रात्रपाळीचे शरीरावर होणारे परिणाम व ते टाळण्यासाठीचे उपाय

Submitted by मइंडी on 9 July, 2018 - 11:55

माझं वय २५ असून मी एक production अभियंता आहे. जवळ जवळ ५ वर्षापासून शिफ्ट मध्ये काम करतोय. बहुतेक रात्रपाळीत डोकं दुखणे, पचन न होणं किंवा साध्या साध्या गोष्टी विसरण्याचे प्रसंग येतात.
आपल्यापैकी भरपूर जणांनी रात्र पाळी दीर्घकाळ मध्ये काम केले असेल त्यांचे व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत वाचायला आवडेल.
रात्रपाळीत वारंवार चहा-कॉफी पिणे योग्य आहे का?
१०-२० मिनिटांची डुलकी जी पहाटे नियंत्रणाच्या बाहेर जाते तिचे काय करावे?
रात्रपाळी मुळे शरीरावर कोणते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात? (म्हातारे झाल्यावर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीत नाई, पण अर्ध रात्र पाळी सं ५ ते रा २ भाप्रवे (इएसटी टैम) गेले साडेचार वर्षे करतोय. जरा खाण्यापिण्याचं पथ्य पाळतोय तर फार कठीण नाही वाटत.

शरिरावर प्रतिकूल परिणाम होतातच कारण आपण शरिराला आवश्यक असलेली झोप घेत नाही, खाण्याचे नियन्त्रण/ ताळबन्द नसतो.
दिवसभरात छान व्यावस्थित (सरासती ८ तास) झोप घ्या.... झोपेच्या जागी अन्धार, शान्त राहिल असे वातावरण ठेवा (डोळ्याला काळा कापडाचा black sleeping eye mask).

अनेकवेळा रात्र पाळी केल्यावर हवी असलेली झोप दिवसा मिळत नाही.... २- ४ दिवस ठिक आहे, पण दिर्घकाळ नाही. सकाळी पाच वाजता पाय मोकळे करायला बाहेर जाणे जमेल का ? मदत होते.

नित्य नियमाने... रात्री ठराविक वेळेला आहार घ्या (पहाटे ४ वाजता)...

शिफ्ट कायमची रात्रीची असेल तर सोपे आही... पाण दर आठवड्यात बदलत असेल तर ज्याप्रमाणे शिफ्ट बदलते तसे स्वत:ला बदला.... बदल त्रासदायक आहे, सोपा नाही. पण सवय होते.

झोपमोड करणारे, आवाजी यन्त्र, मिक्सर, फोन, टॅबलेट घरात त्या काळात विचारपुर्वक, सय्यम्मने वापरा. घरच्या लोकान्चे (मित्र परिवाराचे) सहकार्य मिळणे तितकेच महत्वाचे आहे.

circadian rhythm बद्दल थोडी माहिती येथे बघायला मिळते.
https://en.wikipedia.org/wiki/Circadian_rhythm

मी ऐकलेय रात्रीची झोपच खरी. दिवसाच्या झोपेला अर्थ नसतो. किंवा तिची परीणामकारकता रात्रीच्या झोपेच्या निम्मी असते. म्हणजे दिवसाची आठ तास झोप ईक्वल टू रात्रीची चार तास झोप.

जाणकार प्रकाश टाकतील.

मी स्वता रात्री जागवणारा असल्याने चर्चा वाचण्यास उत्सुक आहे.
आताही पावणेतीन वाजलेत आणि 7 चा अलार्म लावला आहे. फक्त 4 तास झोप रोज घेतो. तीन ते सात !

फर्स्ट --- सेकंड --- थर्ड ---- फर्स्ट या सायकलमध्येच शिफ्ट चेंज असू द्या. अनेक जण फर्स्ट --- थर्ड --- सेकंड --- फर्स्ट अशा सायकल मध्ये शिफ्ट चेंज घेतात (फर्स्ट शिफ्ट संपून थर्ड सुरु होताना जो लाँग वीकेण्ड मिळतो त्याकरिता) जे शरीराकरिता अत्यंत चूकीचे आहे. बाकी डॉक्टर याविषयी जास्त अधिकारवाणीने सांगतील. वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत गणली जात असल्याने प्रत्येक डॉक्टराने त्यांच्या उमेदवारी काळात / इंटर्न्शिप मध्ये शिफ्ट ड्यूटी केलेली असण्याची शक्यता बरीच जास्त असते. आ.रा.रा. यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

दिवस आणि रात्र अशी रचना निसर्गाने केली आहे, झोप ही रात्रीच घ्यावी, रात्री जागून दिवसा झोपत असाल तर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जात आहात. त्याचे परिणाम तुम्हाला आज नाहीतर उद्या भोगावेच लागणार. आजारी पडल्यावर उपचार घेण्याऐवजी आजार होणार नाही याची काळजी घेतलेली उत्तम.

Change the job if you are not getting to work in day shift. I suffered from various health issues by working in night shift. So please dont compromise on health issues , look for new job.

सतत चहा कॉफी घेऊ नका. त्याने

सतत चहा कॉफी घेऊ नका. त्याने पित्त वाढुन डोके जाम दुखेल. उदय यांनी लिहीले आहेच. पण तरीही लिहीते, तुमच्या खाण्यात मोरावळा ( आवळ्याचा मुरांबा ) , मनुका , सफरचंदे, केळी, थंड दूध असु द्या. याने अ‍ॅसिडीटी कमी होते. रात्री पोळी ऐवजी भाकरी घ्या. पोळी पचायला जड असते. त्याने पोट पण गच्च भरते. रात्री दही खाऊ नका. आणी कारले, मेथी सारख्या पित्तकारक भाज्या रात्रीच्या जेवणात घेऊ नका. दिवसा वरण / आमटी- भात, पोळी, वेगवेगळी भाजी, सॅलेड असा आहार घ्या.

मी डॉक्टर नाही, पण माझ्या बाबांना सेम त्रास झाला होता तेव्हा डॉक्टरांनीच असा बदल सांगीतला होता. कारण वडील रेल्वेत असल्याने रात्रपाळी पण असायचीच.

शक्य असेल तर नोकरी बदला. पण तब्येत सांभाळा.

साधारण पणे ३५ पर्यंत काही जाणवणार नाही पण नंतर शरीर साथ देणार नाही. विशीमध्ये २ ते ३ वर्षे केलेलं दुर्लक्ष्य चाळीशी ५ ते ७ वर्षे लवकर आणते. तेंव्हा जपून.

मी फॅक्टरी township मध्ये लहानाची मोठी झाले. आजुबाजुला सगळे शेजारचे काका सकाळ (7ते 7) मधली (10am to 10पम) रात्र पाळी (9pm ते 9am) अश्या शिफ्टमध्ये फॅक्टरीत काम करणारे होते. एका मैत्रिणीच्या वडिलांची नेहमी रात्रपाळी असायची. असे shift duties चे त्रास हा कधी आजूबाजूला चर्चेचा विषय नसायचा. बहुतेक सगळे त्यात पण शिस्तबद्ध आयुष्य जगायचे.
बाकी, इतर व्यसनाधीनतेबद्दल काही बोलायचे नाही. ती शिफ्ट duties मुळे वस्तीला होती का ते कळण्याइतकी मी मोठी नव्हते.

नाईट शिफ्ट आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये व्हायच्या त्यात बहुधा एक छोटा कायदेशीर नॅप टाईम असावा.(त्याशिवाय ९ ते ९ कसे असेल?)
माझी एक नातेवाईक बी एस एन एल मध्ये करायची तिथे नाईट मध्ये काही काळ झोपता यायचे.बहुधा आळीपाळीने युनिट सांभाळायचे.
आता शिफ्ट ड्युटीज मध्ये हा झोपणे पार्ट नसल्याने प्लस बाकी आपली बिघडलेली आहार्पद्धती/रासायनिक खतं वगैरे मुळे जास्त त्रास होत असेल.

आपल्यापैकी भरपूर जणांनी रात्र पाळी दीर्घकाळ मध्ये काम केले असेल त्यांचे व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत वाचायला आवडेल.
<<
Lol
रात्रपाळी, तीही विचित्र व रोजची करणारा वैद्यकव्यवसायी दाखवून द्या. भेटायला आवडेल.

<< रात्रपाळी रोजची न करणारा वैद्यकव्यवसायी दाखवून द्या. भेटायला आवडेल. >>
चिक्कार आहेत. उदा. डर्मेटॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट

Boku bala,
Ata tumhi shikva amhala.
Ek ajar sangto. TEN. Google kara an skin walyala २४ hours ROTA kasa lagto te hi shodha.

अहो एक माणूस डोक्यावर पडला तर सगळी टीमच्या टीम येते का सीटी करायला? प्रायव्हेट दुकान उघडलं असेल तर मग तो प्रोप्रायटरचा प्रश्न.
भारता बाहेरची माझी फॅ. डॉ. रात्रपाळी करत असेल असं वाटत नाही. हॉ मध्ये काम करणारे डॉ. नर्स ऑफिस मधले सगळे आळी पाळीने ऑन कॉल असतात.

हॉ मध्ये काम करणारे डॉ. नर्स ऑफिस मधले सगळे आळी पाळीने ऑन कॉल असतात. १.

भारता बाहेरची माझी फॅ. डॉ. रात्रपाळी करत असेल असं वाटत नाही. २.

:डोके खाजवणारी भावली:

Anyways my point must be explained because it is becoming स्पर्शिका. I mean tangent.

Asking for advice about this ONE condition to the professional called doctor who has the worst workin eating resting hours, in fact life, in INDIA, is डॉक्टर लोकांची क्रूर थट्टा.

Western working hours are much more regulated but still one has to do night duties.

माझा समज काय आहे ते लिहितो. पुढच्या भेटीत विचारेन डॉ ला.
फॅ.डॉ. पेशंटना तपासुन फिजिकल करणे, सर्दी खोकला (आणि असंख्य फिजिकल, मेंटल इ. इ.) अशा लक्षणांवर ती फुटकळं आहेत का त्यामागे काही आहे हे बघायला चाचण्या करणे आणि पुढे काही दिसलं तर योग्य स्थळी पेशंटला पाठवणे हे काम करतो. हे काम ऑफिस आवर्स मध्येच चालतं.
अवेळी त्रास झाला तर अर्जंट केअर, इआर इ. असतात पण तिकडे माझी फॅ.डॉ. जात नाही (नसावी. कधी विचारलं नाहीये)
हे सगळं भारतात नाही याची कल्पना आहे. भारतात बरं नाहीसं झालं की डॉ . ना वेळी अवेळी फोन करतात... आणि डॉ. ही तो नंबर देतात. सो तुमच्याशी सहमत आहेच. पण रोज रात्रपाळी न करणारे दाखवुन द्या असं जनरल लिहिलंत म्हणून बोललो.

इथेही माझ्या सिनिओरिटी लेव्हल ला मी रात्री सहसा उठत नाही, ज्युनिअर्स पाहून घेतात.

पण तरीही शून्य रात्रपाळी असे होत नाहीच.

पोडियाट्रिस्ट
फिजिओथेरपिस्ट
ऑप्थाल्मोलोजिस्ट
हेमॅटोलोजिस्ट
ऑन्कॉलॉजिस्ट
सायकियाट्रिस्ट
न्युरॉलॉजिस्ट

तुम्ही "वैद्यकव्यवसायी" म्हणालात, "डॉक्टर" नाही. वैद्यकव्यवसायी म्हणजे डाएटिशियनपासून पोडियाट्रिस्टपर्यंत आणि फिजिओथेरपिस्टपासून नर्सपर्यंत सर्व येतात. Biggrin

अन पोडियाट्रिस्ट.

पाय कुठे आहेत तुमचे? हे डॉक्टर असतात का? >> Lol

युसेन बोल्टच्या पर्सनल पोडियाट्रिस्टला लागू शकत असेल रात्रपाळी ऑलिंपिक काळात Proud

रात्रपाळीत खरा त्रास रात्री ३ ते ६ या साखरझोपेच्या वेळेत असतो. २-३ वाजेपर्यंत निभावतो पण या वेळेत अवघड असतं. मी गेली २६ वर्षे शिफ्टमध्ये काम करतोय. त्यातील पहिली ६ वर्षे कायम नाईट केलेय. गोड पदार्थ, चहा कॉफी, बेकरी पदार्थ, जंक फुड पुर्ण बंद करा. प्रोटीन असलेले पदार्थ जेवणात वाढवा. संध्याकाळी २-३ किमी धावा अथवा वेट ट्रेनिंग करा. रात्री ८ च्या आत जेवण आटोपा.
रात्री ४ च्या सुमारास केळं वगैरे लाईट खा. सकाळी घरी आल्यावर ताक किंवा दुध पिऊन लगेच झोपा. खाऊ नका. दुपारी उठल्यावर ताकभात वगैरे जेवा. रात्रपाळीत चमचीत खाण्यावर नियंत्रण ठेवलंत तर जास्त त्रास होत नाही.
नाईट ड्राइव्ह करणार्‍यांनीही ३ वाजता गाडी थांबवून तासाभराचा नॅप घ्या. याच साखरझोपेच्या वेळेत अपघातांची शक्यता जास्त असते. नाईट ड्राइव्ह नको म्हणून पहाटे ४ वा. निघणार्‍यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमची झोप झालेली असली तरी समोरून येणारा रात्रभर जागा आहे.

नाईट ड्राइव्ह नको म्हणून पहाटे ४ वा. निघणार्‍यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमची झोप झालेली असली तरी समोरून येणारा रात्रभर जागा आहे.

-- नेहमीच पाळत आलोय. कधीही सहाच्या आधी घर सोडु नये. साधारन सहा वाजता रात्रभर जागलेले कुठेतरी शहर गावाच्या आडोशाला थांबून सकालचे कर्मे करत असतात.

गोवा, हैद्राबाद ला जाताना आम्ही रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान येणारे मुख्य शहर पाहून मुक्काम केला होता. सकाळी फ्रेश होऊन मग हायवेला लागलो होतो. गाडी चालवणारा ही फेश आणि नंतर मागे ताणून दिल्याने आम्ही सर्व डबल फ्रेश होतो. सकाळी उजाडताना रहदारी कमी असते हे पाहीले आहे.

सहमत.सध्या रिसेंट हायवे अपघाताच्या बातम्या सगळ्या 'नाईट' मारुन सकाळी डेस्टिनेशन च्या जवळ येताना ६-७ च्या सुमारास डुलकी लागून झालेल्या वाहन चालकांच्या आहेत.
तसेच गाडी बिघडली म्हणून नीट इंडिकेटर्स्/चिन्हं न ठेवता त्या गाडीच्या जवळपास्/मागे उभं असलेल्यांनी जीव गमावला आहे.
हायवे वर सगळे लवकर पोहचायच्या, स्पीड च्या मोड मध्ये असतात. अश्या वेळी कोणाला मदत करण्यासाठी रस्त्यात गाडी थांबवणे/स्वतःची बिघडलेली गाडी थांबवून त्याच्या दुरुस्तीत अ‍ॅक्टिव्ह पार्ट नसताना जवळ उभं राहून बघत बसणे या गोष्टी टाळाव्या. (मदत करा, पण आधी स्वतःचा ऑक्सीजन मास्क(म्हणजे स्वतःला गाडी उडवणार नाही इतकी काळजी घेऊन) लावून.)