'संजू'च्या निमित्ताने

Submitted by रसप on 27 June, 2018 - 00:56

जेव्हा 'संजू' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हाच वाटलं होतं की टिपिकल संस्कारी पोलिसांकडून आज ना उद्या उलटसुलट प्रतिक्रिया येतील. तश्या आल्या आहेत आणि त्यांवर जिकडे तिकडे चर्चासुद्धा सुरु आहे.
अगदी अपेक्षित आर्ग्युमेंट्स केली जात आहेत. उदाहरणार्थ - असल्या फालतू माणसावर चित्रपट बनवावासं वाटणं, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपल्याकडचे प्रेक्षकच मूर्ख आहेत. ते असल्या नालायक माणसांना डोक्यावर घेतात. हॉलीवूडमध्ये अम्क्यावर चित्रपट बनतो, तमक्यावर बनतो आणि आपण कुणावर बनवतो ? 'संजय दत्त!' वगैरे

220px-Sanju_-_Theatrical_poster.jpg

इथे एक गोष्ट लक्षात आधी घ्यायला हवी.
संजय दत्तवर एक चित्रपट येतो आहे, त्याला काही 'भारतरत्न' दिलं जात नाहीय. आणि चित्रपट हा कशावरही येऊ शकतो, कुणावरही काढला जाऊ शकतो. बायोपिक आहे तो. एखाद्या पिसाळलेल्या जनावरापासून एखाद्या हलकट माणसापर्यंत कुणाही सजीवाच्या आयुष्याला एक 'कहाणी' म्हणून दाखवलं जाऊ शकतं. कारण मुळात, कुठलाही चित्रपट बनवण्यासाठी प्राथमिक गरज असते 'कहाणी'चीच. (अपवाद - सल्लूपट) प्रत्येक आयुष्य, मग ते एखाद्या संताचं असो वा गुन्हेगाराचं, एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते. मग तो अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असो किंवा कुणी सेलिब्रिटी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, कहाणी वेगळी.

दुसरं म्हणजे, ह्यापूर्वीही अनेक ह्याहीपेक्षा अट्टल आणि भयंकर गुन्हेगारांवर चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यात काही नवीनही नाही आणि नैतिक/ अनैतिक तर अजिबातच नाही. 'अ‍ॅण्टी हीरो' असलेलेही असंख्य चित्रपट येऊन गेलेले आहेत. १९४३ सालच्या 'ग्यान मुखर्जी' दिग्दर्शित 'किस्मत' चित्रपटाने सर्वप्रथम भारतीय चित्रपटाला अ‍ॅण्टी हीरो दाखवला होता. त्यानंतर १९७५ च्या यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' पर्यंत चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा अनेकदा लहान-मोठा गुन्हेगार असल्याचं दाखवलं आहे. अर्थात हे सगळे खूप गोड-गोजिरे, गोंडस चित्रपट होते. 'दीवार' मधला अमिताभचा विजय वर्मा एक un-apologetic गुन्हेगार असला तरी त्याला कठीण परिस्थितीने गुन्हेगार बनवल्याचं दाखवलं होतं. मात्र तरी तो 'हाजी मस्तान'वर आधारलेला असल्याचं लपलं नाहीच. शोले, शान सारख्या ब्लॉकबस्टर्समधूनही गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत दाखवलं गेलं. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'ने १९९८ साली खऱ्या अर्थाने गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत समोर आणलं. आपल्याकडचा पहिला 'निओ नॉयर' माझ्या मते 'सत्या'च. किस्मत, दीवार आणि सत्या, हे तीन चित्रपट 'गुन्हेगार' चित्रीकरणातले मैलाचे दगड आहेत. 'सत्या'नंतर भडक बिनधास्तपणे अनेकदा गुन्हेगारांची कहाणी चित्रपटांतून दाखवली गेली आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर - १ आणि २' सारख्या चित्रपटांतून इतके रक्ताचे पाट वाहिले आहेत जितका आमच्या मराठवाड्यात पाऊसही होत नाही ! राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत प्रत्येक सुपरस्टारने 'अ‍ॅण्टी हीरो' रंगवला आहे. ते एक आव्हानात्मक काम आहे.

Picture1_2.jpg

मात्र 'चरित्रपट' ह्या बाबतीत आपल्याकडचा चित्रपट आजही खूप बचावात्मक आहे. अनेक अनुकरणीय व्यक्तींच्या चरित्रपटांतही त्या त्या व्यक्तीचे अवगुण सफाईने झाकले, टाळले गेले आहेत. इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो.

काही दिवसांपूर्वी, मी 'हंसल मेहता' दिग्दर्शित 'ओमेर्ता' पाहिला. हा चित्रपट तर 'ओमर शेख' वर आहे. जो एक कन्व्हीक्टेड दहशतवादी आहे. माझ्या मते बायोपिक कसा असावा ह्याबाबतचा 'ओमेर्ता' हा आपल्याकडचा मापदंड असायला हवा. दिग्दर्शकाने फक्त एक कहाणी सांगितली आहे. कुठल्याही ठिकाणी कोणतंही स्टेटमेंट नाही. पूर्णपणे न्युट्रल. मला स्वत:ला 'संजू'बाबत 'ओमेर्ता' सारखी अपेक्षा नाही. कारण दोघांचं 'प्लेईंग ग्राउंड'च वेगळं आहे. 'संजू' हा स्पष्टपणे एक व्यावसायिक चित्रपट आहे. त्यात संजय दत्तची कहाणी सहानुभूती ठेवून दाखवली असल्याचीच शक्यता जास्त आहे.

But as I said, चित्रपटातून गुन्हेगार, गुन्हेगारीचं उदात्तीकरण नवीन नाही आणि गुन्हेगारावर चरित्रपट काढणंही नवीन नाही. चुकीचं तर अजिबातच नाही. चित्रपट हे एक 'स्टोरी टेलिंग' आहे. कुठलीही कहाणी, कुणाचीही कहाणी ही सांगता आली पाहिजे आणि सांगितली गेलीही पाहिजे. तो संजय दत्त असो वा ओमर शेख, पानसिंग तोमर असो वा मिल्खा सिंग आणि टाटा-बिर्ला-अंबानी असो वा रणजित पराडकर, त्या त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणूनच पाहायला हवं. पिढ्यांवर संस्कार करणे हे चित्रपटांचं काम नसून ते पालकांचं काम आहे. ज्या पिढीच्या लोकांनी संस्कारांचा कैवार घेतला आहे, त्यांच्याच मुशीतून संजय दत्त आणि सलमान खानसारखे लोक घडले आहेत. असे चित्रपट बनतात, तसे चित्रपट बनतात वगैरे कारणांसाठी कुठल्याही पिढीवर नेम साधणं किंवा सरसकट एखाद्या समाजाला दूषणं देणं, हाच खरं तर दुटप्पीपणा आहे, दांभिकपणा आहे. हिंदी चित्रपट बदलतो आहे. धाडसी होतो आहे. त्याचा प्रेक्षकही हळूहळू करत बदलत चालला आहे. परिस्थितीला दोष देण्याचं उदात्तीकरण तरी 'संजू'च्या ट्रेलर्समधून दिसत नाहीय, जे गेल्या ७५ वर्षांतल्या चित्रपटांत सर्रास दिसून आलं आहे.

एक कलाकृती म्हणून कुठल्याही चित्रपटाकडे तटस्थपणे पाहण्याची सवय जोपर्यंत एक प्रेक्षकम्हणून आपल्या नजरेला आणि बुद्धीला होत नाही, तोपर्यंत 'चांगले चित्रपट बनत नाहीत' असं रडगाणं गाण्याचा अधिकारही आपल्याला मिळायला नको, खरं तर.

टीप - 'संजू'चं पहिल्या दिवशीच्याच तिकीटाचं बुकिंग केलेलं आहे.

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2018/06/blog-post.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सद्या एक वॉट्सॅप फॉरवर्ड पण फिरते आहे तथाकथित संस्कृतीरक्षकांकडून की भारतीय जनता कशी मूर्ख आहे, अशा माणसावरच्या सिनेमाला १०० कोटींचे दान वगैरे देतील इ.इ.

निगेटीव्ह पब्लिसिटीचाही सिनेमाला फायदाच होतो हे कळत नसावे की काय?

पोस्ट लिहिणारा मूळ लेखक भारताचा नागरीक नाही की कॉय? Uhoh , चेक करायला हवे!

मस्त! मला संजय दत्त बिलकूल आवडत नाही. पण हा चित्रपट राजकुमार हिरानीचा असल्यामुळे पहावासा वाटतोय. खरं तर मला रणबीर कपूरही फारसा आवडत नाही पण काम चांगलं आहे असं ट्रेलरवरून वाटतंय.

छान आहे लेख!!

एक कलाकृती म्हणून कुठल्याही चित्रपटाकडे तटस्थपणे पाहण्याची सवय जोपर्यंत एक प्रेक्षकम्हणून आपल्या नजरेला आणि बुद्धीला होत नाही, तोपर्यंत 'चांगले चित्रपट बनत नाहीत' असं रडगाणं गाण्याचा अधिकारही आपल्याला मिळायला नको, खरं तर. >>> हे जरी पटले तरी चित्रपट बनवितानासुद्धा केवळ कथा सांगण्याच्या दृष्टीकोनातूनच बनविले पाहिजेत. बाकी संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट आला ह्यात काही नवल नाही. तो कसाही असला तरी खूप डायनॅमिक आयुष्य जगला आहे तो.

'संजू'चं पहिल्या दिवशीच्याच तिकीटाचं बुकिंग केलेलं आहे. >> परीक्षण नक्की लिहा इथे.

रणजीत,
मस्त अ‍ॅज युज्वल ! तुमच्या कडून रिव्ह्यु पण हवाच आहे Wink तुमच्या रिव्ह्यु वर आम्ही पिक्चर पाहावा कि नाही हे ठरत असते बर्याचदा Happy
बाकि मुद्दे पटले तुमचे
-प्रसन्न

हे जरी पटले तरी चित्रपट बनवितानासुद्धा केवळ कथा सांगण्याच्या दृष्टीकोनातूनच बनविले पाहिजेत.
>>>

हे शक्य नाही.
फिल्म ईण्डस्ट्रीमधीलच एक जिवंत व्यक्ती आणि पिक्चर बनवणारे त्याचाच मित्रपरीवार...

कसे शक्य आहे?

माझ्या अंदाजानुसार त्याचे छोटेमोठे दुर्गुण प्रामाणिकपणे कबूल करत मोठ्या चुकीला सॉफट कॉर्नर मिळावा हेच बघितले असणार..

म्हणजे ते दुनियादारीसारखे..
दिघ्या दारू पितो, लफडे करतो, पोरी फिरवतो... पण दिघ्या नीच नाहीये रे...

माझ्या अंदाजानुसार त्याचे छोटेमोठे दुर्गुण प्रामाणिकपणे कबूल करत मोठ्या चुकीला सॉफट कॉर्नर मिळावा हेच बघितले असणार..

>>

हो. मलाही तसंच वाटतं.
बादवे, 'मोठी चूक' म्हटल्याबद्दल धन्यवाद ! Hindsight एखाद्या कृतीला पाप, पुण्य, गुन्हा वगैरे ठरवणं प्रत्येक वेळी बरोबर असतंच असं नाही. काही वेळेस सर्वांगीण विचार करावा लागतो. 'संजू'मधून अगोचर ग्लोरिफिकेशन असेल तर ते तिरस्करणीयच असेल. मात्र जर घडलेल्या कृत्यांची पार्श्वभूमी सत्याच्या जवळ जाईल इतक्या कन्व्हीन्सिंगली मांडली असेल, तर विचार करण्यासारखी बाब असेल.
असो.
घोडा मैदान दूर नहीं. काय आहे, कसं आहे, ते मला रात्रीपर्यंत समजेलच !

रसप, तुम्ही परीक्षण लिहिणार होता ना त्याचे काय झाले? का चित्रपट पाहून एवढे भारावून गेलात की परीक्षणाचे विसरलात?

रसप, तुम्ही परीक्षण लिहिणार होता ना त्याचे काय झाले? का चित्रपट पाहून एवढे भारावून गेलात की परीक्षणाचे विसरलात?

नवीन Submitted by सूलू_८२ on 1 July, 2018 - 18:47

>>

आज पोस्ट करतो.. जरा वेळाने.

ईंग्लिश मध्ये आहे म्हणून सॉरी पण हे फिरतय “कसं काय“ वर.
तिथून साभार... कुठलीही पबलिसिटी द्यायची नाहीये तेव्हा तुमचे तुम्हीच ठरवा...

Rajkumar Hirani has actually written a love letter that says,.......
'Dear Sanju, no matter how hardened a criminal you are, no matter how grave your crimes are, no matter how big a womaniser or drug addict you are/were, I will whitewash all of your crimes. Trust me, I have experience. Ask around, in my last movie I tarnished and misrepresentated an entire religion of 700 million people with another bigot in leading role.
~Yours Truly since Munnabhai days'

Movie is such a hogwash, it's such a eulogy for a criminal that it's unbelievable..
It's certainly not a biopic, it's a 155 min advertising commercial of not a perceived, but proven and prosecuted criminal.

Apart from glaring falsification of facts, movie is shown celebrating a 3rd class lifestyle with such an elan that Richard Attenborough will be ashamed into making a pigmy of Gandhi in front of Sanju...

Hugely one sided communal angle given to everything. His father turned into a social worker and saint. Overtly communal don, while real mafia friends are muted...

The usual things between a father and son, normal exploits of drug addicts, starting level inconveniences of jailed criminals, pathetic acts of completely absent morality and grave irresponsibility towards family, love & friends is shown with melodramatic music and closer face shots, to make them groundbreaking and melancholically like that of Mother India...

Sanjay Dutt was a criminal and there are actually no positives about his life...

And No!!! No claptrap of how great his father was... His father, sister, friends and media, did what they had to, to cover up and give a lease of life to him..

Go on.. drop a tear or two while watching this piece of fiction by love struck Hirani..
But go through these links, which am giving below... Must read and watch...
Move on..

Top Cop interview
https://youtu.be/GBEcG029rVw

Top journalist interview
https://youtu.be/xIe9CkApPa0

Sanju's musing with mafia
https://youtu.be/1pp15RvvPe0

While original IE and Tehelka articles are not to be found on internet, following is the one
http://writingcave.com/what-sanjay-dutt-did-was-a-lot-more-than-purchasi...

माझे मत,

मूवी गुंडापासून ते कुठल्याही सजीवावर बनु देत की, आम्हाला काही नाही त्याचे, पण पोरगं मनाने किती चांगलं हो, आई नसल्याने बिघडलं हा सूर काढतील व मूवीत दळतील हेच खरे आहे असे मूवी पाहिलेल्यांकडून कळते.
आधी लिहिल्याप्रमाणे, व वाचले त्यावरून “ पोरगं आई वडील जिवंत असतानाच “वाया” गेलेलं आणि हे गळवे कशाला?
आणि आई नसलेलं , प्रत्येक मुल हे वाया जात नाही..’

सगळी भक्तगिरी आहे राजू हिरानी गँग...

झंपी + १
सर्व कलाकारांचा अतिशय उत्तम अभिनय पण कथा इतकी बाळबोध करून मांडली आहे की काही परिणामच होत नाही.

इथे एक गोष्ट लक्षात आधी घ्यायला हवी.
संजय दत्तवर एक चित्रपट येतो आहे, त्याला काही 'भारतरत्न' दिलं जात नाहीय. आणि चित्रपट हा कशावरही येऊ शकतो, कुणावरही काढला जाऊ शकतो. बायोपिक आहे तो. एखाद्या पिसाळलेल्या जनावरापासून एखाद्या हलकट माणसापर्यंत कुणाही सजीवाच्या आयुष्याला एक 'कहाणी' म्हणून दाखवलं जाऊ शकतं. कारण मुळात, कुठलाही चित्रपट बनवण्यासाठी प्राथमिक गरज असते 'कहाणी'चीच. (अपवाद - सल्लूपट) प्रत्येक आयुष्य, मग ते एखाद्या संताचं असो वा गुन्हेगाराचं, एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते. मग तो अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असो किंवा कुणी सेलिब्रिटी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, कहाणी वेगळी.>>>
problem तो नाहिये उदो उदो करण्याचा आहे,
एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते>> मग खरी कहाणी सांगा ना.

ते वरच्या फेसबुक व्हिडीओ मध्ये बोलणारे गृहस्थ कोण आहेत? अगदी मनोहर पर्रिकरांसारखे दिसतात,
मनोहर पर्रिकरांवर बायोपिक काढले तर यांना लीड रोल ऑफर केला पाहिजे.
तसेही, पर्रीकर एक पाय पलीकडे ठेऊन उभे आहेत, आत्ताच बायोपिक अनौन्स केले तर रिलीज च्या वेळेस सहानुभूतिच्या लाटेचा नक्की फायदा मिळेल .
होतकरू निर्माते, दिग्दर्शकांनी जरूर विचार करावा

दृश्यम मधले पोलीस अधिकारी म्हणजे योगेश सोमण.
श्री. मनोहर पर्रीकर यांच्यावरची कमेण्ट अतिशय घृणास्पद आहे. कृपया काढून टाकण्यात यावी.

मुळात पर्रीकर मरणाच्या दारात उभे आहेत , हे विधान चूक आहे का? >> जायचे तर सर्वांनाच आहे. पण कोणाच्या मरणाचा अशा प्रकारे खालच्या पातळीवर जावून उल्लेख करणे कसे जमते!

वेमा,
हे विधान काढून टाकावे ही विनंती!

सिम्बा, पर्रीकर एक पाय पलीकडे ठेऊन उभे आहेत, पर्रीकर मरणाच्या दारात उभे आहेत ही विधाने काढून टाका ही विनंती.
कृपया धन्यवाद.

sorry, सोनिया, अरविंद केजरीवाल यांच्या आजारपणावर पर्रीकरांनी टिप्पणी केली तेव्हाच त्यांनी आदर गमावला,
फार तर मी परीकारांच्या पातळीवर येऊन भाषा वापरतोय असे म्हणू शकता,
मला व्यक्ती म्हणून त्यांच्या बद्दल आदर वाटत नाही (नेता म्हणून काही प्रसंगी अजूनतरी वाटतो)

भाषा / टिप्पणी अप्रस्तुत वाटत असेल तर वेमा ते उडवातीलच,
मागोमाग इतर व्यक्तींचा झालेला गौरवास्पद उल्लेख त्यांच्या निदर्शनास आणून देईन, आणि लागे हात तो सुद्धा त्यांच्याकडून उडवून घेईन Happy

फार तर मी परीकारांच्या पातळीवर येऊन भाषा वापरतोय असे म्हणू शकता,>>>>>

तुम्ही तुमचा आब सांभाळा की.

इथे पर्रिकरांनी स्वतः येऊन संजूबद्दल काही लिहिले असते किंवा तुमच्याबद्दल काही लिहिले असते तर कदाचित कदाचीत प्रस्तुत वाटलेही असते. पण तसे नसताना, कुणीही पर्रिकरांचे नाव घेतलेले नसताना, इथल्या काही लोकांना झोम्बावे म्हणून वड्याचे तेल वांग्यावर काढताना तुम्ही तुमची जागाही दाखवून देताय.

Pages