अ‍ॅपल-सिनेमन केक

Submitted by रूनी पॉटर on 24 March, 2009 - 21:57
apple cinneman cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१२५ ग्रॅम/अर्धा पाव/साडेचार औंस कणीक (१ वाटी)
१२५ ग्रॅम/अर्धा पाव/साडेचार औंस मैदा (१ वाटी)
१०० ग्रॅम साखर (३/४ वाटी)
१०० ग्रॅम किसमीस/बेदाणे
१२५ मि.ली. सूर्यफूल तेल किंवा असेल ते (अर्धी वाटी)
१२५ मि.ली. सफरचंदाचा ज्युस (अर्धी वाटी)
२ अंडी, फेटुन
२ सफरचंद, सालीसहीत किसुन
२ टी स्पून बेकींग पावडर
१ टी स्पून सिनेमन/दालचिनी पूड
मुठभर बदामाचे तुकडे (केकवर टाकायला, ऐच्छिक)
१ चमचा पिठी साखर ( केकवर भुरभुरायला, ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन आधी १८० सेल्सिअसला (साधारण ३६० फॅरनहाइट) गरम करुन घ्या. फॅन ओव्हन असेल तर १६० सेल्सिअस ला गरम करुन घ्या.
२. केक बनवण्यासाठी जे भांडे वापरणार असाल त्याला बटरचा हात लावुन घ्या. या केकसाठी ९"/२३ से.मी. वाले केकचे गोल भांडे पुरेसे होते.
३. एका भांड्यात कणीक, मैदा, सिनेमन पावडर, बेकींग पावडर एकत्र मिसळुन मग चाळुन घ्यावेत.
४. त्यात साखर आणि किसमीस टाकुन मिसळावे.
५. वरच्या मिश्रणात मध्यभागी एक खोलगट खड्डा करुन त्यात तेल, फेटलेली अंडी, सफरचंदाचा ज्युस, किसलेले सफरचंद टाकुन नीट एकजीव करावे.
६. हे सगळे मिश्रण केकच्या भांड्यात टाकावे वरुन बदामाचे तुकडे टाकावे आणि ओवन मध्ये ४०-४५ मिनीटे बेक करावे.
बेक केल्यावर सुईने किंवा टुथपिक ने ब्रेडला टोचुन बघावे, जर सुईला काहीही पीठ लागले नसेल तर केक तयार झाला असे समजावे. पीठ असेल तर अजुन ५-७ मि. बेक करावा.
७. बेक झालेला केक ओव्हन बाहेर काढुन ५ मि. निवु द्यावा आणि मगच भांड्याच्या बाहेर काढुन थंड व्हायला ठेवावा आणि त्यावर चाळणीने पिठीसाखर टाकुन सजवावे.

applecake.jpg

वाढणी/प्रमाण: 
८-१० लोकांना एकावेळी पुरेल.
अधिक टिपा: 

१. एवढे जास्त बेदाणे टाकायचे नसतील तर थोडे कमी घातले तरी चालतात.
२. मी वापरलेली वाटी पाव लिटर (२५० मि.ली.) पाणी मावेल एवढी होती.
३. शक्यतो अंडी फ्रीज मधुन काढून लगेच वापरण्यापेक्षा रुम टेंपरेचरला आणावीत आणि मग वापरावीत.
४. सिनेमनचा स्वाद खूप जास्त आवडत असेल तर अजुन थोडी पूड टाकायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
बीबीसी कुकबुक आणि त्यात मी केलेले काही बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पिठी साखर न भुरभुरताच केक जास्त आवडला होता दिसायला पण तसा केकचा फोटो काढायला विसरले. Happy

सुंदर दिसतोय केक!!
तुझ्या केक्सच्या रेसिपी मस्त असतात.. एकदम डिटेलवार, फोटोसहीत!
करून बघणार! Happy

रूपाली
मस्त दिसतोय केक. लेकीला पाठवते रेसिपी. मी पण करून बघीन.

छान आहे कृति. केकवर पिठीसाखर भुरभुरायच्या आधी कागदाची नक्षी करुन त्यावर ठेवायची आणि मग पिठीसाखर भुरभुरायची. असे केल्याचे छान डिझाईन तयार होते केकवर.

रुनी, केक खूप मस्त दिस्तोय. ह्या वीकएंडला करतेय. १-२ प्रश्ण :
ब्राऊन शुगर चालेल का?
सेल्फ रायझिंग पीठ असल्यावर बेकिंग सोडा किती कमी करावा?

केक छान दिसतोय. पुर्ण गव्हाचा करून पहायला हवा.

मृ,
मी सांगू का? सेल्फ रायसींग असेल नी दोन वाट्या पिठ असेल तर पाव चमचा ठीक आहे. नाहीतर भेगा पडतील. सोड टाकल्याने आणखी सोफ्ट होतो. (स्वनुभव). आणखी हलका नी स्पाँजी असेल तर क्रीम ऑफ टार्टर टाकायचे(पण हे त्या स्पाँज केकला चांगले. सेल्फ रायसींग साठी नको).
बेस्ट म्हणजे बेकींग पॉवडर नी सोडा कॉम्बो मस्त होते. पण पिठ आधीच सेल्फ रायसींग म्हणजे त्यात पॉवडर असतेच.

रूनी, मध्येच घूसून लिहिल्याने सॉरी. Happy

मृ, मी सांगू का? <<< आता ती नकोच म्हणाली असती तर काय तू सांगायची राहणार होतीस का ? :p

आणि तू ही असे काहीतरी कोणाच्या तरी पोस्ट मागे लिहायला थांबणार थोडीच. वेळ बराच दिसतोय.
अगदी सगळे कडे काहीतरी (पिंक) पोस्ट टाकत फिरणे चाललेय. Proud

ते व्हिएन्ना ट्रीप उरकली का?

LOL, पण मी विचारत नाही ना पोस्ट टाकू का म्हणून :p

मैदा नसेल वापराय्चा तर काय ऑप्शन आहे? विदाउट मैदा चांगला होइल का? आणी अ‍ॅपल ज्युस ला काही पर्याय आहे का?

WOW सही दिसतोय्....करुन बघावा म्हणतेय एकदा. Happy

लीनाज.
मैदा वापरायचा नसेल तर कणीक वापरता येईल बहुदा आणि जास्तीचा एक चहाचा चमचा (टी स्पून) खायचा सोडा घालावा लागेल. नुसत्या कणकेचा केक नेहमीच्या केक इतका स्पाँजी होणार नाही असे मला वाटते पण करुन बघायला काहीच हरकत नाही.
ग्लूटन अ‍ॅलर्जीसाठी मैदा/कणीक वापरायच नसेल तर ग्लुटनफ्री केकचे पीठ मिळते दुकानात ते वापरता येईल.
अ‍ॅपल ज्युस ला पर्याय म्हणजे संत्र्याचा रस चालू शकेल. किंवा ज्युस ऐवजी दूध घातलेले चालते का हे बघायला हवे करुन एकदा.

सह्ह्ही..
जबरी दिसतोय केक.. !!!!! एकूण डिसी त अ‍ॅपल बरीच स्वस्त झालेली दिसतायत.. अ‍ॅपल रेलिश, अ‍ॅपल केक...... Happy

लीनाज,
नुस्त्या कणकेचा होतो छान. पुर्ण कणीक घे. त्यात २ चमचे बेकींग पॉवडर एवजी, १ चमचा बेकींग सोडा + १ चमचा पॉवडर असं घे. अ‍ॅपल जूस एवजी अ‍ॅपल सॉस टाक. (सेमी स्वीट घे).
बघ होइल चांगला. Happy