आदर्श पती स्पर्धा

Submitted by अतरंगी on 26 August, 2018 - 13:06

नमस्कार मंडळी,

तर या वर्षी आपण श्रावणमासात आदर्श पती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत लग्नात किंवा लिव्ह ईन रिलेशनशिप मधे असलेल्या सर्वांना भाग घेता येईल. प्रश्न तयार करताना व्हॉट्सअप्प/ फेसबूक वर ढकलल्या जाणार्‍या सर्व पाणचट विनोदांचा आधार घेण्यात आला आहे.
स्पर्धा अतिशय सोप्पी आहे. तुम्ही फक्त खालील सर्व मुद्द्यांसमोर लिहिलेल्या मार्कांप्रमाणे स्वतःच्या पतीला अथवा स्वतःला गुण द्यायचे आहेत. ज्यांच्या गुणाची बेरीज जास्त होइल त्यांना विजेते घोषित करण्यात येईल.

सेमी ईंग्रजी वाल्यांसाठी टीपः- ऊणे म्हणजे मायनस आणि अधिक म्हणजे प्लस....

१. तुमच्या लग्नाला/ लिव्ह ईन रिलेशनला किती वर्षे झाली आहेत?
१ वर्षे किंवा कमी:- ऊणे १५, १ ते ३ वर्षे :- ऊणे ५, ५ ते १० वर्षे:- अधिक ५, १० ते १५ वर्षे:- अधिक १५, १५ ते २५ वर्षे:- अधिक २५, २५ ते
३५:- अधिक ३५, ३५ ते पुढे:- अधिक ५०.

२. तुमचे मागील ५ वर्षातील वास्तव्य कुठे आहे? भारताबाहेरः- ऊणे २०, भारतातील एका शहरातः- ऊणे ५, भारतातील एका गावातः- अधिक १०, भारतातील एका खेड्यातः- अधिक २५

३. तुम्ही शॉपिंगला जायचं म्हणता तेव्हा तुम्हाला नवरा तुमच्या कपाटात असलेल्या असंख्य कपड्यांवरुन टोमणा मारतो का? हो:- ऊणे २, नाही:- अधिक ५

४. नवरा तुमच्यासोबत शॉपिंगला येतो का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २

५. शॉपिंगला आल्यावर तो शॉपिंगमधे रस दाखवण्याऐवजी एखादा कोपरा पकडून मोबाईल मधे डोकं घालून बसतो की शॉपिंगला आलेल्या दुसर्‍या बायकांकडे बघत बसतो? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक २

६. शॉपिंग करताना तुमच्याकडे एखाद्या विशिष्ठ रंगाचा ड्रेस/साडी आहे हे त्याला माहीत असते का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

७. नवरा स्वतःच्या कपड्यांसोबत तुमचे कपडे पण मशीनला लावतो का/ धूतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

८. धूतल्यावर ते वाळत घालतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

९. वाळल्यावर तो ते काढून घडी करुन तुमच्या कपाटात ठेवतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१०. हे सर्व तो त्याच्या आई वडीलांसमोर, मित्रांसमोर करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

११. नवरा "तसला" काही उद्देश नसताना कंबर, डोकं, हात, पाय दाबून देतो का? हो:- अधिक १ , नाही:- ऊणे १०

१२. तू किती दमतेस असे मनापासून म्हणताना "निस्वार्थपणे" जवळ घेतो का? हो:- अधिक १ , नाही:- ऊणे
१०

१३. तुम्ही कधी माहेरी किंवा ट्रिपला गेल्यास त्याला मनातल्या मनात आनंद होतो का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५

१४. तुम्ही कधी माहेरी किंवा मैत्रिणींसोबत ट्रिपला गेल्यास तो कामशिवाय फोन करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१५. फोन केल्यास तुमच्या भीतीने औपचारीकता म्हणून न करता खरेच आठवण येत असते म्हणून करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१६. शुद्धीत असताना सुद्धा तुम्हाला मिस यू, लव्ह यू असे मेसेज करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१७. घरुन ऑफिसला आणि ऑफिसवरुन घरी असे वर्षातील कमीत कमी ९९% दिवस करतो का?हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१८. ऑफिस सुटल्यावर सरळ घरी येतो की चौकात, टपरीवर मित्रांकडे असे स्टॉप्स घेत घेत येतो ? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

१९. आलोच ५ मिनिटात असे म्हणून खरेच ५ मिनिटात येतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२०. कुठे आहात असे विचारल्यावर कुठे आहे ते खरे खरे सांगतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२१. न सांगता स्वयंपाकात मदत करतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२२. एखाद्या वेळेस तुम्ही घराबाहेर असाल तर स्वतः होउन स्वयंपाकाची तयरी किंवा पुर्ण स्वयंपाक करतो का किंवा निदान जेवण बाहेरुन तरी मागवतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२३. स्वयंपाक केला तर बेसिन मधे भांड्यांचा ढिगारा करुन ठेवतो कि खरकटे काढून विसळून ठेवतो? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२४. त्याला पुसायची फडकी आणि स्वयंपाकाची फडकी यातील फरक कळतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५

२५. तुमच्या स्वच्छतेच्या व्याख्येप्रमाणे त्याला किचन स्वच्छ ठेवता येते का? हो:- अधिक १०, नाही:- ऊणे ५

२६. तुमच्या स्वयंपाकाला नावं ठेवण्याचा उद्धटपणा तो करतो का? हो:- ऊणे ५, नाही:- अधिक ५

२७. स्वतःच्या आईच्या हातच्या चवीचे कौतुक न सांगता तो वर्षातून ५०% वेळा तरी जेवतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

२८. त्याच्या मोबाईलचे आणि सर्व अ‍ॅप्सचे पासवर्ड तुम्हाला दाखवले आहेत का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५

२९. ते पासवर्ड्स बदलल्यास तो स्वतःहुन सांगतो का? हो:- अधिक १० , नाही:- ऊणे १

३०. घरातले वातवरण टेन्स झालेले असताना किंवा तुमचे भांडण झालेले असताना एखादा पाणचट का होईना जोक करुन वातावरण हलके करायचा प्रयत्न करतो का? हो:- अधिक १० , नाही:- ऊणे ५

३१. तुम्हाला हसतमुख ठेवायचा प्रयत्न करतो का?हो:- अधिक १० , नाही:- ऊणे १०

३२. त्यात यशस्वी होतो का? हो:- अधिक १० , नाही:- ०

स्पर्धेचे नियम.

१. स्त्रीयांनी स्वतःच्याच नवर्‍याचे मुल्यांकन करणे अपेक्षित आहे.
२. गुण लिहिताना लग्नाला किती वर्षे झाली हे लिहावे.
३. प्रश्ननाचे टंकलेखन करायला कामवार ठेवलेला माणूस सेमी ईंग्रजी वाला आसल्याने शुद्धलेखनातल्या चूका काढू नये.
४. सर्व स्पर्धकांनी ईथे प्रामणिकपणे आपल्या पतीचे किंवा स्वतःचे एकुण गुण लिहिणे अपेक्षित आहे. कोणाचे गुण खोटे आहेत असे आढळल्यास माबो वर जाहीर अपमान करण्यात येईल.
५. वरील प्रश्न सोडून तुम्हाला काही प्रश्न या स्पर्धेत असवे असे वाटत असेल तर ते प्रतिसादात लिहावे. पुढील वर्षीच्या स्पर्धेत ते विचारात घेतले जातील
६. पुढच्या श्रावणी सोमवारी आदर्श पत्नी स्पर्धेची घोषणा करण्यात येईल.
७. दोन्ही स्पर्धांचे विजेते श्रावण संपल्यावर घोषित करण्यात येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

All married men will attest to some real wisdom in this message
...
...In the world of romance, one single rule applies:
MAKE YOUR WOMAN HAPPY!

Do something she likes, and you get points.
Do something she dislikes, and points are subtracted.
You don't get any points for doing something she expects.
Sorry, that's the way the game is played.

Here is a non-exhaustive guide to the point system:

SIMPLE DUTIES
You make the bed. (+1)
You make the bed, but forget the decorative pillows. (-10)
You throw the bedspread over rumpled sheets. (-3)
You go out to buy her what she wants (+5) in the rain (+8)
But return with Old Monk. (-5)

PROTECTIVE DUTIES
You check out a suspicious noise at night. (+1)
You check out a suspicious noise, and it is nothing. (0)
You check out a suspicious noise, and it is something. (+5)
You pummel it with an iron rod. (+10)
It's her pet poodle . (-20)

SOCIAL ENGAGEMENTS
You stay by her side for the entire party. (+1)
You stay by her side for a while, then leave to chat with an old school friend. (-2)
Named Tina (-10)
Tina is a dancer. (-10)
Tina is single. (-40)

HER BIRTHDAY
You take her out to dinner. (+2)
You take her out to dinner, and it's not a sports bar. (+3)
Okay, it's a sports bar. (-2)
And its all-you-can-eat night. (-3)
It's a sports bar, it's all-you-can-eat night, and your face is painted the colors of your favorite team. (-10)

A NIGHT OUT
You take her to a movie. (+1)
You take her to a movie she likes. (+5)
You take her to a movie you hate. (+6)
You take her to a movie you like. (-2)
It's called 'Death Cop.' (-3)
You lied and said it was a foreign film about orphans. (-15)

YOUR PHYSIQUE
You develop a noticeable potbelly. (-15)
You develop a noticeable potbelly and exercise to get rid of it. (+10)
You develop a noticeable potbelly and resort to baggy jeans and baggy Hawaiian shirts. (-30)
You say, "It doesn't matter, you have one too." (-80)

THE BIG QUESTION
She asks, "Do I look fat?" (-5)
(Yes, you lose points no matter what)
You hesitate in responding. (-10)
You reply, "Where?" (-35)
You give any other response. (-20)

COMMUNICATION
When she wants to talk about a problem, you listen, displaying what looks like a concerned expression. (+2)
You listen, for over 30 minutes (+50)
You listen for more than 30 minutes without looking at the TV. (+500)
She realizes this is because you have fallen asleep. (-4000)

Send this on to all of the gentlemen you know to refresh them on the point system.
(and to the ladies you know with a good sense of humor!) !!!

मस्त.
कधी कधी हा अॉप्शन पण पाहिजे होता.
लग्नाची वर्षे - ११
नव-याचा स्कोअर - +९० (टोटल ९, त्याचा लकी नंबर Proud )

बाकी लोकांचे ९०+ गुण बघुन मलाच न्युनगंड यायला लागला आहे.

मला वाटायचं कि मी घरात कित्ती कामं करतो पण माझा स्वतःचा स्कोअर फक्त +५ आला Proud

मी शतक सहज पार केले आहे. (आत्मपरीक्षण). तरी तंत्र कुशल नसल्याने धुलाईयंत्राचा एकही गुण धरला नाही सगळे वजा झाले.
मंडळींनी गुणांकन केल्यास ५०-६० मार्क कमी होण्याची शक्यता आहे. पर्यायांमधे कधी-कधी, बहुतेक वेळा असे असते तर येवढी तफावत व व्यक्ति सापेक्षता आली नसती हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. :).

काही प्रश्न अनिवार्य व उत्तीर्ण होण्यासाठी १०० पैकी १०० आवश्यक असे असतात त्याचा उल्लेख नाही प्रश्नावलीत. Happy

Self Assessment - 0

च्यायला, एवढी बेरीज - वजाबाकी करुनही शेवटी हाती भोपळाच लागला Lol

एक मुद्दा राहिला -
तुमच्याबद्दल बायकोचे 'यांना काहीही कळत नाही' असे प्रामाणिक मत आहे का? होय : -१०० - नाही: +१००

जयाप्रदा आण्टी परफेक्ट पती नावाच्या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करताहेत . ती मालिका पाहून पुन्हा गुणांकन करावे का ?

१५६ Happy (कोणताही पती किंवा माणूस पर्फेक्ट नसतो.. तुम्ही १०० गोष्टी बरोबर केल्या तर १०१ वी गोष्ट चुकीची करताच .. )

परफेक्ट आदर्श पतीला बहुतेक घरी
"कम बेबी, कम फास्ट, फिनिश टूडेज टास्क .. अ‍ॅण्ड नो फेण्ड्स कॉल्स, नो स्मोकिंग ओके ? "
" डार्लिंग ! डोण्ट डू धिस अगेन.."
"चिनू हे काय बेबी ? कपडे नीट नाहीस का वाळवलेस ? आज तुला चॉकोलेट नाही"
असं ऐकावे तर नसेल ना लागत ?

आदर्श पती असतो का कधी? ते एक काल्पनिक पात्र आहे, पती हा जास्तीत जास्त आज्ञाधारक असतो, बाकीच्यांच्या नजरेत तो बायकोचा हमाल नाहीतर बायकोच्या ताटाखालचं मांजर असतो.

माझा ऊणे 56
भोकाड पसरणारी बाहुली

उगी उगी seema२७६ जी. तुम्ही त्याच्यासाठी आदर्श पत्नी असाल.
पुढील सोमवारी आदर्श पत्नी स्पर्धा येते आहे. तो स्कोअर पण सांगा. Happy

खिताब म्हणायचंय का?>>> Lol क च्या शेजारी ख त्यात काय एवढं पुरस्कार नाही देता आला तरी पुस्तक देता येईलंच की Lol

Pages