तहान

Submitted by स्वप्नाली on 28 September, 2018 - 17:16

तहान

चैत्र पौर्णिमेच्या नीरभ्र आकाशात चंद्र आज अनभिषक्त सम्राटाच्या थाटात झळकत होता.

रूपेरी प्रकाशात अर्ध्या कोस अंतरावर "त्याला" झोपडीवजा एक घर दिसत होतं.

त्या घराच्या खिडकीतून झिरपणारा पिवळा प्रकाश त्याचा शेवटचा आशेचा कीरण होता.

दाट झाडीतून वाट काढ़त, तो पाय ओढत होता. एरवी मैलभर अंतर झपाझप कापू शकणारा तो एक एक पाऊल उचलताना कण्हत होता.
त्याच्या पहाड़ी शरीरावर जागोजागी झालेल्या जख़मान्मधून ठिबकणारं रक्त त्याच्या वाटेचा सुगावा सोडत होतं. पण आज त्याला त्याची पर्वा नव्हती.

तहानेनं घसा कोरडा पडला होता. श्वास भरून आला होता. जखमांच्या वेदनांनी त्याचा मेन्दू बधीर झाला होता. ह्या क्षणाला दूसरं-तिसरं काहीच नको होतं.

हवं होतं फक्त दोन घोट पाणी.

जीवात जीव असेपार्यंत त्या दोन घोन्टासाठी ते घर गाठायचं होतं.

कुठल्याही क्षणी त्याच्या रक्ताच्या वासानं भूकेलेली जंगली श्वापदं त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढत चालली होती.

आता थोड़याच पावलांचे अंतर राहीले होते.

अचानक पाय अडखळून तो खाली पडला, पडताना एका दगडावर डोकं आदळलं.

"पाणी.... " एक शेवटचा त्याने हूंकार भरला.

आस-पासच्या झाडान्च्या कुशीत निजलेली पाखरं चिवचिवाट करत उडाली.

त्याच्या कमरेला बांधलेला धारदार चाकू चमकत होता.
बहूतेक आकाशातल्या तेजोमय चंद्राशी स्पर्धा करत करत असावा.

डाग दोघान्वरही होते.

चाकूवरून कोणाचं तरी रक्त ओघळत होतं.

आपल्या धन्याची तहान तो चाकू भागवू शकत नसला, तरी धन्याची शेवटची मोहीम फत्ते करून त्याने स्वत:ची तहान भागवली होती!
.
.
.
त्या घरातून रेडियोवर मन्ना डे गात होते,

"एक दिन सपनों का राही
चला जाये सपनों के आगे कहाँ

ज़िन्दगी कैसी है पहेली हाय
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये"

स्व.प्ना.ली.
28.09.2018

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आवडली.
शेवटच्या गाण्याचा फार रिलेव्हन्स लावता आला नाही.
कथेतलं वर्णन वाचून माझ्या डोळ्यासमोर एकदम राणा प्रताप सदृश राजपूत वीर आला.

छान आहे कथा. आवडली.
एक टायपो,
>>दोन घोन्टासाठी>>> दोन घोटांसाठी !
पुलेशु !

छान आहे.
मला योद्धाच वाटतोय तो , खुनी नाही Uhoh

हो. खुनाला वापरलेले हत्यार खुनी कमरेला बांधून फिरणार नाही, अनलेस तो एक सायको सिरीयल किलर असेल.
पहाडी शरीर त्यावर जागोजागी जखमा हे सुद्धा एक लक्षण योद्धा असण्याचे.

नेमका अर्थ उमगला नाही. गूढ कथा लिहीण्याचे सामर्थ्य आहे तुमच्या लेखणीत.
पुढच्या वेळी एखादी पूर्ण लांबीची कथा लिहा. शुभेच्छा !

छान कथा! पण एक शंका - चाकू कमरेला बांधला असेल तर तो उघडा नाही ठेवणार ना? चाकूची मूठ चमकेल , पण पातं म्यानात असेल ना? हातातला चाकू जास्त योग्य वाटेल.
अजून एक, गाण्यामुळे - >>आपल्या धन्याची तहान तो चाकू भागवू शकत नसला, तरी धन्याची शेवटची मोहीम फत्ते करून त्याने स्वत:ची तहान भागवली होती!>> या शेवटाचा प्रभाव जातो.

छान जमलंय! Happy अगदी चित्र डोळ्यांसमोर उभं राहतंय. पुलेशु. आपण अजून छान सहज लिहाल. Happy