वेदांमधील अद्भुत विज्ञान

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 October, 2018 - 01:56

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे ?

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे.

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे कां ???
२)लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ?

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.

५) बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे सुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ??? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ??? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???

६) मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )

७ ) कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.
या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत. ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीटीशांना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कॉन्क्रीट ठासून भरले.
आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कॉन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.
पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.

१३) प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.
मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.
याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो. आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.

पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
माझा लेख सर्वत्र प्रसारित करण्यास काहीही हरकत नाही..

वैज्ञानिक विचारसऱणी वर आधारित असलेल्या हिंदू धर्मात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो .

*संकलित - साभारः सुन्दर मराठी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव ओके. मी पण कन्फ्युज झालेलो. पण लोहस्तंभ जिथे बांधला तिथे मंदीर नसून इतरत्र पाडलेल्या मंदीराचे अवशेष या बांधकामासाठी वापरले गेले आहेत.
काही असो. तिस-या शतकात असेल तर वेद प्राचीन नसावेत. नाहीतर वेदांवर आधारीत ५००० वर्षे आधीचेही लोहस्तंभ दिसले असते. आहेत का तसे ?
अथवा महाभारत तरी तिस-या शतकात झालेले असावे. तिस-या शतकापर्यं जे खांब आर्यावर्तात उभारले गेले ते एकतर चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक किंवा दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त आणि गणपती यांच्या कार्यकाळात उभारले गेले होते.

अवजड बांधकामे आणि सुपरह्युमन असा संबंध पूर्वी कुणी नाडकर्णींनी लावला होता. त्यांचे पृथ्वीवर देव होते हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. या संदर्भात मी स्वतःच एका टीमसोबत राजस्थानात फिरलो असताना काही गोष्टी समोर आल्या होत्या. (या टीमसोबत मी फक्त हौशी प्रेक्षक होतो ).

आम्ही जोधपूरचा रातनाडा पॅलेस आणि जोधपूरच्या किल्ल्याचे बांधकाम पाहीले. या चमूने किल्ल्याच्या आसपास अनेक नमुने घेतले होते. त्यांनी अशाच काही प्रोजेक्ट्सवर कामही केले होते. नॅशनल जिओग्राफिक बरोबर त्यांनी काम केले होते. नॅटजिओ ला पिरॅमिडच्या बांधकामाचे रहस्य उकलण्याचे श्रेय जाते. त्यामुळे त्याचे ठोकताळे इथे वापरता येतात का हे पाहण्याचा यांचा उद्देश होता.

त्यानुसार रातनाडा पॅलेस बांधताना लाकडाच्या मोठ्या ओंडक्यांची गाडी (एका पुढे एक असे सात, आठ , दहा) बनवून त्यावरून महाकाळ शिळा हाकायच्या. मागचा ओंडका पुढे या पद्धतीने ती अचूक जागी आणली की मातीचे ढिगारे बनवले जात. त्या ढिगा-यांवरून शिळा ओढण्यासाठी मजबूत दोरखंड , अनेक हत्ती आणि रहाट (पुली) यांचा वापर केला जाई. मातीच्या ढिगा-यांना मोठ्या पाय-या असत. पायरीपायरीने ही बीम वर चढवत नेऊन खांबावर लोटली जाई.

किल्ल्याची पाहणी करताना मी नव्हतो. त्यामुळे सांगता येत नाही. पण हत्ती, ओंडके याशिवाय हे शक्य नाही. नॅट जिओ ने तर या शिळांचा कारखाना होता हे सिद्ध केले. तसेच शिळा वाहताना झालेले अपघात मानवी अवशेषांच्या एक्स रे वरून दिसून आले.

नॅट जिओ सारख्या संस्था हे कसे झाले असेल याचा अत्यंत शास्त्रशुद्ध विचार करतात. आपण मात्र एकतर दैवी शक्ती किंंवा वेदातले विज्ञान जे आमच्या बापजाद्यांनी कधिच वापरले नाही मात्र आक्रमकांना वापरता आले... त्याला श्रेय देऊन मोकळे होतो.

तर्कशास्त्र वापरा, मेहनत करा. निष्कर्ष काढा. कुणी अडवलेय का ?

नॅट जिओ सारख्या संस्था हे कसे झाले असेल याचा अत्यंत शास्त्रशुद्ध विचार करतात. आपण मात्र एकतर दैवी शक्ती किंंवा वेदातले विज्ञान जे आमच्या बापजाद्यांनी कधिच वापरले नाही मात्र आक्रमकांना वापरता आले... त्याला श्रेय देऊन मोकळे होतो.

तर्कशास्त्र वापरा, मेहनत करा. निष्कर्ष काढा. कुणी अडवलेय का ?

- वेदांचं नाव वाचल्यावर जर दैवी शक्ती वगैरे शब्द जर व्हिडिओ न बघताच वापरले जाणार असतील, तर त्याला मी काहीच करू शकत नाही. जे तिन्ही व्हिडिओ बघतील, त्यांना उत्तर मिळेल.

दीपगृह, तुमच्या व्हिडीओचा, आणि पोस्टचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध आहे हे कळेल का ? मला तरी नाही समजलेलं.

वेदातलं विज्ञान हा शब्द तुमच्या प्रतिसादात आलेला आहे आणि मी वेदांचा अभ्यास करणार्‍यांनी असा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे मला तो प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला उद्देशून आहे, असं वाटलं. तुम्ही कोणाला उद्देशून प्रतिसाद दिला आहे, ते स्पष्ट केलं असतं, तर बरं झालं असतं.
असो.
मी उल्लेख केलेल्या व्हिडिओतल्या व्यक्तीने कॉम्प्युटर सायन्स मध्ये बीई केलेलं असून, काही काळ टीआयएफार आणि डीआरडीओ बरोबर काम केलेलं आहे, असा उल्लेख त्या व्हिडिओत आहे.

तुम्ही तुमचा पहिला प्रतिसाद कुणाला उद्देशून दिला हे लिहीले आहे का ? अशी काही रीत आहे का इथे ? मी अजून व्हिडीओच पाहीलेले नाहीत, तेव्हढा डेटा नाही तर कशाला प्रतिसाद देऊ ? तुम्हाला तसं स्पष्ट सांगितलेलं आहे मागेच.

मी मानव यांचे नाव लिहीलेले आहे. तशी आवश्यकता नाही खरे तर. आपण जेव्हां एखाद्या लेखावर प्रतिसाद देत असतो तेव्हां ते कशाला उद्देशून आहेत हे समजणे हा कॉमन सेन्सचा भाग असतो. वेदातील विज्ञान हा शब्द लेखात आलेला आहे हे तुम्हाला ठाउक नव्हते का ?

मी तुम्हांला 'तुम्ही कोणाला उद्देशून प्रतिसाद दिला आहे, ते लिहा' असं सांगितलेलं नाही. मी ज्या प्रतिसादाला उत्तर दिलं होतं, ज्यात 'नॅट जिओ सारख्या संस्था'चा उल्लेख आहे, त्यात मानव यांचं नाव लिहिलेलं नाही.

तुम्ही कोणाला उद्देशून प्रतिसाद दिला आहे, ते स्पष्ट केलं असतं, तर बरं झालं असतं. >>> याचा अर्थ काय होतो ? आणि माझा प्रतिसाद अजून तिथेच आहे. तो संपादीत नाही केलेला. तुम्ही वादखोर आहात. मी थांबतो.

तुम्ही कोणाला उद्देशून प्रतिसाद दिला आहे, ते स्पष्ट केलं असतं, तर बरं झालं असतं. - याचा अर्थ इतकाच होतो, की मी त्या प्रतिसादाला उत्तर दिलं नसतं.

साध्या प्रश्नाला उत्तर म्हणून दीड दोन तासाचा व्हिडियो का देता? जर खरोखरच कुठेतरी उत्तर असेल तर त्याचे अचूक को-ऑर्डीनेट का देत नाही?
उदा. पहिली चित्रफित अमुक अकरा मिनिटापासून पंधरा मिनिटांपर्यंत पहा असे काहीतरी ठोस नाही सांगत?

पायचे मूल्य अमुक अंशापर्यंत काढले आहे म्हणजे काय? इंग्रजीत संज्ञा वापरून सांगू शकाल का? आधुनिक विज्ञानाने शोधून काढलेले पायचे मूल्य ह्यापेक्षा शुल्बसूत्रातील मूल्य अचूक आहे हे अविश्वसनीय आहे. ह्याविषयी नक्की आकडेवारी द्या आणि इंग्रजीत प्रमाण मानलेल्या संज्ञा वापरल्यात तर हा दावा ताडून पहाणे सोपे जाईल.

वरील लेखातील नवी माहिती/ज्ञान कळाल्याने माझ्या ज्ञानाच्या कक्षा अतिशय रुंदावल्या आहेत (विशेषतः इतक्या थोडक्या मजकुरामध्ये वेद, लेपाक्षी, वैदिक गणित, मदुराई मंदिर, लोहस्तंभ अशा स्थळकाळाच्या भरार्‍या केवळ अफाट क्षमतेचे लेखकच मारू शकतात). पण मला काही आणखी माहिती सांगितलीत तर मी आपली ऋणी राहेन
१. लोहकांत दगड म्हणजे नक्की कुठला दगड? (मला भूगर्भशास्त्रातील संज्ञांचे संस्कृत समानार्थी शब्द माहित नाहीत - माबुदोस)
२. त्या सोमनाथच्या बाणस्तंभावरचा शिलालेख नक्की काय आहे? त्याचा एखादा फोटो आहे का? किंवा त्याचे वाचन कुणा विद्वानाने केले आहे, कशात प्रसिद्ध झाले आहे, इत्यादि संदर्भ देऊ शकाल का? मी खूप शोधाशोध केली पण मला मिळाले नाहीत. म्हणून विचारले. मला त्या बाणस्तंभाचा फक्त फोटो दिसला आंतर्जालावर. आणि रेनेसांच्या आधी आपल्याला पृथ्वी गोल आहे, अंटार्क्टिका वगैरेचा शोध लागला होता हे त्या खांबाच्या रचनेवरून लक्षात येऊन भरून आलं...
३. प्राचीन भारतातली कुठली सात शिवमंदिरे हे ही लक्षात आले नाही....

आपण सविस्तर माहिती नक्की द्याल अशी आशा आहे (वरील मजकूर मूळ आपला नाही माहित असले आणि त्याच्या मूळ लेखक माहित असला तरीही)
आगाऊ धन्यवाद __/\__

धागाकर्त्याना लिहू द्या की हो Wink
भारतात एकूण शिवमंदिरे किती, कुठकुठल्या काळातली, त्यातली बाराच फक्त सगळ्यात महत्त्वाची इत्यादी इत्यादींच्या पार्श्वभूमीवर या एका रेखांशाचं महत्व काय हे जाणून घ्यायची अनिवार इच्छा आहे

हे पा, या वेळी आम्ही धागाकर्त्याच्या बाजूने धुमशान करनार,
माबो वर बऱ्याच दिवसात काय घडलंच नाय,
त्यात इकडे 99%लोक एका पार्टीचे , मग काय मजा,

हा आता मला लॉजिक सोडून असले काहि तरी लिहायला वेळ लागेल, गोष्टि शोधायला लागतील पण मी लिहिणार,

सिम्बा लिहाच हो तुम्ही
फार वाईट आहे हे पुरोगामी
परदेशी लोकांनी मान्य केल्यावर मगच आपल्या लोकांना आपली महती कळते
योगा बघा, आयुर्वेद बघा
आता या लोहस्तभा फॉर्म्युलाचा उपयोग करून जर्मन लोक न गंजणाऱ्या गाड्या बनवतील आणि बाजी मारतील बघा
आणि आपले भारतीय च रांगेत उभे राहून गाड्या विकत घेतील त्या,

आधुनिक काळातील विज्ञानाने बुद्धीपावन झालेल्या प्रतिसादकर्त्यांशी सहमत. हजारो वर्षापूर्वी ह्या भारतीय उपखंडातील लोक निव्वळ नाच गाणी, कुठल्यातरी दगडात शिल्प कोरणे, मंदिरं बांधणे, बिनकामाचे खांब उभे करणे असले शास्त्राचा दुरान्वये संबंध नसलेल्या वायफळ गोष्टी करण्यात रममाण होते. किंबहुना, शास्त्र हा शब्दच मुळ सायन्स ह्या पाश्चिमात्य शब्दाचा हिंदु\सिन्धु अपभ्रंश असावा.

थोडक्यात सांगायचे तर विज्ञानाचा सुर्य पश्चिमेकडे उगवला आणि आपण सगळे हिंदु सिंधु बांधव सुर्यफुलासारखे त्यात न्हाहुन फुललो.

@स्वामी विश्वारूपानंद
तुमच्या ज्ञानसागरात मी पण 2 थेंब टाकू इच्छितो.
तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे.

मी काही दिवसांपूर्वी वाचलेला किस्सा:
एकदा असाच एक, भारतीय ज्ञानावर शंका घेणारा, वैज्ञानिक होता. त्याचापण भारतातल्या सरदारजीबरोबर असाच वाद झाला. त्या वैज्ञानिकाने त्याच्या देशात १० फूट खोल खड्डा खणला, तर त्यांना १ टेलिफोन वायर सापडली. त्याने मग सरदारजीला दाखवून दिले की त्याच्या देशात ५० वर्षांपूर्वीपण टेलिफोन होता. पण आपला सरदारजी पण काही कमी न्हवता. त्याने त्या वैज्ञानिकाला भारतात बोलावले आणि १ जागा दाखवून सांगितले की इथे खण. १० फूट झाले, पण काहीच मिळाले नाही. सरदार म्हणे अजून खण. २० फूट, २५ फूट, ५० करत करत १०० फूट झाले, तरी काहीच मिळाले नाही. सरदारजी म्हणाला, बघ, आता सिद्ध झाले की नाही आमच्या देशात ५० काय, ५००० वर्षांपूर्वीपण वायरलेस होते ते.

८० च्या आधीपर्यंत भारतात जुने विज्ञान एव्हढे प्रगत होते की दोन फुलं एकमेकांना चिकटली तरी नायिका गरोदर होत असे. याचे अनेक पुरावे हिंदी चित्रपटांनी जतन करून ठेवलेले आहेत. वैज्ञानिकांना आजवर याचे उत्तर सापडलेले नाही.

आता हा धागा काय आता स्पिन द यार्न सारखा तर्कशास्त्राचे निरनिराळे प्रयोग करून लांबवायचा आहे का? मग माझेहि योगदान -

(पुढील सर्व उपहासात्मक (ज्याला मराठीत sarcastic म्हणतात) तसे आहे. Light 1 )
<<<शास्त्र हा शब्दच मुळ सायन्स ह्या पाश्चिमात्य शब्दाचा हिंदु\सिन्धु अपभ्रंश असावा.>>>
इतकेच काय, अग्निमीळे पुरोहितं या ऋग्वेदाच्या पहिल्या श्लोकातील पुरोहित हा शब्दहि प्रिस्ट या पाश्चिमात्य शब्दाचा हिंदु\सिन्धु अपभ्रंश असावा!
त्यावरून खरे तर वेदांपूर्वीहि पाश्चिमात्य संस्कृति जास्त पुढारलेली होती नि भारतीयांनी ते सगळे चोरून आणले नि नि पाश्चिमात्य लोकांना मारून टाकले असे वाटते.
तेंव्हा आता भारतात काय होते त्याचा अभ्यास करण्या ऐवजी सरळ पाष्चिमात्य देशातून सगळे नवीन शास्त्र (सायन्स) भीक मागून, किंवा चोरून घेऊन या. तिथेच आपली बुद्धि पणाला लावा.

प्रत्येक वर्षी दसरा नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते ? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 515 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 515 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.45 म्हणजे 21 दिवस
मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 2,589 व वेळ 515 पाहून मला धक्काच बसला !!!!
गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे .
तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा वाल्मिकींचे रामायण ही कविकल्पना म्हणणारे लोक या वस्तुनिष्ठ पुराव्याकडे डोळेझाक कसे करू शकतात?
आपली हिंदु संस्कृती किती महान आहे.गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीतजन्म झाल्याचा...!
।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।

टीप- खालचे पुष्प गुच्छ, पुगु, नमस्कार नमस्कार नमस्कार, पुगु पुगु मायबोली पोस्ट करू देत नाहीये, म्हणून काढावे लागले.

बघा ,, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या गुगल, इंटरनेट असल्याने सामान्य लोकांना घरबसल्या ताडून पाहता येतात, आणि दुष्ट पुरोगाम्यांच्या प्रचाराला बळी पडण्यापासून ते स्वतः ला वाचवतात.

आता कुणी पुरोगामी या योगायोगावर प्रकाश टाकेल काय?

२ मधून १ वजा केला काय आणि २ ला २ ने भागले काय उत्तर एकच येते. हे प्राचीन शास्त्र आहे.
पुरावा = दोन काड्या घ्या. एक वेगळी करा. उत्तर एक येते.

असले अचाट, बिनबुडाचे, अतिरंजित दावे केल्यामुळे भारतातील प्राचीन विज्ञान हा एक हास्यास्पद विषय बनलेला आहे. प्राचीन काळात आपल्याकडे त्या काळाला साजेसे विज्ञान होते. पण असल्या अतिरेकी दाव्यांमुळे आपल्याकडे प्राचीन काळात कुठलेही विज्ञान नव्हते असे लोकांना वाटू लागेल. असल्या निरर्थक बुडबुड्यांमुळे आपल्या पूर्वजांमधे कुणी प्रतिभावंत वैज्ञानिक असतील त्यांच्या कर्तृत्त्वाकडेही आता लोक संशयाने पाहतील. हे आपले दुर्दैव आहे.

वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 515 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 515 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.45 म्हणजे 21 दिवस>>>>>चालत आले की पुष्पक विमानातून आले? लहानपणी गोष्टीतून ऐकलं होतं विमानात बसून आले. विमानाचा शोध भारतीयांनी लावला म्हणून रामायणातली उदाहरणं द्यायची, राम रावणाकडे विमानं होती,आणि दुसरीकडे दिवाळीचा संबंध जोडण्यासाठी ते पायी चालत आले म्हणायचं, आणि गूगल म्याप मध्ये घेतलेली विश्रांती गृहीत धरत नाही. त्यामुळे सलग २१ दिवस राम आणि त्यांची सेना न थकता विश्रांती घेता चालतच होती काय?

<<<असले अचाट, बिनबुडाचे, अतिरंजित दावे ................प्रतिभावंत वैज्ञानिक असतील त्यांच्या कर्तृत्त्वाकडेही आता लोक संशयाने पाहतील. हे आपले दुर्दैव आहे.>>>
अनुमोदन.
खरोखरच भारताला उगाच जगाशी तुलना करायची गरज नाही. आपले आयुर्वेद नि इतर गोष्टी चांगल्या होत्या. पण गेल्या ६०० वर्षात त्या हळूहळू नष्ट होऊ दिल्या, नि ब्रिटिश आल्यापासून अधिकच वेगाने.
आता नुसतेच आमच्याकडे हे होते नि ते होते, हेच ज्ञान परकीयांनी घेतले असे वाद घालण्यात काय अर्थ आहे?
त्यापेक्षा आता हेच ज्ञान परत परकीयांकडून परत घेऊन स्वतः गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या, शस्त्रात्रे, मशिनरी भारतातच उत्तम बनवा की ज्या योगे कुणि कितिही टॅरिफ लावली तरी केवळ मालाचा दर्जा उत्तम म्हणून भारतीय मालच घ्यावा लागेल. जसे अमेरिकेला स्वस्त लोक सगळीकडेच मिळतात, पण भारतीयांचा दर्जा उच्च म्हणून भारतीयांनाच काँप्युटर क्षेत्रात जास्त प्राधान्य. जशी शस्त्रात्रे रशिया किंवा अमेरिकेकडूनच.

पुरी तैय्यारी हो चुकी है. वेस्ट इंग्लंड कंपनी बन चुकी है. अब हम व्यापारी बनकर इंग्लैंड जायेंगे और दो सौ साल तक राज करेंगे. इस दरम्यान उनका प्राचीन ग्यान चुराके लायेंगे और फिर क्या...

किसी को भी एच वन व्हिसा नही देंगे Lol

वेदाची चर्चा चालू आहे म्हणून त्याचेच उपांग असलेल्या आयुर्वेदा वर बी चर्चा होऊ द्या . मागे काही महिन्यापूर्वी लोकसत्ता वर चांगला वादविवाद चालू होता आयुर्वेदवर.. एका आयुर्वेदतज्ञाने मस्त प्रतिवाद केला होता .. कोणाकडे ती लिंक असेल तर कृपया टाकावी इथे ....
अगदी मागच्या शतकात घडलेल्या काही नाकाच्या शस्त्रक्रियेचे दाखले खाली टाकतो ...

http://gyan-amruth-of-divine.blogspot.com/2013/06/how-ancient-indian-sur...
https://en.wikipedia.org/wiki/History_of_rhinoplasty

बाकी नाडी बघण्याची कला बी चांगलीच भारी आहे पण दुर्दैवाने फार लोक राहिले नाहीत आता ज्यांना चांगलं जमतंय असे . bams वाल्या किती मंडळींना येतं नाडी पाहता देवच जाणो .. आमच्या नगर ला एक डॉक्टर होते मागच्या पिढीत जे चांगलेच भारी होते यात .. एकदा बीडकडचा एक आमदार याना हात दाखवायला आला तेव्हा नाडीतून त्यांनी जाणले कि याने एक खून केला होता ... त्याने ते कबुल बी केलं .. नगर मधले कुणी जुने डॉक्टर इथं असतील तर कदाचित ते जास्त डिटेल मध्ये सांगतील

Pages