चेन्नई विरुद्ध मुंबई शिक्षण

Submitted by सर्वदा_ on 4 September, 2018 - 06:15

चेन्नई ला राहायला जायची शक्यता आहे.. सध्या मी ऐरोली मध्ये राहाते.. मुलगी युरो स्कुल मध्ये आहे.. चेन्नई कस आहे? मराठी प्रांत सोडून जायला नको वाटत आहे.
शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कस आहे??..
इथे युरो तर मला खूप छान वाटत ..
फॊरेन भाषा पण आहेत ..
चेन्नई विरुद्ध मुंबई शिक्षण .. तिचाच विचार आहे फक्त
बाकी आम्ही नवरा बायको ओके आहोत दोन्ही साठी..
पण मुळीच इथे छान चाललं असताना नको वाटत आहे जायला ..
Sad काय करू ?

लाईफ स्टाईल बेटर होईल इथे मुंबई मध्ये ट्रॅव्हल मधेच लाईफ जात आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्य असल्यास पुण्यातच सेटल व्हा. पुण्यासारखे शहर या ब्रह्मांडात दुसरे नाही.

पुण्याबाहेरच्या शहरांतले लोक अस्वच्छ आणि अज्ञानी असतात. त्यामुळे त्यांना इथल्या शिस्तीशी जुळवून घेणं जमत नाही. आठ आठ दिवस अंघोळ न करणारे, कपडे न धुणारे पुण्याबाहेरचे लोक पाहण्यात आहेत. मुंबईतल्या लोकांना तर आपले पीएम कोण, राष्ट्रपती कोण हे सुद्धा ठाऊक नसते. उठले की पळत सुटायचे. आवश्यक ते शरीरधर्म सुद्धा करायला वेळ नसतो या लोकांना. माणसाच्या जन्माला येऊन असे ... सारखे धावून पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे का ? हाच वेळ आरोग्यसाधना, ज्ञानसाधना, बलोपासना, छंदवर्ग यासाठी देता येतो. गुणवत्ता वाढीसाठी देता येतो. उगीचच अँथम बिंथम सारखे फालतू व्हिडीओ काढण्यात वेळ न घालवल्यानेच पुण्याचा क्रमांक पहिला आलेला आहे.

एका सर्टिफाईड अव्वल शहराचा नागरीक

लेखिकेने धागा काढून चार दिवस झालेत. त्यांचा एकही प्रतिसाद नाही. मुलगी कितवीत आहे या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे त्यायोगाने सुचवायला. धागा वाचतायत ना त्या? आपण उगाच इथे मुंबई पुणे कलकत्ता चेन्नई करत बसलोय. Lol

सॉरी वाचत आहेच.. मुलीच वय ६ वर्श
बरेचसे प्रतिसाद पटले.. तिला लहान वयात तिकडे घेउन जायचा विचार करुन तिचं फ्युचरच बदलतिये किंवा डिसाइड करत आहे असं वाटतय..
९-१०वी मधे असती तर येवढा विचार नसता केला.. तोपर्यन्त तिची जडण घडण बर्यपैकी झालेली असती

मुंबईच्या युरो स्कूलबद्दल माहिती नाही. युरोपिअन लोक चालवतात का ?>>> कोण चालवतात ते माहित नाही पण मुंबईत युरो स्कूल आहे,मेहता कॉलेजशेजारी... ऐरोली सेक्टर १९

मुंबई इतकी चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठल्याही शहरात नाही. ह्याच व्यवस्थेच्या जोरावर मुलंमुली सकाळी शाळाकॉलेज, दुपारी क्लास, संध्याकाळी पुन्हा हॉबी किंवा मित्रमैत्रिणींकडे तिन्हीवेळा घरी येऊन खाऊनपिऊन पुन्हा जाऊ शकतात. आणि तेही सुरक्षितरीत्या! मी लोकल ट्रेन, बसमध्ये बघतो, अगदी पहिलीदुसरीची मुले एकट्याने बिनधास्त प्रवास करीत असतात. पालकांना मुलांकरिता अडकून पडायला होत नाही. इतर शहरात अशी चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने कुठेही जायचं असल्यास एकतर स्वतःच्या वाहनाने जावे लागते किंवा एकाला सोडायला आणि आणायला दुसऱ्याला अडकून पडावे लागते. त्यामुळे आपल्या हालचालींवर पुष्कळ बंधने येतात. ज्याचा नक्कीच तोटा होतो.

तिचं फ्युचरच बदलतिये किंवा डिसाइड करत आहे असं वाटतय..

--- मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतल्यापासून आपण मुलांच फ्युचर डिसाईड करायला लागलेले असतो. इव्हन आपला स्वतःचा जन्म आणि आपल्याही जन्माच्या आधी आपल्या पुर्वजांचा जन्म झाल्यापासून आपल्या येणार्‍या पिढ्यांचे फ्युचर डिसाईड होत असते.

जन्मापासून केवळ मुंबईतच राहिलेल्या लोकांना मुंबईच्या बाहेर आफ्रीकन जंगल आणि त्यात अंदमानचे आदीवासी राहतात असे वाटत असते. किती तो फुकाचा सुपरिओरिटी कॉम्प्लेक्स असतो.. चाळीच्या कॉमन संडासाबाहेर रांग लावून विधी उरकण्याची स्वतःची मजबूरी असलेले दिव्यांगबुद्धी लोक मुंबैबाहेरच्या स्वतःचे स्वतंत्र बंगले असलेल्या लोकांना मात्र मागास समजत असतात असा अनुभव आहे..

हेला यु आर जस्ट टु मच.
प्रतिसाद जर्रासा विचार करुन टंकत चला. जमल्यास.
असे प्रतिसाद तुमचीच क्षुद्रबुद्धी दाखवुन देतात.

>>धाग्यावरचे तुमचे विचार भाजप /सेने सारखे वाटतात>> सगळ्यांच्या मनात एक सेना लपलेली असते असं म्हणावं का? Proud
मी जन्माने मुंबईकर आहे. दुसर्‍या कुठल्याही शहरात रहायचा अजिबात अनुभव नाही. भरत म्हणाले तसं टोकाचं वाटत नाही बाकी ठिकाणच्या लोकांबद्दल पण मुंबईबाहेरच्या लोकांना मुंबईच्या वेगाशी, प्रचंड बिझी लाईफशी जुळवून घेणं, लोकल ट्रेनमध्ये रोज चढायची मारामारी करत कामावर जाणं खरंच कठीण जात असावं. पर्सनली मला मुंबईचं लाईफ आवडतं. एक जिवंतपणा वाटतो त्यात.
सर्वदा, मुंबई आणि चेन्नै ह्यात निवड करायची झाल्यास मुंबईच बेस्ट. एस्क्पोजर, आजूबाजूला कॉस्मोपोलिटन वातावरण ह्याकरता. चेन्नैत ते मिळेलसं वाटत नाही.

कटू असलं तरी मुंबईकर म्हणून ज्याची तारीफ केली जाते ते कष्ट करणारे लोक परप्रांतीय आहेत हे सत्य आहे.

दक्षिणेचे लोक मुंबईत हॉटेल इंडस्ट्रीत आहेत. राब राब राबतात. मल्याळी लोकांनी टायर पंक्चर पासून ते मिळेल तिथे मिळेल ती कामे केलेली आहेत. ते सुट्या घेत नाहीत. कमी पगारावर काम करतात ही त्यांची ओळख. भाजीवाले युपीवाले आहेत. पहाटे साडेतीनला ठोक बाजारातून भाजी घेऊन पाच वाजता आपला स्टॉल झाडून पुसून लावणारी मंडळी आहेत ही. बिहारी मिळले तिथे मिळेल तसे राहतात. बांधकामावरच्या मजुरांपासून ते गायी म्हशींचे गोठे बांधून त्यांचं दूध काढून संपूर्ण मुंबईला पुरवणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यातून अनेक बिहा-यांनी पैसा कमवून उद्योगधंद्यात लावलेला आहे.
पंजाब्यांचा पैसा इंडस्ट्रीत आहे. ऑटोमोबाईलची दुकाने, स्पेअर पार्ट्सची दुकाने, पंजाबी मिठाया, दूध हे त्यांचे व्यवसाय आहेतच. शिवाय मुंबईत हजारो व्यवसायात पंजाबी आहेत. अनेक प्रकारच्या डिस्ट्रीन्युटर्शिप्स, एजन्सीज त्यांच्याकडे आहेत. फिल्म लाईन मधे पंजाबी आणि बंगाल्यांचे वर्चस्व आहे.
सर्वात महत्वाचे गुजराथी आणि राजस्थानी. मुंबईच्या आर्थिक नाड्या या लोकांच्या हातात आहेत असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. पंजाबी यांच्याकडून डिस्त्रीब्युटरशिप घेतात. मॉल्स मधे यांचा पैसा आहे. बिल्डींगा लाईनला फायनान्स आहे. त्यांचेच बिल्डर्स आहेत. फिल्म इंडस्ट्रीला पैसा आहे. मुंबईचा जो कर वसूल होतो त्याचा सर्वाधिका वाटा या दोन कम्युनिटीज उचलतात.
हे सगळे धावाधाव करून मुंबईची आजची इमेज बनवीत असतात.
मराठी मनुष्य यांच्या जिवावर बाता मारतो आणि लोकलला लटकून घर ते ऑफीस करणे याच्याशिवाय त्याचे काँट्रीब्यूशन काय आहे ?
मुंबईचा डबेवाला हा सुद्धा मूळचा कोल्हापूर, सांगली, सातारा भागातला आहे.
मंदबुद्धी कोण आहेत ते आपणच ठरवावे.

सायो यांनी जे लिहिलंय, तेच मला म्हणायचंय.
वरच्या कोंबडी खुराडेवाल्या प्रतिसादातली फोडणी माझ्या प्रतिसादात पडलीय.

माझे बर्‍याच शहरांमध्ये राहून झालेय. पण चैन्नेला मात्र मी फक्त १०-१२ वेळा गेलो असेन आणि सलग सात दिवसांच्यावर कधी राहिलो नाही.
पॅकेज जवळपास सारेखच असे गृहीत धरल्यास मला चैन्ने अथवा मुंबई या दोहोत निवड करायची असल्यास माझा प्रेफरन्स मुंबई असेल. पण इतर गोष्टींचापण विचार करावा लागेल. रोजचा प्रवासात जाणारा वेळ, तो प्रवास किती कम्फर्टेबल आहे, तसेच शहरात वास्तव्य नेमके कुठल्या भागात असेल, या बाबीही माझ्या दृष्टीने महत्वाच्या असतील निर्णय घेण्यास.

मुंबईत राहायचे असल्यास मुख्य मुंबईत म्हणजे ओरिजिनल कॉलोनियल बॉम्बे म्हणजेच दक्षिण मुंबई, कफ परेड, मुंबादेवी, वरळी, कुलाबा, फारतर वांद्रे पश्चिम हेच भाग बेस्ट आहेत. दादरपासून पुढे सगळा कचरा आहे व हे लोक उगाच स्वतःला मुंबईकर म्हणवून घेतात. आता स्वतःला मुंबईकर म्हणायची फॅशन फार कर्जत कसार्‍यापर्यंत पसरली आहे.

हेला, तुमच्या प्रतिसादांत सेन्सिबिलीटी नसून कडवटपणा ठासून भरलेला आहे. नाईलाजाने मुंबई सोडावी लागली असावी आणि त्याचा राग, जळफळाट मनात राहिला असावा असं वाटतं आहे.

अवांतर आहे इथे. पण मुलुंड ते ठाणे हा भाग मी खूप वर्षांनी पाहिला. ओळखू येत नाही. अनेक मॉल्स आलेत. माझ्या दिल्लीच्या एका मित्राचा मॉल आहे याच भागात. दिल्ली पाहिली नसेल तर नक्की पहा. पुणेकरांना आवडत नाही पहिल्या भेटीत. पण असं जिवंत शहर नाही. इथेही पंजाब्यांचं वर्चस्व आहे. पण दिल्लीच्या प्रत्येक भागात वेगवेगळी संस्कृती आहे. हवामानाची बोंब आहे.

हवामानाचीच नाही, बायकांच्या सेफ्टीचीही बोंब दिल्लीइतकी कुठेच नसेल. बाकी संस्कृतीतल्या वैविध्याचं वरदान भारतात सगळीकडेच आहे.

बायकांच्या सेफ्टीचीही बोंब दिल्लीइतकी कुठेच नसेल. >> दिल्लीच्या बाह्य भागात बोंब आहे. आयएसबीटी भागात तिमारपूरपासून खाली. सीमापुरी भागात गाझियाबादपासून (युपी सुरू होते ) तिथे. पुरानी दिल्ली, नवी दिल्ली इथे भारतातल्या इतर शहराप्रमाणेच आहे स्थिती. मुंबई सुद्धा समजतो तेव्हढी सेफ नाही. काही भागात तक्रारसुद्धा होत नाही. दिल्लीला उत्तर प्रदेश आणि बिहार जवळ असल्याने सर्वाधिक लोंढे त्या शहरात आहेत. उघड्यावर राहत असल्याने त्या त्या भागात सेफ्टीचे प्रॉब्लेम्स आहेत. बरीच वर्षे काढल्यानंतर लक्षात येते ते.
पण एकंदरीत दिल्लीची इमेज खराब आहे ते ही बरोबरच आहे. रात्री फिरणे शक्य नाही.

दिल्लीजवळ गुडगाव, मानेसर इथला भाग बराच डेव्हलप्ड झाला असला तरी सुरक्षेची बोंब आहे, इव्हन बाप्यांना सुद्धा. ७ - ८ वर्षांपूर्वी तिथे जाणे येणे राहणे बरेच झाले. लगेच हमरीतुमरीवर येतात लोक, दिल्लीत तेवढे नाही.
शस्त्र वगैरे काढणेही बरेच सामान्य आहे तिथे.

प्रॅक्टिकल सल्ला-

ऐरोलीत तुमचं स्वतःच घर आहे का आणि ते ऑफिस पासून लांब आहे त्यामुळं ट्रॅव्हल मध्ये वेळ जातोय?

ऑफिस जवळ घर घ्या, किमान अर्धा ट्रॅव्हल कमी होईल अशा ठिकाणी घर घ्या भाड्याने, स्वतःच घर भाड्याने द्या.

चेन्नई ला घर आणि शाळा रेलोकेट करण्यापेक्षा मुंबईतच करा.

<<पुण्यासारखे शहर या ब्रह्मांडात दुसरे नाही.>>
वा, वा! अगदी माझ्या मनातले बोललात!
बाकी आता पुनः पुण्याला जाण्याइतकी ता़कद उरली नाही. खोकून खोकून दोन दिवसात मरीन!
मी २००५ मधे हिंजवडीच्या एम बी ए च्या कॉलेजात (?) सहा महिने शिकवले. धन्य धन्य झालो!!
(अहो मुलामुलींना नापास करू नका, त्यांच्या बापाने नग्गद तीन लाख मोजले आहेत असे मला बाकीच्या प्रोफेसरांनी सांगितले! त्यामुळे माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी पास!!)

"एवढे सांगूनही तुम्ही चैनैला गेलात तर आम्ही जबाबदार नाही"

अशा डिस्क्लेमरची उणीव काही प्रतिसादांमध्ये जाणवली.

लाईफ मध्ये काहितरी वेगळे करायचे असल्यास नक्की प्रयत्न करा . मुल आपण जिकडे जाउ तिकडे रुळतात. त्याना पण वेगवेगळ्या भागात राहुन कुठेही अ‍ॅडजेस्ट करायची सवय होते. माझ्या दोन्ही मुलानी शालेय जिवनात भारतातील दोन स्ट्रिम आणि भारताभारिल दोन स्ट्रीम ( CBSC & state ) मध्ये शिक्षण घेतले आहे आणि मुल अ‍ॅडजेस्ट झाली आहेत . मुम्बई पुण्यात परत आला तर government aided state school सोडल्यास आणि एक ते दिड लाख वार्षिक खर्च करायची तयारी असल्यास बिना डोनेशनची अ‍ॅडमिशन मिळु शकते हे स्वानभुअवावरुन सांगतोय.

बाकी मुंबई ही मुंबई आहे, मुंबई सोडुन बरीच वर्ष झाली तरी आजुन मुंबईला परत जाउन राहावेसे वाटते. मागच्या वर्षी प्रयत्नपण केला पण सगळ्या गोष्टी नाही जुळुन आल्या.

Pages