तुम्ही सेलिब्रेटींची ट्रोलिंग करता का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2018 - 18:31

सध्या सोशलसाईटवर ट्रोलिंग नावाचा प्रकार फार बघायला मिळतो. बहुतांश लोकं एंजॉय करतात. पण मला हा भस्मासूर, एक किड वाटते. येत्या काळात काय ते स्पष्ट होईलच.

सध्या सोशलसाईटवरच्या चकरा कमी होऊनही व्हॉटसप फेसबूक कृपेने दोन प्रकार कानावर आलेत.

पहिला, वा पहिली - अनुष्का शर्मा.
विराट कोहलीची जोडीदार असायची तिला बरीच किंमत चुकवावी लागली आहे असे वाटते. आणि ती देखील उगाचच. त्यामुळे जातीवंत ट्रोलर्सची ती अशीही आवडीची टारगेट आहेच. सध्या तिच्या सुईधागा चित्रपटातील तिच्या रडक्या वा उदास चित्रांना घेऊन बरेच विनोद बनत आहेत. अश्या फोटोंना मेमेस की मीमस (स्पेलिंग - memes) असे काहीतरी म्हणतात. त्यातले काही आपल्याला खरोखर हसवतातही. पण दुर्दैवाने जेव्हा असे ट्रोलिंग विनोद एखाद्या महिलेवर बनायला सुरुवात होतात तेव्हा ते हळूहळू वल्गर होत जातात.

दुसरे आहेत दुर्दैवाने आपलेच सचिन पिळगावकर.
खरे तर यांच्याईतका चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच. त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. पण या वयातही उत्साहाने नाचणे, नच बलियेसारखी स्पर्धा जिंकणे, नृत्यस्पर्धेचे जज बनताना नाचातील शास्त्रोक्त बारकावे टिपून सांगने, सारेच अफाट. पण ज्यांना खरेच आदराने महागुरू म्हटले गेले पाहिजे त्यांना चिडवल्यासारखे महागुरू म्हटले जाऊ लागले.

आता नुकतेच त्यांचे एक गाणे आले आहे.
Official : Amchi Mumbai -The Mumbai Anthem | Sachin Pilgaonkar |
https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ

प्रामाणिकपणे सांगायचे तर गाणे म्हणून मला ते नाही आवडले. अगदी आमच्या मुंबईचे गाणे असूनही नाही आवडले. पण यावरून ट्रोल करणे म्हणजे तुम्ही एखादे चुकीचे गाणे निवडून, वा फ्लॉप स्क्रिप्ट निवडून, वा बंडल पिक्चर करून फार मोठा गुन्हाच केला आहे अश्या पद्धतीने तुटून पडणे. हे सगळे कुठून येते? त्यातही जी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असेल, टॉपला असेल त्यांच्या चुकांनाच मोठ्या करून त्यांची टिंगल उडवण्यात लोकांना जास्त मजा येते. दुर्दैवाने हा एक हुमायुन नेचरचाच सडका भाग आहे. कमीअधिक प्रमाणात आपण कोणी याला अपवाद नाही आहोत. यात आपले काहीतरी आत सुखावते.

एखादी अनुष्का शर्मा आजच्या नटीतील विचारांनी बोल्ड अभिनेत्री असल्याने विराटच्या साथीने अश्या प्रकारांना इग्नोर करणे तिला जमतही असेल. पण आपल्या मराठमोळ्या सचिनना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच हे सोपे जात नसेल.

आज तुम्ही म्हणाल पण नाही हो, मला ते सचिन वा ती अनुष्का मुळातच आवडत नाही. पण उद्या हा प्रकार ईतका बोकाळणार आहे की यातून कोणी सुटणार नाही.

त्यामुळे माझ्यापुरते तरी मी अश्या प्रकारांना लाईक शेअर एंटरटेन करणे बंद केले आहे. पूर्वी जे केले असेल त्याबद्दल सध्या वाईट वाटत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कऊ धन्यवाद
ही अशी पोस्ट कशी शोधता येते चटकन ?

चटकन नाही
कालच वाचलं होतं हे
मग हिस्टरी मध्ये जाऊन बघितल तर सापडलं
आणि
ऋन्मेऽऽष सचिन पिळगावकर फक्त तीन words सर्च केले तरी खूप काही सापडलं
उदाहरण
IMG_20180905_091404.jpg

ओके ओके धन्यवाद
मला हे जुने पोस्ट शोधा फार जमत नाहीत. त्यात माझा मोबाईल जुने मॉडेल, २जी नेटवर्क. कधी लॅपटॉप असेल तरच शोधू शकतो. त्यापेक्षा लोकांना जे समजायचे ते समजू देणे सोयीस्कर पडते.
पण आपण ते केल्याबद्दल आभार Happy

कऊ=ऋन्म्या ???? Rofl
ऋन्म्या कुठं फेडशील ही एवढी पापं ?? Proud
कऊ म्हणजे कविता ! एक स्वतंत्र अभिव्यक्ती असलेली प्रतिलिपीवरील कथालेखिका. जिच्या कथांचे ४५०+ चाहते प्रतिलिपीवर आहेत.
हे कऊचं प्रतिलिपीवरील प्रोफाईल―
कऊ

ड्युआयडी सारखी वागणूक का आहे या आयडीची ? रच्याकने ऋन्मेषचे आडनेम पण नाईकच आहे ना ? अर्चना सरकार नाहीत का प्रतिलिपीवर ?

विपू पाहिली. ती एका ड्युआयडी वर रुसून मायबोली सोडून जाण्याची भाषा करताना दिसतेय आणि तिची समजून घालण्यासाठी ऋन्मेष ड्युआयडी टीम कामाला लगलेली आहे. संशोधक आघाडीवर आहेत त्यात. मनोरंजक विपू आहे. Lol

Mi_anu
हो पण एवढी नवीन नाहीये
कारण मला तिथे दोन वर्ष तरी झाली असतिल,
माबोवरील असणाऱ्या बर्याच सुविधा प्रतिलिपि वर नाहीत.
(त. टी. - हा प्रतिलिपी चा प्रचार नाही mi_anu यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे)

https://youtu.be/-kI0deu6vJU

बिचारी सोनाक्षी सिन्हा आता ट्रोल होतेय

पण येत्या पिढीत एवढे डिटेल रामायण खरेच किती जणांना माहीत असेल?? कि या अपेक्षा फक्त सेलिब्रेटींकडून..

कि या अपेक्षा फक्त सेलिब्रेटींकडून.. >> ह्या अपेक्षा फक्त सोनाक्षीकडून. लक्ष्मण तिचा काका. शनवारवाड्यात नारायणरावासोबत "काका, मला वाचवा" करत फिरली तरी ट्रोलिंग थांबायचं नाही... Wink

ट्रोलिंग करो, नाही करो त्यांना कुठे फरक पडणार आहे, म्हणून मी तरी आतापर्यंत कोणाच्या फेबूवरच्या अधिकारिक पानावर जाऊन ट्रोलिंग करण्याचं कष्ट केलं नाही.

सेलिब्रिटी म्हणजे चंदेरी दूनायेतील कलाकार असा मर्यादित अर्थ घेवुया.
काही कलाकार त्यांच्या कले मुळे लोकप्रिय होतात आणि त्यांची पडद्या वरची प्रतिमा बघून आपण त्यांच्या चरित्र ठरवतो .
पण जस्या भूमिका फसव्या असतात तसे त्यांचे चरित्र सुद्धा फसवे असते .
एका कलाकार ला प्रसिद्ध करण्या मागे खूप लोकांचा सहभाग असतो .
निर्देशक ,लेखक,कॅमेरा मन .
आणि अजुन बाकी लोक .
पण ही सर्व मंडळी नजरेत येत नाहीत .
खूप वाहवा झाली की कलाकार स्वतःला महान समजू लागतात आणि इतर सर्व लोकांची मेहनत विसरता .
स्वताला सर्व ज्ञानी समजतात आणि फसतात .सपशेल अपयशी होतात .
मग त्यांचे चाहते त्यांची खिल्ली उडवतात ते योग्यच आहे .
विनोदी कलाकार किती ही प्रसिद्ध असेल तर लेखक ची जागा कधीच घेवू शकत नाही .
अभिनेता,अभिनेत्री किती ही प्रसिद्ध असेल तरी निर्देश का ची जागा कधीच घेवू शकत नाही

ट्रोलचा राहू द्या..गमंत अशी आहे की,मॅडम रामायण नावाच्या बंगल्यात राहतात...बापाच नाव शत्रूघ्न, भावांची नावे लव कुश...

गमंत अशी आहे की,मॅडम रामायण नावाच्या बंगल्यात राहतात...बापाच नाव शत्रूघ्न, भावांची नावे लव कुश..>> आणि सख्ख्या काकांची नावे राम, लक्ष्मण आणि भरत.

ह्यांच्या घरातच वेगळ रामायण चालू आहे तर..

चुक बिचारीची नाहीये...बिचारीला अजून पण हेच वाटत असणार..
लव आणि कुश रामाची नाही तर शत्रूघ्नची मुले आहेत..

कुणीतरी फेबूवर कमेंट केलेली..ती इथे देतोय..

"और इस तरह लक्ष्मणने शूर्पनखा के साथ साथ सोनाक्षीका भी नाक काट दिया. "

बघितला मी तो भाग .
रामायण माहीत नाही म्हणजे मी आधुनिक विचाराची अशी सोनाक्षी ला दाखवायचे असेल .
हा अंदाज सुद्धा चुकीचा असू शकत नाही .

एक प्रश्न पडलाय
चार भाऊ आणि नावे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे आधीच प्लान कसे केले?

गमंत अशी आहे की,मॅडम रामायण नावाच्या बंगल्यात राहतात...बापाच नाव शत्रूघ्न, भावांची नावे लव कुश..>> आणि सख्ख्या काकांची नावे राम, लक्ष्मण आणि भरत. >>

याचा काय संबंध येतो? एखादी गोष्ट सर्वांना माहिती असावी अशी अपेक्षा असेल तर ती घराचं, काकांच वगैरे नावं काही का असोत तरी असावी आणि अशी अपेक्षा नसेल तरीही ती नावं काही का असोत तरी नसावी.

रामायण माहीत नाही म्हणजे मी आधुनिक विचाराची अशी सोनाक्षी ला दाखवायचे असेल .
हा अंदाज सुद्धा चुकीचा असू शकत नाही .
>>>

यापेक्षा ट्रोल ओढवून घ्या आणि प्रसिद्धी मिळवा हे असूशकेल.
अन्यथा या आधी कित्येकांना तिची फॅमिली हिस्टरी बंगल्याच्या नावासह माहीत असेल? नेमका हाच प्रश्न आणि तिचे उत्तर न देणे... लगे हाथ केबीसीला सुद्धा टीआरपी

बरोबर .
दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए .
हे वाक्य सत्य आहे हे दाखवायचं प्रयत्न .
पण जनता त्यांची बाप आहे .
ये पब्लिक हैं सब जाणती है

कोणतेच रिऍलिटी शो
हे रिअल नसतात.
त्यांची स्क्रिप्ट असते .
सर्व काही स्क्रिप्ट प्रमाणे होत असतं हे बहुतेक सर्व लोकांना माहीत आहे .
तरी भोळ्या बापड्या लोकांची संख्या माहिती गार लोकांपेक्षा जास्त असल्या मुळे ह्या
धूर्त लोकांनाच हेतू साध्य होतो

मला सचिनचा राग येत नाही .. लहानपणी त्याचे अनेक चित्रपट पाहिले आहेत , त्यावेळी आजच्या इतके चांगले मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध नव्हते , तेव्हा अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे , सचिन , महेश कोठारे यांच्या चित्रपटांनी जे मनोरंजन केलं त्याचं एक लहानसं ऋणच आहे , जे कधी फेडता येणार नाही असं मला वाटतं ...

बाकी या गाण्यामुळे लोकांना अचानक सचिनचा राग येऊ लागला किंवा तो आवडेनासा झाला असं अजिबात नाहीये .. एका पेक्षा एक कार्यक्रमाच्या आधी सचिनच्या स्वभावाची ( मी - मी - मी - माझं - मला ) त्याच्या चाहत्यांना - प्रेक्षकांना कल्पनाही नव्हती ... अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एवढाच आदर मराठी प्रेक्षक सचिनला देत होते .. या कार्यक्रमात सर्वप्रथम आणि नंतर इतर कार्यक्रमांत हजेरी लावताना , इंटरव्ह्यूज मधून अशा अनेक ठिकाणी सचिनचा स्वभाव दिसून आला आणि बहुतांश प्रेक्षकांचा आदर तो गमावून बसला ... मी मी करणारी लोकं कोणालाच आवडत नाहीत ... कौतुक हे लोकांनी करावं - आपणच आपलं कौतुक करून घेतलेलं लोकांना पसंत पडत नाही .. ही नापसंती व्यक्त करण्यासाठी मग ट्रोलिंग ..

तरुण दिसण्याचा अट्टाहास , सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची केविलवाणी धडपड it's all really sad .. सचिनबरोबरच्या सहकलाकारांनी ( अशोक सराफ , कोठारे वगैरे ) आपला फोकस मध्ये असण्याचा काळ संपला हे सहज स्वीकारलं आहे , अशोक सराफांच्या इंटरव्ह्यूच्या व्हिडीओ वर जाऊन पाहिलं तर अतिशय प्रेम आणि आदर व्यक्त करणाऱ्या कमेंट दिसतील , एकही वाईट कमेंट नाही ..... सचिनने आज त्यांच्या वाट्याला जे काही येत आहे ते स्वतःच्या वागण्याने ओढवून घेतलं आहे ..

अशोक सराफांच्या इंटरव्ह्यूच्या व्हिडीओ वर जाऊन पाहिलं तर अतिशय प्रेम आणि आदर व्यक्त करणाऱ्या कमेंट दिसतील >> खरतर. , अशोक सराफांचे किन्वा अगदी कोठारेन्चे इंटरव्ह्यू पाहिलेत तर ते ही फार आदर , प्रेम , कृतज्ञता व्यक्त करणारे वाटतात . तिथे कुठेही बडेजाव किन्वा मोठेपणा नाही.

Pages