मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
4 months ago
शेवटचा प्रतिसाद
4 months ago
Time to
read
<1’

मायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.

आजपासून मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.

आयफोन आणि आय पॅड दोन्हीवरही हे अ‍ॅप चालेल.
या आवृत्तीच्या चाचणीसाठी मदत करणारे मायबोलीकर शाली, किल्ली, योकु आणि मेधा यांचे आभार. वेळेअभावी त्यांच्या सगळ्या सूचना आणि अडचणी दूर करू शकलो नाही. पण पुढील आवृत्तीत त्यावर काम सुरु राहील.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

योकु,
म्हणजे आयोएस माबो अ‍ॅप वर, मायबोलीचेच असलेले ट्रान्सलिटरेशन न वापरता (जे आपण डेस्क्टॉपवर वापरतो) , आयोएसचे हिन्दी ट्रान्सलिटरेशन जास्त सोयिस्कर पडते असे तुमचे मत आहे का? का बरे?

नाही.
मायबोलीचेच असलेले ट्रान्सलिटरेशन (जे आपण डेस्क्टॉपवर वापरतो) सोपं पडतं.

धन्यवाद भोजराज. या पद्धतीने लिहण्याची चाचणी केली नव्हती. तुम्ही ती करून चालते आहे, हे इथे लिहल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे अजून एका प्रकारे मायबोली आयओएस अ‍ॅप वर लिहणे शक्य आहे हे इतर मायबोलीकरांनाही कळेल.

आयफोनवरचा मराठी कीबोर्ड वापरणे जास्त सोपे वाटतेय.
फक्त माझ्याइथे ‘शिफ्ट‘ की साठीचे आॅटो-टाॅगल आॅपरेट नाही होतेय.

आॅटो
अॅाटो
ॲाटो
अाॅटो

अरे हो हा एक प्राॅब्लेम आणि.

१)बॉटम ला अ‍ॅड ची पट्टी येत नाहीय>> मला अ‍ॅडची पट्टी दिसतीये आणि फोन ची स्क्रीन मुळातच छोटी असल्याने (आयफोन 5S) वाचायला त्रासदायक वाटतीये. सुरुवातीला माझ्यासाठी नवीन, ग्रुपमधे नवीन... उघडताना, जाहिरातीला क्लिक होऊन जाहिरात उघडल्याने वेळ जात होता. आता सवयीने जमतंय, पण पट्टी गेली नाही अजून.
२)स्क्रोल डाउन करताना १-२ धागे रिपीट दिसतायत..
बाकी लूक आवडला.

Pages