आज माझी बाहुली मला ओळखेनाशी झालीय

Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 September, 2018 - 08:33

आज माझी बाहुली मला ओळखेनाशी झालीय

मी तोच,, तिच्यासंगे लपाछुपी खेळणारा

मी तोच,, तिच्यासाठी कधी हत्ती कधी माकड बनणारा

आज तिच्या अनोळखी नजरांमुळे, छाती भरून आलीय ॥

आठवतंय तुला का ? तो बांधलेला झुला

खिळा मारताना हात रक्ताळलेला

तू दुडूदुडू धावलीस लेप शोधण्यासाठी

तुझी ती तळमळ बघुनी , जखम जागीच लोपली ॥

तुला काय देऊ नि तुला कुठे ठेवू ?

दिनरात होतो,, मी मग्न विचारात

तू दृष्टी, तू सृष्टी या दिन नेत्रांची

काय अपराध घडला कि पडलो अंधारात ॥

मी बाप कि पाप ? , हा प्रश्न आता पडतो

तुझ्या आठवणीने आता कंठही सुकतो

नको बाळा नको वागू अशी तू माझ्याशी

तुझ्या वाणीस हे कान तळमळलेले,

बोल "बाबा" , ये जवळी उराशी

किती वाट पाहू , तो क्षण आतुरलेला

श्वास जड झाला आत्मा कोमेजलेला ॥

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults