मायबोलीचे उत्तम वाचक

Submitted by थॅनोस आपटे on 28 September, 2018 - 06:26

मायबोली पहिल्यासारखी राहिली नाही हे वाक्य निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शब्दात डोळ्यांना ऐकू येऊ लागले आहे. पहिल्यासारखी नाही म्हणजे लेख येत नाहीत असे असावे. खरे तर अनेक जण लिहीत आहेत. खूप जण उत्तम लिहीत आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. मायबोलीवर काही वाचक नवोदीतांचे लिखाण मनापासून वाचून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात. काही जण तर जवळपास प्रत्येक नव्या धाग्याला हजेरी लावतात. अर्थातच त्यांचा व्याप सांभाळून. काही जणांचे प्रतिसाद तर ज्ञाबवर्धक असतात. लेखकाला उत्तम दिशादर्शन करणारे असतात.

अशा वाचकांची नोंद घ्यावी या हेतूने हा धागा आहे. इथे अशा सकारात्मक व उत्तम वाचकांचा उल्लेख करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पटकन सर्वत्र दिसणारे प्रतिसादक म्हणून काही नावे सुरूवातीस घेत आहे. (सध्या माझ्या वाचनात जे धागे येतात त्यावर आढळणारी नावे आहेत). जसजसे माहीत होईल तस तसे मी ही अपडेट करीनच. आपणही हातभार लावावा.

१. मानव पृथ्वीकर
२. पाथफाईंडर
३. वावे
४. किल्ली
५. सस्मित
....................

हे सर्वांना प्रोत्साहन देताना दिसताहेत.

मायबोलीचे उत्तम वाचक>>
की उत्तम प्रतिसादक, प्रोत्साहन देणारे.
उत्तम वाचक असला तरी तो प्रतिसाद देइलच असे नाही. उत्तम वाचकाची व्याख्या वेगळी करता येइल, बहुतेक इथे ती अपेक्षीत नाहिये.

व्याख्येची आवश्यकता वाटत नाही. सातत्याने प्रतिसाद देणे हे सुद्धा मायबोलीवर उत्तम वाचक असण्याचे लक्षण आहेच की. प्रतिसाद न देण्याने नवीन लेखकाला किंवा अगदी जुन्या लेखकालाही प्रोत्साहन कसे मिळेल ?

धन्यवाद.
मायबोलीचे चांगले वाचक खूप आहेत.काही व्यक्त करतात, काही करत नाहीत इतकंच.

अरे वा माझं नाव पहिल्या नंबरावर!

मायबोलीचे चांगले वाचक खूप आहेत.काही व्यक्त करतात, काही करत नाहीत इतकंच.>> +१

माझ्या नावाचा उल्लेख पाहून आश्चर्य वाटलं, पण धन्यवाद Happy

स्वाती२, साधना, प्रसन्न हरणखेडकर हे ही उत्तम वाचक आहेत आणि त्यांच्या पोस्ट्स एकदम बॅलन्स्ड् असतात.
किल्ली चे प्रतिसादही मला खूप आवडतात.

बाकी पुर्वी - अशोक, दिनेश, साती, इ उत्तम वाचक पण होते आता ते इथे नाहीत Sad

माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद _/\_

व्हीजे म्हणजे कोण? VB माहित आहे.

बादवे तुमच्या नावाचा अर्थ काय? Proud

अरे धन्यवाद.
उगाचच मी काही मोठे केले आहे असे वाटत आहे.
मी सामान्य वाचक आहे, बाकी कामाच्या धबडग्यात काहीच वाचायला जमत नाही म्हणून वाचनाची भुक भागवायला इथे घुटमळतो.
माझ्या यादीत, सिंबा मी_अनु, शाली, दक्षिणा, मानव पृथ्वीकर, किल्ली, आनंद (जो आजकाल फार कमी वेळा येतो)
आणि मारू नका पण मी ज्याला मिस करतोय तो (आपला )कु ॠ. ज्याचा मुड बरा असला तर तो वाचत असतो अन खरच खुप चांगले प्रतिसाद देतो.

टायटल वाचून "चौरंगी सामन्यांतील हिंदूंच्या बाजूचे महत्वाचे प्रेक्षक" आठवलं Lol

खरच दर्जेदार काही दिसल तर आवर्जून प्रतिसाद दिलाच जातो
पण उगाच कुणाला फक्त प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून "वा:वा:.... मस्तच लिहलय हं!" वगैरे म्हणत नाही (अर्थात जे तसे करतात त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही)

दर्जा घसरलाय हे माझे स्पष्ट मत आहे (याबद्दल दुमत असू शकत)
वैभव जोशी, दाद वगैरे लोकांच्या कवितांनी खुळावायला व्हायचा एक काळ होता आणि आता द्वयर्थी कवितांचा रतीब पडतोय!
धुंद रवी, स्वीट टॉकर वगैरेचे लेखन खिळवून ठेवायचे.... त्या दर्जाचे आजकाल क्वचित काही दिसते!

"जुनी मायबोली राहिली नाही" म्हणणाऱ्या लोकांचा उपहासात्मक उल्लेख आजकाल बऱ्याच जणांकडून होतो.... त्यांना फक्त एव्हढेच म्हणावेसे वाटते.... " हाय, कंबख्त तुने पीही नही!

<< दर्जा घसरलाय हे माझे स्पष्ट मत आहे >>
नाही, मी सहमत नाही. मस्ती करणारे करतात, पण तुम्ही स्वतः कुणाच्या वाकड्यात गेला नाहीत, तर ते त्रास देत नाहीत, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे केवळ मायबोलीच नाही तर इतर मराठी आंतरजालावर पण बघितले आहे. आपल्याला काय हवे तितकेच टिपायला हवे. मी स्वतः पूर्वी कधीच कविता वाचत नसे, पण आता इथे नक्कीच वाचतो आणि माझ्या मते हा पॉजिटिव्ह बदल आहे.

पूर्वी 'कमी लोकांकडून पण सातत्याने लिहिले जाणारे दर्जेदार साहित्य' आणि आता 'भरपूर लोकांकडून सगळ्या प्रकारचे साहित्य' इतकाच फरक आहे.आताही चांगले लिखाण येते.पण खूप लिखाण रोज येत असल्याने सगळे वाचले जात नाही.शीर्षक वाचून लिखाण वाचायचे की नाही ठरवावे तर नॉर्मल शीर्षक आणि आत इंटरेस्टिंग कंटेंट असणाऱ्या लेखकांवर अन्याय होतो.नाव वाचून लेख वाचणे चांगला प्रकार नाही.यात नव्या लेखकांवर अन्याय होतो.
मी 2007 पासून मायबोलीवर वाचक आहे.नॉस्टॅल्जिक फॅक्टर सोडल्यास दर्जा खालावला असे वाटत नाहीये.

अनु +१
मीही जवळजवळ २००८ पासून मायबोली वाचते. मलाही दर्जा खालावलाय असं नाही वाटत.

मी वर स्वरूप यांना समर्थन देण्याचे कारण :
मी माबोवर सक्रिय झालो अंदाजे दिड वर्षापासून. त्याआधी जवळपास दोन वर्षे रोमात होतो. या संपूर्ण कालखंडात पहिली जवळपास अडीच वर्षे माबो खेळिमळीने बघितली. मी पण अनेक धाग्यांवर दंगा घातला. या काळात कोणीही केलेली शेरेबाजी ही खिलाडूवृत्तीने घेतली जायची. आजकाल संयम सुटत चालला आहे.
या रणांगणात काही मोती गळालेत ( पानिपतकरांच्या ईस्टाईलने वाक्य टाकलंय Wink ) तर काही हे मैदान सोडून गेलेत. ज्यांच्या लिखाणाच्या प्रेमात इथे प्रवेश घेतला. यातली काही नावे स्वरूप यांनी नमूद केलीत. न राहवून स्वरूप यांच्या प्रतीसादाला समर्थन केले. Happy

तुम्हाला दूरदर्शनचे कार्यक्रम आठवत असतील, ७० च्या दशकातले ब्लॉकबस्टर्स सिनेमे आठवून आताच्या सिनेमांची तुलना करण्याचा मोह आवरत नसेल, पूर्वी ५० आठवडे, ५ वर्षे सिनेमे चालायचे त्याची तुलना आताच्या दोन आठवड्यात गल्ला जमवून जाणा-या सिनेमांशी कराविशी वाटत असाल तर...

तुमचे वय झालेले आहे. आता काहीही केलं तरी ते दिवस येणार नाहीत हे सत्य तुम्ही स्विकारलेले नाही. असे नाही कि नवीन लोकांमध्ये टॅलन्ट नाही. काळानुरूप त्यांचे लिखाण आहे. फक्त तुम्हाला या काळाशी अ‍ॅडजस्ट करणे जमलेले नाही. तेव्हांचे दिग्गज पण कधी नवीन असतीलच. उदाहरणार्थ धुंद रवी ऑर्कुटवर नवीन लिहायला शिकला तेव्हां त्याला लोकांनी प्रोत्साहन दिले होते. तेव्हांही दिग्गज लिहीणारे होते. पण रवी पुढे निघून गेला..

कधी कधी जुन्या लेखकांचे धागे काढून त्यावर कुठे गेलास तू असा विलाप करणा-यांची गंमत वाटायची. असो. ज्याचा त्याचा आनंद.

कालाय तस्मै नम:
हे असे होणारच.
माबो च्या या पुढील पिढीतील वाचक सध्याच्या लेखकांची आठवण काढतील.

त्यालाही अर्थ नाही. काळाबरोबर राहूयात. नवीन आलेल्या आणि चांगले लिहीणा-यांणा प्रोत्साहन देणा-यांची दखल याचसाठी घेउयात. प्रत्येक नवीन लिखाणाला प्रतिसाद दिला पाहीजे असा अर्थ कुणी काढत असेल तर नाईलाज आहे. किंवा आवडले नाही तरी प्रतिसाद द्या अशी सक्तीही नाहीये. पुढे जाऊयात का ?

काही जण प्रतिसादांनाही दाद देतात. खरं म्हणजे नव्या लोकांची भीड चेपते अशाने. चांगले लिहीणारे असतील त्यांना उत्साह येतो. छोटीशी कृती असते ही..

मुंगेरीलाल, चिमण, धुंद रवी आता इथे लिहीत नाहीत याचं थोडं वाईट वाटतंच.पण त्यांना अजून चांगले प्लॅटफॉर्म मिळाले आहेत/असतील. त्यामुळे गुड फॉर देम.

Pages