मायबोली गणेशोत्सव २०१८ - बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:38

एकवीस दुर्वा माथी शेंदुरा
पेढ्या मोदकाची ताटं रे भरा

तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

CYMERA_20180912_144330.jpg

नैवेद्याची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.

Group content visibility: 
Use group defaults

जाई, नैवेद्याचे पान पाहुनच भुक लागली. मस्तच.

सोनू, फुल भारी दिसतय. पण समोर असले तर मन होणार नाही ईतकं छान फुल खायला. Happy

IMG_20180913_125948.jpg

हा आमच्या बाप्पाचा नैवेद्य छोट्याशा गोष्टी सह

41669216_1956315644407361_361461076082032640_o.jpg

गणपती पूजन आणि मोदक

गणपती आणि मोदक आपल्या मनातले घट्ट समीकरण. घरी गणपतीची स्थापना आणि पूजन करायचे म्हणजे मोदक हे केलेच पाहिजे. तर माहेर मराठवाड्यातील असल्याने मोदक म्हणजे तळणीचे मोदक हेच माहित. (आणि माझ्या बाबांना अजूनही तेच आवडतात.) पण मग आम्ही पुण्यात राहायला आलो आणि उकडीचे मोदक हा प्रकार कळला. तसेच लग्नानंतर अनेक नवनवीन गोष्टी करून पाहण्याची हौस असल्याने आणि नवरा पण सगळं कौतुकाने खाणाऱ्यांपैकी असल्याने उकडीचे मोदक करायला सुरुवात केली. पण वर्षातून केवळ एकदा केल्याने त्यावर फारसा हात असा बसलाच नाही.

सासर सोलापूरचे असल्याने तिकडे पण तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक केले जात नाहीत. परंतु आमच्याकडे कणकेच्या पारीत मोदकाचे सारण भरून त्यांना वाफवायची पद्धत आहे (दिंड करतो तसे). तसं पहिला गेलं तर करायला सोप्पे. त्यामुळे ह्यावेळेस तश्याच पद्धतीने केले. आणि त्यात लेकीने मोदक करायला मदत केली. म्हणजे जेवढे केले त्यातल्या निम्म्याच्यावर तर तिनेच केले. मी कणकेची पारी लाटून देत होते आणि ती त्यात सारण भरून मोदक तयार करत होती. त्यामुळे ह्यावेळेसच्या मोदकांचे विशेष कौतुक.

तसा ह्यावेळेचा गणेशोत्सव खासंच आहे. बरेच वर्षं स्वयंपाक, साफ-सफाई तसेच मला जमेल तशी सजावट असं नवऱ्याच्या मदतीने करत होते. अलीकडे २-४ वर्षे सजावट करताना मुलींचा सहभाग असायचा. पण ह्यावर्षी मुलींनी इतके काम केले - घर अतिशय स्वच्छ आवरले तसेच जी माफक सजावट केली त्यात मदत केली. आणि महत्वाचे म्हणजे मोठीने मोदक करायला मदत केली

आपल्या मुलांनी आपल्या बरोबरीने काम करून सहभागी होणे, ह्या मनाला अतिशय सुखावणाऱ्या गोष्टीची सुरुवात आजच्या गणेशपूजनाच्या दिवशी झाली. गणपती आहेच ना सुखकर्ता!

>>> णकेच्या पारीत मोदकाचे सारण भरून त्यांना वाफवायची पद्धत आहे (दिंड करतो तसे)
इन्टरेस्टिंग!
छान दिसतो आहे नैवेद्य आणि गोष्टही छान. Happy

मनस्विता, छान दिसताहेत मोदक. मला उकडीच्या मोदकापेक्षा हे जास्त आवडतात. आई हे तळूनही करते कधी कधी. पण कणकेचे मोदक जास्त पहायला नाही मिळत सहसा.

आमचा हा पहिला गणपती, सोलापूरला घरी बसवला असल्याने इथूनच नैवेद्य दाखवला. Wink
उकडीपेक्षा तळलेले खरपूस मोदकच आम्हाला अन आमच्या बाप्पाला प्रिय.
modaks_1.jpg
मी फक्त थोडी सारण बनवण्यात मदत केली. Wink

पहिल्यांदाच घरी केलेल्या सुरळीच्या वड्या

छान नैवेद्य सर्वच.

अश्विनी यांचा दिसत नाही फोटो मला. क्रोम वापरतेय मी सध्या.

छान आहेत सगळेच फोटो.

गौरी/महालक्ष्मी नसतात का कोणाकडे? त्याचे ताट बघायचे आहे.

मनस्विता आणि ९, नैवेद्य एकदम सुरेख !
घरची चिल्लर पार्टी खरी खुरी मदत करायला लागते तो काळ किती मस्त . आमच्याकडे क्वचित कधी झलक दिसत असते

अंजू , परत टाकतीय फोटो ,दिसतोय का,? >>> नाही मला क्रोम, आय इ, मोझीला कुठेही दिसत नाहीये. मोबाईलवर बघते दिसतो का.

मोबाईलवर पण नाही दिसत.

Pages