भावाला कसे समजावून सांगावे ?

Submitted by अबोलीशी on 5 August, 2018 - 12:00

माझ्या भावची समस्य आहे. आई वडील आणि आम्ही दोघ भाउबहिन असेच चार आहोत. आमचे घर खाउनपिऊन ठीक आहे.
आम्हि पहिल्यांदा ज्या ठिकानी राहत होतो ती लो मिडल क्लास वस्ती होती. तिथेच शाळेत गेलो. माझ्या भावात आनि माझ्यात एक वर्शाचं अंतर आहे.
दिसण्यात तो आईवर आनि मी बाबावर गेली आहे. मी पुरुशी दिसते तर भाऊ बायकी चेह-याचा आहे. लहानपनी फार प्रॉब्लेम नाही झाला. मला तरी अजून नाही. पन दहाविनंतर त्याचे मित्र त्याला चिडवायचे. त्या वेळि त्याला त्रास नाहि झाला. पन नंतर आजुबाजुच्या वस्तितले मुल पन त्रास देऊ लागले. भाऊ अगदि नॉर्मल आहे. पन सारखेच चिडवन्याने तो अस्वस्थ रहायचा.
मला असा त्रास कधि नाही झाला. उलट मि मामेभावाला जो पोलिस आहे त्याला घेऊन त्या मुलाना दम दिला. त्यानंतर बरे चालले. आम्हि विसरुन गेलो.
तो नोकरिला लागला. पन लग्नासाठि मुली नकार देत होत्या. त्याची काय चुक आहे यात ?
त्यामुळे पुन्हा तो गप रहायला लागला. दरम्यान आम्हि माझ्या क्वार्टर मधे रहायला आलो. इथे भावाला मित्र मिळाले. लग्न होत नसल्याने तो बाहेर जास्त रमायचा.
पन इथेही काहितरी झाले. कुनीतरी काहीतरी कमेन्ट केल्याने तो घराबाहेर पडेना झाला. फक्त ऑफिसला जाताना आनि येताना.
इकडेहि पुर्वीसारखा एक ग्रुप आमच्या घरावरुन जाता येताना भंकस करतो. त्याला आवाज देतात, मोठ्याने चिडवतात. मामेभावाला पोलिस तक्रार करु म्हटले तर तो म्हनाला पोलिसांना एव्हढा सेन्स नसतो. उलट एखादे वेळि तेच काहितरी असे बोलतिल कि..
इथे सिक्युरीटी आहे. पण ते मुलाना रोखत नाहित. कॉलनी कमिटीत तक्रार दिलि तर यात आम्हि काय करनार म्हनतात ?
त्यात वडिल संतापि आनि लवकर टेन्शन घेनारे आहेत. याच्या बाबतित काहि झाले की धिर द्यायचा सोडुन त्यालाच बोल लावत बसतात. आई फक्त कावरि बावरि होऊन बघत राहते. पूर्वि माझं ऐकत असायचा. अलिकडे तो माझ्याशिही बोलत नाहि.

या समस्येवर काय उत्तर आहे समजत नाहि. तो जिवाचे काहि बरे वाईट तर करनार नाहि या भीतिने आई आणि मि पन काळ्जित आहेत. वडिलांना शांतिने घ्या म्हटलं तर गेला तर ब्रं होईल असा त्रागा करतात. त्यांच्या मानात तसे काहि नसते. पन हताश मानसाचे बोलने असते ते. त्याने भावाला कसे वाटेल याचा पाचपोच त्यांना नाहि.

डॉक्टरकडे नेऊन काहि फरक पडेल का ? कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात ? माझी एक मैत्रिन म्हनते प्लास्टीक सर्जरीने रूप बदलते. पन त्याला खुप पैसे लागतात ना ? किंवा जरा पैसे खर्च करुन हाय सोसायटित घर घेतले तर तिकडे चिडवने तरी बंद होईल. मग कदाचित काहि काळ गेल्यावर त्याला बरे वाटेल असे वाटते.

मला काहि समजत नाहि. मी काय करु ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबोलीशी, समुपदेशक आणि मानसोपचार्तज्ञ हे दोन प्रोफेशन थोडे वेगळे असतात. समुपदेशक म्हणजे आपले counselor हो. २-३ try करा. एखादे तरी सापडतील चांगले. तुमच्या भावाचा आत्मविश्वास परत आणणं ही priority अगदी आता आजपासून ठेवा. कुठे राहाताय त्या जिल्ह्याचा नाव सांगा. आम्ही तुम्हाला काही counselors ची नावं सुचवू. Counselor तुमच्या आई बाबांना सुद्धा नक्कीच काही कानगोष्टी सांगतील.
भावाला Louisa Hay ची ही क्लिप दिवसभरात १५ वेळेस ऐकायला सांगा . trust me, this one is very reassuring.
https://www.youtube.com/watch?v=jbdB2ss1YLs&t=1167s

सर्वात प्रथम तुम्ही स्वतःची काहीही अनुमाने काढू नका. आमच्याशी निट वागतो किंवा ऑफीसमध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सगळे ठिकच असणार वगैरे.
>>> मलाही हेच म्हणायचे होते पण शाली यांनी नीट समजावले आहे.

शिवाय दाढी मिशी येत असूनही बाय चॉइस गुळगुळीत राहणारे लोक असतातच.(शेल्डनचे पात्र आठवले.)>>>
BBT मधला का, रच्याकने तो गे आहे.

होहो. शेल्डन चे लग्न झालेय त्याच्या पार्टनर बरोबर. (मला शेल्डन हा कलाकार न म्हणता ते सिरियल पात्र व्यक्तीमत्व म्हणायचे होते इथे.)

त्यांचा भाऊ गे नाही किंवा तृतीयपंथी नाही असे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे. त्यामुळे अशा चर्चा टाळलेल्या उत्तम. ज्यांची समस्या आहे त्यांना कसे वाटत असेल ?
आकाश तायडे या नावाने सर्च करून पहा. हा मुलगा नॉर्मल आहे. उपजीविकेसाठी त्याने वेगळी वाट धरली आहे. मात्र तो सहज आहे आणि आत्मविश्वास आहे त्याला.

वेल्ळात वेळ काढुन माहिति आनि सल्ले देना-या सर्वाचे मनापासुन आभार.
एखाद दुसरि कमेन्ट वाचताना अंगावर आलि असं वाटल. पन नंतर पटल. शेवटि उद्देश मदतिचा आहे. वडिलांचे चुकते हे मला कबुल आहे. त्यांच्यामुलेच तो असा झाला आहे अस मला पन वाटत. पन लगेच खालि म्हटल्याप्रमाने या वयात त्यांना कौन्सिलर कडे चला असं म्हननं अवघड आहे. त्यातुन आनखी काहि गुंता होईल.
अनेकांनि कौन्सिलर कडे जायचा सल्ला दिला आहे. मला पन वाटत ट्राय केला पाहिजे. मेल मधे पत्ते पन मिळाले आहेत. या सर्वांचे आभार. नाव घ्यायचे राहून जातेय त्याबद्दल सॉरी खरंच.
पुन्यात मावशि आहे. काका हेल्पिंग आहेत . त्यामुळ पुन्यात जमन्यासारखे आहे. त्यामुळ प्रॉब्लेम सुटावा असं वाटतं. पहिल्यांदा हे करुन बघू आम्हि.
सर्वांच्या शुभ इच्छां बद्दल आभार. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यानं धीर आला हे सांगावंस वाटलं. मी एकटि नाहि अशी भावना झालि.
आभार सर्वांचे.

मि निट माहिती दिली नाहि असे वाटले असेल तर मनापासुन सॉरि. कारण नेमके काय सांगावे हे नक्कि नव्हते. काय महत्वाचे आहे हे कलत नव्हते. इथे शेअर केल्याने त्याचि प्रॅक्टिस झाली.
भाऊ गे नाहि. थर्ड सेक्स पन नाहि. क्रॉस ड्रेसर पन नाहि आनि बायकि हावभाव पन नाहित. फक्त एकदाच दशावतार करताना सितेचा रोल केला होता. ते पन धार्मिक भावना म्हनुन. अध्यात्मिक कारनासाठि. तशि हौस नाहि. पुन्हा एकदा आभार सर्वांची.

अरे तो टायगर श्रॉफ , त्याला पण दाढी मिशा नाहीत असं त्याने स्वतःच सांगितलेलं. त्याचाही चेहरा बायकीच आहे. जिम मध्ये जाऊन छान बॉडी केलीये त्याने. तुम्हाला जो मार्ग सोप्पा वाटेल तो करून बघा . तुम्हाला आणि भावाला शुभेच्छा.

>> तो टायगर श्रॉफ , त्याला पण दाढी मिशा नाहीत असं त्याने स्वतःच सांगितलेलं. त्याचाही चेहरा बायकीच आहे. जिम मध्ये जाऊन छान बॉडी केलीये त्याने.

हाच योग्य मार्ग. आणि म्हणून माझ्या आधीच्या प्रतिसादात मी तेच लिहिलंय. इतरांपेक्षा वेगळेपण असणे गुन्हा किंवा कमीपणा नाही. आजूबाजूच्या लोकांच्या समाधानासाठी त्यांच्यासारखे होण्यात/दिसण्यात उर्जा आणि वेळ खर्ची घालण्यापेक्षा, आपल्यात जे कौशल्य किंवा सकारात्मक गुण आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांची जोपासना करण्यावर भर दिल्यास ते जास्त फायद्याचे ठरेल.

लहानपणी आम्हीही आमच्यातला एका मुलाला चिडवायचो. तो दिसण्यापेक्षा वागायला बायकी होता. नंतर एके दिवशी तो आईकडे खूप रडत गेला आणि घरातून बाहेरच पडणार नाही बोलला. त्याच्या वडिलांना हे प्रकरण समजले तसे त्यांनी येऊन सर्व पोरांना मजबूत दम दिला. एक दोन सॉफ्ट टारगेटना थोबडवला सुद्धा. पोरं घाबरली. त्यानंतर तो आमच्यातच खेळायचा पण त्याला कोणी चिडवले नाही. आजच्या तारखेला थोडीफार बॉडी पर्सनॆलिटी बनवून तो ठिकठाक दिसतो, वागतो. पोरांमध्ये मिसळतो. काही प्रॊब्लेम नाही. लग्नालाही अडचण येऊ नये असा आहे.

एक अनुभव आठवला तो शेअर केला. तुमच्या केसमध्ये ईतपत माहितीवर सल्ला देऊ शकत नाही, एक्स्पर्टही नाही. पण तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागणार आहेत.

१) जे काही बायकी वागणे, दिसणे आहे ते कमी कसे करता येईल वा शक्य तितके लपवता कसे येईल यावर काम करा.
२) मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा.
३) चिडवणार्‍या पोरांचा तात्पुरता बंदोबस्त करा. तात्पुरता यासाठी कारण १-२ वर काम केले की पुढे तितका त्रास होऊ नये.

चर्चा वाचल्या नंतर अस वाटते आहे की प्रोब्लेम फार मोठा नाही , त्याचा बाऊ केलेला आहे

लोकांकडे दुर्लक्ष करणे हे आहेच पण त्याला कोणत्याही छंदामध्ये गुंतवा , त्याच्या कला गुणांना अजून दारे उघडी करुन द्या , पुरुषार्थ म्हणजे केवळ धष्टपूष्ट शरिरयष्टी नाही तर त्याचे कर्तृत्व आहे हे त्याला समजावून सांगा , परिस्थितीपासून लांब पळणे हा उपाय नाही . जे काही करायचे इथेच कुटूंबासोबत राहूनच करा

Pages