खेळ शब्दांचा -५- खेळ व खेळाडू.

Submitted by संयोजक on 21 September, 2018 - 00:01

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ५ :- खेळ आणि खेळाडू.
क्लू :-
भारताचा राष्ट्रीय खेळ.
_ _ (दोन अक्षरी)

Group content visibility: 
Use group defaults

येस Proud

नाही.

पब्लिकहो, सहा सिक्सेस चा प्रश्न "फर्स्ट क्लास" क्रिकेट बद्दल तसाच्या तसा धरला, तर फक्त गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री हेच आहेत. त्यामुळे "भारतीय खेळाडू" फक्त शास्त्री.

युवी, गिब्ज ई लोकांनी २०-२०, वन डे व इतर सामन्यांत मारले आहेत, जे फर्स्ट क्लास क्रिकेट मधे धरत नाहीत.

>> २०-२०, वन डे व इतर सामन्यांत मारले आहेत, जे फर्स्ट क्लास क्रिकेट मधे धरत नाहीत
हे मला माहित नव्हतं. नाहीतर मला अपेक्षीत उत्तर युवी आणि शास्त्री हे होतं.

हे मला माहित नव्हतं. नाहीतर मला अपेक्षीत उत्तर युवी आणि शास्त्री हे होतं. << म्हणूनच 'युवराज नाही... शास्त्री आहे...' असं लिहिलेलं मी. Proud

'रेस अ क्रोस अमेरिका' अर्थात राम, ही लांब पल्ल्याची सायकलिंगची रेस एकट्याने पुर्ण करणारे पहिले भारतीय

होय डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ

त्यांनी त्यांच्या दुसर्‍या प्रयत्नात राम पुर्ण केली. त्याच वर्षी डॉ अमित यांनीही ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पार केली. परंतु ते गोकुळनाथांच्या नंतर आले.

डॉ. गोकुळ नाथ यांना ११ दिवस १८ तास ४५ मिनिटे लागली तर
डॉ. अमित समर्थ यांना ११ दिवस २१ तास ११ मिनिटे लागली.

भारतातर्फे एकापेक्षा जास्त खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला व ऑलिंपिक मेडल थोडक्यात हुकलेला गोलंदाज.

सशल - फर्स्ट क्लास म्हणजे कसोटी क्रिकेट आणि डोमेस्टिक सामन्यांमधले सर्वात वरच्या लेव्हलचे पण क्रिकेट चे पारंपारिक नियम पाळून खेळलेले सामने - रणजी, दुलीप, इंग्लिश काउण्टी वगैरे, तसेच कसोटी मालिकांच्या सुरूवातीला किंवा मधे अध्यक्षीय संघ, रणजी विजेता संघ यांच्याविरूद्ध परदेशी संघ खेळतात ते सामने. यात काटेकोर नियमांनुसार सामने या कॅटेगरीत धरण्यापेक्षा वर्षानुवर्षे/परंपरेनुसार स्पर्धा फर्स्ट क्लास मधे धरल्या गेलेल्या आहेत.

सोबर्स आणि शास्त्री दोघांनीही जनरल फर्स्ट क्लास मधेच मारलेले आहेत. कसोटी मधे कोणीच मारलेले नाहीत.

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव खेतवाडी गिर्गाव भागाचे फोटो असलेला धागा सापडत नाहीये. लिंक देईल का कुणी प्लीज.

भारतातर्फे एकापेक्षा जास्त खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला व ऑलिंपिक मेडल थोडक्यात हुकलेला गोलंदाज.

>>>> उत्तर काय आहे याच

Pages