नवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी

Submitted by अस्मिता on 24 July, 2018 - 22:57

मराठी चॅनेल जगतात आणखी एक नवीन चॅनेल येऊ घातलाय तो म्हणजे सोनी मराठी!

ह्याचे 2 ते 3 प्रोमो आलेले आहेत आणि त्यावरून हे विषय छान असतील अशी अपेक्षा आहे!

https://youtu.be/YSt-cqlTK40

https://youtu.be/HqaR7wvj4x0

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती फुलराणी मध्ये मंजूला आधीच त्रास काय कमी होता म्हणून आता मूल न होणं वगैरे साईड ट्रॅक्स आणून चांगल्या विषयाची माती करत आहेत.>>>बरोबर... 2-3 episodes अगदीच boar होते.. नवीन काहीच घडले नाही.. पण insta वरचा हा promo पाहून जरा बर काहीतरी दाखवतील अस vattay

विहंगला विकास बद्दल कधी आणि कसं कळलं? डुप्लिकेट विकास आणि विहंग यांनी नाटक कसं आणि कधी रचलं? सध्या , म्हणजे डुप्लिकेट विकासची एंट्री झाली तेव्हा पासून बघितलं आहे मधेमधे, पण मधले बरेच भाग मिस झाले.

विहंगला विकास बद्दल कधी आणि कसं कळलं? डुप्लिकेट विकास आणि विहंग यांनी नाटक कसं आणि कधी रचलं? >>>
रेवतीची संस्थेची फाईल कपाटातून आणण्यासाठी विहंग त्यांच्या खोलीत जातो, तेव्हा त्याला विकासने लपवलेला त्याचा लहानपणीचा आश्रमातील फोटो आणि कृष्णा जंगम या नावाचं कार्ड मिळतं, तेव्हाच त्याला सत्य समजतं.
ते सत्य विकासने सर्वांसमोर कबूल करावं म्हणून तो त्याची कॉलेजमधील मैत्रीण स्वरा आणि तिच्या काकासोबत हे सर्व नाटक रचतो.

विहंगला जे सत्य कळतं ते एवढी वर्ष रेवतीला कळत नाही एका खोलीत राहून Uhoh खोटा कृष्णा चांगलं काम करतो. आजीने कमी मेकप केला पाहिजे. खरा कृष्णा कोण ते कळल्यावर मालिका संपली पाहिजे, फाटे न फोडता.

मी या आठवड्यात बने नाही बघितली, आख्खा आठवडा एक ट्रॅक त्यामुळे अंदाज आला. भे ला जी चा पण कंटाळा आला, त्या विकासला इतका इगो तर, झक मारुदे ना. विहंगने सरळ सांगायचं, बाबा तूच किस्ना आहेस हे माहीतेय मला. पण तुला तुझी ओळख सांगायची नसेल तर तुझी मर्जी, पण तू माझ्या मनातून उतरलास.

फुलराणीमध्ये मोहन आगाशे कोण असतात. मंजूचा नवरा कुठे नोकरी करतो. मंजूचा बाॅस आणि तो शिपाई छान आहेत. मंजूचा बाॅस जाड झालाय का. बनमस्कामध्ये बारीक होता.

हो , क्षितिश दाते त्याचं नाव, बनमस्का मध्ये त्याची आणि बापमाणूस मधल्या गीताची जोडी होती, नंतर कृष्ण बनून देवशप्पथ मध्ये लीड रोल होता त्याचा.

 पहीली बनमस्का. दुसरी देवाशप्पथ, त्यात कृष्ण. >> हो हो. बनमस्कामध्ये "चुंबक" म्हणायचे त्याला. पण मला तेव्हा तो फारसा आवडला नव्हता. पण देवाशप्पथमध्ये छान काम केलं त्याने. "मुळशी पॅटर्न"मध्ये पण आहे तो.

Ravi

Pages