कमळफुलाची चटणी

Submitted by मनिम्याऊ on 17 August, 2018 - 14:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कमळाचे फुल १ (लोटस) ( वॉटर लिली नाही)

ओल्या नारळाचा चव 1 वाटी
हिरव्या मिरच्या 2
आलं 1 इंच
जिरे 1 टीस्पून
मीठ 1 टीस्पून
साखर चिमूटभर

क्रमवार पाककृती: 

कमळफुलाच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.
पाकळीच्या देठाजवळचा पिवळसर पांढरा भाग काढून टाका.

मग इतर सर्व साहित्य आणि पाकळ्या मिक्सर मधून भरड वाटून घ्या.
कमळाची चटणी तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

शक्यतो गुलाबी कमळाच्या पाकळ्यांचा वापर करावा.
याच पाककृतीप्रमाणे मीठ, मिरच्या आणि जिर्या ऐवजी साखर आणि गुलकंद वापरून गोड चटणी बनवता येते.

माहितीचा स्रोत: 
आमच्या घरची छत्तीसगढी कामकरी बाई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<परवा मी एबीपी माझा वर खाद्याभ्रमंती मधे गोंड समाजातील एका माउलीने केलेली लाल मुंग्यांची चटणी बघितली... आदीवासी भागात खाण्यासाठी जे जे उपलब्ध असेल त्याची चटणी बनवुन भाताबरोबर खातात >>

चटणीत वापरल्या जाणार्या लाल मुंग्या या झाडावर घरटं करून रहातात. साध्या नेहमी दिसणार्या लाल मुंग्या त्या या न्हवेत.

Pages