सुरुवात नव्या बदलाची

Submitted by संयोजक on 21 August, 2018 - 09:52

62E91F17-2009-464F-85B8-1594CB506D66.jpeg

श्रावणाचा अलवार महिना येतो. निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेली असते. लहान मोठी रोपटी सुध्दा अद्भुत दिसणारी फुले लेवून श्रीमंत झालेली असतात. अजुबाजूला पाचूंची नुसती पखरण झालेली असते. रंगांच्या विस्मयकारी छटा लेवून डोंगर सजलेले असतात. अवखळ झऱ्याप्रमाणे बागडणारा श्रावण अनेक व्रत, वैकल्य, उपास, ग्रंथवाचणामुळे प्रौढही भासतो. पंचमीला अंगणा अंगणात माहेरवाशीनींचे पैंजणे रुणझुणतात. झोके बांधले जातात. वारूळे पुजली जातात. सोमवारी शिवामुठी वाहील्या जातात. स्वयंपाकघरातुन खमंग वास येतात. चटण्या, कोशींबिरी, वेगवेगळ्या वड्या, भाताच्या मुदीवरचे पिवळे धम्मक वरण आणि विविध भाज्यांनी केळीची पाने सजतात. रांगोळीच्या महिरपींवर चिमटीने हळदी कुंकू पडते. तृप्त पंगती उठतात. अनेक व्रतांची उद्यापने करीत करीत श्रावण आला तसाच गडबडीने जातो. पण जाताना बाप्पांचे वेध लावायला विसरत नाही.

बाप्पा येणार म्हणलं की सजावटीच्या चर्चा सुरू होतात. सगुण रूपात शोभणारा बाप्पा कुठल्या रूपात घरी आणायचा ह्यासाठी मूर्ती निवडणे हे काम सर्वप्रथम करण्यात येतं. एव्हाना काहींनी बाप्पा बुक केलाही असेल. अनेकजण मूर्ती घरीच बनवतात. कोणी मातीचा तर कोणी तांदळाचा, शाडूच्या मातीचा, पेपरचा, इ. बरेचजण मूर्ती विकत आणतानाही अगदी आठवणीने मातीची मूर्ती आणतात. पण बहुतकरून व मोठ्या प्रमाणावर pop म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती दरवर्षी खपतात. Pop चे तोटे माहीत असूनही लोक त्या विकत घेतात.pop च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, रंगासाठी वापरलेली रसायने घातक असतात. शिवाय, त्यांची काय हालत होते हे पाहायचे असेल तर विसर्जनानंतर नदीकिनारी किंवा समुद्रावर जाऊन पहा. निर्माल्यही नदीत किंवा जलाशयात विसर्जित करण्यात येते. त्याचे पुढे काय होते हे आपण जाणतोच. सजावट करताना थर्माकोल सारखे पर्यावरण विघातक साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ते टाळून, सहज कुजणारे किंवा पुनर्वापर करता येण्याजोगे साहित्य वापरायला हवे. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपला गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा करता येईल ह्या अनुषंगाने विचार आणि अंमलबजावणी व्हायला हवी. म्हणूनच जे मायबोलीकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना त्यांचे अनुभव मांडण्यासाठी हा धागा, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यास मायबोलीचाही हातभर लागतो आहे हे सुखद सत्य जगासमोर येईल.

बदल ही एकदम होणारी गोष्ट नसली तरी त्याची सुरवात कुठून तरी होणं गरजेचे आहे. शंभर मैलांच्या प्रवासाची सुरवात ही पहिल्या उचललेल्या एका पावलानेच होते. म्हणूनच या दुरवर चालणाऱ्या पर्यावरणपुरक प्रवासाचे पहिले पाऊल आपली मायबोली या 'गणेशोत्सवाच्या' निमित्ताने उचलत आहे. ह्या गणपतीला मायबोली तर्फे "सुरुवात नव्या बदलाची" हा उपक्रम राबवतो आहे. ह्यात तुम्ही साजरा केलेला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा अनुभव लिहणं अपेक्षित आहे, सोबत प्रकाशचित्र असेल तर सोन्याहून पिवळं. या वर्षी जमले नसेल तर तुमच्या मनात असलेल्या कल्पना मांडल्या तरी त्यांचे स्वागत आहे. त्यांचा उपयोग इतरांना पुढच्या गणेशोत्सवात करता येईलच की.
गणपतीबाप्पा मोरया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मी_अनु Happy __/\__

कसा बनवायचा माहित नव्हता, जसा जमेल तसा बनवला

धन्यवाद शालीजी Happy

ह्या वर्षीचा अजून बनवायचा आहे. फोटो टाकेनच

आमच्या घरी बाप्पा हौसेखातर असतो. आम्ही शाडूची मूर्ती घरी बनवतो, घरीच बादलीमध्ये विसर्जन करतो. मूर्ती पूर्ण विरघळते, त्याच मातीचा पुन्हा पुढच्या वर्षी वापर करतो. सजावट पाना-फुलांची - शक्यतो घरच्या छोट्या बागेत मिळणाऱ्याच.

हा गेल्या आठवड्यात लेकिला दाखवायला केलेला प्ले डोचा बाप्पा. अगदीच १० मिनिटात करुन दाखवला आहे त्यामुळे फिनीशिन्ग नाहीये, यावर्षी घरी गणपती बसवायचा ठरले तर परत अशीच मुर्ती करणार

clay ganapati.jpeg

प्लेडो/क्ले (खेळायची चिकणमाती) वापरून गणपतीची मूर्ती तयार करायला शिकवणार्‍या अशा बर्‍याच व्हीडिओज आहेत यूट्यूबवर. मुलांसाठी आणि नवशिक्यांसाठी छान आहेत.

विनिता, शब्दाली बाप्पा सुरेख एकदम. >> +१ कशी बनवली तेही लिहा की म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू.
तुनळी वरची लिंक छान आहे. अशीच एक लिंक मला फेसबुक वर आलेली https://m.facebook.com/story.php?story_fbid=2210806672472400&id=10000629... >> ह्यात मूर्ती बनवतानाच त्यात बी वापरतात ते घरच्या कुंडीत किंवा बागेत विसर्जन केलं की त्यात झाड येतं.

IMG_20180909_142646977.jpg
इथे एका ठिकाणी Ganesha making workshop होता. त्यात मी आणि मुलांनी मिळून तयार केलेला गणपती Happy

धन्यवाद शाली Happy
यातही २ बिया आहेत घातलेल्या. कुठल्या झाडाच्या ते नीट कळलं नाही. उगवल्यावर कळेल Happy

तुरेवाला फेटा, जॅकेट भारीच थाट आहे बुवा तुमच्या बाप्पाचा. Happy
पायाला मेहंदी लावल्यासारखी वाटतेय. मस्तच. Happy

धन्यवाद शालीजी, किल्लीजी Happy

खरे तर अजून सुधारणेला बराच वाव आहे. पुढील वर्षी नीट बनवेन.
पण स्वतः गणपती बनवण्यात खरंच खूप आनंद आहे. Happy

किल्लीजी>> जी मत कहो ना
स्वतः गणपती बनवण्यात खरंच खूप आनंद आहे>>> अगदी खरय.. Happy Happy शुभेच्छा !

त्या वरच्या फोटोवरून आठवलं - व्हॉअ‍ॅ वर एक फॉरवर्ड आला होता. एका बेकर ने चॉकोलेट चा गणपती बनवला आहे. नंतर तो दुधात विसर्जन करून ते दूध (चॉकलेट मिल्क) गरजू लहान मुलांना वाटप करण्याचा त्यांचा प्लॅन आहे.
कल्पना छान वाटली खरोखर. फक्त संबंधितांनी हायजिन ची नीट काळजी घेतली पाहिजे! त्यावर कुंकू फुले बिले न वाहता किंवा वाहिली तर स्वच्छ करून मग दुधात विसर्जन करणे इ. काळजी घेतली तर बरे असे वाटले.

हा फोटो जरा झूम करुन पाहावे लागेल, घरी मातीपासुन बनवलेली मुर्ती थाटात विराज्मान झालीये Happy
मुर्तीकारः माझा दादा, भाग्येश

विनीता कील्ली मस्त झालेत बाप्पा! मी धातुचा बसवते पण स्वत:ला करायला आवडेल पुढच्यावर्षी एखादं कार्यशाळा करन कारण ह्याबाबतीत मातीकामात मी कच्च मडकं .....
चाॅकलेट गणपतीचं वर एका ग्रुपवर चर्चा झाली की बाप्पाला प्यायचं ही कल्पना कशीतरी वाटते.

Pages