तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे??

Submitted by कटप्पा on 27 July, 2018 - 15:26

आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?

आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?

माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.

आणखी एक गोष्ट तो करतो- एकाच दिवसात तो 2 पाउंड वजन कमी किंवा जास्त करून दाखवतो ( टॉयलेट ला न जाता)

तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे?????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मधले बोट न दुमडता पटापट मूठीची पुर्ण उघडझाप करू शकतो.
असे करणारा मला आजवर कोणी भेटला नाही Happy

तसेच मी एकापाठोपाठ एक खोट्या ढेकर न थकता शेकडोंच्या संख्येने देऊ शकतो.
असे ईतर कोणाला जमतही असेल. कल्पना नाही.

जागं राहाण्याची...
झोपेचं कठीणे माझ्या, कधीही कशीही कुठेही झोप लागणार्‍यांबद्दल आदरे...
मला आवाज, प्रकाश, गोंगाट इ असेल तर झोप लागत नाही. प्रवासात तर अजूनच उथळ असते; त्यातही बाय रोड प्रवास असेल तर मग अजिबातच नाही.

तुम्ही वर जे झुरळांचा वास लिहिलेय त्या टाईपमध्ये माझा एक मित्र आहे. फरक ईतकाच. त्याला मुंग्या दिसतात. म्हणजे अगदी चालता चालता तो मध्येच वाकतो आणि समोरची मुंगी मारून पुढे जातो. आम्ही नुसते अवाक होऊन बघत राहतो याला चालता चालता साडेपाच फूट उंचीवरून ती मुंगी दिसतेच कशी Uhoh

मी पाण्यासारखा, किंवा खरे तर बीअरसारखे म्हणा, चहा ढोसू शकतो.
माझा ३५-३६ चहा सलग प्यायचा रेकॊर्ड आहे. ते सुद्धा टाकीच संपली नाहीतर हाल्फ सेंच्युरी मारलीच असती..

मी स्वत:बद्दल न थकता तासनतास बोलू शकतो.
तसेच जर शांत राहायचे ठरवले तर कयामतचा दिन येईपर्यंत शांत राहू शकतो. जराही बोअर न होता.
टू ईन वन / बोथ वेज पॉवर म्हणू शकतो याला.

खोट्या ढेकरा मला पण जमतात. थोडी हवा जिभेने दाबून नरड्यात सारायची, पण गिळायची नाही आणि मग ढेकर द्यायची.

मी रात्री कितीही कडक चहा/कॉफी पिऊनही नेहमीच्या वेळेला गाढ झोपू शकते.विषकन्या असतात तशी मी कॅफेनटॅनिनकन्या आहे.

मी रात्री कितीही कडक चहा/कॉफी पिऊनही नेहमीच्या वेळेला गाढ झोपू शकते.विषकन्या असतात तशी मी कॅफेनटॅनिनकन्या आहे.

नवीन Submitted by mi_anu on 28 July, 2018 - 03:59>>>>+११११११

मी फक्त रात्रीच नाहीतर, कधी मनात येईल तेव्हा, चहा, कॉफी पिऊन झोपू शकते.

पण सगळ्यात मजेशीर म्हणजे जर कोणी खूप इरिटेट करत असेल वा कारण नसताना भांडत असेल अन एकदा का मी ठरविले की मला आता यापुढे काही ऐकायचे नाही तर अगदी माझ्या कानाजवळ येऊन किंचाळले तरी मग बास मला काही ऐकूच येत नाही.
मज्जा येते उलट कारण भांडणारी किंवा पकवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा बघण्यालायक असतो, तेच इरिटेट होतात कारण कोणी आपल्याला इग्नोर करतोय ही जाणीव भांडणापेक्षा जास्त जिव्हारी लागते बऱ्याचदा☺️

त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय. >>> हे तर फारच भारीए. Rofl

कारण कोणी आपल्याला इग्नोर करतोय ही जाणीव भांडणापेक्षा जास्त जिव्हारी लागते बऱ्याचदा☺️>>>>>
अगदी खरे, माबोवर काही id वर प्रयोग करून पाहिला आहे,
अलमोस्ट वर्क्स एव्हरी टाइम,
अलमोस्ट म्हटलंय कारण वरचा एक id दाद देत नाहीये अजून Happy

अलमोस्ट म्हटलंय कारण वरचा एक id दाद देत नाहीये अजून Happy
>>>>
सिंबा, मुळात ठरवून इग्नोर करणे असे काही नसतेच. ही प्रक्रिया सहज झाली पाहिजे. जसे प्यार किया नही जाता हो जाता है टाईप्स. तुम्ही ठरवून करता तेव्हा बॅक ऑफ द माईंड त्याच व्यक्तीचा विचार करत असता. जसे की तुमच्या वरच्या वाक्यातही त्या id चा उल्लेख आहे. मग हे इग्नोर कसे. अश्या इग्नोरमध्ये आपण स्वत:लाच प्रेशरराईज करून घेतो की मला या अमुकतमुक व्यक्तीला जाणीवपूर्वक इग्नोर करायचेय आणि हे त्याला जाणवले पाहिजे याचीही काळजी घ्यायचीय Happy

येनीवेज,
@ टॉपिक

मला दारू न पिता असंबद्ध बडबड करता येते. तसेच दारूच्या अंमलाखाली असलेल्या लोकांसारखे नाचताही येते. गणपतीच्या मिरवणूकीला मी नाचतो तेव्हा मला बाकिची पोरं शिव्या घालतात. कारण माझा नाच बघून बिल्डींगमध्ये चर्चा होते की पोरं पिऊन नाचत होती Happy

मला भाजित मिट नसेल तर वासा वरुन समजते कस महित नाहि पण मला कळते.
>>>>
हॅटस ऑफ !
मला तर अळणी हा प्रकार खाऊनही समजत नाही. खारट समजते पण लोकांना अळणी चव कशी समजते हेच मला कोडे वाटते. कधी अळणी जेवण असले आणि मी आधी जेवलो तर पुर्ण जेऊन होते. आणि आई जेव्हा जेवते तेव्हा मला बोलते अरे आज डाळ फारच अळणी झाली होती, कमाल आहेस बाबा कशी खातोस तू.. कळत नाही का तुला...
अळणी जेवण आवडीने खाता येणे याला फालतूची सुपरपॉवर डिक्लेअर करू शकतो का?

मी ऋन्मेष या id चे प्रतिसाद न ओलांडता मायबोली वाचू शकतो!
>>>
धन्यवाद Lol
धागेही ओलांडू नका. देव तुम्हाला या कार्यासाठी लागणारे बळ देवो Happy

माझ्यात लैच फालतू पावरी हायेत.

१. मला माझ्या फिल्डमधलं सोडून बाकीच्या सगळ्यातलं कळतं. माझ्या फिल्डमधलं काय विचारलं की मी वसकन अंगावर येतो.
२. मी स्वतः बिननावाने आणि तोंड लपवून वावरतो, पण नवा ड्युआयडी आला की त्याच्या मागे लागतो.
३. मी अंधारात लपून मारामारीचे आव्हान देतो आणि कुणी स्विकारले की पुढेच येत नाही.
४. एखादा मृत आत्मा पुन्हा मायबोलीवर आला की मी त्याचा वध कसा झाला हे पब्लीक पोस्टवर मजा घेऊन सांगतो. पण माझा वध अनेकदा कसा झाला हे कुणी सांगितले की मग रुसून बसतो.
५. मला बी ड्युआयडी वळिखता येत्यात, पर खटकत्यात ते फकस्त शत्रूपक्षाचं . आमच्या साईडचे ड्युआयडी हे वैध असतात असे मला वाटते ही माझी फालतू पावर आहे.

मला ड्युआयडी ओळखता येतात. अंदाज सहसा चुकत नाहीत.
Submitted by भरत
>>>>>

हे भारी आहे. मला तर झीनत अमान आणि परवीन बाबी मधील फरक कधी ओळखता आला नाही. त्यामुळे अश्यांचे कौतुक वाटते Happy

बाकी यावरून आठवले, मला स्वत:शीच गप्पा मारता येतात.
फार आधी म्हणजे ऑर्कुटच्या काळात कॉलेजला असताना त्या वयात आपण सोशलसाईटवर मुलींशी मैत्री गप्पाटप्पा करायच्या हेतूनेच यायचो. त्यामुळे गप्पांच्या धाग्यावर रमायचो. ऑर्कुट समूहातील त्या धाग्यांवर एका पेजवर 10 प्रतिसादच राहायचे. जसे ईथे 30 असतात. त्यात माझा टायपिंग स्पीड एवढा की 10 पैकी 5 प्रतिसाद माझे आणि ईतर 5 जणांचे प्रत्येकी एक. त्यामुळे मग एक आयडीया केली. माझेच 3-4 प्रोफाईल तिथे एकाच वेळी आणून गप्पा सुरू करायचो. थोड्यावेळाने मी स्वत:च विसरून जायचो की हे माझेच प्रोफाईल आहेत. रात्री सगळे झोपायला गेल्यावर थोडावेळ आपसातच बडबडत बसायचो Happy

डेडलाईन जवळ आलेली असताना, खूप काम असेल तेव्हा, सुपर पॉवर्स येतात माझ्यात .
(engineering capability )
मग मी खूप वेगात काम करू शकते, पूर्ण एकाग्रतेने , गाणी गात !
पण वेळेचे बंधन नसेल तर रेंगाळते, म्हणून माझी वीकडेस ला काम (घरची) पण फास्ट होतात Happy Lol
सुट्टी असली की आळशीपणाचा कहर करू शकते Lol

Pages