झब्बू क्र. ५ - यंत्र

Submitted by संयोजक on 21 September, 2018 - 00:35

विषय क्र ५ - यंत्र
चाकाचा शोध लागल्यानंतर वैज्ञानिक जगात मोठी उलटफेर झाली. चाकाच्या शोधानंतर मानवाने वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बनवायला सुरू केली. मानवी जीवन हे सुखकर होण्यामागे बराचसा हात ह्या यंत्रांचा आहे.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय पाचवा झब्बू. तुम्ही पाहिलेल्या, वापरात असलेल्या यंत्रांचे प्रकाशचित्र.
CYMERA_20180921_095729.jpg

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पहा -

Group content visibility: 
Use group defaults