तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे??

Submitted by कटप्पा on 27 July, 2018 - 15:26

आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?

आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?

माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.

आणखी एक गोष्ट तो करतो- एकाच दिवसात तो 2 पाउंड वजन कमी किंवा जास्त करून दाखवतो ( टॉयलेट ला न जाता)

तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे?????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा का मी ठरविले की मला आता यापुढे काही ऐकायचे नाही तर अगदी माझ्या कानाजवळ येऊन किंचाळले तरी मग बास मला काही ऐकूच येत नाही. >>> हे भारी आहे! हे जमायला हवं.

मला अगदी बारीकसे आवाजही आहेत त्याहून मोठ्याने ऐकू येतात. त्याने डोक्यात कधीकधी खूप कल्लोळ झाल्यासारखं वाटतं. यासाठी कानाच्या डॉक्टरलाही मी २-३ दा भेटले आहे. त्यांना कमी ऐकू येण्यावर काय करायचं हे येतं, जास्त ऐकू येण्यावर त्यांच्याकडे काही उपाय नाही.
अशी सुपरपॉवर असणारा कुणी कानाचा डॉक्टर असेल तर सांगा. Sad

एक मित्र आहे. तो जेवून आला असेल आणि जेवायचा आग्रह केला तर पुन्हा जेवतो. शिवाय श्रीखंड पुरी असे आयटेम मागून मागून घेतो. आणि एव्हढे करूनही दोन दोन दिवस पार्लमेंट कॉल आला नाही तरी काही बिघडत नाही त्याचे.

I will bite the bait nonetheless........ PROVE IT!!
Submitted by व्यत्यय
>>

मराठी भाषांतर प्लीज

मला अगदी बारीकसे आवाजही आहेत त्याहून मोठ्याने ऐकू येतात. त्याने डोक्यात कधीकधी खूप कल्लोळ झाल्यासारखं वाटतं.
>>>>

हे माझ्या गर्लफ्रेंडसोबतही होते. मी अगदी नखाला नखाने कुरतडत असलो तरी तिला पाच फूटावरून ते ऐकून ईरीटेशन होते. याचमुळे कितीही शांततेत जेवलो तरी तिला माझ्या तोंडाचा आवाज येतोय असे वाटून बडबडत राहते.

I will bite the bait nonetheless........ PROVE IT!!
Submitted by व्यत्यय
>>

मराठी भाषांतर प्लीज >>>>>
ङूग्ले त्रन्स्लेत

तरीही मी आमिष कापणे येईल ........ हे सिद्ध करा !!

कटप्पा बहुतेक माबो आयडींच्या सुपरपॉवर्स, न सुटणार्‍या सवयी, आयुष्यातले सर्वोत्तम निर्णय इ. इ. चा डेटाबेस बनवण्याच्या नादात आहेत वाटतं.

थोडं अवांतर.
ललिता - प्रीती misonia बद्दल वाचलं आहे का?
मला थोड्या कमी प्रमाणात आहे. हे नीट सगळ्यांना सांगेपर्यंत ' तुलाच कसा त्रास होतो? ' याची variations व्हायची.

माझ्या जीभेला चहाचा चटका बसत नाही. मी उकळता चहा पिऊ शकतो. पण गंमत म्हणजे दूध कॉफी पाणी वा ईतर कुठलेही गरम पेय तितके गरम पिऊ शकत नाही जसे चहा. काय लॉजिक आहे कल्पना नाही पण गरमागरम चहा सोसवतो.

घरी चहा उकळवून पिता येतो. पण बरेचदा ऑफिस वा कॉलेज कॅन्टीनमध्ये आधीच बनवून थर्मास किटलीत ठेवल असल्यास तो उकळता गरम नसतो. असा चहा तर दोन घोटात कप रिकामा करू शकतो.
कॉलेजला कॅन्टीनमध्ये आम्ही चहा मागवायचो तेव्हा असेच माझा चहा र्रपकन्न पिऊन मी शेजारच्याचाही त्याचे लक्ष नाही असे बघून एका घोटात संपवायचो. मग तो प्यायला जाताच एवढ गरम चहा क्षणात गायब कसा झाला या भूताटकीचे त्याला कौतुक वाटायचे. आणि मी साळसूद चेहरा करून बसलो असायचो.

मला अगदी बारीकसे आवाजही आहेत त्याहून मोठ्याने ऐकू ---रेडिओ/गाणी ऐकत झोपायचं/काम करायचं. तो आवाज ऐकायला येईल इतपत हवा. Ent should have suggested this. Spiritual solution - meditation. Manaache shlok works, listening to it.

कटप्पा बहुतेक माबो आयडींच्या सुपरपॉवर्स, न सुटणार्‍या सवयी, आयुष्यातले सर्वोत्तम निर्णय इ. इ. चा डेटाबेस बनवण्याच्या नादात आहेत वाटतं >>> Rofl

माझ्याकडे माझ्या (च) शरिराचे काही अंशी ॲडमिन ॲक्सेस असल्यासारखे कंट्रोल आहेत.
त्यात सगळ्यात वरचा नंबर लागतो, भूक नियंत्रण करण्याचा. स्वत:चर्या इच्छेने मी माझ्या भुकेला मर्जीनुसार स्विच मारल्यासारखे बंद करू शकतो. बर्याच वर्षांपासून माझी न्याहरी बंद आहे. फक्त दोनच वेळा जेवण करायचो, बाहेरुन काही ही खाणं पिणं नाही. हल्लीचे काही महिने अचानक मनात आल्यापासून दुपारच्या जेवणाला रामराम ठोकलायं.
परिणाम? माझा मेटाबोलिक रेट झपाट्यानं उतरलाय. डॉक माझं ९०-६० चा लो बीपी रेटींग पाहून भोवळ यायचा बाकी होता.
पण आश्चर्याची गोष्ट अशी की मला आत्तापर्यंत यांचा जराही त्रास झालेला नाही.

मी मनात आणलं तर कितीही गुदगुल्या सहन करू शकतो. एखाद्या सुपरव्हिलनने मला खांबाला बांधून त्याच्या हस्तकांकरवी कितीही गुदगुल्या करवल्या तरी माझ्यावर ढिम्म परिणाम होणार नाही.
वासावरून मीठ किती पडलंय ते ओळखायची पॉवर माझ्यातही आहे. पण मला वाटायचं कुठल्याही सुगरण व्यक्तिला ती असतेच!..??

वासावरून मीठ किती पडलंय ते ओळखायची पॉवर माझ्यातही आहे. पण मला वाटायचं कुठल्याही सुगरण व्यक्तिला ती असतेच!..??+१११११ फक्त मी इथे 'नेहमी स्वयंपाक करणारी/करणाऱ्याला असा बदल करेल. कारण मी काही सुगरण नाही तरीही मला वासावरुन मिठाचा अंदाज येतो.

मी अजिबात सुगरण नाही, नेहमी स्वैपाक करते पण मला वासवरूनच काय स्वतः खाऊन पाहिले तरी मीठ कमी असल्याचे कळत नाही कारण i don't care Lol

===
विलभ, नीट खात पीत जा. या अशा सवयीचा दीर्घकालीन परिणाम वाईटच असतो हे डॉक्टरने सांगितले असेलच. सध्या नसला तरी नंतर त्रास होतोच !

===
बाकी सगळ्यांच्या सुपरपॉवर मजेशीर आहेत Lol
माझ्याकडे नाही असलं कायपन Wink

माझी सुपर पॉवर म्हणजे मला 2 व्यक्तीतील साम्य फार पटकन
लक्षात येत. त्यांच्या लकबी / सवयी इत्यादींवरून चटकन सांगते बरेचदा बरोबर येते. शिवाय एकदा गेलेले रस्ते विसरत नाही.

विलभ, नीट खात पीत जा. या अशा सवयीचा दीर्घकालीन परिणाम वाईटच असतो हे डॉक्टरने सांगितले असेलच. सध्या नसला तरी नंतर त्रास होतोच !

>>
सल्ल्याबद्दल धन्यवाद :). पण फक्त स्विच बंद करणं माझ्या हातात आहे, ते परत चालू करणं मला अजूनतरी जमलेलं नाही. भूक नसताना काहीतरी खाणे ही कला अजून म्हणावी तशी अवगत झालेली नाही.

मी झोपताना घड्याळ बघते आणि मनाशी किती वाजता उठायचे ती वेळ डोळ्यासमोर आणते व झोपते. सकाळी बरोबर त्या वेळी आपोआप जाग येते.

आपल्याकडे कोणती सुपरपावर आहे या विषयी मी तासंतास विचार करुन शेवटाला आपल्याकडे कोणतीच सुपरपावर नाही या निष्कर्षावर येतो व परत देव प्रत्येकाला काहीतरी देतोच हा विचार करुन पुन्हा सुपरपावरचा विचार करत बसण्याची फाल्तु सुपरपावर माझ्याकडे आहे. पायजेल का कुणाला ???

रिया प्लस one.

आता तरी गर्लफ्रेंड पुराण बंद करा. दुसऱ्या धाग्यावर तुम्हीच खुलासा केला ना . लोक अजून विसरले नाहींयत.

मी एखादे पुस्तक किंवा कादंबरी एका दमात वाचू शकते तहान भुक झोप विसरून ( कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर झोप भुक तहान), उदाहरण शिवाजी सावंत च्या कादंबरी, पु ल देशपांडेची पुस्तके, मध्यंतरी amazon वरून अमीष ची मराठी version ची पुस्तके मागवलेली ती पन अशीच वाचून काढली.
मृत्युंजय, युगंधर बऱ्यापैकी मोठ्या कादंबरी आहेत मी सलग १० १२ तास खर्चुन वाचल्या आहेत.
हुशार लोक बोलू शकतात की समजुन घेउन अभ्यास करून वाचायला पाहिजे परंतू मला असेच वाचायला आवडते.

@ ShitalKrishna, मृत्युंजय, युगंधर बऱ्यापैकी मोठ्या कादंबरी आहेत मी सलग १० १२ तास खर्चुन वाचल्या आहेत. >>> तुमचं खरंच कौतुक वाटतेय. Happy

माझ्यातल्या गुण- दोषांऐवजी इतरांचे गुणदोष [ अगदीं इतरांच्या सुपरपॉवर्स सुद्धां] नेमके टिपायची सुपरपॉवर असावी माझ्यात . उदा. -

आजी, 'सुपरपॉवर' म्हणतात ह्यालाच ! अग, विनातक्रार ५०वर्षं
अशा खवडूस माणसाबरोबर संसार केलायस तूं !!!sorrry.jpg

Pages