चेन्नई विरुद्ध मुंबई शिक्षण

Submitted by सर्वदा_ on 4 September, 2018 - 06:15

चेन्नई ला राहायला जायची शक्यता आहे.. सध्या मी ऐरोली मध्ये राहाते.. मुलगी युरो स्कुल मध्ये आहे.. चेन्नई कस आहे? मराठी प्रांत सोडून जायला नको वाटत आहे.
शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कस आहे??..
इथे युरो तर मला खूप छान वाटत ..
फॊरेन भाषा पण आहेत ..
चेन्नई विरुद्ध मुंबई शिक्षण .. तिचाच विचार आहे फक्त
बाकी आम्ही नवरा बायको ओके आहोत दोन्ही साठी..
पण मुळीच इथे छान चाललं असताना नको वाटत आहे जायला ..
Sad काय करू ?

लाईफ स्टाईल बेटर होईल इथे मुंबई मध्ये ट्रॅव्हल मधेच लाईफ जात आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुले कुठेही पटकन रुळतात! त्यांचा प्रश्न थोड्याच कालावधीत तेच निकाली काढतात! आपण उगाचच काळजी करतो!
ह्याउप्पर लहान वयात वेगवेगळ्या अनुभवांन्ना समोरे गेल्यास मुले लवकरच धीट होतात कारण त्यांचा अनुभवाचा आवाका लवकर वाढ्तो. ते पटकन आत्मसात करतात. उलट मोठेपणी स्थानबदल मुले स्विकारत नाहीत असा माझ्या वर्तुळातील - माझा अनुभव!

दक्षिणेतील शिक्षण हेही चांगलेच आहे. विशेषतः संस्कार ह्याबाबतीत दक्षिणेतील मुले आदर ठेवणारी असतात असे माझे मत.
मी मुंबै दोन वेळा सोडली. मी स्वतःला नाही रुळवून घेउ शकलो! मला बंदिस्त असल्यासारखे वाटले! आपले वाक्य "इथे मुंबई मध्ये ट्रॅव्हल मधेच लाईफ जात आहे.." ह्याविषयी मी शतप्रतिशत सहमत. एक महिना लोकल ने फिरलो पण इतके पकलो कि लगेच माझी गाडी घेऊन गेलो. भलेही ट्राफिक जॅम मघे घंटो अडकलो. पण मी माझ्या गाडीत खिडक्या लावून शांतपणे गाणी ऐकत बसायचो! माझे मुंबैचे मित्र 'ये येडा हय...' म्हणून टवाळकी करायचे त्याकडे दुर्लक्ष केले!

उलट अहमदाबाद सारख्या ठिकाणी पटकन रुळलो! तिथले जगणे सहवासानंतर रुक्ष नाही वाटले! तर माझ्या मते बदल सहज स्विकरणे केंव्हाही चांगले! आणी 'आयुष्य एन्जॉय कराहो' असे सुचवेन....!!

Yaksh yancha chhan pratisad.. mee hi baryapaiki yach condition madhe aahe .. uttar wachayla aawadatil

मुलीचे वय?

उच्च शिक्षणासाठी चेन्नई मध्ये काही खाजगी विद्यापिठे खुप चांगली आहेत. पुण्या -मुंबईतुन खुप मुले डॉकटर - engineering साठी चेन्नई ला जातात. आमच्या ओळखीतले काही तिकडे आहेत त्याबद्दल काही माहिती पाहिजे असल्यास सांगणे.
१२वी पर्यन्त मला काही माहित नाही

चेन्नई मधे खूप सांस्कृतिक दरी जाणवते. आपण महाराष्ट्रीयन त्या मानाने फारच पुरोगामी आहोत. तिकडे मुले मुली जरा बॅकवर्ड वाटतात. तसेच अतिशय गरमी आहे...प्रचंडच. तमिल ग्रुपिझम चालतं ! माणसं फार ऑर्थोडॉक्स, देवभक्त, सनातनी! लुंगी नेसून, गंध कपाळभर लावून चालत निघणार.
आपल्या पालेभाज्या मिळत नाहीत. भाज्या म्हणजे जरड भेंडी, चक्री, भोपळा, वांगी. घरा- कपड्यांचे- साड्यांचे भडक लालपिवळे रंग , बटबटीत डिझाइन्स, उन्हाची लाही आणि न समजणारी कर्कश तमिळ भाषा. कुर्मा नामक फार नावजून खाल्ली जाणारी पांढरी मिक्स भाजी, इडली-डोसे, रस्सम. पकोडे म्हणजे लाल रंगाची मीठ नसणारी बेचव भजी.
पण अतिशय हुशार माणसं. इंग्लीश, गणित उत्तम असणारी. गुण ग्राहक, मदतीला तत्पर. हार्ड वर्कींग. डाउन टू अर्थ. नो अ‍ॅटिट्युड. शिस्तबद्ध ट्रॅफीक, उत्तम पब्लिक ट्रांसपोर्ट, रस्ते चांगले, मुंबईच्या मानाने स्वस्त घरे.......................
पहा........ तुम्हाला बेटर प्रॉस्पेक्ट्स असतील तर जा. कंपेअर करा की तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत.
मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने म्हणाल तर ठीक आहे..पण तो वेगळा मुलगा बनेल जसा की तो मुंबईत बनला असता त्यापेक्शा.....

मला मुंबईतील शिक्षण तसेच ओव्हर ऑल एक्स्पोजर जे मुलांना मिळते ते खूप ग्रेट वाटले. आता हैद्राबदला गेले तर दोन दिवसांच्यावर अरे कुठे खेड्यात आलो असे वाट्ते. ते तसे नाही असे वरून दिसते पण लोकांच्या वागण्यात फरक जाण वतो. मुंबईतल स्मार्ट नेस. एक्ष्पो जर अमेझिंग आहे.
बंगलोर हैद्राबाद त॑री बरे पण चेन्नै? मला नित्याचे राहायला नाही आवड त. अति शय गर्मी व ह ह्युमिडि टी, वेगळेच फूड बाकी इथे मुंबईत कसे आपल्या एसी कवचात इंटरनेटच्या पाशात मजेत राहतो तसे कुठेही राहायला जमेल जगात. जनसंपर्क आला की वांधे येतात.

South India Education is good but like Ama said the exposure is limited. Also Chennai is not that welcoming for outsiders. Mumbai is definitely better for education. I am staying in NCR for so many years. Here also education is good in school, better than Mumbai for CBSE. This is my opinion though.
Again if you are going at high class level where you can afford international curriculum schools it really does not matter where you stay in Chennai or Mumbai or Delhi.

आयबी स्कूलचे कितीतरी मुले पुढे काय करायचे समजत नाही म्हणून मग डिग्रीला आपल्यासारख्यच कॉलेज मध्ये प्रवेश घेतात. व स्ट्रगल करतात. आय बी म्हणजे अंडरग्रॅ जुएट स्ट् डीज ला अमेरि केत जावे हे बेस्ट. तसा प्लॅन असल्यास चिम्ता नाही. मद्रासेत खूप चांगल्या शाळा आहेत.
गुड शेपर्ड, आमचे महर्शी विद्या मंदीर पण आहे. पण इथे अभ्यास करून तुमच्या पाल्याला जर झेविअर रुइ या मध्ये अ‍ॅडमिशन मिळाली तर बात कुछ और ही है. पुढे पीजी पण शिक्षणा स सोय होते. अर्थात रिझल्ट अनुसार.

इथे दिल्ली इतकी क्रिमिनॅलिटी नाही. माझी मुलगी दहावीपरेन्त ऐरोली डीएव्हीत शिकली पण दहावीच्या सुट्टीतच तिचे असं ख्य फ्रेंड ग्रूप स्पेशल
इंटरेस्ट्स निर्माण झाले. व ती मुंबईभर एकटीने फिरू लागली पार खार बांद्राला एकटीने जाओन रात्री परत वगैरे इथे सुखरूप पणे करता येते.
दिल्लीत तशी शास्श्वती वाटत नाही.

हर प्रकारचे विद्यार्थि भेटतात. व इवेम्ट्स जितके इथे होतात तितके इतरत्र होत नाहीत. अभ्यास एके अभ्यास असेच असेल तर चलता है. पण एक व्यक्ती म्हणून मुलाची डेव्हलपमेंट इथे जास्त चांगली व्यापक होईल. प्रवास मात्र आहे. इथली मुले करतात चेचवड पणे. लोकल मेट्रो जमले की झाले.

अवांतर -
सहज मॅप पहिला, चेन्नई पेक्षा बेंगलोर जास्त दक्षिणेला आहे. मी उलट समजत होतो.

मला मुंबईतील शिक्षण तसेच ओव्हर ऑल एक्स्पोजर जे मुलांना मिळते ते खूप ग्रेट वाटले. आता हैद्राबदला गेले तर दोन दिवसांच्यावर अरे कुठे खेड्यात आलो असे वाट्ते. ते तसे नाही असे वरून दिसते पण लोकांच्या वागण्यात फरक जाण वतो. मुंबईतल स्मार्ट नेस. एक्ष्पो जर अमेझिंग आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>

चेन्नई मधे खूप सांस्कृतिक दरी जाणवते. आपण महाराष्ट्रीयन त्या मानाने फारच पुरोगामी आहोत. तिकडे मुले मुली जरा बॅकवर्ड वाटतात. तसेच अतिशय गरमी आहे...प्रचंडच. तमिल ग्रुपिझम चालतं ! माणसं फार ऑर्थोडॉक्स, देवभक्त, सनातनी! लुंगी नेसून, गंध कपाळभर लावून चालत निघणार.
>>>>>>>>>>>>>>>>
he paTal

मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने म्हणाल तर ठीक आहे..पण तो वेगळा मुलगा बनेल जसा की तो मुंबईत बनला असता त्यापेक्शा.....
हे तर conclusion वाटलं

एक्स्पोजर?

मुंबईत एक्स्पोजर मिळवणारे खुद्द मुळचे मुंबईकर कमी आणि बाहेरुन आलेल्यांची संख्या जास्त असते.

मुंबैबाहेरच्या शहरांतले लोक बेसिकली आळशी आणि मंद असतात. त्यामुळे त्यांना इथल्या वेगाशी जुळवून घेणं जमत नाही.

एक जन्माने मुंबैकर.

अवांतराबद्दल क्षमस्व.

मुंबैबाहेरच्या शहरांतले लोक बेसिकली आळशी आणि मंद असतात. त्यामुळे त्यांना इथल्या वेगाशी जुळवून घेणं जमत नाही.
Submitted by भरत. on 7 September, 2018 - 17:16
<<
अगदी सहमत !
मुंबई हि तिसर्‍या जगातील मंद लोकांसाठी नाहिचै मुळी. अश्या लोकांनी लवकरात लवकर मुंबईतून फुटावे व गर्दी कमी करावी

मुंबैबाहेरच्या शहरांतले लोक बेसिकली आळशी आणि मंद असतात. त्यामुळे त्यांना इथल्या वेगाशी जुळवून घेणं जमत नाही.

:: तरी रोज आदळणार्‍या लोंढ्यांबद्दल तक्रार करतात कसे?

मुंबईतील जमेच्या बाजू: शिक्षण चांगले मिळू शकते, इतर शहरांच्या तुलनेत सुरक्षित (सेफ) आहे, मुले स्ट्रीट-स्मार्ट होतात, जलद जीवनाची सवय होते. चेन्नईचे माहीत नाही, पण मुंबई मात्र बकाल आहे. योग्य संधी मिळताच बाहेर पडावे, हे उत्तम.

मुंबैबाहेरच्या शहरांतले लोक बेसिकली आळशी आणि मंद असतात. त्यामुळे त्यांना इथल्या वेगाशी जुळवून घेणं जमत नाही.
एक जन्माने मुंबैकर.
अवांतराबद्दल क्षमस्व.>>>>> ग्रो अप. कसला घंटा वेग. बाकीचे मस्त जगतात. Mumbaikars(esp Marathi) have this superiority complex .

मुंबैबाहेरच्या शहरांतले लोक बेसिकली आळशी आणि मंद असतात. त्यामुळे त्यांना इथल्या वेगाशी जुळवून घेणं जमत नाही.
एक जन्माने मुंबैकर.>>> +१००००० Happy

चेन्नई - बिग नो... चेन्नई/ कोलकता शहरे मला जरा आधुनिकतेचा/ जीवनराहणीबाबत बाबतीत समाधानी वाटली..आहेत त्याचात समाधानी राहणारे लोक... नावीन्य/ उत्सुकताचा अभाव

जर तुम्हाला स्वतःला मुंबईबाहेर जायचे असेल तर पुणे, बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, एन्सीआर, चंदीगढ या शहरात जा../ जर कंपनीचे
क्वॉवटरस असतील तर कुठेही जा...

गेल्या दोन वर्षात बहुतेक मेट्रो शहरांत प्रवास केला..त्या त्या शहराचे एअरपोर्ट त्या त्या शहराचे प्रातिनिधीत्व करतात...

अवांतराबद्दल क्षमस्व.>>>>> ग्रो अप. कसला घंटा वेग. बाकीचे मस्त जगतात. Mumbaikars(esp Marathi) have this superiority complex .>> +१११११

मुंबईकर जगत नसतो..फक्त धावत असतो आत तर धावणपण नसतं एवढी गर्दी झाली आहे.....एकदा बी टाऊन (भोपाल) मध्ये जाऊन या..तिकडची लोक मस्त जीवन जगत असत

-

बघितलंय . म्हणूनच सांगतोय.
माझा अनुभव (दुसर्‍या शहरात राहण्याचा आणि दुसर्‍या शहरांतून आलेल्या लोकांबद्दलचा) थोडा डेटेड आहे. तरीही अजूनही परिस्थितीत फार फरक पडलाय असं दिसलेलं नाही.
असो.

इथे मुंबई मध्ये ट्रॅव्हल मधेच लाईफ जात आहे.. >>>
असे लेखिका म्हणतेय.

तेच योग्य आहे, इतर ठिकाणी जाल तर उगाच वेळ मिळेल आणि आराम वगैरे करायची सवय लागेल, असे त्यांना पटवून द्यायचे आहे का?

मुंबईच्या युरो स्कूलबद्दल माहिती नाही. युरोपिअन लोक चालवतात का ?
तसे असेल तर ३ तासाच्या अंतरावर पाँडिचेरी येथे फ्रेंच मंडळींनी चालवलेले एक स्कूल आहे. इथेही फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात. तमिळ भाषेचा अडथळा जाणवणार नाही. एकलव्य आणि बिलबाँग अशी दोन आणखी इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. पाँडिचेरीचे वातावरण थोडे बरे आहे. परदेशी लोक आहेत. बाकी तुम्ही स्वतः चौकशी केलेली बरी.
चेन्नई मधेही असतीलच म्हणा..

>>>दक्षिणेतील शिक्षण हेही चांगलेच आहे. विशेषतः संस्कार ह्याबाबतीत दक्षिणेतील मुले आदर ठेवणारी असतात असे माझे मत.<<<
>>>>मदतीला तत्पर.<<<
हि अशी एकदम जनरालाईज्ड विधान आहे.

Pages