जागतिक स्त्रियांच्या समस्या किति मोठ्या आहेत त्यच्या समोर तुम्हा दोन चार टक्के पुरुशांना आयुष्यातून उठावे लागले तरी काय होतं अशी मानसिकता बनत चाललि आहे..

या विस्।अयावरिल चर्चेतून तर मानसिक्ता अशीच जाणवत आहे की स्त्रीने आरोप केला म्हणजे तो व्यक्ति १००% गुनेहगारच समजायला हवा नाहीतर तुम्ही स्त्री-समानता माननारे नाही, स्त्रीचा सन्मान करणारे नाही. एमसीपी आहात.. वगैरे...

मला तरी ही मोहीम आवडली आहे. अगदी मनापासून. एरव्ही बायकांची बाजू बरोबर आहे हे माहीत असतानाही लोक तिच्यासोबत उभे राहत नाहीत. अगदी स्त्रियाही. मला अगदी सुरूवातीला डिपार्टमेंट मिळेपर्यंत पर्सनलला टाकले होते तेव्हांचे अनुभव आहेत. सुदैवाने पर्सनलची हेड स्त्री होती. स्त्री किती सूक्ष्म विचार करते हे पहिल्यांदा समजले. तसेच (एकच प्रकरण होते मी असताना) अशा प्रकरणात चहाड्या सांगायला इतर बायका पण नंतर येतात हे ही पाहिले.

बायका म्हणून असा काही एक गट नसतो. त्यातही बरेच कल्ट्स असतात. याचा फायदा सिस्टीम उचलतेच.
एका ड्राफ्ट्समन असलेल्या तरूणीचा मानसिक छळ झाल्याची केस होती. तिने तक्रार दिली होती. अनेक मुलींनी तिला तक्रार मागे घेण्याचे फायदे आणि न घेण्याचे तोटे समजावून सांगितले. तिच्या विभागप्रमुखानेही केस मागे घेण्याबाबत तिची समजूत काढली. पण ती ठाम राहिली. लोकांनी तिच्याबद्दल पुरवलेली माहिती अशी होती कि ती शिफ्टमधे येत नाही. कायम जनरल शिफ्ट देऊन कंपनीने मेहरबानी केली आहे. पण तिला जाणीव नाही. पाच मिनिटेही जास्त थांबत नाही. सुटीच्या दिवशी कामाला येत नाही. अशा बाईला प्रमोशन केवळ बाई असल्यामुळे मिळाले आहे. त्यामुळे रात्र रात्र थांबून कष्ट करणा-यांवर अन्याय झाला आहे. कुणीतरी ते बोलून दाखवले तर हिने मानसिक छळाची तक्रार केली आहे.

मला आमच्या बॉस ने व्हिडीओ मुलाखती घ्यायला सांगितल्या. एकेकाला बोलवून विचारताना फॅक्ट्स पण पाहिल्या. योगायोगाने मी स्वतः अभियंता असल्याने ड्रॉईंग्ज तपासताना मला ते ज्ञान उपयोगी आले. त्या बाईने जरी जनरल शिफ्ट केली होती तरी तिचे काम अत्यंत चांगले होते. तसेच कल्पक होती. कन्स्पेट्युअल ड्रॉईंग्ज वरून बॉसेसला डिजाईन सोपे जात होते. या ड्रॉईंग्जचे फक्त प्रॉडक्शन / मॅन्युफॅक्चरींग ड्रॉइंग्ज बनवायचे काम इतरांना करायचे असे. त्यातही अनेक चुका होत. त्यामुळे थांबावे लागे.

प्रत्येकाचे काम पाहून त्यावरच प्रश्न विचारल्यावर लोक खजील व्हायचे. यातून एक सिद्ध झाले. बाई हुषार होती. त्यामुळेच तिला प्रमोशन मिळाले. नव-याने सोडून दिले असल्याने लहान मुलांची जबाबदारी होती. त्यामुळे सकाळची पहिली शिफ्ट किंवा रात्री उशिरा घरी जाण्याची सेकंड शिफ्ट तिला जमत नसे. (या कंपनीत आरेखक दोन शिफ्ट मधे येत). माझ्या बॉसने जे अंदाज सांगितले ते तंतोतंत खरे ठरले.

अशी कुठलीच मोहीम केवळ पुरूषांना त्रास द्यायचा या हेतून जोर पकडणार नाही.
उद्या मला चुकून कुणी खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा त्रास जरी झाला तरी त्यावरून मी जनरलायझेशन नाही करणार. त्या प्रकरणाचा सामना करीन. नाहीच यश आले तर हार मानेन. पण माझ्या प्रकरणाचा फायदा या चळवळीला बदनाम होण्यासाठी होऊ देणार नाही. कारण मला एव्हढे माहीत आहे सुक्याबरोबर ओलेही भरडले जातात. त्यामुळे सुक्याचे भरडले जाणे चालू राहू नये..

Pages