आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र २ - शेतीउपयोगी वस्तू आणि शब्द.
क्लू
याचा उपयोग नांगरणी साठी होतो
_ _ र
खेळ शब्दांचा -२- शेतीसंबंधीत वस्तू आणि शब्द.
Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वसवा
वसवा
असा एक शब्द आहे शेती संबंधी पण ते अवजार वैगेरे नाही!
नाही, माझा शब्द अवजार नाही पण
नाही, माझा शब्द अवजार नाही पण शेती संबंधित आहे
शेतीसंबंधी शब्द असा स्कोप
शेतीसंबंधी शब्द असा स्कोप ठेवला तर अधिक शब्द बसतील हो संयोजक.
लोकहो, शब्दांचे अर्थ किंवा वस्तूंचं वर्णनही लिहा, उत्तरात किंवा उत्तर दिल्यावर.
तेवढीच उजळणी किंवा माहितीत भर.
*
शुद्धलेखनाची चूक सुधारली.
भरत +1.
भरत +1.
मला यातले बरेच शब्द माहित नाहीत. वस्तू वगैरे माहित असतील कदाचित पण इथे कोकणात त्यांची नाव वेगळी असू शकतात म्हणून वर्णन पण करा वस्तूचे. उत्तर दिल्यावर केले तरी चालेल.
शेतीसंबंधी शब्द असा स्कोप
शेतीसंबंधी शब्द असा स्कोप ठेवला तर अधिक शब्द बसतील हो संयोजक.>>
भरतजी,
माझ्याही मनात हे आले होते.
आपण संयोजकांची परवानगी गृहित धरून देऊयात शब्द!
'आठवा' हे आहे का?
'आठवा'
हे आहे का?
वरती मी दिले ला पाभर हा शब्द पेरणी साठी वापरण्याचे अवजार ह्याच्या फण्यातून धान्य जमिनीत पेरले जाते.
ह्यावर अजुन एक भाग असतो त्याला चाडं म्हणतात व ह्याला पुर्वी बांबुच्या नळ्या लावून पाभरीच्या फण्याना जोडत वरून धान्य मुठीने हळू हळू सोडले की ते नळ्या मार्फत पाभरीच्या फण्यातून जमीनीत पेरले जाते.
सहमत
सहमत
ताटवा?
ताटवा?
शेतातील पिक काढल्यानंतर उरले
शेतातील पिक काढल्यानंतर उरले सुरले पिक गोळा करणे.
_ _ वा.
शेतातील पिक काढल्यानंतर उरले
शेतातील पिक काढल्यानंतर उरले सुरले पिक गोळा करणे.>>
सरवा
मानव नाही
मानव नाही
कृष्णा बरोबर
कृष्णा बरोबर
शेतातले मुख्य धान्य नेल्यावर खाली उरतो तो ‘स र वा’. व्यंकटेश माडगूळकरांच्या एका पुस्तकाचे हे नाव .
- ळ - - -
- ळ - - -
ह्या अवजाराला अजून एक नांव आहे आमच्या भागात.
- प - -
बदल केला आहे. शेतीशी संबंधीत
बदल केला आहे. शेतीशी संबंधीत वस्तू आणि शब्द दोन्हीही चालतील.
धन्यवाद संयोजक!
धन्यवाद संयोजक!
फुळकावणी ?
फुळकावणी ?
फुळकावणी नाही. पण ह्याचा अर्थ
फुळकावणी नाही. पण ह्याचा अर्थ आता तुम्ही सांगा.
आधी दिलेले अगदी कॉमन मार्केटमधले मराठीनांव आहे तर त्याला खाली दिलेला ग्रामिण भागातला शब्द. ह्या शिवाय दाणे होणारच नाहीत. पुर्वी बैल हवे असायचे.
म ळ करणी ?
म ळ करणी ?
हा शब्द नाही पण जवळपास
हा शब्द नाही पण जवळपास पोहोचला आहात.
म ळणी यंत्र
म ळणी यंत्र
मळणीयंत्र?
मळणीयंत्र?
बरोबर!
बरोबर!
आता त्याचा पर्यायी शब्द खाली मी दिलाय ४ अक्षरी तो देखिल सांगा हातोहात!
- - ळ - बैला संबंधी
- - ळ -
बैला संबंधी
मानव देताय शब्द की मी देऊ?
मानव देताय शब्द की मी देऊ?
* * रा (ग्रामीण भागात याने अंतरही मोजतात. बहुऊपयोगी वस्तू.)
* * रा >>. कासरा
* * रा >>.
कासरा
कृपया वेळेनुसार घ्या :
कृपया वेळेनुसार घ्या :
- - ळ -
बैला संबंधी
साद, अजून क्ल्यू द्या थोडा
साद, अजुन क्ल्यू द्या थोडा
बैलास बांधण्यासंबंधित
बैलास बांधण्यासंबंधित
* आता जेवायला जातो, तासाने भेटू ☺️
इथे विविध शेती अवजारांची
इथे विविध शेती अवजारांची चित्रांसह छान माहिती दिलीय.
फक्त माहिती करीता लिंक देतोय, यावर प्रतिसाद इथे नको हे सांगणे न लगे.
http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/22...
फुळकवणी- अतिशय पांचट सपक
फुळकवणी- अतिशय पांचट सपक कोड्यास
खळगुट पण म्हणतात कधी कधी
Pages