मुंबई दर्शन

Submitted by सोमन on 8 August, 2018 - 00:13

दादर किंवा CSTM ला उतरूण एका दिवसात पाहणया सारखि ठिकाण सूचवाल का ?

सकाळी ६:३० ला पुण्यातुन निघून संध्याकाळी पून्हा माघारी असा Plan आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तारांगण, मत्स्यालय, गिरगाव चौपाटी, नरीमन पॉईंट, गेटवे इत्यादी करता येईल. 6-8 तासांची ola केलित तर बराच वेळ वाचेल.

सकाळी ७.१५ ची डेक्कन क्वीन

सकाळी ७.१५ ची डेक्कन क्वीन पकडा आणि साधारण १०.३० ल दादर ला उतरा. तिथुन लोकल पकडुन भायकळा ला उतरा. भाय्कळ्याचे वीरमाता जिजाबाइ भोसले उद्यान पहण्यासारखे आहे. साधारण २ तास पुरेसे आहेत त्यासाठी. ते पाहुन पुन्ह लोकल पकडुन सिएसटी ला या.. तोवर जेवणाचि वेळ झालेलि असेल.. १११ नम्बर ची बस पकडुन आमदार निवास स्टोप ला उतरा... हॉटेल ओ.सि.एच. मधे जेवण करा.. अगदि माफक दरात चांगले जेवण मिळेल. तिथुन पुन्हा १११ पकडा आणि गेट वे ला या.. तिथे थोडावेल बसुन फोटो काढुन झाले कि १ तासाची फेरी बोट घ्या.. परत आल्यवर कन्टला आला नसेल तर टॅक्सी करुन मरिन लाइन्स ला फिरुन या.. सि.एस.टी. वर ४.२५ ला प्रगति वाट पाहत उभी असेल.. शक्य असेल तर तिने जा नहितर ५.१५ ला पुन्ह डेक्कन क्वीन येइल तिने परतीचा प्रवास करा... खुप छन एक दिवसचा प्रवास होइल..!!! मझ्या ५ वर्षाच्या लेकाला मि नुकतिच अशि सफर घडवुन आणलि आणि साहेब अतिशय खुश झाले.....!

१)मुलांच्या वयाप्रमाणे ठिकाणं बदलतात.
२)महिलामंडळास कपडे खरेदी आवडते. हल्ली
३)फुटपाथ स्ट्रीटफुडची चलती आहे.
४) समुद्र - गेटवे/ गिरगाव चौपाटी/ महालक्श्मी मंदिरामागचा
५) फुटपाथ कपडे -
फॅशन स्ट्रीट/कोलाबा/बान्द्रा
६) फुटपाथ - पुस्तके
फ्लोरा फाउंटन
७) पुण्यात मेट्रो येणारच आहे तोपर्यंत मुंबईत फेरी
८) भायखळा राणीबाग - पक्षी आहेत, प्राणी नाही. बुधवारी बंद.
९)म्युझिअम दोन राणी बागेतले/ गेटवे जवळचे मोठे
१०) प्रभादेवी सिद्धिविनायक - बराच वेळ लागू शकतो कधी
११) क्राफ्र्डच्या आजुबाजुच्या रस्त्यातली मार्केट्स
१२) कमला नेहरु पार्क, बाबुलनाथ, चौपाटी.
आवड पाहून ठिकाणे/क्रम ठरवा.

मुंबईची ऐतिहासिक सफर करायची असेल आणि भुईकोट बघायचे असतील तर मुबंईतील किल्ले आणि पुरातन वास्तू बघता येतील.
मुंबईच्या किल्ल्याची मी केलेली भटकंती आणि त्याचा वृत्तांत
भाग १ --> https://www.maayboli.com/node/61998
भाग २ --> https://www.maayboli.com/node/62437

तसेच मलबार हिल परिसरातील १२व्या शतकातील बाणगंगा तलाव बघण्या सारखा आहे
बाणगंगा तलाव --> https://en.wikipedia.org/wiki/Banganga_Tank

पेंगवीन सोडले तर राणीच्या बागेत पाहण्यासारखं काहीच नाही. नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, एलिफंटा, तारपोरेवाला मत्सालय, हे सुद्धा होऊ शकतं.

पुण्यात नसणाऱ्या गोष्टी यावर भर द्या-
१) समुद्र
सध्या पावसामुळे बोटी बंद असतात.
एलिफंटा सहल ही एकच होईल बाकी काही होणार नाही.
२)फुटपाथ मार्केट
पुस्तके रविवारी नसतात.
३) म्युझिअम
पाहणे फार वेळखाऊ असते आणि लहान मुलांना नेऊ नये.
४) बागा
बऱ्याच बागा नऊ ते साडेचार बंद असतात.
५) डबल डेकर बस प्रवास
सिएसटिम'बाहेर बरेच रूट आहेत. भरपूर बस असतात
फोर्ट फेरी - लास्ट स्टॅाप -परत.
१ नंबर - नेव्हीनगर परत
११३ कमला नेहरु पार्क
६/८ मर्यादित -कुलाबा -परत
यातून प्रवास आणि टॅक्सी यात खूप फरक आहे!

नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण - वरळी सीफेस
भायखाळा - राणीबाग - प्राणी जवळजवळ नाहीतच. पक्षी आहेत. पेंग्विन आहेत.
तारापोर मस्त्यालय - मासे, मोठी कासवं
गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या आजुबाजुचा परीसर
समुद्र पहायचा असेल तर - गिरगाव चौपाटी , हाजी अली दर्गा
प्रिन्स वेल्स म्युझियम - मला तरी बोर वाटते. मुलांनाही नाही आवडत त्या अ‍ॅन्टीक वस्तु बघत फिरायला. वेळ जातो.

संध्याकाळी पुण्याला परतायचं आहे तर लवकर निघावे लागेल नाहीतर फॅशन स्ट्रीट, काफर्ड मार्केट अशी मार्केट्स पण आहेत फिरायला.

DJ, ओ.सि.एच. कुठे आहे??

पुण्यात नसणाऱ्या गोष्टी यावर भर द्या->>>>>>>> +१

१० वर्षे+ वयाचे मुल आहे असे गृहीत धरून
नेहरू सायन्स सेंटर
तारांगण
वरळी / हाजीअली सी फेस या ३ हि गोष्टी जवळ जवळ आहेत.
खरेतर पहिल्या २ गोष्टी अर्धा दिवस घेऊ शकतील.

डबल डेकर ने मुंबईत फोर्ट मध्ये फिरणे सुद्धा छान अनुभव आहे.
परतायची घाई करू नका, शिवनेरीने गेलात तर कधीही परत जायला निघू शकता,
evening by the sea चुकवू नका

किंवा एक थीम ठेऊन हि ट्रीप करू शकता,
- वर जसे म्हंटले तसे इतिहासाच्या पाऊलखुणा,
- चित्रपटातील मुंबई (band stand, जलसा, आणि चित्रपटात दिसणारी प्रसिध्द ठिकाणे),
- मुंबईतील धार्मिक स्थळे , बाणगंगा, महालक्ष्मी, सिद्धीविनायक आणि शीतला devi बरोबर , माउंट मेरी आणि हाजीअली ला अवश्य जावे.
- shopping ट्रीप, मनीष मार्केट, फोर्ट च्या फुटपाथ वरील पुस्तके, चोरबाजार मधील अन्तिक दुकाने इत्यादी.
- transport tour, local, बस, मेट्रो, मोनो रेल, launch मधून गेटवे ,
- मोठ्या बागा - जिजामाता उद्यान, मलबारहिल, प्रियदर्शिनी पार्क, धरावी मधील निसर्ग उद्यान

पुस्तकाचे मार्केट ( फुटपाथ) - फ्लोराफाउंटन
( भाव करून लगेच खाली ठेवा, हवं आहे असं दाखवलं तर भाव कमी करत नाहीत.)

शनिवारी मुंबईत फिरावं , सर्व कामं होतात. रविवार नको.