मायबोली गणेशोत्सव २०१८ - तुमच्या गावाचा गणपती

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:30

बुद्धीदाता भालचंद्रा। भक्तचकोरा पूर्णचंद्रा। अमित गुणसमुद्रा। स्मरणमात्रे पावसी॥

दुर्वांकूर मोहविती। रक्तवर्ण पुष्पी प्रिती। मोदक बहु तोषविती। भक्तवत्सला विनायका॥

भक्त पूजिती एकभावे। ते गोड मानिसी सदैवे। करूणाघना वर्षावे। सुखपूर्ण जलराशी॥

अनंत नामे हाकारीता। नाभी नाभी धीर देता। नाना संकटे निवारीता। भक्तांलागी धावतसे॥

ऐसा श्रीगणेश उदार। मुळींचा जो निर्विकार। भक्तांलागी साकार। वर्णवेना वाचे कदा॥

प्रसन्नवदन मंगलमूर्ति। पूजू भावे शुद्धमती। समाधान देई चित्ती। अखंडित सर्वदा॥
(-पुरंदरे शशांक)
IMG-20170824-WA0005.jpg

आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय. मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो. त्याला आपण आपल्या मनाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. तसेच त्याची स्मृती कायमची कोरली जावी म्हणून आपल्या कॅमेर्‍यातही छायाचित्राच्या रुपात जतन करतो. अशी प्रकाशचित्रे बघण्यासाठी सगळे मायबोलीकर उत्सुक आहेत.
तर मित्रहो, लवकर लवकर कामाला लागा आणि आपली अशी प्रकाशचित्रे ह्या धाग्यावर अपलोड करा.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे तुम्ही काढलेले आणि प्रताधिकार मुक्त असावे.
५. फोटो इथेच प्रतिसादात द्यायचे आहेत.
काय म्हणता? तुम्ही अजून काढलेच नाहीत? मग चला! लवकर लवकर फोटो काढा आणि सर्वांना दाखवा बरं!

Group content visibility: 
Use group defaults

IMG_20180915_190858.jpg

अंधेरी पश्चिम लल्लुभाई पार्क इथला गणपती