झेन एस्टिलो घ्यावी का ?

Submitted by कल्पेश. on 1 July, 2018 - 07:21

नमस्कार मित्रानो,
चार चाकी घेण्याची इच्छा आहे पण नवीन गाडी घेण्याइतपत बजेट नाही आणि लोन घेवू इच्छित नाही. जुनी गाडी घेताना मारुतीच्या गाड्या मेंटेनेंसला स्वस्त आणि एवरेजला जास्त म्हणून त्यातील काही मॉडेल पाहिली. त्यापैकी झेन एस्टिलो आकर्षक आणि आधुनिक सोईने युक्त तसेच खुप किफायतशिर वाटते. पण अधिक माहिती घेता हे मॉडेल बंद झाल्याने असे स्वस्त मिळतेय हे लक्षात आले. तर ते घेण्यात काय धोके भविष्यात येवू शकतात.

पेट्रोल गाडी आणि १ लाखाच्या आसपास बजेट आहे. महिन्याचे रनिंग १००० ते १२०० किमी असेल, ह्यासाठी अजुन कुठले इतर पर्याय असतील तर तेहि जाणून घ्यायला आवड़तील. पण शक्यतो एस्टिलो बद्दलचे मत आणि माहिती हवीय. कारण गाडी स्टाइलिश अन् ऐस्पैस आरामशीर वाटते.

धन्यवाद

Group content visibility: 
Use group defaults

स्विफ्ट तर खुप आवडली पण किंमत फार पुढे जाते. एस्टिलोचे ड्रॉ बॅक सांगितले तर फाइनल निर्णय घ्यायला खुप मदत होईल.

धन्यवाद आरारा खुप छान लिंक दिलीत. डोळ्याखालुन घातली आणि डोक्यामध्ये जपून ठेवली.
धन्यवाद बिपिन चंद्र हर
फाइनली वैगनार घेतली Happy

Lol Biggrin

किती तो केविलवाना प्रकार...

अश्याने कुणाची खरी ओळख लपत नाही, १ तारखेला कन्फुज म्हनुन धागा काढला आनी ४ तारखेला लगेच सांगताय की घेतली गाडी