अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!!

Submitted by कल्पतरू on 24 August, 2018 - 07:23

नमस्कार मंडळी, हा नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे आपले नवीन मायबोलीकर बोकलत, तर या गोष्टीला काही दिवसांपूर्वी सुरवात झाली, अमानवीय या धाग्यावर अनेक मायबोलीकर त्यांना आलेले गूढ अनुभव शेअर करत असतात. त्या सगळ्या अनुभवांना एक गंभीरतेची किनार असते पण आपले बोकलत त्या सगळ्या गंभीरतेवर पाणी ओतून तो धागा विनोदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मायबोलीकरांनी त्यांना हात जोडून नवीन धागा काढण्याची विनंती केली पण परिणाम शून्य, म्हणून त्यांच्या वतीने हा धागा मी काढत आहे आणि त्यांना कळकळीची विनंती करत आहे कि इथून पुढे त्यांनी त्यांचे अनुभव या धाग्यावर शेअर करावेत. नमुन्यादाखल त्यांनी शेअर केलेला अनुभव इथे पोस्ट करत आहे.
मुंजाचाच विषय निघालाय तर आता मी तुम्हाला एक खरीखुरी माझ्याबाबत घडलेली घटना सांगतो. ३-४ दिवसाची सुट्टी काढून मामाने मला त्याच्या गावी कोकणात बोलावलं होतं. साधारण दुपारी एक वाजता तिकडे पोहचलो समोर पाहतोय तर सगळे गावकरी माझीच वाट पाहत उभे होते. मला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभा होता, कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी हात जोडून उभं होतं. मामाच्या घरी गेल्यावर मामाला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तो गंभीर झाला आणि म्हणाला तुला मी मुद्दाम इथे बोलावलंय. गाव संकटात आहे, गावाच्या बाहेर एक चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर एक मुंजा राहतो त्या मुंजाने गावातल्या माणसांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. दर अमावसेला २० कोंबड्या आणि पौर्णिमेला १० बोकड अर्पण करावी लागतात. नाही केल्या तर त्या चिंचेच्या झाडावरून येणारी केबलची वायर तो तोडून टाकतो. त्यामुळे बायकांचे डेली सोप्स आणि बाप्यांचे क्रिकेटचे सामने बंद होतात. अजून जीओचा टॉवर पण आपल्याकडे नाय आला त्यामुळे या अनर्थातून गावाला वाचव आणि गावात सुख समाधान शांती नांदु दे. गाव खरोखरच एका मोठ्या संकटात सापडलं होतं.दैनंदिन गरजेचं साधन नसल्याने बायकांची भांडणं आणि बाप्यांच्या पारावरील गप्पाना ऊत आला होता. एक मात्र चांगली गोष्ट अशी की लोकं एकटे दुकटे बाहेर पडायला घाबरत असल्याने गाव हागणदारीमुक्त झाला होता. तरीसुद्धा गावाला या संकटातून काढणं माझं कर्तव्य होतं. मामा मला म्हणाला उद्या अमावास्या आहे, जर तू मुंज्याला कुस्तीचा आव्हान देऊन हरवलंस तर तो कायमचा निघून जाईल. मी थोडा वेळ विचार केला, आणि मामाला बोललो निश्चिन्त रहा. मी हरवेन उद्या त्या मुंजाला. आता मी कुस्तीच्या तयारीला लागलो, जेमतेम २४ तास माझ्याकडे होते.या २४ तासात सल्लूचा सुलतान आणि आमिरचा दंगल वारंवार पाहून कुस्तीतले सगळे डावपेच व्यवस्थित शिकून घेतले. दुसऱ्या दिवसाची रात्र कधी अली समजलीच नाही. रात्री ठीक बारा वाजता त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन मुंजाला कुस्ती खेळायचं आव्हान दिलं. आव्हान दिल्याबरोबर झाडावर सळसळ झली आणि २० ते २५ फुटाचा एक माणूस भेसूर हसत माझ्यासमोर उभा राहिला. आकाशात एक लख्ख वीज चमकली आणि आमच्या कुस्तीला प्रारंभ झाला. सगळे गावकरी माझ्या नावाचा जल्लोष करत होते त्यामुळे माझ्या अंगात चेव आला होता. पहिला डाव आम्ही एकमेकांची ताकद मोजण्यात खर्ची घालवला. नंतर खऱ्या कुस्तीला सुरवात झाली. कधी तो वरचढ ठरायचा तर कधी मी. साधारण १ तास असाच गेला दोघेही थकलो होतो. शेवटी मुंजाने मला पकडायला हाताची कैची मारली ती मी लीलया चुकवली आणि ज्या क्षणाची वाट मी पाहत होतो तो आला. कैची चुकल्यामुळे मुंजा थोडा वळला आणि त्याची कंबर माझ्यासमोर अली. मी क्षणाचाही विलंब न करता सुलतान मधली सल्लूची फिनिशिंग मूव्ह मारली, या डावातून मुंजा सावरू नाही शकला आणि उताणा पडून राहिला. गावकर्यांनी एकच जल्लोष करत मला खांदयावर उचलला आणि शोले मधल्या जय वीरू सारखी माझी वरात काढली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी जंगी पार्टी ठेवली होती. सगळी गावकरी मला आशीर्वाद देत होती.मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. एका गावाला संकटातून वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मागच्या आठवड्यात कोल्हापूरला जायचा योग आला. माझी चार चाकी काढली आणि आई नको जाऊस बोलायच्या आत मी भर रात्री कोल्हापूरचा रस्ता पकडला. मी शक्यतो प्रवास रात्रीचाच करतो, ट्राफिक जास्त नसल्याने गाडी हवी तशी सुसाट मारत, हवेवर उडवत मी अंतर झपाट्याने कापतो. नुकतीच सकाळ होत आली होती, कुठे चहा मिळतोय का ते पहायला मी गाडीचा वेग हळू केला पण पदरी निराशाच. अचानक जोरात पावसाला सुरवात झाली. ध्यानी मनी नसताना सुरु झालेल्या पावसाने जरा निराशा केली. थोडं पुढे गेल्यावर एक गाव लागलं आता नीट आठवत नाही पण तुंबाड कि तुंबड असं काहीतरी गावाचं नाव होतं. आत गावात चहा मिळेल या आशेनं मी गाडी एका बाजूला लावून मुद्दाम भिजत भिजत गावात प्रवेश केला. भिजल्यावर चहा प्यायची मजाच काही और असते. थोडं चालून गेल्यावर मला एक भला मोठा वाडा दिसला. या वाड्यात जाऊन मुद्दाम मी अमक्या तमक्याचा मित्र आहे असं सांगून एक कप फुकटात चहा घशात ओतण्याचा माझा प्लॅन होता. कोणीतरी बोलून गेलयच फुकट ते पौष्टिक. तर आतमध्ये गेलो तर स्मशान शांतता. अगदीच पडका वाडा होता, वर्षानुवर्षे कोणीच फिरकलं नसणार त्या वाड्यावर. माझी जरा निराशा झाली, मी बाहेर पडायला निघणार इतक्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागली एक म्हातारा दबक्या पावलांनी वाड्यात येत होता म्हातारा नक्की कुठे जातोय हे पाहायला मी बाहेर पडणार इतक्यात एक तरणा ताठा माणूस त्याच्या पाठीवर लपत लपत आला, मी झटकन मागे वळलो. आता अजून कोण भलताच तिसरा माणूस पण यायचा म्हणून तिथेच बसून राहिलो. थोड्या वेळाने तो तरणा माणूस अंगणातल्या तळघरात जाताना दिसला, म्हातारा खिडकीतून सगळं पाहत होता. मला पण त्या तळघरात जाऊन नक्की काय आहे ते पाहायचं होतं. पण म्हातारा जो काय टक लावून पाहत होता तो हलायचा अजिबात नाव घेत न्हवता, मी त्या म्हाताऱ्याला दगड मारणार इतक्यात तरणा माणूस त्या बोळातून बाहेर आला तो चक्क सोन्याची नाणी घेऊनच. क्रिकेटर बॉल उडवतात तशी दोन चार वेळा उडवली आणि बाजूलाच एका ठिकाणी लपून बसला. म्हाताऱ्याला वाटलं तो गेला असेल म्हणून म्हातारा पण त्या बोळात जायला निघाला, म्हातारा जसा त्या बोळात गेला तसा त्याच्यापाठीवर तो तरणा माणूस पण आतमध्ये गेला. बराच वेळ झाला मी कंटाळून निघून जाणार होतो इतक्यात तो तरणा माणूस एकटाच बाहेर आला आणि वाड्याच्या बाहेर निघून गेला. तो गेल्यावर मी त्या बोळात उतरलो. एक पंचवीस तीस फूट खोल खाली उतरल्यावर एक सरळ रस्ता लागला खूप जुनं भुयार वाटत होतं. रस्त्याच्या शेवटी भली मोठी संदूक होती. ती संदूक उघडून पाहतोय तर त्याच्याखाली अजून एक संदूक. खाली उतरायला मोठी रशी अडकवलेली. चला आता इथपर्यंत आलोय तर खाली पण जाऊन येऊ म्हणून मी पिक्चर मध्ये दाखवतात त्या स्टाईल मध्ये रशी न पकडता खाली उडी मारली. एका मोठ्या लालभडक तळघरासारखी ती जागा होती. उडी मारली त्या ठिकाणच्या भोवती पिठाचं वर्तुळ काढलेलं होतं. बाजूला लक्ष गेलं तिथे मानवी देह जळत होता, बहुतेक तो म्हातारच असावा. माझ्याच जवळ एक पितळी भांडं होतं मी ते कुतूहल म्हणून उघडलं त्यात एक पिठाची बाहुली होती ती हातात घेतली तर अचानक एक लाल रंगाचा पंचा घातलेला विचित्र प्राणी त्या तळघरात आला. माझ्याजवळ आला आणि ती बाहुली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. बिचारा बऱ्याच दिवसाचा उपाशी दिसत होता. पण काही केल्या त्या पिठाच्या आतमध्ये येऊ शकत न्हवता. मग मीच त्या पिठाच्या वर्तुळाच्या बाहेर आलो आणि त्याला ती बाहुली दिली. तो अधाशासारखा ती बाहुली खाऊ लागला. मला त्याची दया आली म्हणून मी जवळ गेलो आणि मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर तो पण लाडात आला आणि माझ्या हाताला चाटायला लागला, मग मी दोन्ही हाताने त्याला गोंजरायला लागलो तर त्याने आपला पंचा लाडाने हलवायला सुरवात केली आणि काय आश्चर्य त्याच्या पंचामधून सोन्याच्या मोहरा पडायला लागल्या. कितीतरी वेळ त्या सोन्याच्या पडतच होत्या पडतच होत्या पडतच होत्या.

क्रमश ...........................

छान लिहिलय.. पण हे असं का? वेगळा धागा उघडुन शिर्षकाखाली गोष्ट लिहा ना... कल्पनाशक्ति बरी आहे. Happy

दुसरा धागा नको रे बाबा, सुरवातीला लिहायला लागलो तेव्हा त्या अमानवीय धाग्यावरच्या काही भगतांनी असा काय हल्ला चढवला माझ्यावर विचारू नका.इथल्या काही चांगल्या मायबोलीकरांमुळे मी त्या संकटातून तरुण गेलो. त्यामुळे नवीन धागा काढायचं धाडस होत नाही. हा धागा पण तिथल्याच एका भगताने काढून दिलाय मला.

बोकलत - काका तुम्ही तेच तेच दोन दोन धाग्यावर का लिहिताय ... तुमचे स्वतंत्र झाड आहे ना ?>>>दोन्ही धाग्यांवर माझे चाहते आहेत ते माझ्या साहसी कथांची वाट पाहत असतात म्हणून दोन्ही धाग्यांवर कथा पोस्ट करतो Happy

बोकलत आणि त्यांच्या पराक्रम गाथा इथेच शोभून दिसतात.>>>धन्यवाद

Submitted by बोकलत on 25 October, 2018 - 11:44.
>>>>>. धन्यवाद काय देताय? तिथून पळवून लावण्यासाठी बटरिंग चालू आहे. फसायच नाही अशा भूलथापांना. इथे लिहिलं नाही लिहिलं तरी तो धागा अजिबात सोडायचा नाही :काडी: :Evil face:
Lol Lol

दोन्ही धाग्यांवर माझे चाहते आहेत ते माझ्या साहसी कथांची वाट पाहत असतात म्हणून दोन्ही धाग्यांवर कथा पोस्ट करतो Happy >>>>>> जबरदस्त आत्मविश्वास. एक नंबर Wink आवडलं हे मला Proud

कसल्या कसल्या भ्रमात जगतात काही लोक...
<<
हो ना.
जगात अ-मानवीय उर्फ भुताटकी, देव-देवता वगैरे काही आहे, वगैरे भ्रम फारच जास्त लोकांना असतात.

भित्रेपणा घालवणे , कोणी तुमच्यावर इग्नोरास्त्राचा वापर केल्यास त्याचा मुकाबला करणे , भूतप्रेत-रेगुलर पिशाच-ब्रह्मपिशाच -हडळ-मुंजा-म्हसोबा-पित्रे -वेताळ -झोटिंग-खविस-मुंडक नसलेले प्रेत -सती आसरा -कच्चा कलुआ -शैतान वीर -म्हशासूर -स्मशान भैरव इत्यादी तत्सम मंडळींची बाधा असल्यास त्यासाठी बोकलतयानाचे नित्य पारायण करावे ..हमखास अनुभव येतील .. बोकलतायान हा एक दिव्य ग्रंथ असून तो नुसता जवळ बाळगला तरी बोकलतबुवा रात्री स्वप्नात कोकलत येउन दृष्टांत देतील .
'' ओम बोंब बोकलताय नमः '' हा त्यांचा मूलमंत्र असून त्याचा नित्य ४२० वेळा हरभऱ्याच्या माळेवर जप करावा .. मंत्रजपाचे नियम पाळणे शक्य नाही त्यांनी "श्री बोकलत जय कोकलत " असं सतत नामस्मरण चालू ठेवावे ...
इति श्री बोकलतबुवा चर्नपर्णमस्तु ....

@जिद्दु, बरोबर बोललात, तसेच कोणाला पछाडलेलं असेल तर बुवाबाजी,अंगारे धुपारे करत बसू नका, त्या माणसासमोर जाऊन फक्त एव्हढच बोला, 'बोकलतला बोलवायला पाहीजे' बस्स माणूस खाडकन बरा झालाच म्हणून समजा.

बोकलत तुमचे लिखान त्या अमानवी धाग्यावरच टाका. तुम्ही आल्यापासून तिथे बर्‍याच लोकांची दुकानदारी बन्द झाली आहे.

बोकलत तुमचे लिखान त्या अमानवी धाग्यावरच टाका. तुम्ही आल्यापासून तिथे बर्‍याच लोकांची दुकानदारी बन्द झाली आहे>> +११११११११११११११११

Pages