भावाला कसे समजावून सांगावे ?

Submitted by अबोलीशी on 5 August, 2018 - 12:00

माझ्या भावची समस्य आहे. आई वडील आणि आम्ही दोघ भाउबहिन असेच चार आहोत. आमचे घर खाउनपिऊन ठीक आहे.
आम्हि पहिल्यांदा ज्या ठिकानी राहत होतो ती लो मिडल क्लास वस्ती होती. तिथेच शाळेत गेलो. माझ्या भावात आनि माझ्यात एक वर्शाचं अंतर आहे.
दिसण्यात तो आईवर आनि मी बाबावर गेली आहे. मी पुरुशी दिसते तर भाऊ बायकी चेह-याचा आहे. लहानपनी फार प्रॉब्लेम नाही झाला. मला तरी अजून नाही. पन दहाविनंतर त्याचे मित्र त्याला चिडवायचे. त्या वेळि त्याला त्रास नाहि झाला. पन नंतर आजुबाजुच्या वस्तितले मुल पन त्रास देऊ लागले. भाऊ अगदि नॉर्मल आहे. पन सारखेच चिडवन्याने तो अस्वस्थ रहायचा.
मला असा त्रास कधि नाही झाला. उलट मि मामेभावाला जो पोलिस आहे त्याला घेऊन त्या मुलाना दम दिला. त्यानंतर बरे चालले. आम्हि विसरुन गेलो.
तो नोकरिला लागला. पन लग्नासाठि मुली नकार देत होत्या. त्याची काय चुक आहे यात ?
त्यामुळे पुन्हा तो गप रहायला लागला. दरम्यान आम्हि माझ्या क्वार्टर मधे रहायला आलो. इथे भावाला मित्र मिळाले. लग्न होत नसल्याने तो बाहेर जास्त रमायचा.
पन इथेही काहितरी झाले. कुनीतरी काहीतरी कमेन्ट केल्याने तो घराबाहेर पडेना झाला. फक्त ऑफिसला जाताना आनि येताना.
इकडेहि पुर्वीसारखा एक ग्रुप आमच्या घरावरुन जाता येताना भंकस करतो. त्याला आवाज देतात, मोठ्याने चिडवतात. मामेभावाला पोलिस तक्रार करु म्हटले तर तो म्हनाला पोलिसांना एव्हढा सेन्स नसतो. उलट एखादे वेळि तेच काहितरी असे बोलतिल कि..
इथे सिक्युरीटी आहे. पण ते मुलाना रोखत नाहित. कॉलनी कमिटीत तक्रार दिलि तर यात आम्हि काय करनार म्हनतात ?
त्यात वडिल संतापि आनि लवकर टेन्शन घेनारे आहेत. याच्या बाबतित काहि झाले की धिर द्यायचा सोडुन त्यालाच बोल लावत बसतात. आई फक्त कावरि बावरि होऊन बघत राहते. पूर्वि माझं ऐकत असायचा. अलिकडे तो माझ्याशिही बोलत नाहि.

या समस्येवर काय उत्तर आहे समजत नाहि. तो जिवाचे काहि बरे वाईट तर करनार नाहि या भीतिने आई आणि मि पन काळ्जित आहेत. वडिलांना शांतिने घ्या म्हटलं तर गेला तर ब्रं होईल असा त्रागा करतात. त्यांच्या मानात तसे काहि नसते. पन हताश मानसाचे बोलने असते ते. त्याने भावाला कसे वाटेल याचा पाचपोच त्यांना नाहि.

डॉक्टरकडे नेऊन काहि फरक पडेल का ? कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात ? माझी एक मैत्रिन म्हनते प्लास्टीक सर्जरीने रूप बदलते. पन त्याला खुप पैसे लागतात ना ? किंवा जरा पैसे खर्च करुन हाय सोसायटित घर घेतले तर तिकडे चिडवने तरी बंद होईल. मग कदाचित काहि काळ गेल्यावर त्याला बरे वाटेल असे वाटते.

मला काहि समजत नाहि. मी काय करु ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेम कंडीशन माझ्या एका मित्राची आहे. त्याला ९ वी मधे असताना एका जिम मधे बोलावुन त्याला व्यायाम करायला लावलेला त्रास देण्यासाठी. पण त्याने थोडे धाडस केले आणि जिमचा आरसा फोडुन पलायन केले. त्यानंतर त्रास दिला नाही.

भाऊ बहुदा सतत होणाऱ्या बुलीइंग मुळे नैराश्यात गेला असावा.
तुम्हाला 2 स्तरावर काम करावे लागेल,
भावाला मानसिक आधार देणे आणि टवाळ मुलांचा बंदोबस्त करणे.
पैकी, समुपदेशकाशी बोलून पहिला प्रॉब्लेम सुटू शकतो, मानसोपचारतज्ञांकडे जाण्याची गरज असेल तर समुपदेशक सुचवेल.
जर समुपदेशनाने त्याची सेल्फ वर्थ वाढली, कॉन्फिडन्स आला तर कदाचित दुसरा प्रॉब्लेम आपोआप सुटेल, किंवा तीव्रता तरी कमी होईल.

मुंबईत असाल तर IPH ठाणे इकडे समुपदेशनासाठी मदत मिळू शकेल.

समूपदेशकांचा उपयोग होईल असे वाटते. आपण जसे आहोत तसे आत्मविश्वासपूर्वक स्वीकारणे हे आपल्याला जमतेच असे नाही. तेथे ते मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरतील.

दोन चार जणांना तुमच्या भावाने धरुन मरेस्तोवर बदडायला हवे. तेही भर चौकात शेकडो लोकांसमोर.. एकदाची चिडवणूक बंद होइल. चार सहा महिने जेल होइल पोलिस केस होइल. पन भावाला भारी कॉन्फिडन्स येईल.

सगळा मामला कॉन्फिडन्सचा आहे. तुमचा भाऊ स्वतःच आतून खचलाय, त्याला आधी उभारी द्यावी.

---- (प्लिज डोन्ट टेक इट अदरवाईज > तृतीयपंथी लोकांचा भयंकर कॉन्फिडन्स मला खूप आवडतो. शिकण्यासारखे आहे)

काही गोष्टी नीट कळल्या नाहीत.
फक्त चेहरा बायकी आहे का शरीरयष्टी आणि देहबोली पण?
Straight आहे का गे आहे?
फक्त चेहरा असेल तर दाढी मिशा वाढवा. जिम लावा, बॉडी बनवा.

>>फक्त चेहरा बायकी आहे का शरीरयष्टी आणि देहबोली पण?>> मलाही हा प्रश्न पडला. सगळीजणं जर इतका त्रास देत आहेत तर नुसता चेहराच नसावा असा अंदाज.

• भावाला चांगल्या मानसोपचारतज्ञकडे घेऊ जा.
• त्याने स्वतः आधी त्याचे Gender, Gender Identity, Gender Expression आणि Sexual Orientation (https://www.maayboli.com/node/64572) मान्य करायला हवे. त्यामुळे त्याला confidence येईल.
• आईवडील जुन्या पिढीतले आहेत पण तुम्ही स्वतः त्याला यासाठी मदत करू शकता, पाठबळ देऊ शकता.
• त्यानंतर त्याला मोठ्या शहरात, हुच्चभ्रू वस्तीत राहायला जाऊदे. तिथे कमी त्रास होईल असे वाटते.
• शक्य असेल तर भारताबाहेरच जाऊंदेत.
www.misalpav.com/node/41317 हा धागादेखील वाचा.

फक्त चेहरा बायकी आहे का शरीरयष्टी आणि देहबोली पण?>> मलाही हा प्रश्न पडला. सगळीजणं जर इतका त्रास देत आहेत तर नुसता चेहराच नसावा असा अंदाज. >>>>>

तो नॉर्मल आहे हे मी यासाठीच लिहीले आहे. शरिरयष्टी म्हणजे ठेवण असेल तर बारीक चनिचा आहे. देहबोली = Body Language ? आमच्याशि तरी नॉर्मलच आहे. ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मलच आहे याचि मला खात्रि आहे.
दिसण्यावरून कुनि काही बोलले तर त्याचा इगो हर्ट होतो. ते समजावून झालेले आहे.
मारामारीचा सल्ला पसंत नाही, ते वडलांना आवडनार नाही. जिमचा विचार करता येईल. पन योगा रोज आहे. दाढि मिशि अजुन नाही आली. काहिंना उशिरा येते, काहिंना नाही. तो प्रॉब्लेम नसावा.
समुपदेशक म्हनजे समजले नाहि. मानसोपचार तदन्याकडे जाऊ.

त्यानंतर त्याला मोठ्या शहरात, हुच्चभ्रू वस्तीत राहायला जाऊदे. तिथे कमी त्रास होईल असे वाटते.
• शक्य असेल तर भारताबाहेरच जाऊंदेत. >>> हे जास्त आवडले.
वस्तिप्रमाने वागनुक बदलते. या मुलाना आपल्या वागनुकीचे परिनाम समजावुन सांगनारे कुनी नाहित.

तो नॉर्मल आहे हे मी यासाठीच लिहीले आहे. शरिरयष्टी म्हणजे ठेवण असेल तर बारीक चनिचा आहे. देहबोली = Body Language ? आमच्याशि तरी नॉर्मलच आहे. ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मलच आहे याचि मला खात्रि आहे.
दिसण्यावरून कुनि काही बोलले तर त्याचा इगो हर्ट होतो. ते समजावून झालेले आहे.
>>> लोकांना फाट्यावर मारायला शिकायला पाहिजे त्याने.

दाढि मिशि अजुन नाही आली. काहिंना उशिरा येते, काहिंना नाही. तो प्रॉब्लेम नसावा.

>>> काय वय आहे?

>>ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मलच आहे याचि मला खात्रि आहे.>> च्रप्स, ऑफिसमध्ये जातो म्हणजे लहान नक्कीच नाही.

सायो काही जण लवकर जॉब सुरू करतात, म्हणून विचारले मी. कारण वय जास्त असेल तर हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो दाढी मिशी नाही आली तर, त्यांना डॉक्टर कडे जायला हवे.

असं बुलिंग होत असेल तर वाईट आहे. १२वीत असताना एका मुलाला अश्या प्रकारचं बुलिंग व्हायचं असं आठवलं. पण त्याला एरवी चिडवलं तरी सर्व उपक्रमात, मौज मजेत नीट सामावून घ्यायचे.
मुंबई च्या चांगल्या एरियात, कोरेगाव पार्क मध्ये किंवा बंगलोर सारख्या शहरात आयटी सिटी च्या जवळ राहता आले तर हे सर्व इश्यूज येणार नाहीत असे वाटते.मुळात कोणाला कधी दाढी मिशी आली किंवा कोण कसा चालतो हे समाजाचे प्रश्न नाहीत. नन ऑफ देअर बिझीनेस. शिवाय दाढी मिशी येत असूनही बाय चॉइस गुळगुळीत राहणारे लोक असतातच.(शेल्डनचे पात्र आठवले.)
मस्त स्पाइक्स वगैरे केले, चांगले फिट असलेले योग्य रंगांचे फॉर्मल्स घातले तर कोणाला जाणवूही नये.

"लग्नासाठी मुली नकार देतात....... . पुर्वीसारखा एक ग्रुप आमच्या घरावरुन जाता येताना भंकस करतो. त्याला आवाज देतात, मोठ्याने चिडवतात"
एक तर तुम्ही सगळी माहिती लिहिली नाही (लिहायची की नाही हा तुमचा प्रश्न. किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत असं दिसतंय.
यात भावाचा काही दोष आहे, असं अजिबात सुचवत नाहीए.
अ‍ॅमींचा सल्ला योग्य वाटतो आहे. तुम्ही फक्त त्यांच्या तिसर्‍या सल्ल्याचा विचार करताय. पहिलाही तितकाच महत्त्वाचा आहे. मोठ्या शहरातल्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्टला भेटा. सेक्क्स्युअलिटी बाबत आणंइ सेक्स्युअल कौन्सेलिंग करणार्‍या.

सर्वात प्रथम तुम्ही स्वतःची काहीही अनुमाने काढू नका. आमच्याशी निट वागतो किंवा ऑफीसमध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सगळे ठिकच असणार वगैरे. तुम्हा भावा बहिणीचे नाते कसे आहे त्या नुसार त्याला विश्वासात घेवून सगळे विचारा. दोन सख्खी नाती आयुष्यभर समांतर वाहू शकतात आतली खळबळ घेवून. त्याच्या मनात चाललेली खळबळ तो तुम्हाला सांगत असेलच असं नाही. ते कौशल्याने विचारुन घ्या. नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजुन घ्या. समुपदेशाकडे जाणे मला तरी योग्य वाटते पण त्या अगोदर तुम्ही त्याचे समुपदेशन करा. तुम्ही वर जे लिहिलं आहे त्यावरुन मला तरी समस्या बाहेर नसुन ती घरातच आहे असे वाटते. तुमच्या भावापेक्षा तुमच्या वडिलांना खरी समुपदेशकाची गरज आहे. जे आहे ते काहीही चुकीचे नाही हे त्यांना पटवून द्या. स्विकारायला सांगा.
'याच्या बाबतित काहि झाले की धिर द्यायचा सोडुन त्यालाच बोल लावत बसतात.'
'आई फक्त कावरि बावरि होऊन बघत राहते.’
'गेला तर ब्रं होईल असा त्रागा करतात.'
ही वाक्ये खुप काही सांगुन जातात. यामुळे ऊभारी घ्यायची बाजुलाच, तो जास्तच खचत असेल. त्याचा कुटूंबावरचा विश्वासच उडून जाईल. बहुतेक त्याला आता घरच्यांचा फारसा विश्वास वाटत नसावाही. कारण वर तुम्हीच म्हणालात 'अलिकडे तो माझ्याशिही बोलत नाहि.' हे फारसे चांगले नाही. गुंता अजुन वाढतच जाईल. वर काही जणांनी सल्ला दिला आहे की उच्चभ्रु सोसायटीत रहायला जा. जमलं तर परदेशात जा. ऐकायला बरे वाटते पण ही पळवाट आहे. तुमची आर्थीक परिस्थितीही बेताची आहे असं लिहिलय तुम्ही. आणि त्यामुळे काय होईल? सुरवातीला त्रास थोडा कमी झाल्यासारखा वाटेल किंवा पुर्ण थांबल्यासारखा वाटेल. पण मग तुमच्या लक्षात येईल की त्रास बंद झाला नसुन त्याचा प्रकार बदलला आहे फक्त. वर प्रतिसादात लिहिले आहे की ही तुमची समस्या आहे समाजाची नाही. त्यांनी त्यात का लक्ष घालावे? पण समाज मग तो मध्यमवर्गातला असो वा ऊच्चभ्रू, हा प्रकार होणारच. तो समाजाचा स्वभाव आहे. त्यामुळे आहे तेथे राहून या समस्येवर योग्य व्यक्तींची मदत घेवून मात करता आली तर पहा.
परत महत्वाचे, आपण आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी आपल्या कुटूंबाच्या भरवशावर लढत असतो. काही झाले तरी माझी माणसे आहेत सावरायला हा फार मोठा आधार असतो. तुमच्या भावाला हे परत परत सांगा, नुसतं बोलून नाही तर कृतीतुनही की आम्ही आहोत. या साठी अगोदर आई-बाबांना व्यवस्थीत समजुन सांगा. बाहेर येणाऱ्या समस्येला त्यालाच तोंड देवूद्या, फक्त त्याला तेवढे सशक्त करा मनाने. मला व्यवस्थित नाही सांगता आले नक्की पण बरेचसे पोहचावे तुमच्यापर्यंत.

आपण आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी आपल्या कुटूंबाच्या भरवशावर लढत असतो. काही झाले तरी माझी माणसे आहेत सावरायला हा फार मोठा आधार असतो. तुमच्या भावाला हे परत परत सांगा, नुसतं बोलून नाही तर कृतीतुनही की आम्ही आहोत >>>> +११११११११११११११११

मी काही सल्ला वगैरे देणार नाहीये पण ह्या वरच्या दोन ओळींकडे खरेच लक्ष द्या. परीस्थिती कितीही कठीण असो, आपल्या माणसांची साथ खुप खुप खुप महत्वाची असते. अन ती आपल्या क्रुतीतुन दिसणे खुप गरजेचे असते नाहीतर नकळत गैरसमज निर्माण होतात दुरावा येतो. अन जर कोणी दुब़ळ्या मनाचा असेल तर नैराश्य देखिल येवु शकते.

अ‍ॅमींचे पहिले ३ सल्ले चांगले आहेत.शालींचा प्रतिसाद मस्त आहे.

माफ करा,इथे विचारण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या.भावाच्या आत्मविश्वासासाठी कौन्सिलरकडे त्याल घेऊन जा.

भावाला समजवण्याची/समुपदेशनाची गरज आहे त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांना देखील आहे.
आधी घरच्यांना समजवा मग बाहेर मस्करी करणार्‍या मुलांना.
शालींचा प्रतिसाद उत्तम आहे.

हुच्च्भ्रु समजात बुलिंग होत नाही अस का वाटतय लोक्सांना? लोक्स सगळिकडे सारखेच असतात. परदेशातही त्रास होणार नाही ह्याची काय गॅरंटी, भलेही प्रमाण खुप कमी होइल. इथे जर महिन्यात ४ प्रसंग होत असतिल तर मे बी परदेशात सहा महिन्यात एकदा होइल. तिथे अवेरनेस आणि थोडी प्रगल्भता जास्त आहे पण तिथेही रेसिस्ट आणि टवाळ लोक्स असतातच..

काही प्रॉब्लेम नसेल तर चांगलाच आहे. पण मला तरी अस वाटत आहे की लग्नाच्या वयात दाढी मिशा ना येन हा प्रॉब्लेम च आहे..

मला यातील खरंच फारस माहिती नाही.. पण तुम्ही सगळं ठीक आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणून स्वत:ची समजूत करून घेत आहात असे वाटत आहे..
देव करो आणि तुमच्या भावाला काही प्रॉब्लेम डिटेक्त न होवो .. पण तुम्ही डॉक्टर कडे जाऊन शहानिशा करणे गरजेचे आहे... प्रॉब्लेम असेल तर त्यापासून पळू नका.. स्वीकारा

एक प्राध्यापक होते. त्यांना तोतरेपणा होता. वर्गात आणि कॉलेजमध्ये जाता येता तोतरेपणामुळे हुल्लडबाज मुले टर उडवत. पण प्राध्यापकांनी त्याची फिकीर केली नाही. आपले शिकवण्याचे काम ते इमानेइतबारे करत राहिले. पण त्यांच्या तोतरेपणामुळे वर्गात नीट बोलता येत नाही या कारणास्तव लवकरच त्यांना कोलेज सोडावे लागले. पण माणूस डगमगला नाही. खाजगी क्लासेस सुरु केले. सुरवातीला कमी मुले जाऊ लागली. पण जी जात होती त्यांना कळत होते कि तोतरेपणापेक्षा या माणसाकडून शिकण्यासारखे खूप आहे. अभ्यास काय व कसा करायला हवा, अभ्यासात आवड कशी निर्माण होईल, नेमके कशावर फोकस करायला हवे, कसे लिहिले तर परीक्षेत मार्क्स मिळतात इत्यादींची या माणसाला प्रचंड जाण होती. या मुलांना त्यांच्या क्लासेसचा परीक्षेत खूप फायदा झाला. त्या मुलांनी मग अजून काही मुलांना क्लासेस बाबत सांगितले. पुढच्या वर्षी अजून जास्त मुले आली. अशा रीतीने काही वर्षातच यांचे क्लास खूप लोकप्रिय होऊ लागले. प्राध्यापकांमुळे ज्यांना चांगले मार्क मिळाले व ज्यांचे भले झाले त्यांनी आयुष्यात खूप मजल मारली. ते प्राध्यापकांना विसरले नाहीत. पुढे अनेक वर्षांनी याच क्लासेसचे कॉलेजमध्ये रुपांतर झाले. तिथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी धडपडू लागले. प्राध्यापक अजूनही तोतरेच होते. पण ती गोष्ट आता लोकांच्या दृष्टीने फार दुय्यम झाली होती. एकेकाळी वर्गात शिकवताना नीट बोलता येत नाही म्हणून कॉलेजने हाकलून दिलेला माणूस आज स्वत:चे कॉलेज चालवत होता.

तात्पर्य: प्रत्येकाकडे काही गोष्टी बलवान असतात तर काही दुबळ्या/वेगळ्या असतात. आपली शक्ती कशात आहे हे ओळखणे महत्वाचे. कोणाला चांगले शिकवणे जमते, कोणी चांगले नृत्य करू शकतो, कोणाला चांगले गाता येते, कोणाला चांगले पोहता येते, कोणी चांगली वाद्ये वाजवू शकतो. कोणाला बॉडी बिल्डींग चांगले जमते. कम ऑन. अनेक कौशल्ये आहेत. जे आपल्याला चांगले जमते ते ओळखून त्यावर फोकस करणे आणि त्या गुणांना खतपाणी घालून त्यांची जोपासना करणे हे महत्वाचे. कारण याच गोष्टी तुम्हाला आयुष्यात तारू शकतात. केवळ चार भुक्कड टवाळकी नावे ठेवतात म्हणून ज्या गोष्टी आपल्यात दुबळ्या/वेगळ्या आहेत तिथे सुधारणा करण्यात उर्जा घालवणे व्यर्थ आहे.

इतरही अनेक प्रसिद्ध उदाहरणे आहेतच जे इतरांपेक्षा वेगळे असूनही प्रचंड यशस्वी झाले आहेत:

प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन अंध होते.
जगप्रसिद्ध संशोधक स्टीफन हॉकिंगना वयाच्या विसाव्या वर्षापासून मज्जासंस्थेच्या दुर्धर रोगाने ग्रस्त होते.
अॅपलचा सीइओ टीम कूक समलिंगी आहे.

हि फक्त मला आता आठवलेली. अजूनही खूप सांगता येतील.

त्यामुळे माझ्या मते तुमच्या समस्येची व्याख्या बदला. तुमच्या भावाची समस्या "तो जिथे इतरांपेक्षा वेगळा आहे तिथे दुरुस्ती कशी करता येईल?" हि नसून "तो कशात प्रवीण आहे हे ओळखून त्या गुणांची जोपासना कशी करता येईल व ते त्याला पुढे कसे नेतील?" ही आहे. बाकी फडतूस टवाळखोरांकडे दुर्लक्ष करायला शिकणे हि पहिली पायरी.

प्रतिसाद आवडला शाली.

पण अबोलीने स्वतः त्याचे समुपदेशन करावे कि नाही याबद्दल शंका आहे.

भावापेक्षा वडलांनाच समुपदेशनाची जास्त गरज आहे हे अगदी मान्य. पण ६०+ वयाच्या, इतकी वर्ष घराचा कर्ता,decision maker राहिलेल्याला बदलणे कितपत शक्य आहे माहित नाही.

दोघे भाऊ-बहीण व्यवस्थित शिकले आहेत, कमावणारे आहेत, लेखातच "किंवा जरा पैसे खर्च करुन हाय सोसायटित घर घेतले तर तिकडे चिडवने तरी बंद होईल. मग कदाचित काहि काळ गेल्यावर त्याला बरे वाटेल असे वाटते." असे लिहिले आहे. म्हणून मोठ्या शहरात, उच्चभ्रू वस्तीत किंवा 'शक्य असेल तर' परदेशात रहायला जा म्हणले. जर तुमच्या (आणि इतर काहीजणांच्या) मते तिथे जाऊनही काहीच फरक पडणार नसेल... तर मग काय उपाय आहे हे मला माहित नाही.

===
> आपण आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी आपल्या कुटूंबाच्या भरवशावर लढत असतो. काही झाले तरी माझी माणसे आहेत सावरायला हा फार मोठा आधार असतो. > फारच असहमत! एवढेच इथे नोंदवून थांबते.

===
अबोली तुला आणि भावाला शुभेच्छा!

येथे लिहिणार्यानी आपण काय लिहितो ते पहावे ही विनन्ती. उच्चभ्रु असा शब्द आहे हुच्च्भ्रु नव्हे. तसेच लोक्स असा शब्दही मराठीत नाही. लोक हा शब्द अनेक वचनी आहे.

Genetic condition असावी त्याला. नोकरी करतो म्हणजे आतापर्यंत दाढीमीशी यायला हवी. स्त्रैण चेहर्याचा /देहबोलीचा पुरुष असणे हा जनुकीय आजार आहे बहुधा. Endocrinologist म्हणजेच संप्रेरक तज्ञांना दाखावा. ते पुर्ण hormonal profiling केल्यानंतर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील.
Endocrinologist असा सर्च गुगल सर्च देऊन बघा.

{फारच असहमत! }+१
आपल्याच कुटुंबाशी झगडण्यात आयुष्य खर्ची पडल्याची उदाहरणं आहेत.

भावाला समजावून सांगायच्या आधी तुम्ही त्याला समजून घ्यायची गरज आहे का हे तपासा.

अंगकाठी, बोलणंचालणं, इ. आणि लैंगिकता यांची समीकरणं इतकी पक्की नसतात.
एखादा macho man समलैंगिक असू शकतो.
आणि उलटही असतंच.
माझ्या आधीच्या प्रतिसादात मी हे नोंदवायला हवं होतं. Sad

येथे लिहिणार्यानी आपण काय लिहितो ते पहावे ही विनन्ती. उच्चभ्रु असा शब्द आहे हुच्च्भ्रु नव्हे. तसेच लोक्स असा शब्दही मराठीत नाही. लोक हा शब्द अनेक वचनी आहे.>>>
माहिती आहे, मी पुणेकर आहे. (अवांतराबद्द्ल क्षमस्व)

Pages