नमस्कार मंडळी, हा नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे आपले नवीन मायबोलीकर बोकलत, तर या गोष्टीला काही दिवसांपूर्वी सुरवात झाली, अमानवीय या धाग्यावर अनेक मायबोलीकर त्यांना आलेले गूढ अनुभव शेअर करत असतात. त्या सगळ्या अनुभवांना एक गंभीरतेची किनार असते पण आपले बोकलत त्या सगळ्या गंभीरतेवर पाणी ओतून तो धागा विनोदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मायबोलीकरांनी त्यांना हात जोडून नवीन धागा काढण्याची विनंती केली पण परिणाम शून्य, म्हणून त्यांच्या वतीने हा धागा मी काढत आहे आणि त्यांना कळकळीची विनंती करत आहे कि इथून पुढे त्यांनी त्यांचे अनुभव या धाग्यावर शेअर करावेत. नमुन्यादाखल त्यांनी शेअर केलेला अनुभव इथे पोस्ट करत आहे.
मुंजाचाच विषय निघालाय तर आता मी तुम्हाला एक खरीखुरी माझ्याबाबत घडलेली घटना सांगतो. ३-४ दिवसाची सुट्टी काढून मामाने मला त्याच्या गावी कोकणात बोलावलं होतं. साधारण दुपारी एक वाजता तिकडे पोहचलो समोर पाहतोय तर सगळे गावकरी माझीच वाट पाहत उभे होते. मला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभा होता, कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी हात जोडून उभं होतं. मामाच्या घरी गेल्यावर मामाला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तो गंभीर झाला आणि म्हणाला तुला मी मुद्दाम इथे बोलावलंय. गाव संकटात आहे, गावाच्या बाहेर एक चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर एक मुंजा राहतो त्या मुंजाने गावातल्या माणसांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. दर अमावसेला २० कोंबड्या आणि पौर्णिमेला १० बोकड अर्पण करावी लागतात. नाही केल्या तर त्या चिंचेच्या झाडावरून येणारी केबलची वायर तो तोडून टाकतो. त्यामुळे बायकांचे डेली सोप्स आणि बाप्यांचे क्रिकेटचे सामने बंद होतात. अजून जीओचा टॉवर पण आपल्याकडे नाय आला त्यामुळे या अनर्थातून गावाला वाचव आणि गावात सुख समाधान शांती नांदु दे. गाव खरोखरच एका मोठ्या संकटात सापडलं होतं.दैनंदिन गरजेचं साधन नसल्याने बायकांची भांडणं आणि बाप्यांच्या पारावरील गप्पाना ऊत आला होता. एक मात्र चांगली गोष्ट अशी की लोकं एकटे दुकटे बाहेर पडायला घाबरत असल्याने गाव हागणदारीमुक्त झाला होता. तरीसुद्धा गावाला या संकटातून काढणं माझं कर्तव्य होतं. मामा मला म्हणाला उद्या अमावास्या आहे, जर तू मुंज्याला कुस्तीचा आव्हान देऊन हरवलंस तर तो कायमचा निघून जाईल. मी थोडा वेळ विचार केला, आणि मामाला बोललो निश्चिन्त रहा. मी हरवेन उद्या त्या मुंजाला. आता मी कुस्तीच्या तयारीला लागलो, जेमतेम २४ तास माझ्याकडे होते.या २४ तासात सल्लूचा सुलतान आणि आमिरचा दंगल वारंवार पाहून कुस्तीतले सगळे डावपेच व्यवस्थित शिकून घेतले. दुसऱ्या दिवसाची रात्र कधी अली समजलीच नाही. रात्री ठीक बारा वाजता त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन मुंजाला कुस्ती खेळायचं आव्हान दिलं. आव्हान दिल्याबरोबर झाडावर सळसळ झली आणि २० ते २५ फुटाचा एक माणूस भेसूर हसत माझ्यासमोर उभा राहिला. आकाशात एक लख्ख वीज चमकली आणि आमच्या कुस्तीला प्रारंभ झाला. सगळे गावकरी माझ्या नावाचा जल्लोष करत होते त्यामुळे माझ्या अंगात चेव आला होता. पहिला डाव आम्ही एकमेकांची ताकद मोजण्यात खर्ची घालवला. नंतर खऱ्या कुस्तीला सुरवात झाली. कधी तो वरचढ ठरायचा तर कधी मी. साधारण १ तास असाच गेला दोघेही थकलो होतो. शेवटी मुंजाने मला पकडायला हाताची कैची मारली ती मी लीलया चुकवली आणि ज्या क्षणाची वाट मी पाहत होतो तो आला. कैची चुकल्यामुळे मुंजा थोडा वळला आणि त्याची कंबर माझ्यासमोर अली. मी क्षणाचाही विलंब न करता सुलतान मधली सल्लूची फिनिशिंग मूव्ह मारली, या डावातून मुंजा सावरू नाही शकला आणि उताणा पडून राहिला. गावकर्यांनी एकच जल्लोष करत मला खांदयावर उचलला आणि शोले मधल्या जय वीरू सारखी माझी वरात काढली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी जंगी पार्टी ठेवली होती. सगळी गावकरी मला आशीर्वाद देत होती.मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. एका गावाला संकटातून वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.
अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!!
Submitted by कल्पतरू on 24 August, 2018 - 07:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धन्यवाद उमानु
धन्यवाद उमानु
तुम्ही स्वतः साठी नाही ठेवली का सोन्याची बिस्किटे>>>> नाही ठेवली, शेवटी तो ही इतर धातूंसारखा एक धातूच, माणसाच्या हव्यासापायी इतर धातूंपेक्षा वरचढ ठरलेला एक चकाकता पदार्थ एव्हडीच काय ती त्याची ओळख, दोन वेळची भाकरी मिळाली आणि निजायला उशाशी दोन दगड मिळाले की समाधान मानायचं.
@ मोक्षू, मनापासून धन्यवाद.
@ मोक्षू, मनापासून धन्यवाद.
आणि निजायला उशाशी दोन दगड
आणि निजायला उशाशी दोन दगड मिळाले की समाधान मानायचं.>> दोन कशाला?
दोन कशाला?>>>>माझ्यासाठी एक
दोन कशाला?>>>>माझ्यासाठी एक आणि बायकोसाठी एक
बायको घाबरत नाही हडळींना?
बायको घाबरत नाही हडळींना?
काहीही हा अनामिका
काहीही हा अनामिका
बायको कशाला घाबरले?त्या तर पाणी भरायला येतात यांच्याकडे☺️☺️☺️☺️
(No subject)
वैनी तर हे गाणं म्हणत असतील:
वैनी तर हे गाणं म्हणत असतील:
(चाल: सोल्जर सोल्जर)
बोकलत बोकलत
वेताळांना ठोकलत
गावकऱ्यांवर केली दया sss
बोकलत बोकलत
भूते बसली कोकलत
आता गं कसली भीती बया sss!
भारी आहे
(No subject)
बोकलत मग तुम्हाला खायला कोंडा
बोकलत मग तुम्हाला खायला कोंडा पण चालत असेल. जसे निजेला धोंडा चालतो.
रच्याकने तुम्ही भुतांशी WWF खेळण्याव्यतिरिक्त बायकोला कोंडा खाऊ घालण्यासाठी काय करता?
बोकलत मग तुम्हाला खायला कोंडा
बोकलत मग तुम्हाला खायला कोंडा पण चालत असेल. जसे निजेला धोंडा चालतो.>>>> हो चालतो पण क्वचितच,तांदळाचं पीठ संपलं असेल तर, जास्त करून मी तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजीच खातो, मेथीच्या भाजीत फायबर असतात जे मला भुतांशी कुस्ती खेळताना उपयोगी पडतात.
रच्याकने तुम्ही भुतांशी WWF खेळण्याव्यतिरिक्त बायकोला कोंडा खाऊ घालण्यासाठी काय करता?>>>> अतिशय छान प्रश्न विचारला, त्याचं काय आहे ना गावाकडे साधारण शंभर एकर जमीन आहे, अर्ध्या भागात शेती करतो आणि बाकीच्या भागात गोशाळा आणि घर आहे, गोशाळेत दोनशे गायी, शंभर म्हशी आणि नांगरणीसाठी पन्नास बैल आहेत, या सगळ्यावर लक्ष ठेवायला 10 ल्याब्राडोर श्वान आणि 10 जर्मन शेफर्ड आहेत, सगळ्यांना मी व्यवस्थित शिकवलंय. बैलांकडून नांगरणी करून घेणे, गायीचं दूध काढणे, विहिरीतून पाणी काढून शेताला देणे, स्वयंपाक करणे, atm मधून पैसे काढणे/ट्रान्स्फर करणे अशी सगळी कामं ते लीलया पार पाडतात. संध्याकाळी व्हाट्सएपच्या व्हिडिओ कॉल वरून माझ्याशी गप्पा मारून लाईव्ह अपडेट देत असतात. हे सगळं झालं गावाकडचं , मुंबईत बायकोच्या मालकीच्या साधारण वीस तीस लहान मोठ्या कंपन्या आहेत त्याव्यतिरिक्त ती अनेक जागांचे व्यवहार करत असते, आता जागा घेणे म्हणजे किती धोक्याचं काम हे तुम्हाला सांगायलाच नको, कुठल्या जागेवर पूर्वी स्मशानभूमी असते तर कुठल्या जागेवर कोणी स्वतःचं बरं वाईट करून घेतलेलं असतं, आशा पछाडलेल्या जागी जाऊन मला तिथे वावरणाऱ्या विध्वंसक शक्तींचा नाश करावा लागतो, त्यामुळे माझा जास्त मुक्काम मुंबईत असतो, एव्हढं सगळं झाल्यावर दोन पैसे खिशात येतात आणि आम्ही संध्याकाळी स्टेशनवरून मेथीची भाजी आणतो आणि खाऊन निजून जातो.
कोपरापासून _/\_
कोपरापासून _/\_
बोकलत तुम्हाला महालक्ष्मी
बोकलत तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न आहे कि कड्यावरचा गणपती कि याकूब बाबा पीर ?
घरातली धुणी भांडी
घरातली धुणी भांडी त्यांच्याकडून करून घेतली आणि संध्याकाळी त्यांच्याकरवी वेताळाला निरोप पाठवला

<<
बोकलत तुम्हाला महालक्ष्मी
बोकलत तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न आहे कि कड्यावरचा गणपती कि याकूब बाबा पीर ?>>>>सगळेच,माणसाने जाती धर्माचा वटवृक्ष एव्हडा बहरवलाय की झाड मेलं तरी मुळं जिवंत असतात. ख्रिश्चन भूत असेल तर ओम दाखवून काही होत नाही त्याला क्रॉसच दाखवायला हवा. अर्थात या सगळ्याची गरज मी नवखा होतो तेव्हा होती, तो कास्ट अवे पिक्चर पाहिलाय का तुम्ही, त्यात एक निर्जन बेटावर अडकलेला माणूस समुद्रात जाण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून त्याला मोठ्या जहाजाची मदत मिळेल. पण एक शेवटची मोठी लाट त्याला काही केल्या पार करता येत नाही, सारखी किनाऱ्यावर आणून सोडते. बऱ्याच वर्षानंतर एक लोखंडी पत्रा किनाऱ्यावर लागतो आणि त्याच्या साहाय्याने तो ती लाट पार करतो , पुढे सगळा शांत समुद्र असतो. आपलं सुद्धा तसंच असतं सुरवातीला कठीण प्रसंग येतात पण एकदा का ती शेवटची लाट पार केली की पुढे सगळं शांत. आपण फक्त योग्य वेळ आणि काळाची वाट पाहायची काय माहित कधी काय त्या लोखंडी पत्र्यासारखं किनाऱ्याला लागेल आणि ती लाट पार करायला मदत करेल.
आम्ही संध्याकाळी स्टेशनवरून
आम्ही संध्याकाळी स्टेशनवरून मेथीची भाजी आणतो आणि खाऊन निजून जातो.
>>
तुम्ही मटार , केळ्याचे शिकरण वगैरे खात नाही काय? एन्जॉय करण्याची पुण्याची ती परमावधी असते....
ऐकावं ते नवलच! आमच्यात
ऐकावं ते नवलच! आमच्यात सोन्याच्या बिस्किटांचे पुडे आणून वाटतात . हंड्यात बिस्किटं भरून ठेवलेली पहिल्यांदाच ऐकतोय.
अहो बोकलत भाऊ... महालक्ष्मी
अहो बोकलत भाऊ... महालक्ष्मी आणि गणपतीत जातीधर्म कुठे आला ? शिवाय महालक्ष्मी आणि याकूब बाबाचा दर्गा हे सर्वधर्मसमभावाचे उदाहरण आहे कोकणातले...... हे सगळे एकाच ठिकाणचे आहेत. असो. तुम्ही ते नाहीत हे समजले... खडा टाकून पाहिला होता.
दोन वेळची भाकरी मिळाली आणि
दोन वेळची भाकरी मिळाली आणि निजायला उशाशी दोन दगड मिळाले की समाधान मानायचं.>>>>>
गावाकडे साधारण शंभर एकर जमीन आहे, अर्ध्या भागात शेती करतो आणि बाकीच्या भागात गोशाळा आणि घर आहे, गोशाळेत दोनशे गायी, शंभर म्हशी आणि नांगरणीसाठी पन्नास बैल आहेत, या सगळ्यावर लक्ष ठेवायला 10 ल्याब्राडोर श्वान आणि 10 जर्मन शेफर्ड >>>>>>
बोकलत ,..अहो एवढे सगळे असताना डोक्याला धोंडा घेवून झोपता? आणि तेही मुंबईत ...घर तरी आहे का की आकाशाचे पांघरूण
काही म्हणा तुम्हाला इन्स्टंट स्टोरीज सुचतात लई भारी
बोकलत यांची एवढी इस्टेट बघता
बोकलत यांची एवढी इस्टेट बघता मुंबईत केवळ एक घर असेल असे वाटत नाही. कमीतकमी "३" तरी असतील. असो. त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो ही समस्त भुतयोनीस प्रार्थना.
बोकलत.. भूत व भुतांचे प्रकार
बोकलत.. भूत व भुतांचे प्रकार व ते ओळखायचे कसे याबाबत आपले अमूल्य मार्गदर्शन मिळेल का ?
इतकी श्रिमंती भुतांच्या
इतकी श्रिमंती भुतांच्या जिवावर?
तुम्ही मटार , केळ्याचे शिकरण
तुम्ही मटार , केळ्याचे शिकरण वगैरे खात नाही काय? एन्जॉय करण्याची पुण्याची ती परमावधी असते....>>>>नाही मी मुंबईत राहतो ना. आणि तसंही मायबोलीवर एक केळ्याची बाग कविता वाचली तेव्हापासून केळं खायची इच्छा उडाले.
धन्यवाद @उमानु, @पाथफाईंडर
धन्यवाद @उमानु, @पाथफाईंडर
लोक काय बोकलतांचा इंट्रव्यु
लोक काय बोकलतांचा इंट्रव्यु घेत आहेत काय?
बोकलत.. भूत व भुतांचे प्रकार
बोकलत.. भूत व भुतांचे प्रकार व ते ओळखायचे कसे याबाबत आपले अमूल्य मार्गदर्शन मिळेल का ?>>>अनेक प्रकार आहेत. हळूहळू माझ्या थरारक कथांमधून सगळ्या भुतांची ओळख होईलच.
>> सगळेच,माणसाने जाती धर्माचा
>> सगळेच,माणसाने जाती धर्माचा वटवृक्ष एव्हडा बहरवलाय की झाड मेलं तरी मुळं जिवंत असतात.
वा काय लिहीता तुम्ही बोकलत ( ͡ᵔ ͜ʖ ͡ᵔ )
धन्यवाद @avdhut
धन्यवाद @avdhut
( ͡ᵔ ͜ʖ ͡ᵔ )>> भारीच
बोकलत भाउंची इस्टोरी लईच भारी
बोकलत भाउंची इस्टोरी लईच भारी !
मानवजी, कविता खत्रा
Pages