नवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी

Submitted by अस्मिता on 24 July, 2018 - 22:57

मराठी चॅनेल जगतात आणखी एक नवीन चॅनेल येऊ घातलाय तो म्हणजे सोनी मराठी!

ह्याचे 2 ते 3 प्रोमो आलेले आहेत आणि त्यावरून हे विषय छान असतील अशी अपेक्षा आहे!

https://youtu.be/YSt-cqlTK40

https://youtu.be/HqaR7wvj4x0

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी year down पण बघतेय सद्ध्या. छान वाटतेय.
सुरुवात पाहिलेली नाही. पण जन्मेजय नाईकने (संतोष जुवेकर) इंजिनिअरींग अर्धवट सोडून वाईनरीमध्ये करीअर केलंय. एका वाईनरीचा मालक आहे तो. पण नंतर होणाऱ्या बायकोच्या वेदिकाच्या आग्रहाखातर की हट्टाखातर तो परत इंजिनियरींगला अॅडमिशन घेतो. मग या सगळ्यातली धावपळ आणि धम्माल. त्याला तिथे दोन खास मित्र आणि एक मैत्रीण पण भेटते. छान आहे सिरियल. आणि अभिनय छान करतायत सगळेच. Happy

हास्यजत्रामध्ये फार द्वयर्थी जोक आहेत, कधी कधी तर कृृतीसकट, सूचक वाटतील असे Uhoh त्या बुलेट ट्रेनमध्ये आशिष पवार हची भाषा बोलायचा तेही घाण वाटायचंं ऐकायला, हेे तर बरेच पुढे आहेत. वनिता खरात आवडते.

मी फ्क्त ह. म. बने , तु. म. बने बघते. ते फारच मस्त आहे. >>>>>>>> ++++++++१११११११ मस्तच मालिका आहे ही. उगाच कटकारस्थाने नाहीत, खलनायक नाही, सासू-सूनन, जावा जावा भाण्डणे नाहीत. प्रत्येक एपिसोडमध्ये एक चान्गला मेसेज असतो. मुख्य म्हणजे यात करियरिस्ट स्त्रीला ( राणी गुणाजी) उद्धट, घमेन्डी, किव्वा खलनायिका दाखवले नाहीये, जे इतर सिरियल्समध्ये दाखवतात. गृहिणीचे पात्रसुद्दा ( आदिती सारन्गधर) हटके दाखवलेय.

परवाचा आणि कालचा एपिसोड खुप मस्त होते. परवाच्या एपिसोड मधले वडिलांचे वागणे आणि समजुन घेणे फारच मस्त. कालच्या एपिसोड मधली सईची घालमेल फार मस्त.

एक फॉरवर्ड मेसेज
#क्षण एक हळवा...
तसा टीव्हीच्या मालिका पाहण्याचा माझा योग फारच कमी येतो(मात्र मालिका मला माहित आहेत बऱ्याचश्या!!)पण ताईकडे आल्यापासून काही मालिका नियमित पाहणं होतं.. त्यातलीच एक सोनी मराठी चॅनेलवरची "ह.म बने,तु.म बने"..कौटुंबिक मालिका..चौंकोनी,षटकोनी किंवा अगदी अष्टकोनी म्हणूयात अशी..नावापासूनच वेगळेपण जपणारी..
लेक आणि सुनांच्या नावाने सुरु होणारी घराची पाटी...हर्षदा मकरंद बने आणि तुलिका मल्हार बने..म्हणून ह. म बने,तू.म.बने!
घरातील रिडायर्ड आजी-आजोबा..खऱ्या अर्थाने रिडायर्ड लाईफ गुण्यागोविंदाने जगणारे,सुज्ञ..चतुर..हवेहवेसे!
मोठी सून हर्षदा नोकरी करणारी,धाकटी घर सांभाळणारी,मोठा मुलगा बँकेत तर धाकटा मुलगा स्वतःच्या व्यवसायात,पण अजूनही धडपडणारा..आणि यांची तीन मुले..दोन मुली आणि एक मुलगा!
ना कसला हेवादावा.. ना भांडणं..एकमेकांना अगदी समजून घेणारे (आणि यात कसलीही अतिशयोक्ती नाही,जेही मालिकेत दाखवतात,ते अगदी सहजतेने.!!)
......पण मुळामध्ये त्यांचे आपापसतले सामंजस्य हा माझा इथला मुद्दा नाहीये...तो एक विस्तृत लेखाचा भाग होईल.
मालिकेचा कालचा भाग हा इतर भागांपेक्षा खूप वेगळा होता..स्तब्ध करणारा..आणि डोळे ओलावणाराही!!
आणि खऱ्या जगातील कुठल्याही बापाला,ज्याला मुलगी आहे,त्याला हळवं करणारा..!!
.......ऑफिसच्या कामानिमित्त मोठी सून व एका लग्नानिमित्त धाकटी सून व सासू या तिन्ही स्त्रिया बाहेर असतात..घरामध्ये आजोबा आपल्या खोलीत व ऑफिसचं काम जरा लवकर आटोपलंय म्हणून घरी येऊन चादर घेऊन मस्तपैकी झोप काढणारा मोठा मुलगा मकरंद....हेच हजर असतात.
आणि तेव्हड्यात शाळेतून जरा लवकरच रेहा,मकरंदची मुलगी परत येते..भांबावलेली..घाबरलेली आणि रडवेली!!
कंबरेभोवती तिचाच यूनिफॉर्मचा कोट गुंडाळलेला...नजर आईला शोधतेय... शेवटी वैतागून शाळेची बॅग ती खाली टाकते आणि त्या आवाजाने मकरंद जागा होतो..अवेळी मुलीला शाळेतून आलेली पाहता तोही चक्रावतो.
आणि अरेरे..बाबा यावेळी नेमका घरात आहे,हे पाहून ती अधिक भांबावते.. अधिक रडवेली होते आणि पटकन बाथरूम मध्ये निघून जाते,त्याच्या विचारलेल्या प्रश्नांची काहीही उत्तरं न देता की... तू आत्ता शाळेतून कशी आलीस?काय झाले?
"काहीही नाही...माझं पोट दुखतंय..पाठ दुखतेय"बस्स..मागील पंधरा मिनिटापासून बाथरूमच्या आत असणाऱ्या तिचा आणि बाहेर असणाऱ्या बाबाचा हाच संवाद!!
...आणि अचानक त्याला काहीतरी जाणवतं. स्तब्ध होतो..आणि अगदी हळुवारपणे तो लेकीला विचारतो.."रेहा,बाळा..तुझं पोट दुखतंय...म्हणजे तुला...?"
आणि तेव्हड्याच हळुवारपणे ती म्हणते,"हो,बाबा..!"
.....आणि त्या क्षणाला तो अंतर्बाह्य थरथरतो..डोळे भरून येतात..आवाज कापरा होता..!
आपली लहानशी लेक "मोठी"झाल्याची जाणीव होते,त्या क्षणाला त्या बापाला! (इथे त्या कलाकाराचा अभिनय लाजवाब!!)
आणि हेही जाणवतं कि लेकीच्या आताच्या या अवघड प्रसंगात आपल्यालाच वेळ सावरायची आहे..आणि सुरु होते या बापाची धडपड..
बायकोच्या कपाटातून सॅनिटरी पॅड शोधून,सोबत लेकीला बदलायला दुसरे कपडे असं सारं घेऊन ते बाथरूमच्या बाहेर ठेवून व तिला सांगून तो खाली हॉल मध्ये जातो...तो तडक किचनमध्येच!
इंटरनेटवर शोधून या काळात मुलींना काय खायला द्यावे..काय precaution घ्यावी..काही प्रथमोपचार काय व कसे करावे..याची माहिती घेतो!
तिला पाय शेकायाला म्हणून पाणी गरम करतो..खायला गोडाचा शिरा..गरम दूध..फळं..!!
किचनमध्ये कुठे काय ठेवलंय..लायटर कुठे असतो,हे काहीही माहिती नसताना..धडपडत,भांबावत..हे सारं तो करतोच!
मधेच किचनमध्ये आजोबा येतात..त्यांना कॉफी हवी असते..एरव्ही त्यांच्या चिडचिडण्याला अगदी हसून प्रतिसाद देणारा हा..जरासा त्यांच्यावर वैतागतो...आजोबा अचंबित..हा असा काय वागतोय?
आणि तो त्याच्या बाबाला सांगतो.."बाबा,मी हे सारं रेहा साठी करतोय..ती..तिला..तिचं..!"त्याचे "नेमके"शब्द फुटत नाहीत...पण आजोबा "नेमका"अर्थ समजून जातात.आपल्याला कधी मुलगी झालीच नाही..म्हणून अश्या प्रसंगाला सामोरं कधी गेलोच नाही..याची जाणीव!
आपली नात..क्षणात मोठी झाली,याची जाणीव...प्रदीप वेलणकरांचा अभिनय ...अप्रतिम
बाबांनी दिलेली शेकण्याची पिशवी,खाण्याचे साहित्य..पाय बुडवून बसायला टब आणि गरम पाणी..हे सारं लेकीला देऊन..हा बाप तिच्याजवळ बसतो..आणि खऱ्या अर्थाने दोघात संवाद सुरु होतो.
"हे असं होतं बाळा,प्रत्येक मुलीला particular age मध्ये होतं.. थोडासा त्रास होतो..पण तो सहनही करायला हवा..आणि हे सारं निसर्गनिर्मित असतं.."
"हो,बाबा,हे सारं आम्हाला शाळेत शिकवलं पण असं अचानक..म्हणून मी जराशी घाबरले..!"
बाप हळुवारपणे तिच्या डोक्यातून हात फिरवतो..हातात हात घेतो..आणि तिची हि अवघड पहिली वेळ..स्त्रीत्वाची जाणीव तिला या कवितेतून सांगतो..कुणाची आहे माहिती नाही..पण अप्रतिम आहे.
या कळा नव्हे दुःखाच्या,
हितगुज तुझे हे स्वत्वाशी!
शापितांचे भोग नव्हे हे
पुण्याने भरली ओटी!
चार दिसांचा खेळ,
सृजनाशी ज्याचा मेळ!!
जरी चित्त सैरवैर, हि नवचैतन्याची वेळ!
घेई विसावा क्षणभर,निसर्गाशी जुळे नाळ,
सजे पालखी बीजाची, होई तू भाग्यवान!!
कुणी म्हणो हा विटाळ,म्हणो निषिद्ध हा काळ
सांग जगा तोऱ्यात,सृष्टीचे हे वरदान!!
कुणी काढता कोड्यात,कोडे त्यास थेट घाल,
कसा झाडाच्या फळाशी,
नाही बीजाचा विटाळ!!
खेळ झिम्मा पोरी आता,छेड सूर आनंदाचे,
तुझ्या कुशीत रुजले,गुपित हे विश्वाचे!!
कळी फुलू दे जराशी,मन होऊ दे हिंदोळा,
भान जन्माचे देतो,हा आनंद सोहळा!!

एव्हाना माझे व ताईचे डोळे भरून आले होते..भारावल्या सारखं झालं होतं..मुलीची पहिली पाळी, हि कुणाही आईसाठी एक विलक्षण हलवून व हरवून सोडणारी घटना असते..आपल्या लेकीत निर्माण झालेलं हे स्त्रीत्व पाहण्याची..तिला सावरण्याची..समजवण्याची..समजून घेण्याची वेळ असते.एक आई व एक डॉक्टर म्हणून मी हे चांगल्या प्रकारे समजू शकते...पण वरच्या या प्रसंगात आई कुठे नाहीच...आहे तो फक्त बाप!
आणि अजिबात स्वतः मुलीची"आई"न होता बाप राहूनच लेकीला समजून घेणारा हा बाप...अगदीच विलक्षण..हळवा!!
भाग्यवान असतात ते पुरुष..जे मुलींचे बाप असतात!!
या मालिकेतील या भागाबद्दल लेखक,दिग्दर्शक आणि कलाकार यांचे विशेष कौतुक!!
विशेषतः बापाची भूमिका बजावणाऱ्या कलाकाराचे..
चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली यातून त्याने जो बाप साकारलाय, त्याला तोड नाही....त्या क्षणाला तो कलाकार नव्हताच...होता तो फक्त बाप!!
डॉ विद्या डी निकाळजे (पुणे)

हा एपिसोड क्रमांक 118 , यू टयूब वर available आहे
https://youtu.be/1fs-kgdVxHA

मुलीला येणारी ऋतु प्राप्ति आणि घरी एकटा असणारा बाबा, आपल्या लाड़क्या लेकी साठी काय काय करतो ते अतिशय अलगद रित्या उलगडून दाखवल आहे.

मुलीला येणारी ऋतु प्राप्ति आणि घरी एकटा असणारा बाबा, आपल्या लाड़क्या लेकी साठी काय काय करतो ते अतिशय अलगद रित्या उलगडून दाखवल आहे. >>> + १११
तो भाग सुंदरच आणि कविताही उत्तम!!!
त्याच्या पुढच्या दिवशीचा पण सई आजोबांची काळजी करते , तो भागही छान होता, शेवटच्या संवादाने तर डोळे पाणावले.
सोनीच्या मालिका खूप वेगळ्या आणि छान आहेत, ह.म.बने -तु.म.बने तर उत्तम, हलकीफुलकी आहे , गंगाधर टिपरे सारखी.
सारे तुझ्याचसाठी, ती फुलराणी आणि भेटी लागी जीवा या मालिकाही वेगळ्या आणि मस्त आहेत Happy

इथले प्रतिसाद वाचून ह.म.बने -तु.म.बने चे काही एपिसोड्स युट्युब वर बघितले. मस्त हलकी फुलकी मालिका आहे.
मुलीला येणारी ऋतु प्राप्ति आणि घरी एकटा असणारा बाबा >>>> हा एपिसोड आवडला. मुळात हा विषय मराठी मालिकेच्या एपिसोडमध्ये असणे हेच कौतुकाचे आहे. त्यात सर्व पात्रांचे अभिनय, ती कविता मस्त.
झी च्या भिकार सासू-सुना छाप मालिकांशी कम्पेअर केलं तर फारच उच्च कोटीची मालिका आहे.

मला कॉमेडी शोज, डान्स शोज कुठलेही आणि कुठेही बघायचा कंटाळा येतो पण सोनी मराठीवर मी बने कुटुंब आणि भेटी लागी जीवा आवर्जुन बघते.

या महिन्यात channels निवडायची आहेत त्यात झी मराठी, झी युवा, कलर्स मराठी घेऊ का नको विचार करतेय. एकदा वाटतं की बघत नाही कशाला घ्यायची आणि दुसरीकडे वाटतं की मराठी ठेवावीत सर्व Lol

सोनी मराठी दोन मालिका आणि स्टार प्रवाहची स्पेशल 5 ही एक सध्या बघतेय त्यात योगेश सोमण आहेत म्हणून फक्त. पण कंटाळवाणी नाही तशी, गुन्ह्याची उकल लवकर करतात त्यात. अभिनय त्यात सर्वच चांगला करतात. अजय पुरकर dashing officer वाटतात.

ते कलर्स आणि endemol चे वादविवाद झालेत ना मागे त्यामुळे bb नक्की त्याच channel वर का दुसऱ्या काय माहिती.

बहुतेक पुढच्या महिन्यात सर्व मराठी channel घेईन असं ठरवतेय. फक्त मराठी पिक्चर्स दाखवतात ते नाही घेणार. बाकी हिंदी कुठलेच नाही घेणार.

भेटी लागी जीवा ही एकच मालिका सध्या व्यवस्थित ट्रॅकवर चाललेली आहे.
ती फुलराणी मध्ये मंजूला आधीच त्रास काय कमी होता म्हणून आता मूल न होणं वगैरे साईड ट्रॅक्स आणून चांगल्या विषयाची माती करत आहेत.
ह. म.बने खरतर छान, हलकी फुलकी मालिका पण सध्या या आठवड्यात मकरंदकचे आजारपण आणि हॉस्पिटलवारी यामध्ये जाम पाचकळपणा सुरुये, तो बघवत नाही.

Pages