गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 September, 2018 - 08:36

पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे. आता ती दिडच दिवस का आहे??? आणखी खोलात विचार केला तर मूर्तीकारांनी नीट पेंटिंग करून तयार केलेल्या गणेशमूर्तींना हा दीड दिवसाचा नियमही व्यावहारिक कारणांनी गैरलागू होतो. पण मूळ पार्थिव गणेश व्रतापेमाणे व्रतकर्त्यांनी पहाटे उठून नदीवर जाऊन स्नान करून 2/3 ओंजळी चिकणमाती आणून स्वहस्ते तो गणपती तयार करायचा आहे. त्याला रंगरंगोटी इत्यादी काहीच करायची नाहीये,फक्त डोळ्यासारखे जे कोरलेले अवयव मूर्ती सुकायला लागल्यावर ढासळतील, ते मूर्ती तयार केल्यावर काही वेळात सूर्योदयाचे उन्ह येऊन वाळायच्या आत तूप लाऊन ते अवयव घट्ट करायचे आहेत.(म्हणूनच आजही रंगविलेल्या मूर्ती असल्या तरी पुरोहित, गुरुजी,भटजी लोक यजमानाला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्तीच्या डोळ्यातून सुरमा लावल्या प्रमाणे तुपात भिजलेली दुर्वा फिरवायला सांगतात,ज्याची माझ्या मते आज काहीही आवश्यकता उरलेली नाही!असो!!!) आता असा स्वहस्ते केलेला गणपती नीट , न भांगता,न तडे जाता किती दिवस राहिल? एक ते दोन दिवस! म्हणून हे व्रतही दीड दिवसाचच आहे.

धर्मशास्त्रातही सोईच्या ठिकाणी मानवी व्यवहारांची गणित पाळली(गेली) नाही तर ते धर्मशास्त्रदेखील मूर्तीसारखच पाण्यात मृत्तिका होऊन मूळ रूपात विसर्जित होत!..,असो! बोला...गणपती बाप्पा मोरया,दरवर्षी लवकर या! (आणि गणेश मंडळानमध्येच येणार असाल तर ,जा ही!..आंम्हाला म्हाइतिये की तुम्हालाही त्याचा त्रास होतोय गेली काही दशकं.. असो!)
======================
लेखक:- कुमार पराग दिवेकर गुरुजी. (धर्मशास्त्रांचा सावरकरी प्रेरणेने धांडोळा घेणारा एक उत्साही बाल लेखक!)

Group content visibility: 
Use group defaults

कृष्णाने रणांगणावर अर्जुनाला गीता सांगितली, पण गीता वाचायला गेलो तर केवढी मोठी आहे? महाभारताचं पण तसच आहे, मूळ काव्य लहान नी नंतर त्यात वाढ होत गेली. त्या आरती धाग्यावर आहे ना अधिकचे शब्द, तसे काहीतरी.

दीड दिवसाच्या गणपतीला पार्थिव का म्हणतात नी त्यात प्राणप्रतिष्ठा का करावी लागते याबद्दलची गोष्ट वाचायला आवडेल.

मुलांची नावं पार्थिव कसे ठेऊ शकतात असं वाटायचं, पण ती अवस्था म्हणजे प्राणप्रतिष्ठा करण्या आधीची अवस्था असा अर्थ घेतला तर तितकसं खटकत नाही. जन्म मृत्युच्या फेऱ्यात येणारी एक स्थिती, सगुण संपूर्ण सजीव होण्यापूर्वी.

नंतर त्यात वाढ होत गेली. >>> छट्ट्... नर-नारायण डेटा कंप्रेशन आणि डिकंप्रेशन जाणत होते याचा पुरावा नंबर एक तुम्ही ट्रिव्हिअलाईझ करताय. शोनाहो.

Pages