नवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी

Submitted by अस्मिता on 24 July, 2018 - 22:57

मराठी चॅनेल जगतात आणखी एक नवीन चॅनेल येऊ घातलाय तो म्हणजे सोनी मराठी!

ह्याचे 2 ते 3 प्रोमो आलेले आहेत आणि त्यावरून हे विषय छान असतील अशी अपेक्षा आहे!

https://youtu.be/YSt-cqlTK40

https://youtu.be/HqaR7wvj4x0

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यक शाहरुखची नक्कल.
सोनी हिंदी सगळ्यात खाली/मागे आहे. मराठीचं काय होणार?

>>>सोनी हिंदी सगळ्यात खाली/मागे आहे
मला वाटलेलं की झी सगळ्यात खाली असावं
टॉप ५ हिंदी चॅनेल्स कुठली आहेत?

हिंदीमध्ये सध्या त्यांचं काय स्टेटस आहे ह्याची कल्पना नाही पण प्रोमोज वरून मला वाटतंय मराठी असू शकेल चांगलं..Let's see!

सुरु झाली ही वाहीनी म्हणून धागा वर काढला.

मी हृदयात वाजे समथिंगचा पहिला भाग बघितला. संवादलेखिका मायबोलीकर वल्लरी आहे. मला आवडले तिचे संवाद. शुभेच्छा तिला.

दुसऱ्या दोन मालिकेचे एकेक शॉटचं बघितले. आठ आणि साडेआठची. आठच्या मालिकेत मृण्मयी देशपांडेची बहिण गौतमी आहे आणि अंजली मधला हर्षद अतकरी आहे.

काल थोडेसे ह. म. बने, तु. म. बने बघितले. चांगले वाटले. प्रदीप वेलणकर, उज्वला जोग, त्यांची २ मुले, २ सुना, ४ नातवंडं.

२ मुले आणि ४ सुना वाचलं मी चुकून Happy चांगली वाटते ही मालिका प्रोमोवरून. विशेषत: वेलणकरांना हसताना बघून छान वाटतं नाहीतर नेहेमी ते मुलाचा नाहीतर मुलीचा संसार, लग्न, घटस्फोट यामुळे (पडद्यावर) गांजलेले असतात. ती बाॅक्सर मुलीचीपण चांगली असेल असे वाटते. अतकरी आवडतो. राज्य पुरस्कारही चांगले होते.

ती अस्मितावाली काम करते त्या सिरीयलचा एक शॉट बघितला अक्षय वाघमारे हिरो आहे, त्या दोघांनी छान अभिनय केला.

अतकरी अंजली किंवा दुर्वा मध्ये ठीक वाटलेला पण सारे तुझ्याचसाठीमध्ये जास्त चांगला वाटतोय. ह्याचा पण एक सीन बघितला.

सिरियल्स नवीन बघायला घ्यायची आता भीतीचं वाटते, आधी सुरुवातीला चांगल्या असतात नंतर मात्र इतक्या भरकटतात की बास रे बास.

पण आठ ला मानबा किंवा नंतर सुबोध भावेची बघण्यापेक्षा सोनीच्या सध्या बऱ्या दिसतायेत.

इथे वाचून ती फुलराणी बघायला सुरवात केली.... छान वाटतेय... सगळे actors पण मस्त acting करत आहेत.. अजून कोणती सिरियल चांगली आहे या चॅनलवर?

ह.म.बने तु.म.बने आणि भेटी लागी जीवा या दोन्ही मालिका चांगल्या आहेत.
अरुण नलावडे ब-याच दिवसांनी चांगल्या आणि वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.
सोने पे सुहागा म्हणजे त्यात समीर धर्माधिकारी पण आहे ना Happy

संतोष जुवेकर दिसला म्हणून एक भाग पाहिला Year Down चा, थक्क झालो हृषीकेश जोशी सारखे कलाकार प्रिन्सिपॉल म्हणून वाया घालवले आहेत. जुवेकरला इंजिनीरिंग ला M-३ ला कैक वर्षे KT लागली आहे आणि आता परत ऍडमिशन घेत आहे असे साधारण एपी च्या शेवटी कळले. पुढच्या भागात वर्गात मुले त्याला prof समजतात असे दाखवले. सध्या तरी पास .

ह म बने तु म बने सर्व भाग बघितले नेटवर. चांगली आहे. पहिला भाग आणि पाचवा भाग जास्त आवडले. सर्वांनी छान अभिनय केलाय. आदिती सारंगधर या आधी मला आवडत नव्हती फार काही पण यात आवडली. राणी गुणाजीची ज्वेलरी आवडली आणि साड्याही, ती छान कॅरी करते.

थँक्यु अंजूताई. मी हेच लिहायला आले होते. हृदयात वाजे समथिंग चे संवाद मी लिहितेय. मला तुमचे फीड्बॅक वाचायला आवड्तील...

हास्यजत्रा बघितलं थोडं. बुलेट ट्रेनचीच काॅपी वाटली. प्रसाद खांडेकर, समीर, भक्ती, अंशुमन, नम्रता आणि विशाखा ओळखीचे आणि आवडीचे.

सोनी मराठी युटूब चॅनलवर पण पूर्ण एपिसोड आहेत. युएस मध्ये २ दिवस उशीरा नेच बघता येतात. ही सोनीची नेहमीचीच पॉलिसी आहे...
चांगल्या वाटल्या बहुतांशी सिरीयल्स ...

सध्या मी ह म बने, तु म बनेचं बघतेय. ती पण नेटवर. भेटी लागीचे पाच भाग बघितले.

जुळता ची नायिका आवडली मला प्रोमोत. पण सिरीयल नाही एकही भाग बघितली.

हृदयात वाजे समथिंग पण क्वचित बघते, वल्लरीसाठी. तिचे डायलॉग आवडतात मला. पण फार नाही बघत. ते नायक, दोन नायिका फार काही आवडले नाहीत मला. त्यापेक्षा नायकाचे आई बाबा वगैरे इतर कुटुंब आवडलं.

जुजुजुकी (फार बै मोठं नावे) बघतेय सध्या. चांगली वाटतेय. हिरोच्या घरातले सगळे छान आहेत आणि तो दुकानातला मुलगापण जो वेगवेगळे मराठी काहीतरी लिहिलेले टीशर्ट घालतो. हिरो स्वभावाने फारच गोड आहे, अपूर्वाला खूप छान सांभाळून घेतो.

ह. म. बने, तु. म. बने - खूप मस्त आहे. त्यातले विषय खूप मस्त आहेत. टिपरेंची मालिका आथवते.

मी ह म ब ने तु ब बद्दलच लिहायला आले होते, अतिशय हलकीफुलकी आणि साधा सरळ सोपा सहज अभिनय सर्वांचा, त्यामुळे रोज बघते.

Tata sky वर हे channel सध्या दिसत नाहीयेय का ? १२२० या channel no. वर दिसायचं .पण आता channel not available असं येत..

1 ऑक्टोबर पासून दिसत नाही, टाटा स्काय आणि सोनीचा वाद सुरू आहे. किती दिवस जातील माहीत नाही. सोनी लिव app वर बघु शकता आवडती मालिका.

Pages