गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 September, 2018 - 08:36

पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे. आता ती दिडच दिवस का आहे??? आणखी खोलात विचार केला तर मूर्तीकारांनी नीट पेंटिंग करून तयार केलेल्या गणेशमूर्तींना हा दीड दिवसाचा नियमही व्यावहारिक कारणांनी गैरलागू होतो. पण मूळ पार्थिव गणेश व्रतापेमाणे व्रतकर्त्यांनी पहाटे उठून नदीवर जाऊन स्नान करून 2/3 ओंजळी चिकणमाती आणून स्वहस्ते तो गणपती तयार करायचा आहे. त्याला रंगरंगोटी इत्यादी काहीच करायची नाहीये,फक्त डोळ्यासारखे जे कोरलेले अवयव मूर्ती सुकायला लागल्यावर ढासळतील, ते मूर्ती तयार केल्यावर काही वेळात सूर्योदयाचे उन्ह येऊन वाळायच्या आत तूप लाऊन ते अवयव घट्ट करायचे आहेत.(म्हणूनच आजही रंगविलेल्या मूर्ती असल्या तरी पुरोहित, गुरुजी,भटजी लोक यजमानाला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्तीच्या डोळ्यातून सुरमा लावल्या प्रमाणे तुपात भिजलेली दुर्वा फिरवायला सांगतात,ज्याची माझ्या मते आज काहीही आवश्यकता उरलेली नाही!असो!!!) आता असा स्वहस्ते केलेला गणपती नीट , न भांगता,न तडे जाता किती दिवस राहिल? एक ते दोन दिवस! म्हणून हे व्रतही दीड दिवसाचच आहे.

धर्मशास्त्रातही सोईच्या ठिकाणी मानवी व्यवहारांची गणित पाळली(गेली) नाही तर ते धर्मशास्त्रदेखील मूर्तीसारखच पाण्यात मृत्तिका होऊन मूळ रूपात विसर्जित होत!..,असो! बोला...गणपती बाप्पा मोरया,दरवर्षी लवकर या! (आणि गणेश मंडळानमध्येच येणार असाल तर ,जा ही!..आंम्हाला म्हाइतिये की तुम्हालाही त्याचा त्रास होतोय गेली काही दशकं.. असो!)
======================
लेखक:- कुमार पराग दिवेकर गुरुजी. (धर्मशास्त्रांचा सावरकरी प्रेरणेने धांडोळा घेणारा एक उत्साही बाल लेखक!)

Group content visibility: 
Use group defaults

चांगली माहिती.

एक शंका आहे:
>>> पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत
हे पुरुषांनी करायचं व्रत का ठरलं असेल? मुळात गणपती पार्वतीने म्हणजे एका स्त्रीने घडवला होता ना?

मस्त प्रतिसाद आहेत दोन्ही..

मघा लेख आला तेव्हा उघडला, तो सनातनची करमणूक असेल म्हणून. मग तटी सावरकर वाचून वक्रभ्रुकुटीने वाचला, तर सेन्सिबल वाटला. पण मग आत्मूबाबा मिपावरचे आठवले, अन पर्तिसाद न टंकता बंद केला.

रच्याकने.

प्रतिसाददात्या #१, हे प्रोग्रेसिव्ह, पुरोगामीभटजी आहेत. विधी येईल, पण तो अपेक्षेपेक्षा वेगळाच अन नॉन-सनातन असेल.

प्रतिसाददात्या #२, और ये लगा सिक्सर!

#थोडे_बोलुया_गणपतीविषयी_काही.

उजव्या सोंडेचा.
शाक्तपंथी,
विघ्नकर्ता.
म्हणून द्वारक्षणासाठी नेमलेला.
गणनायक म्हणून शिवसेने सारखा सरकारात सामावून घेतलेला.
हुशार, उग्र, शांत, मग विघ्नहर्ता झालेला.
मग त्याचं काय अन कसं करायचं.
अन मग 'सार्वजनिक' केलेला/झालेला.
अन कायकाय..

गणपती इज अ‍ॅन इट्रिग्युइंग मोटिफ.

अधिक माहितीसाठी वाचा :
आशियाचे आराध्य दैवत गणेश - म के ढवळीकर

स्वाती, काय आहे ना की कुठलाही देव हिंदू धर्माच्या मुख्य धारेत आला की त्याचा ताबा उच्चवर्णीय पुरुषांकडे जातो... ते उपास बिपास चिल्लर पार्टी बायकांकडे येतं Proud

आत्मबंध, तुमचा आधीचा id वेगळा होता ना? बरेच दिवसात तुम्ही खादाडीवर काही लिहिलं नाहीये. Happy

तुमचे मिपा वरचे लिखाण मी वाचत असते.चांगलं लिहिता.मागे काहीतरी गुरुजी अप्रेंटीस शिप मधले अनुभव वाली सिरीज पण मस्त लिहिली होती.
(आपल्याच जवळची माती वापरून) मृत्तिका मूर्ती या कन्सेप्ट ची अजून चांगली पब्लिसिटी होणे गरजेचे आहे.यावेळी बाजारात शेण शाडू आणि दूध यांनी बनलेल्या 1 तासात विरघळणाऱ्या मूर्ती आल्या आहेत ती कल्पनाही आवडते.

गेल्या आठवड्यात पाहिलेली wa पोस्ट ~~
एका भांड्यात तुरटी गरम केली की तिचे लगेच पाणी बनते . हे पाणी गणपतीच्या साच्या मध्ये ओतले की पाच मिनिटात सुंदर गणेशमूर्ती तयार.

*सेवानिवृत्त प्रा. एन. के. जोशी सर* यांनी तयार केलेला तुरटी पासूनचा गणपती.
विसर्जना नंतर नदी , तलाव ,विहीर यांतील गाळ आपोआप साफ करण्यास उपयोगी व तयार करण्यासही अतिशय सोप्पी पद्धत

आता जर सर्वानी ऎसी तुर्टी किलो किलोने जलाशयात विसर्जनानिमित्त ओतली तर एक्वाटिक फ्लोरा फौना आणि एकंदर एकोसिस्टिमची तर ....!

जोशी सर नक्की कशाचे प्राध्यापक होते?
<<
तुम्हाला काय करायचंय? सेवानिवृत्त झालेत ना? मग सेवेची किम्मत नको??
गटारीतून गॅस येतो, तसा तुरटीतून आपोआप पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवताहेत ना?
तुम्हाला मेलं प्राचीन हिंदू शास्त्रीय प्रगतीचं कौतुकच नाही.
इंग्रजांनी पॅरीसवरून आणलेल्या प्लॅस्टरचे गणपती करणारे तुम्ही Angry

हे पाणी गणपतीच्या साच्या मध्ये ओतले की पाच मिनिटात सुंदर गणेशमूर्ती तयार.
<<
अलिबाबा/अ‍ॅमॅझॉन वर गणपतीचे साचे कुठे मिळतात?

@पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत
हे पुरुषांनी करायचं व्रत का ठरलं असेल? मुळात गणपती पार्वतीने म्हणजे एका स्त्रीने घडवला होता ना? -- धर्मानुसार चे उत्तर:- जशी काही व्रते स्त्रियांची तशी काही पुरुषांची.
माणुसकीचे उत्तर:- कोणत्याही पूजा कोणीही कराव्या.धर्मशास्त्राचे अधिकार मानूच नयेत.
आमचे उत्तर:- सगळाच्या सगळा धर्म,आध्यात्म सम्पूर्ण स्वबुद्धीने निर्णय घेऊन पाळावे,बदलावे. काहीच नको असेल तर अजिबात काहीही पाळू नये..कारण त्यावाचून काहीही अडत नाही. Happy
=================================
@उजव्या सोंडेचा.
शाक्तपंथी,
विघ्नकर्ता.
म्हणून द्वारक्षणासाठी नेमलेला.
गणनायक म्हणून शिवसेने सारखा सरकारात सामावून घेतलेला.
हुशार, उग्र, शांत, मग विघ्नहर्ता झालेला.
मग त्याचं काय अन कसं करायचं.
अन मग 'सार्वजनिक' केलेला/झालेला.
अन कायकाय..
गणपती इज अ‍ॅन इट्रिग्युइंग मोटिफ. --- इतिहास, समाज,धर्म ,रूढी,परंपरा ह्या सगळ्यातून नानाविध कारणांनी देव धर्माची असंख्य रूप ,पूजाविधी व त्या बद्दलचे नियम ,घटना घडत असतात..ते केवळ बुद्धिवाद आणि नीतिमत्ता ह्याच आधारावर तपासायचे असतील तर अत्यन्त उत्तम..! मग जे योग्य वाटेल ,असेल ते ठेवावे न वाटेल,असेल ते उडवून लावावे.
=============================
@आत्मबंध, तुमचा आधीचा id वेगळा होता ना? बरेच दिवसात तुम्ही खादाडीवर काही लिहिलं नाहीये. --- हो , लिहीन लवकरच. Happy आधीचा आय डी - अत्रुप्त आत्मा.
============================
@ कल्पेशकुमार --- हे पुढील आपल्यासाठी--
तुरटीच्या गणपतीचे फॉरवर्ड पुन्हा फिरू लागले आहेत . त्यानिमित्ताने - पुन्हा एकदा

तुरटी चा गणपती आणि छदम विज्ञान

सध्या पुण्यात खेर काकांचा तुरटीचा गणपती गाजतो आहे . तुरटी चा अक्खा गणपती बनवला तर तो विसर्जन केल्यावर पूर्ण वितळेल शिवाय नदीचे पाणी सुद्धा स्वच्छ होईल अशी ती आयडिया आहे .

आयडिया चूक आहे .

पुण्यात किंवा इतर कुठेही समुद्रात किंवा नदीत विसर्जन केले जाते ( तळ्यात / विहिरीत नाही )

तुरटी मुळे भांड्यातले स्थिर पाणी स्वच्छ होते .
नदीच्या वाहत्या पाण्यात तुरटी चा गणपती काय हत्ती टाकला तरी उपयोग नाही . आयडिया पर्यावरण प्रेमी नाही .

तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी निर्जंतुक झालेले नसते. हे सारे भांड्यातल्या स्थिर पाण्यासाठी खरे आहे .

नदीच्या वाहत्या पाण्यात हा थर खाली बसू शकत नाही . वाहत्या पाण्यात तुरटीचा काहीही उपयोग नाही . समुद्रात तर काहीच नाही .

वाहत्या पाण्यात तुरटी अजिबात शुद्धीकरण करू शकत नाही . चव वाईट होईल आणि विनाकारण पोट्याशियम चे क्षार वाढतील .

तुरटी चे सूत्र:(K2SO4.Al2(SO4)3.24H2O)) बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. वाहत्या पाण्यात तुरटीचे भौतिक गुणधर्म - उदा मातीचे कण एकत्र करणे हे लागू पडणार नाहीत . रासायनिक गुणधर्म मात्र विरघळतील .

हे असले धातूंचे क्षार पाण्याला प्रदूषित करतील .

जर मोठ्या प्रमाणावर असले तुरटीचे गणपती विसर्जित झाले तर - नदीचे प्रदूषण वाढेल .

पोस्ट बाय ~Dr Abhiram Dixit

हे तुरटी गणपतीचे प्रबोधन करणे आवश्यक.
बरेच लोक चांगले समजत आहेत कल्पनेला.

कागदाचा लगदा/
शेण्+शाडूमाती गणपती बद्दल आपले काय मत आहे?

हे पुरुषांनी करायचं व्रत का ठरलं असेल? मुळात गणपती पार्वतीने म्हणजे एका स्त्रीने घडवला होता ना? -- धर्मानुसार चे उत्तर:- जशी काही व्रते स्त्रियांची तशी काही पुरुषांची.
माणुसकीचे उत्तर:- कोणत्याही पूजा कोणीही कराव्या.धर्मशास्त्राचे अधिकार मानूच नयेत.
आमचे उत्तर:- सगळाच्या सगळा धर्म,आध्यात्म सम्पूर्ण स्वबुद्धीने निर्णय घेऊन पाळावे,बदलावे. काहीच नको असेल तर अजिबात काहीही पाळू नये..कारण त्यावाचून काहीही अडत नाही. Happy>>> मस्त पोस्ट आत्मबंध!

'तुरटीचा गणपती' ह्या पाणीशुद्धीकरणाच्या क्रांतिकारी विचाराचा प्रसार करण्यासाठी अद्याप कोणी 'विनासायास XXलॉस' सारखे नाव देऊन वॉट्सअ‍ॅप फॉर्वड्स, फेसबुक, माबो/मिपा वर धागे, १ कोटीचे टार्गेट, खेर काकांच्या भाषणाच्या विडिओची लिंक असे भाराऊन जाऊन काहीच केले नाही का? Sad

माहिती म्हणून छान आहे. पटतेहि.
मग गणपतीची मूर्ती फक्त मातीचीच असावी का? धातूंची मूर्ति (सोने, चांदी, पितळ) पण मान्य आहे ना?
आम्हाला कुणितरी लाकडी मखरात प्लास्टिकचा गणपती भेट म्हणून दिला. गणपती आहे म्हणून पूजेत ठेवला, पण दररोज प्लास्टिकच्या गणपतीची पूजा करताना मन गोंधळून जाते. त्याचे विसर्जनहि होणार नाही!

<<<सगळाच्या सगळा धर्म,आध्यात्म सम्पूर्ण स्वबुद्धीने निर्णय घेऊन पाळावे,बदलावे. काहीच नको असेल तर अजिबात काहीही पाळू नये..कारण त्यावाचून काहीही अडत नाही.>>
अनुमोदन, फक्त थोडा अभ्यास असावा स्वबुद्धीने निर्णय घेण्यापूर्वी!
मनापासून प्रार्थना केली तर देवाला पुरते ना?
मग हे बाकीचे सगळे - उत्सव, नाच गाणी, दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा या सगळ्यात देवाचा, धर्माचा काय संबंध?

<<<स्वाती, काय आहे ना की कुठलाही देव हिंदू धर्माच्या मुख्य धारेत आला की त्याचा ताबा उच्चवर्णीय पुरुषांकडे जातो... ते उपास बिपास चिल्लर पार्टी बायकांकडे येतं Proud>>>
कटू सत्य म्हणतात ते हेच.

उत्सव असायला हरकत नाही, पण त्याचे विकृतीकरण नसावेत, व काळाच्या गरजे नुसार योग्य ते बदल व्हावेत.

>>> स्वाती, काय आहे ना की कुठलाही देव हिंदू धर्माच्या मुख्य धारेत आला की त्याचा ताबा उच्चवर्णीय पुरुषांकडे जातो... ते उपास बिपास चिल्लर पार्टी बायकांकडे येतं
Proud

>>> धर्मानुसार चे उत्तर:- जशी काही व्रते स्त्रियांची तशी काही पुरुषांची.
हे उत्तरच नाही. कुठली स्त्रियांची आणि कुठली पुरुषांची हे कशावरून ठरतं हा प्रश्न आहे.
('मला माहीत नाही' हे उत्तर चालेल. Proud )

आजकालच्या काळात दारू पिणे म्हणजे काळाची गरज झाली आहे, मग त्यानंतर काय होईल ते होईल.
माझ्या मते उत्सव कसलाहि करावा, पण त्यात देवाला, धर्माला ओढू नका!

आत्मबंध, मूळ लेख आवडलाच पण त्याखालचा >>माणुसकीचे उत्तर:- कोणत्याही पूजा कोणीही कराव्या.धर्मशास्त्राचे अधिकार मानूच नयेत.
आमचे उत्तर:- सगळाच्या सगळा धर्म,आध्यात्म सम्पूर्ण स्वबुद्धीने निर्णय घेऊन पाळावे,बदलावे. काहीच नको असेल तर अजिबात काहीही पाळू नये..कारण त्यावाचून काहीही अडत नाही. >> हा प्रतिसाद सगळ्यात जास्त आवडला. त्यातला धर्मशास्त्र प्रतिसाद नकोच आहे वाचायला. आता स्वाती आणि वरदाचा प्रतिसाद धरुन लिहावंसं वाटतं की बायका व्रतं करायला बसल्या तर नैवेद्याचा पुरणावरणाचा, पंचपक्वान्नांचा स्वैपाक कोण करेल? मोदक कोण वळेल? म्हणून बायकांची व्रतं किचनमध्ये.

आपण उत्सव एन्जॉय करावा, देवा धर्मांचे ज्यांना करायचे तर करून घेतात. मी तरी उत्सव असेच एन्जॉय करतो.

गुरुजी, लेख आवडला,
मिपा वरची लेखमाला पण आवडलेली,

रच्याक
कुमार पराग दिवेकर गुरुजी. >>>>> मधले कुमार नाव आहे की कु. चा फुल फॉर्म आहे?

ही एक कथा कुठेतरी वाचली होतो १० दिवसांच्या गणपती बद्दल. असे असेल तर दीड दिवसांचा गणपती चुकीचे वाटतेय.

--

भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही कमी झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कडे पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.

एवढं मोठं आणि कॉम्प्लेक्स महाभारत दहा दिवसांत सांगून आणि लिहुन पूर्ण होईल का? एक साधा ३-४ पानी व्हाईट पेपर लिहायचा असेल तर मागे पुढे रेफरंसेस चुकत माकत ४ दिवस जातात!
अगदी फर्स्ट ड्राफ्ट म्हणत असाल तरी सुद्धा कठिण वाटतंय.

सुपर कॉम्प्युटर ला व्यासांनी व्हॉइस कमांड नि टाईप करायला सांगितली म्हणून 10 दिवसात झाले लिहून महाभारत.
सुपर कॉम्प्युटर ने खूप CPU पॉवर वापरली की तो तापतो की नाही, मग त्याला एक्सटर्नल्ली कूल करायला लागते,
त्याचीच रूपक कथा आहे ती,

आमच्याकडे सगळे सगळे होते आधी पासून

दहा दिवसांत सांगून आणि लिहुन पूर्ण होईल का? >> इतका लॉजिकल विचार कशाला करता Happy
तसेही खरे महाभारत काही असे एकटाकी लिहिले गेलेले नाही. वर्षानुवर्षे पिढ्यान् पिढ्या अनेक लोकांनी लिहिलेल्या अनेक कथांनी बनत गेले आहे ते.

पाण्यात बुडवून कूल केलं म्हणजे एसी, पंखे, कूलर असले शोध आपलेच म्हणायला दुसरे संदर्भ शोधायला लागणार तर!

Pages